Oct 27, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २५)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २५)

   सावी खरं तर मानसिक आणि शारीरिक दृष्टीने थकली होती आणि पोटात भर पडली तिच्या त्यामुळे आणि सोहमच्या सहवासामुळे ती कधी झोपेच्या आधीन गेली हे तिचे तिला ही कळले नाही. तो तिथेच सोफ्याच्या एका खुर्चीवर लॅपटॉपवर त्याचे काम करत बसला होता.दिवे लागनीची वेळ झाली आणि सोहम तिच्या जवळ जाऊन तिला उठवत म्हणाला.


सोहम,“ सावी उठ किती वेळ झोपणार अजून! बघ दिवस मावळला! उठ फ्रेश हो मी चहा करतो!” तो तिच्या केसातून हात फिरवत बोलत होता.


       सावीने अर्धवट डोळे उघडले आणि किलकिल्या डोळ्यांनी  पाहत सोहमचा  हात धरला. आज तिने जे अनुभवले ते स्वप्न होते की सत्य अजून ही तिला समजत नव्हते. ती डोळे उघडून पडल्या ठिकाणीच सोहमला एकटक पाहत होती. सोहमने मात्र ती  त्याला अशी का पाहत असावी हे हेरले आणि तो हसून पुन्हा तिला म्हणाला.


सोहम,“ उठा मॅडम हे स्वप्न नाही सत्य आहे आणि तुम्ही आज जे जे अनुभवले ते ही खरं होत.” असं म्हणून त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.


    सावी त्याच्या स्पर्शाने भानावर आली आणि उठून बसत इकडे तिकडे पाहत  म्हणाली. 


सावी,“ अरे मी तर तुला काय-काय फेकून मारले होते हॉल सगळा अस्थाव्यस्थ होता.तू आवरलस का सगळं?” तिने विचारले.


सोहम,“ हो मीच आवरलं! मी चहा घेऊन येतो   सावी!”तो उठून जात म्हणाला.


सावी,“ तू कशाला उचलले मी उचलले असतना शोना! मी करते ना चहा!” ती त्याचा हात धरून त्याला थांबवत म्हणाली.


सोहम,“ शोना बाप रे! आज खूपच प्रेम उतू चालले की! तू जा फ्रेश हो मी करतो चहा! आणि आता तू काही करायचं नाही समजले!” तो तिच्या जवळ बसत म्हणाला.


सावी,“  खरं तर तुला खूप मारायला पाहिजे सोहम पण ना!” ती त्याच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली.


सोहम,“ पण काय मग?” तो तिला पाहत म्हणाला.


सावी,“ पण ना  तुला मारलं तर मलाच लागेल because I love you!” ती डोळे मिचकावत म्हणाली.


सोहम,“ हो का हा तर नवीन शोध लागला की आज! बरं मी जेवण मागवलं आहे रात्रीच! चहा करतो आणि तुझ्या बाप्पा पुढे सांजवात ही!” तो हसून स्वतःला सोडवून घेत म्हणाला.


सावी,“ बरं कर मग!” असं म्हणून तिने टीव्ही लावला.


     सोहमने चहा करून आणला. तासा भराने जेवण आले.दोघे ही जेवले. बेडरूममध्ये सावी सोहमच्या मांडीवर झोपली होती. खरं तर त्यांना आज खूप काही बोलयच होत. म्हणूनच सोहमने आदित्यला सगळ्या गोष्टींचा कल्पना दिली होती आणि त्याच्या आई-बाबांना ती द्यायला सांगितली होती.म्हणून तर ते लॉजवर जाऊन थांबले होते आणि उद्या सकाळी येणार होती.

             सावी सोहमच्या हाताशी चाळा करत शांत पडून होती.सोहमने तिच्या केसातून हात फिरवत बोलायला सुरुवात केली.


सोहम,“ या एका वर्षात खूप काही घडलं ना सावी आपल्या आयुष्यात!” तो म्हणाला.


सावी,“ हो खूप काही घडलं आणि खूप काही शिकले मी!” ती म्हणाली.


सोहम,“ हो मी ही खूप काही शिकलो ग! Sorry for everything savi! खरं तर मी तुला असं एकटीला सोडून यायला नको होतं. तुझा झालेला तारा आणि माझ्या बद्दलचा गैरसमज मी तेंव्हाच दूर करायला हवा होतो.खरं तर तुझ्या मनात संशय निर्माण व्हायला ही मीच जबाबदार होतो आणि वरून तुलाच शिक्षा देऊन मी निघून आलो!” तो अपराधीपणे बोलत होता.


