A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session0ed22047967e0928a379305b4721314c55d025139bdb77a3f2eb671815e6dbd564d000e7): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hamsfars part 21
Oct 29, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग 21)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग 21)

 

              असेच दोन महिने निघून गेले. जसजसे दिवस पुढे जात होते तशी सावीची मात्र घालमेल वाढत होती. तिला सोहम पासून दूरावण्याच्या विचाराने ही आता गलबलून येत होते. पण ती तसे बोलून मात्र दाखवत नव्हती.सोहम मात्र अगदी निवांत वाटत होता. जणू त्याचे सगळे ठरले होते.त्यांचे रोजचे रुटीन सुरू होते.

 

       नेहमी प्रमाणे सोहम ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. तो अंघोळीला गेला होता आणि सावी त्याचे ऑफिससाठीचे कपडे काढून ठेवत होती. तो पर्यंत सोहमचा फोन वाजला! फोन होता तारा सबनीस या नावाचा! नाव वाचून सावी दचकली पण ती सावरली आणि तिने फोन घेतला. तिकडून तारा बोलत होती.

 

तारा,“ हॅलो सोहम सर! कसे आहात तुम्ही तुमची तब्बेत कशी आहे आता?” ती म्हणाली.

 

सावी,“ अग सोहम वोश रूममध्ये आहे. तो आल्यावर मी फोन करायला सांगते त्याल तुला फोन करायला!” ती सहज म्हणाली.

 

       खरं तर तारा ही सावीचा आवाज ऐकून थोडी दचकली पण सावी इतकं सहज बोलत आहे पाहून ती ही रिलॅक्स झाली आणि बोलू लागली.

 

तारा,“ अहो इतकं ही काही महत्वाचे काम नाही मॅडम! तुम्ही कशा आहात आणि सर बरे आहेत ना आता त्यांचा अपघात झाल्याचे कळले. पण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात हे ऐकून खूप बरे वाटले मॅडम कारण तुम्ही दोघे माझ्यामुळे वेगळे झाला असतात तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते!” ती बोलत होती.

 

सावी,“ हो सोहम आता ठीक आहे तारा आणि जे झाले त्यात तुझी काहीच चूक नाही चूक असेल तर ती माझी होती बरं ते सगळं सोड तू कशासाठी फोन केला होतास?” ती म्हणाली.

 

तारा,“ अहो मी हेच सांगण्यासाठी फोन केला होता की माझे लग्न ठरले आहे आणि पुढच्या महिन्यात लग्न आहे. खरंच सोहम सर नसते तर माझे काय झाले असते काय माहीत? मी त्यांना कधीच विसरणार नाही मॅडम ते अगदी मोठ्या भावा सारखे माझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून आज मला एक चांगला जीवनसाथी मिळत आहे. खरंच मॅडम तुम्ही खूप लकी आहात. सोहम सर सारखा चांगला माणूस तुमचा नवरा आहे आणि ते खूप प्रेम करतात  सावनी मॅडम  तुमच्यावर!” ती कृतज्ञपणे सोहमचे भर भरून कौतुक करत होती.

 

सावी,“ अरे वा तारा congratulations and all the best for your bright future! आणि सोहमच म्हणशील तर he is a good human being and yes I am lucky to have him! I am always proud of him!” ती अभिमानाने म्हणाली.

 

तारा,“ मॅम तुम्ही दोघ ही माझ्या लग्नाला यायचं आहे! मी पत्रिका whs up करू की कुरिअर करू पत्ता घेऊन?” ती म्हणाली.

 

सावी,“ अग whs up कर सोहमला! कुरिअर वगैरे कशाला! आणि मी सांगते सोहमला फोन करायला!” ती म्हणाली.

 

तारा,“ ठीक आहे! काळजी घ्या मॅम सोहम सरांची आणि स्वतःची ही! तुमच्याशी बोलून खरंच बरं वाटलं ok By!” ती म्हणाली.

 

सावी,“ हो आणि मला छान वाटले तुझ्याशी बोलून ok by!” ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

 

        सोहम बाथरूममधून बाहेर आला.आणि त्याने विचारले.

 

सोहम,“कोणाचा फोन आला होता का? नाही म्हणजे तुझा बोललेला आवाज येत होता म्हणून विचारले!” तो केस पुसता पुसता विचारत होता.

 

     सावीने त्याला बेडवर बसवले आणि त्याच्या हातातील  टॉवेल घेऊन त्याचे केस पुसत म्हणाली.

 

सावी,“ अरे तारा सबनीसचा फोन होता! तिने  फोन करायला सांगितला आहे तुला! तिचे लग्न ठरले आहे आणि पुढच्या महिन्यात लग्न आहे” ती अगदी सहज सांगत होती.