     सावी हे ऐकून उठली आणि त्याला बिलगून बोलू लागली.


सावी,“ नाही सोहम खरं तर चूक माझी होती. मी तुला एकांतात हे सगळं विचारायला हवं होतं.मी ते न करता पार्टित तमाशा केला.तुला नाही नाही ते बोलले तुला काय वाटेल याचा एकदा ही विचार मी नाही केला वरून तुला न बोलता दुसऱ्या दिवशी ऑफीसला निघून गेले.त्या दिवशी तुला आदित्यने नसले गाठले तर मी तुला कायमचे गमावले असते  

मी तुला इतकं हर्ट केलं की तू आत्महत्या… हा विचार करूनच माझ्या पोटात गोळा येतो!” रडत बोलत होती.


सोहम,“एक मिनिट तुला हे कोणी सांगितले आदित्यने ना पण कधी? त्याला तर ना..! त्याने मला प्रॉमिस केलं होतं की तो या बद्दल कोणालाही सांगणार नाही!” तो नाराजीने म्हणाला.


सावी,“ हो त्यानेच सांगितलं जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतास तेंव्हा तू तरी कुठं त्याला दिलेलं स्वतःला जपण्याचा प्रॉमिस पाळलेस रे! तुला हॉस्पिटलमध्ये त्या अवस्थेत पाहुन आणि मलाच वाचवताना तुझी ही अवस्था झाली आहे हे कळल्यावर त्याचा संयम संपला आणि त्याने सगळे सांगितले आम्हांला! सोहम मी तुला जे त्या पार्टीत बोलले ते खरं तर रागाच्या भरात आणि नशेत बोलले रे! पण तू माझ्या पासून लांब गेल्यावर मला तुझ्या अस्तित्वाची खरी किंमत तुझी  खरी किंमत कळली. तुला एक्सिडंट नंतर त्या अवस्थेत पाहून मी हादरून गेले आणि आदित्य कडून ते सगळं ऐकून तर मला धक्काच बसला! मी नाही गमवू शकत तुला आणि तुझ्या शिवाय मी नाही जगू शकत!” ती रडतच बोलत होती.


सोहम,“ अच्छा म्हणून आज सोडून चालली होतीस ना मला!” तो पुन्हा नाराजीने म्हणाला.


सावी,“ मग काय करणार होते सोहम मी? एक तर माझ्या मनात गिल्ट होत तुला मी खूप त्रास दिला आहे मला तुला अजून त्रास नव्हता द्यायचा!खरं तर मी तू हॉस्पिटलमध्ये होता तेंव्हा चौथ्या

दिवशीच निघाले होते.तुला एकदा पाहावं आणि जावं म्हणून मी टॅक्सी हॉस्पिटल समोर थांबवली. तुला I. C. U. च्या काचेतून पाहिले तर तू झोपला होता. तुला तिथूनच पाहून मी निघाले तर बाबांनी मला थांबवलं आणि मला जाब विचारला. त्यांच्याच सांगण्यावरून मी सहा महिने तुझ्या बरोबर राहायला तयार झाले खरं तर मला तुझा सहवास हवा होता आणि दुसरी गोष्ट मला आपल बाळ हवं होतं.पण बाबा आणि माझ्यात असं ठरवलं होतं की सहा महिन्यानंतर तुझा निर्णय अंतिम असेल! माझ्यामुळे तू मरणाच्या दारात जाऊन पोहोचला होतास सोहम!तुला मला आणखीन त्रास द्यायचा नव्हता.एक तर तू माझ्यावर येणारे संकट स्वतःवर घेतलंस तू काय स्वतःला सुपर हिरो समजतो काय? मूर्ख कुठला! आला मध्ये लगेच मला ढकलून रिकामा झाला! तुझी काय अवस्था होती तुला तरी माहीत आहे का? ते अट्टेचाळीस घंटे अट्टेचाळीस वर्षा सारखे काढले आहेत मी! तुझ्या  मला वाचवण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेने मी अजूनच खचले सोहम! माझ्या मनात गिल्ट होत म्हणून मी ठरवलं होतं की तू जर मला निघून जा म्हणालास तर निमूटपणे निघून जायचे तुझ्या आयुष्यातून! तुझी ती प्रतिक्षिप्त क्रिया मला मात्र खूप महागात पडली असती! माझं काय व्हयचं ते झालं असत पण मेले असते तर मी मेले असते! तुला कोण सांगितला होते नसता शहाणपणा! ” ती काहीशा रागानेच बोलत होती.


        सोहमने ते ऐकले आणि त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला आणि तो बोलू लागला.


सोहम,“शू sss  एक शब्द अजून बोलशील तर खबरदार! अग मुर्ख मुली मी म्हणालो की मी तुला वाचवणे हे प्रतिक्षिप्त क्रिया होती माझी! आणि तू लगेच विश्वास ठेवला! तू माझ्याशी कशी जरी वागलीस ना तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तू विसरतेस  सावी! मला कधीच तुला काही ही झालेले चालले नसते आणि चालणार ही नाही! मी तुझ्या दिशेने तो टँपो येताना पाहिले  तुझे मात्र त्याकडे लक्ष नव्हते आणि तुला सावध करायला ही उशीर झाला होता. म्हणून मग मी तुला ढकलून दिले. त्यानंतर तू मला फक्त ओझरती दिसलीस नंतरच मला काही आठवत नाही. मी जेंव्हा डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो! पण मी रागाच्या भरात तुला बोललो आणि तू विश्वास ठेवलास! खरं तर मी तुला तू ज्या दिवशी आजारी पडलीस आणि आदित्यने माझी कान उघडणी केली तेंव्हाच  तुला कुठे तरी माफ केले होते सावी! आणि उरली सुरली कसर तू जेंव्हा मला उशीर झाला तेंव्हा घाबरलीस तेव्हाच भरून निघाली. मी तुला रोमँटिक डेटवर घेऊन गेलो.तेव्हाच तुझ्या लक्षात यायला हवं होत सावी सगळं! मी तुझ्याशी चार महिने जे काही वागलो ते प्रेम नाही तर काय होत ग! मी फक्त तुला तोंडानी  सांगितले नाही इतकच कारण तू जे  माझ्या मग पुढं कारायचीस माझी इतकी काळजी घ्यायचीस ते मला आवडायचे आणि मला माहित होतं की जर मी तुला सगळं सांगितलं तर तुझ्यातली झोपलेली डॉमीनेटींग सावी पुन्हा जागृत होणार! ती ही मला खूप आवडते पण सध्या पुढे-पुढे करणारी आणि सतत मागेपुढे करणारी सावी मला आवडत होती.मी मुद्दामहुन तुला नाही सांगितले काही मला वाटलं होतं तू भांडशील मला पण  तू तर निघालीस तोंड घेऊन! तू एक नंबर बिनडोक आहेस सावी!” तो तिला हसून जवळ ओढत म्हणाला. 


सावी,“खरं तर मला तुझ्या वागण्याचा अंदाजच येत नव्हता सोहम! अच्छा म्हणजे मी तुझी काळजी घ्यावी तुझ्या पुढे-पुढे करावं म्हणून हे सगळं लपवलस का नालायका? मी काय तुझी काळजी घेत नाही का! मी काय म्हणून भांडायचे होते तुला सांग ना माझीच चूक असताना! खरं तर ना मी तुझ्या बरोबर आज यायलाच नव्हतं पाहिजे but I love you!” ती लटक्या  रागाने त्याला फटका मारून त्याला मिठी मारली.


सोहम,“that's  like my savi! मग आज नुसतीच भांडणार का मग रात्र भर?”त्याने सूचक नजरेने तिचा चेहरावर करून विचारले.


        सावी लाजून त्याच्या मिठीत शिरली. आज सावीच्या आयुष्यात पुन्हा नव्याने प्रेमाचा वसंत फुलला होता  आणि सावी सोहमच्या प्रेमाच्या पावसात पुन्हा एकदा चिंब भिजत होती.पण आजचा पाऊस खूप वेगळा होता. आधीच्या सहवासात तिला वाटणारी हुरहूर आता राहिली नव्हती आता ती निश्चितपणे सोहम बरोबर एका वेगळ्या अनोळखी प्रदेशात विहार करत होती. त्याच्या सुगंधी श्वासाने आणि स्पर्शने न्हाऊन निघत होती. आधी तिच्या मनात हे सुख आपल्या वाट्याला अजून किती दिवस आहे याचा विचार असायचा पण आज तेच सुख तिला कायमचे मिळणार आहे म्हणून ती मनातून सुखावली होती.सोहम मात्र तिच्यात अधिकाधिक  गुंतत जात होता. तो अधिकाधिक सावीमध्ये उतरू पाहत होता. तो ही आज खूप दिवसांनी मनाने मोकळा झाला होता त्याच्या मनातल्या भावना तो आज व्यक्त करून सावी वरचे प्रेम व्यक्त करून मोकळा झाला होता. त्यामुळे तो त्याच्या प्रेमाची मुक्त हस्ताने उधळण करत होता आणि सावी  ती प्रेमाची उधळण मुक्तपणे झेलत होती. 