 

       सोहम ताराचे नाव ऐकून दचकला आणि त्याच्या चेहरा पांढरा फटक पडला होता. पण सावी तिच्या बद्दल इतकी कशी सहज बोलत आहे याचं त्याला आश्चर्य वाटत होते. कारण त्याच्या मते  आत्ता पर्यंत सावीने तांडव घातला असता.  त्याने सावीचा हात धरला आणि तिला पाहिले.

      त्याचा आश्चर्य मिश्रित घाबरलेला चेहरा पाहून सावी हसून त्याचा हात धरून त्याच्या पुढे उभी राहत म्हणाली.

 

सावी,“ इतकं घाबरायला काय झालं सोहम! अरे मी नाही भांडणात तुला!( तो अधिकार तरी कुठे आहे मला आता ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली)” ती सहज बोलत होती.

 

सोहम,“ सावी खरच मला तुझे वागणे कळत नाही!” तो आश्चर्याने म्हणाला.

 

सावी,“ खरं तर मला या विषयावर तुझ्याशी बोलायचे होते. पण वेळच नाही मिळाला! आज तू ऑफिस मधून आल्यावर बोलू आपण या विषयावर आणि प्लिज टेन्शन नको घेऊन आवर आता नाश्ता थंड होतोय!” ती असं म्हणून निघून गेली.

 

      सोहम मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता. त्याने नाष्टा केला. टिफिन घेतला आणि ऑफिसला निघून गेला.सावीला नॉर्मल पाहून तो बुचकळ्यात पडला होता. त्याला सावीच्या वागण्याचा अंदाज येत नव्हता. त्याचे मन ऑफिसमध्ये ही आज लागत नव्हते. सावी आज आपल्याशी काय बोलणार आहे याचा विचार त्याला सतावत होता. कदाचित सावीने आपल्यावरच हक्क आता सोडला आहे ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली तसा म्हणून आता आपण काही केले किंवा कुणाशी ही बोललो तरी  तिला काहीच फरक पडत नाही! नाही नाही सावी अशी माझ्यापासून अलिप्त नाही होऊ शकत तीच माझ्यावर खूप प्रेम आहे आज ही पण मग ती अशी का वागली आज? मला ताराचा फोन आला तर तिला काहीच फरक पडला नाही.आधीची सावी असती तर तिने तांडव केला असता  म्हणजे ती माझ्यापासून मनाने  दूरावली  गेली आहे का? हा सगळा विचार करून तो अस्वस्थ होत होता. कधी एकदा ऑफिस मधून घरी जातो आणि तिच्याशी बोलतो असं त्याला झालं होतं.

                    माणसाचे मन किती विचित्र असते ना! सोहम सावीला निघून जा असं सतत सांगत होता. पण त्याला आज ताराचा फोन आला तेंव्हा सावीला काहीच फरक पडला नाही हे पाहून मात्र सोहम अस्वस्थ झाला होता.कारण त्याच्या अपेक्षेप्रमाणे सावीने त्याला भांडायला हवे होते तिने तांडव करायला हवा होता.पण आज तिला काहीच फरक पडला नाही हे पाहून तो अस्वस्थ होता त्याच्या मनाची घालमेल होत होती. त्याला भीती वाटत होती की सावी त्याच्या पासून मनाने दूरावली गेली आहे. तसा विचार केला तर  सावी वर काहीच परिणाम झाला नाही हे पाहून त्याला ही काहीच फरक पडायला नको होता कारण त्यालाच सावी पासून फारकत हवी होती.

             माणूस हा विचित्र प्राणी आहे.त्याला एखादी व्यक्ती त्याच्या मागेपुढे करत असते तेंव्हा ती नको असते आणि जेंव्हा तीच व्यक्ती त्याच्या पासून दूर जाते असे वाटते तेंव्हा तो अस्वस्थ होतो. माणूसाला सतत  धावणाऱ्या गोष्टींच्या मागे पाळायला आवडते.सावीला सतत निघून जा असं म्हणणारा सोहम आज मात्र सावी त्याच्या पासून मनाने दूरावली म्हणून तो अस्वस्थ होत होता.एकदाचे ऑफिस अव्हर्स संपले आणि तो घरी पोहचला.

   घराचे दार उघडेच होते. तो घरात पोहोचला तर सावी  सांजवात करत होती. सोहमने आज त्याच त्यानी स्वतःच पाणी घेतले. सावीने चहा केला. सोहम फ्रेश होऊन आला आणि त्याने चहा घेतला. सावी कधी बोलते असं त्याला झालं होतं. सावी मात्र शांत वाटत होती. सोहम मात्र अस्वस्थ होता.सावी स्वयंपाकाला लागली आणि सोहम मात्र टी. व्ही. पाहत होता पण त्याचे सगळे  लक्ष सावीकडे होते. सावीचा स्वयंपाक झाला. सावी हॉलमध्ये येऊन बसली.रात्रीचे आठ वाजले होते. शेवटी  सोहमनेच न राहवून  बोलायला सुरुवात केली.