     या सगळ्यात कधी  दोघे ही एकमेकांच्या बाहु पाशात अनावृत्तपणे  निद्राधीन झाले त्यांना ही कळले नाही. जेव्हा सावीला सकाळी जाग आली तेव्हा ती सोहमच्या बाहु पाशात होती. तो अजून गाढ झोपेत होता. सावीने त्याला पाहिले तर तो एखाद्या निरागस मुला सारखा तिला वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर रात्री मिळालेल्या सुखाचे समाधान आणि तेज विलसत होते. सावीला त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवण्याचा मोह आवरला नाही आणि तिने त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने अलवार  हात फिरवला! सोहम तिला झोपेत ही जवळ ओढत होता. सावी ते पाहून हसली. तिने स्वतःला त्याच्या मिठीतुन सोडवून घेतले आणि ती बाथरूममध्ये  गेली. तिच्या ही  चेहऱ्यावर तृप्तीचे तेज दिसत होते.ती तयार झाली तिने आठवणीने रात्री तिची बॅग गाडीतून सोहमाला आणून ठेवायला लावली होती. तिने छान  लेव्हेंडर कलरचा पंजाबी सूट घेतला होता.ती तयार व्हायला आरशा समोर बसली. तिला ती आज बऱ्याच दिवसांनी स्वतःला आरशात पाहत आहे असे  वाटून गेले. तिने केस  ड्रायरने वाळवले आणि विंचरून मोकळेच सोडले.टिकली लावताना तिला झोपलेला सोहम आरशातून दिसत होता. त्याच्याकडे अपचुकच तिचे लक्ष गेले आणि तिने एक निश्चिंततेचा एक सुस्कारा सोडला आणि पाणावलेले डोळे पुसून स्मित हास्य करत टिकली लावली. मंगळसूत्र नीट केले. आज तिला खऱ्या अर्थाने तिच्या चुकांची माफी आणि सोहमची पुन्हा एकदा साथ लाभली होती. 

      ती किचनमध्ये निघून गेली. एव्हाना सात वाजून गेले होते. तिने चहा केला नाष्ट्याची तयारी केली तो पर्यंत आठ वाजले. ते पाहून ती बेडरूममध्ये सोहमला उठवायला गेली कारण आज त्याने ऑफिसमधून सुट्टी काढली असली तरी आई-बाबा आणि आदित्य केंव्हा ही येऊ शकत होते.     


सावी,“ सोहम उठ आई-बाबा आणि आदित्य केव्हा ही येतील!” ती चहाचा कप टीपॉयवर ठेवून त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली.


सोहम,“ येऊ देत! ते काय पाहुणे आहेत का त्यांच स्वागत करायला!” तो अर्धवट डोळे उघडून तिचा हात धरून पुन्हा झोपत म्हणाला.


सावी,“ पाहुणे नाहीत ते मला ही माहीत आहे पण उठा साहेब तुम्ही कशा अवस्थेत झोपला आहेत ते तरी एकदा पहा!  आदित्य जर आला तर तुला झोपलेला पाहून तो सरळ बेडरूममध्ये घुसेल आणि तुला जर त्याने असं पाहिलं तर! तुझ्या बरोबर माझी ही लाज निघेल!” ती हसून त्याला हाताने हलवून म्हणाली.


       तिच्या तोडून आदित्यच नाव ऐकून सोहम खडबडून उठला आणि बेडला टेकून बसत म्हणाला.


सोहम,“ त्या आद्यला पहिल्यांदाच काही अक्कल नाही.आवरतो मी आता!”तो वैतागून म्हणाला.


सावी,“ ये माझ्या भावाची अक्कल काढायची तुला गरज नाही! स्वतःला बघ आधी असं झोपत का कोण?” ती त्याला चिडवत चहाचा कप  त्याच्या हातात देत म्हणाली.


सोहम,“ ये तुझ्या भावाची कौतुक नको सांगू मला! आणि तुला तर ना आता सोडतच नाही बघ! मला चिडवतेस काय?तुला दाखवतोच आता!” असं म्हणून त्याने तिला जवळ ओढले.


सावी,“ सोड बरं सोहम मला! मी आत्ताच आवरलं आहे!” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत  म्हणाली.

       सोहमने तिला जवळ ओढले व तो तिचा चेहरा निरखत म्हणाला.


सोहम,“ सावी तू या आठवड्यात खूपच थकल्या सारखी दिसत आहेस! मला वाटलं होतं तुला टेन्शन आलं आहे म्हणून कदाचित असेल पण आज ही तुझा चेहरा कोमेजला आहे! मला खरंच आता तुझी काळजी वाटत आहे!खरं तर काल तुला आरामाची गरज होते पण मला ते लक्षातच आलं नाही sorry!” तो काळजीने म्हणाला.