 

सोहम,“ सावी सकाळी ताराचा फोन आला होता तर तू माझ्याशी त्या विषयी  संध्याकाळी बोलू म्हणाली होती.मला तर हाच प्रश्न पडला आहे की ताराचा मला फोन आला तरी तू शांत कशी ग?” तो आश्चर्याने विचारत होता.

 

सावी,“हो सोहम मला तुझ्याशी या विषयावर बोलायचे होते खरं तर मला तुझी माफी मागायची होती! त्याचसाठी मी चंदिगढला आले होते.पण तुझा एक्सिडेंट झाला आणि घटनाच अशा घडत गेल्या त्यामुळे  ही गोष्ट मागे पडत गेली.आणि आज अचानक ताराचा फोन आला आणि याची आठवण झाली.” ती बोलत होती.

 

सोहम,“ बोल मग!” तो म्हणाला.

 

सावी,“ त्या दिवशी मी तुझ्याशी  पार्टीत भांडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी रागातच तुला न बोलता ऑफिसला निघून गेले! पण तू ऑफिसमध्ये ही आला नाहीस आणि मी संध्याकाळी घरी आले तर तू घरी ही नव्हतास तुझे पत्र  पाहून मी खूप अस्वस्थ होते. मी तुला खूप फोन केले.तुझा फोन स्वीच ऑफ लागत होता. पुण्याला आईंना ही फोन केला पण तू तिथे ही नव्हतास तेंव्हा तुझ्या वरच्या रागाची जागा काळजीने घेतली. मी आदित्यला फोन करण्याच्या विचारात होते तर तोच रात्री दहा वाजता आपल्या घरी आला त्याच्या बरोबर तारा,श्वेता, प्रमोद आणि एक पोलीस होता.तेव्हा मला सगळे खरे समजले आणि माझी मलाच लाज वाटू लागली सोहम! मी जे तुझ्यावर आरोप केले ते सगळे खोटे होते.मीच मूर्ख आहे. तू नव्हतास तर मी रोज पश्चत्तापाच्या आगीत जळत होते. मी खरंच तुझ्या लायकीची नाही सोहम! I am sorry for everything!” असं म्हणून तिने  सोहमला मिठी मारली आणि इतका वेळ रोखून ठेवलेले रडू आता तिला आवरणे अशक्य होते.

 

सोहम,“ म्हणजे  आदित्य तुझ्याकडे मला झोपवून आला होता तर कारण त्याच रात्री मनोपचारतज्ञाने मला झोपेचे इंजेक्शन दिले होते कारण मला प्रमाणा बाहेर मेंटल ट्रेस आला होता आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही चंदिगढला आलो!” तो म्हणाला. 

 

  ती हुंदके देऊन रडू लागली. सोहमने ही तिला मनसोक्त रडू दिले. थोड्यावेळाने सावी शांत झाली. सोहमने तिला सोफ्यावर बसवले आणि तिला पाणी दिले. तिने पाणी पिले. सोहम मात्र तिला त्या बद्दल काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने तो सावीला काहीच झाले नाही अशा आविर्भावात म्हणाला.

 

सोहम,“ चल सावी जेवू या! मला खूप भूक लागली आहे!”

 

     सावी त्याच्याकडे आश्चर्याने पाहून म्हणाली.

 

सावी,“ तूला माझ्याशी  यावर काहीच बोलायचे नाही?”  तिने त्याचा हात धरून विचारले.

 

सोहम,“ सावी मला यावर तेंव्हा ही काही बोलायचे नव्हते आणि आज ही काही बोलायचे नाही! चल जेवण करू!” तो म्हणाला 

                सावीची मात्र सोहमच्या अशा वागण्याने मनस्थिती विचित्र झाली.तिला कळतच नव्हते की सोहमच्या मनात नेमके काय चालू आहे.तिला वाटत होते की सोहमने तिच्यावर रागवावे. तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का? तू माझ्याशी अशी कशी वागू शकतेस म्हणून जाब विचारावा पण सोहमने असं काहीच केले नाही.म्हणजेच आता सोहमला माझ्या कोणत्याच गोष्टींचा फरक पडत नाही.त्याने माझा विचार सोडून दिला आहे. ती ही सगळा विचार करत होती आणि सोहमने तिच्या समोर चुटकी वाजवली. तशी सावी भानावर आली.