सावी,“ असं काही नाही रे आणि कालच म्हणशील तर मी कधीच ती रात्र विसरणार नाही सोहम कारण काल मला तू खूप काही दिलंस! हो मला अशक्तपणा जाणवत आहे but its ok अशा अवस्थेत असं होऊ शकत ना आणि आपण जाणार आहोत की आज क्लिनिकमध्ये!” ती त्याचा हात धरून म्हणाली.


सोहम,“ हुंम आज जाऊ आपण आणि तुला कुणी सांगितलं होतं इतक्या लवकर उठायला ग? आज पासून तू कोणतच काम करणार नाहीस समजलं तुला!” तो तिला दरडावत म्हणाला.


सावी,“ जो हुकूम मेरे आका!बघ चहा थंड होऊन गेला! तू जा आवर जा लवकर! मी  नाष्टा तयार केला आहे! आई-बाबा,आदित्य आत्ता  येतील!” ती त्याला उठवत म्हणाली.


सोहम,“ हो माझी आई आवरतो!” तो उठून म्हणाला.


      तो पर्यंत डोर बेल वाजली. सावीने जाऊन दार उघडले तर समोर तिघे हजर! सगळे आत आले आणि  सावीने सोहमच्या आईला पाहून त्यांना मिठी मारली आणि ती रडू लागली. सोहमच्या आईने नीताताईने तिला शांत केले आणि त्या बोलू लागल्या.


नीताताई,“ सावी कुठे आहे ग तो नालायक?तो आज खूप मार खाणार माझ्याकडून!” त्या जराशा रागानेच म्हणाल्या.


     तो पर्यंत सोहम हॉलमध्ये त्याच आवरून सावीला हाक मारत आला आणि निताताई उठल्या त्यांनी जाऊन सोहमचा कान धरला आणि त्या म्हणाल्या.


नीताताई,“ काय चाललंय रे बब्बू तुझं नेमकं? त्या बिचाऱ्या पोरीला किती सतवशील! कालच खरं तर तुझं कानफाड फोडणार होते पण आदित्य आम्हाला घेऊन गेला. कशाला इतकी नाटक केलीस रे नालायका?” त्या चिडून म्हणाल्या.


सोहम,“ आsss आई कान सोड आधी खूप दुखतोय! सांगतो की सगळं मी!”तो कान सोडवून घेत म्हणाला.


बाबा,“ बाब्बू तू ना! आज काल खूप शेफारला आहेस?” ते म्हणाले.


नीताताई,“मी सावीला घेऊन जाणार आहे तू राहा एकटा इथेच!” त्या सावीकडे पाहत म्हणाल्या.


सोहम,“ आई-बाबा ऐकून तर घ्या ना माझं!” तो रडकुंडीला येऊन म्हणाला.


आदित्य,“ काय ऐकायचे रे तुझे सोम्या! इतकी नाटक कशासाठी केलीस रे! काल मला फोन केलास म्हणून नाही तर मी सावीला घेऊन जाणार होतो आणि काय ग ये सावी आम्हाला म्हणालीस की तुम्ही पुढे व्हा मी येते आणि एअरपोर्ट गाठलस होय! कुठे निघाली होतीस एकटी?” तो रागाने बोलत होता.


सोहम,“अरे ऐक तरी माझे! अरे मला वाटलं होतं सावी माझ्याशी भांडेल पण ही तर निघाली! तरी मी हिच्यावर लक्ष ठेवायला  प्युवूनला सांगितले होते! आता सावी कुठे निघाली होती  ते तिलाच विचार बाबा!” तो स्पष्टीकरण देत म्हणाला.


सावी,“ sorry आदित्य! अरे मला काहीच सुचत नव्हते!” ती तोंड पाडून म्हणाली.


बाबा,“ बरं मग झाली ना समेट एकदाची सावी-बब्बू?” त्यांनी मिश्किलपणे पाहत विचारले.


दोघांनी ही होकारार्थी मन हलवली.


सोहम,“ तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती!” तो हसून म्हणाला.


नीताताई,“ म्हणजे सावी काय ग? आम्ही आज्जी-आजोबा तर होणार  नाही ना!” त्यांनी हसून विचारले.


       सावीने होकारार्थी मान हलवून  लाजून मान खाली घेतली  आणि सगळे खुश झाले.आदित्यने सोहमला आनंदाने मिठी मारली. 


बाबा,“ सावी अशा अवस्थेत कुठे निघाली होतीस बेटा! अग किती काळजी घायला हवी अशा वेळी! आणि काय रे बब्बू तुला आधीच माहीत होतं ना हे मग तरी तिला इतकं टेन्शन दिलंस!तुला अक्कल आहे का नाही!” ते चिडून म्हणाले.


सोहम,“ sorry!” तो म्हणाला.


बाबा,“ हे मला नाही सावीला म्हण आणि आम्ही घेऊन जात आहेत सावीला तू राहा एकटाच इथे! तुला शिक्षा तर मिळाली पाहिजे!”ते सावीकडे पाहत म्हणाले.


सोहम,“ बरं जा घेऊन मी नाही अडवणार मग तर झालं!” तो हसून म्हणाला.


सावी,“ बरं चला नाष्टा करा सगळे!”  ती म्हणाली.


    सगळ्यांचा नाष्टा करून झाला आणि सोहम बोलू लागला.


सोहम,“ बरं मी सावीला घेऊन क्लिनिकमध्ये जातो आहे. सावीची ट्रिटमेंट सुरू करावी लागेल.” तो म्हणाला.


निताताई,“ बरं! ठीक आहे.जा पण सावी कोमेजलेली दिसत आहे.” त्या काळजीने सावीला पाहून म्हणाल्या.


     सावी आणि सोहम डॉक्टर सिंगच्या क्लिनिकमध्ये गेले. डॉक्टर सिंगने सावीचे ब्लड रिपोर्ट आधीच पाहिले होते. त्यांनी सोहमला फोन केला आणि तिथेल्या एका गायनिकची सोहमला अपॉइंटमेंट घेऊन दिली होती पण त्या आधी त्यांला सावीच्या  ब्लड रिपोर्टवरती  सोहमशी सविस्तर चर्चा करायची होती. हे दोघे केबिनमध्ये गेले आणि डॉ.सिंगनी बोलायला सुरुवात केली.


डॉ.सिंग,“ मि.सोहम आपकी  वाईफ प्रेग्नन्ट हैं।लेकिन चिंता की बात ये हैं की इतके ब्लड रिपोर्ट कुछ अच्छे नहीं हैं। सावनी का हीमोग्लोबिन, प्लेट सेल्स और बाकी सब नॉर्मल से बहुत ही कम हैं और ऐसी हालत में ये ठीक नहीं। मैंने मिसेस सावनी को कहा था कि वो आपको ले के आए लेकिन वो छह  दिन हो गए लेकिन आई ही नहीं इसी लिए मैंने आपको फोन किया।   आपको जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी ट्रीटमेंट शुरू कर देनी चाहिए।  सोनोग्राफी और प्रॉपर ट्रीटमेंट चाहिए इसी लिए मैंने आपको गायनिक की अपॉइंटमेंट लेने को कहा। उनको मैं फिर भी फोन कर देता हूँ आप आज के आज वहाँ जाइए।” ते म्हणाले.


सोहम,“ ठीक हैं डॉक्टर आज की ही अपोइंटमेंट हैं।हम यहाँ से वही चले जाते हैं बस आप उनको फोन कर दिजिए!”सोहम म्हणाला.

    

         डॉ.सिंगने दिलेल्या पत्त्यावर  मेटर्निटी हॉस्पिटलमध्ये दोघे गेले. डॉ. मनजीत कौर यांची अपॉईंटमेंट घेतलेलीच होते. दोघे ही त्यांच्या अपॉइंटमेंटची वेळ आल्यावर त्यांच्या केबिनमध्ये गेले.डॉ. मनजीत कौर एक पन्नाशी पार केलेली अनुभवी गायनिक होत्या. त्यांनी सावीचे रिपोर्ट पाहिले आणि तिची सोनिग्राफी आणि बाकीच्या टेस्ट  करून घेतल्या. सोनोग्राफीचे आणि बाकीचे रिपोर्ट आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न सावीला आणि सोहमला विचारला.


डॉ.कौर,“ आपने इससे पहले अबॉर्शन कराया हैं क्या?” त्यांनी गंभीरपणे विचारले


सावी,“ जी हाँ!”तिने उत्तर दिले


डॉ.कौर,“ तब अबॉर्शन के बाद कुछ तकलीफ हुई थी आपको?” त्यांनी गंभीरपणे विचारले


सावी,“ हाँ हुई तो थी लेकिन उसका अब की प्रेग्नेंसी से क्या ताल्लुक हैं डॉक्टर?”तिने विचारले


       हे ऐकून सोहम सावीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिला.


डॉ.कौर,“ आप यंगस्टर्स की यही तो प्रोब्लेम हैं। आप लोक करिअर के पीछे भागते रहते हैं।  करिअर के लिए बिना सोचे समझे डिसीजन लेते हैं।लेकिन इसका क्या इंपैक्ट आपके बॉडी पर होगा इसकी आपको परवाह नहीं होती।”


सोहम,“ आप कहना क्या चाहती हैं डॉक्टर?”त्याने काळजीने विचारले


डॉ. कौर,“ मैं जो बताने जा रही हूँ आप दोनों ध्यान से सुनये! मिसेस सावनी साडे तीन महिनेकी प्रेग्नेंट हैं। बच्चे की ग्रोथ भी अच्छी हैं।लेकिन सावनी की बॉडी यह प्रेग्नेंसी सह नहीं पाएगी! इनकी प्रेग्नेंसी में बहुत सारी कॉम्प्लिकेशन्स हैं। ऊपर से खून की कमी! अगर आप ये बच्चा रखते हैं तो सावनी की जान को खतरा हैं!” त्या गंभीरपणे सांगत होत्या


सोहम,“ क्या?”तो काळजीने म्हणाला.


डॉ. कौर,“ हाँ आपकी मिसेस ये प्रेग्नेंसी सह नहीं पाएंगी! मेरी सलाह माने तो आप अबॉर्शन करवा लीजिए ओ भी जल्द से जल्द क्योंकि अगर और देर हो गई तो उसमें भी कॉम्प्लिकेशन्स बढ़ जाएंगे। और एक बात मुझे कहते हुए बुरा लग रहा हैं लेकिन ये बताना जरूरी हैं।” त्या गंभीरपणे बोलत होत्या.


सावी,“ और क्या डॉक्टर!”सावी डोळ्यात पाणी आणून म्हणाली.


डॉ. कौर,“ इसके बाद आप कभी भी माँ नहीं बन पाएगी! लेकिन आप ये बच्चा रखती हैं तो आप की जान को सीक्स्टी परसेंट खतरा हैं। अब फैसला आपका हैं आप क्या करना चाहिए हैं।”त्या म्हणाल्या.


सावी,“ ठीक हैं डॉक्टर हम आपको सोचके बताएंगे!”  सावी शांतपणे म्हणाली.


डॉ.कौर,“  ठीक हैं दो दिन में सोच के आ जाइए आप! तब तक मैं कुछ दवाइयाँ लिखकर देती हूँ!आप लेती रहिएगा!” त्या म्हणाल्या.


           सोहम हे सगळं ऐकून सुन्न होता.सावी मात्र खूपच शांत होती. सोहम गाडी सुरू करत सावीला म्हणाला.


सोहम,“ हे बघ सावी यात विचार करण्यासारखे काहीच नाही. मला कोणती ही रिस्क घ्यायची नाही आपण उद्याच अबोर्शन करून घेऊ! आणि   तुला पहिल्या अबोर्शन नंतर त्रास झाला होता हे तू मला सांगितले ही नाहीस!” तो काळजीने बोलत होता.


सावी,“ सोहम तेंव्हा तू घरी होतास कुठे तुला सांगायला! तू तर जर्मनीला गेला होतास आणि चूक तर माझीच आहे मी तुला न विचारता…..असो!” ती डोळे पुसत म्हणाली.


सोहम,“हे बघ सावी जे झाले ते झाले पण मला आता कोणतीच रिस्क नको आहे.आपण उद्या अबोर्शन करून घेत आहोत!” तो काळजीने म्हणाला.


सावी,“ तू ऐकलेस का नीट डॉक्टर काय म्हणाल्या मी आत्ता अबोर्शन केले तर मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही सोहम!” ती म्हणाली.


सोहम,“ नाही झालं तर मूल  चालेल सावी पण मला तुला कोणत्याच किंमतीवर गमवायचे नाही तुला कळतंय का या प्रेग्नसीमध्ये तुझ्या जीवाला धोका आहे सावी! यात खूप रिस्क आहे” तो काळजीने म्हणाला.


सावी,“ तू नीट ऐकलस का? डॉक्टर म्हणाल्या की साठ टक्के रिस्क आहे म्हणजे चाळीस टक्के रिस्क नाही!” ती शांतपणे म्हणाली.


सोहम“ are you out of your  mind?सावी नसता हट्ट मी तुझा पुरवणार नाही समजलं का?” तो आता चिडून म्हणाला.


सावी,“ हे बघ सोहम मला हे बाळ हवं आहे.” ती शांतपणे म्हणाली.

             

    या बोलण्यात घर केंव्हा आलं ते दोघांना ही कळलं नाही. सोहमच्या आईने दोघांना ही पाणी आणून दिले. सोहमचे बाबा आणि आदित्य ही तेथेच होते. हॉस्पिटलमध्येच दोघांना पाच वाजून गेले होते. दोघे ही पाणी प्यायले. त्यांनी सोहमचा उतरलेला चेहरा पाहून काळजीने विचारले.

  

 नीताताई,“ काय रे बब्बू चेहरा का उतरला आहे तुझा सगळं ठीक आहे ना?”


सोहम,“ काही ही ठीक नाही आई आज सावीच्या सगळ्या टेस्ट केल्या.डॉक्टरच म्हणणे आहे की या प्रेग्नसीमुळे  सावीच्या जीवाला धोका आहे. लवकरात लवकर अबोर्शन करून घ्या!” तो विमनस्क होऊन सांगत होता


नीताताई,“ काय बोलतेस काय बब्बू? हे बघ सावी बेटा आम्हाला तुझ्या पेक्षा कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही! तू  अबोर्शन करून घे!” त्या काळजीने म्हणाल्या.

     सोहमच्या बाबांनी आणि आदित्यने ही त्यांना दुजोरा दिला.हे पाहून सावी म्हणाली.


सावी,“ आई मी जर आत्ता अबोर्शन केले तर  मी कधीच आई होऊ शकणार नाही!” ती हे सांगून रडायला लागली.


     हे ऐकून सगळेच पंधरा-वीस मिनिटे शांत होते.सावीच्या हुंडक्यांचा आवाज फक्त ऐकू येत होता. शेवटी नीताताईंच काही तरी विचार करून म्हणाल्या.


नीताताई,“ अग म्हणून काय झाले तुझ्या शिवाय आम्हाला काहीच महत्त्वाचे नाही बेटा! आपण एखादे मूल दत्तक घेऊ!” त्या तिला समजावत म्हणाल्या.


आदित्य,“ अग सावी विज्ञान किती पुढं गेलंय तुला अगदी दत्तक मूल नको असेल तर सरोगेट मदरचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहेच की!” तो तिला समजावत  म्हणाला.


बाबा,“ हे बघ सावी बेटा तुझ्या जीवा पेक्षा आम्हाला काहीच महत्वाचे नाही!” ते म्हणाले.


सावी,“ तुम्हाला सगळ्यांना मीच दिसते का फक्त पण त्या जीवाच काय मी पहिल्यांदा हा मूर्खपणा अविचाराने केला आहे पण आता नाही माझ्या गर्भात बाळ असताना मी त्याला मारून दुसऱ्या पर्यायांचा विचार का करू! मी माझ्या आणि सोहमच्या बाळासाठी कोणती ही रिस्क घ्यायला तयार आहे! मला कोणत्या ही किंमतीवर हे बाळ हवे आहे!” ती चिडून म्हणाली.


      हे ऐकून सोहम उठला आणि सावीला जवळ जवळ ओढतच बेडरूममध्ये नेले आणि दार लावून घेतले आणि तिला तो हाताला धरून म्हणाला.


सोहम“ तू मुद्दाम करत आहेस का हे?तू का ऐकत नाहीस सावी? तुला माझा राग आला आहे का तर तसं सांग तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण असला जीव घेणा हट्ट करू नकोस सावी प्लिज!” तो आता डोळ्यात पाणी आणून बोलत होता.


सावी,“ काय तरीच काय बोलतो आहेस सोहम! तुझा राग का येईल मला? I love you!” ती त्याला मिठी मारत म्हणाली.


सोहम,“ मग ऐक ना सावी माझं! नको करूस असा हट्ट प्लिज आपण उद्याच जाऊन अबोर्शन करून घेऊ!” तो आता रडकुंडीला येऊन बोलत होता.


सावी,“  नाही सोहम मी नाही ऐकणार हे!मला हे बाळ हवे आहे आणि जर तू माझ्यावर अबोर्शनची जबरदस्ती करणार असशील तर मी निघून जाईल इथून!” ती ठामपणे त्याच्या पासून दूर जात म्हणाली आणि बेडरूम मधून निघून गेली.


          सोहम मात्र तिला हतबलपणे पाहत राहिला. आदित्य, सोहमचे आई-बाबा यांनी सावीला सर्वोत्तपरी समजावण्याचा प्रयत्न केला पण सावी कोणालाच बधली नाही. शेवटचा पर्याय म्हणून मग सोहमच्या आईने सावीच्या आईला बोलवून घेतले.


   सावी तिच्या आईचे ऐकेल का? तिचा हट्ट सोडेल का? पुढे काय होणार होते?     या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.


©Swamini (asmita) chougule