 

       दोघे ही जेवले. सोहम रुममध्ये निघून गेला.सावी किचन आवरत होती.सोहम सावीकडून हे सगळं ऐकून रिल्याक्स झाला होता पण सावी मात्र अस्वस्थ होती.सावी बेडरूममध्ये आली तर सोहम मोबाईल घेऊन बसला होता. सावी बेडवर येऊन बसली.  तिच्या मनात अनेक विचारांची आंदोलने उठत होती.शेवटी सावी न राहवून सोहमला बोलू लागली.

 

सावी,“ मी इतकी परकी झाले का सोहम तुला की आता माझा तुला राग ही येत नाही.मला वाटले होते की ताराचा विषय निघाल्यावर तू माझ्यावर चिडशील मला बोलशील की तुझा माझ्यावर  इतका विश्वास नव्हता का? प्लिज सोहम असा नको वागूस इतकं ही परक नको करुस मला! हवं तर मला एक थोबाडीत दे पण असा शांत नको राहुस! तुझं असं शांत राहण्याचा मला त्रास होतोय!” ती रडत बोलत होती.

 

       सोहमने तिला जवळ बसवून घेतले आणि तिचे डोळे पुसून तो बोलू लागला.

 

सोहम,“ सावी खरंच असं काही नाही ग! एक तर ती ती घटना घडून एक वर्ष होऊन गेल. आणि तेच-तेच काय उगळायचे ग! खरं तर माझी ही चूक होतीच की कुठे तरी मग तुला एकटीला दोष देण्यात काय अर्थ आहे सावी! आणि मला आता नाही रागवावस वाटत तुझ्यावर पण याचा अर्थ तू मला परकी झाली असा नाही ग होत. खरं तर आता मी तुझे रोजरोज सॉरी ऐकून कंटाळलो आहे. जे झालं ते  आपण नाही बदलू शकत मग कशाला मनस्ताप करून घ्यायचा! तू ना नुसती रडूबाई झालीस आज काल मला तर वाटत होतं की तूच मला भांडणार आता ताराचा मला फोन आला म्हणून ” तो हसून म्हणाला.

 

सावी,“तुला हसू येतय सोहम!” ती चिडून म्हणाली.

 

सोहम,“ मग काय करू मी आता!  मी तुझ्यावर रागावलो  नाही म्हणून तुला रडू येत आहे.धन्य आहे तुझी!आता तुला मी कसं आणि काय सांगू!” असं म्हणून त्याने तिला मिठी मारली. सावी ही त्याच्या मिठीत अलगद शिरली.

 

     अचानक पणे रणरणत्या उन्हाळ्यात वळीवाचा  पाऊस कोसळावा. तसं सोहम सावीवर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि उन्हाने भेगाळलेली धरती तृप्त होत जावी तशी सावी  त्यात न्हाऊन निघत होती. 

             बऱ्याच वेळ सोहम सावीच्या मांडीवर डोके ठेवून पडून होता. सोहम त्याच्या ही न कळत भूतकाळात गेला.त्याच्या समोर पार्टी दिली त्या आधीचे काही दिवस आणि पार्टीची ती रात्र तरळत होती.

 

         सोहम टीम लीडर होता तर तारा त्याच्याच टीम मधील एक मेंबर होती. ती त्याच्या पेक्षा वयाने आणि हुद्द्याने ही ज्युनिअर होती. खरं तर तारा तशी खूप हुशार पण आज काल कामात खूप चुका होत होत्या तिच्याकडून!  तिचे कामात लक्षच नसायचे एक दिवस तिला ऐन मिटिंग मध्ये कोणाचा तरी फोन आला आणि तिने घाबरून तो फोन लगेच उचलला. सोहमला संशय येत होता की तिच्या बरोबर काही तरी चुकीचे घडत आहे एक दिवस त्याने तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावले व तिला स्पष्टच विचारले.

 

सोहम,“ तारा काय झालंय नेमकं तू आज काल खूप अपसेट दिसतेस? कामात ही तुझ्या खूप चुका होत आहेत! फोन आला की दचकतेस! काय झालं आहे तारा तुला?” तो काळजीने विचारत होता.

 

           ताराने पहिल्यांदा आढेवेढे घेतले पण सोहमने फोर्स केला आणि ती रडायला लागली. सोहमने तिला शांत केले आणि ती बोलू लागली.

 

तारा,“ सर माझं आयुष्य बरबाद झालं आहे. आता आत्महत्या करण्या शिवाय माझ्याकडे पर्याय नाही!” ती रडत बोलत होती.

 

सोहम,“ काय बोलतेस तारा असं काय झालं?” त्याने विचारले.

 

तारा,“ सर मी जिथे पेईंग गेस्ट म्हणून  राहते तिथेच वीरेंद्र  राहतो. रोज जाता येता आमची नजरा नजर व्हायची. मग ओळख झाली आणि मैत्री मैत्रीचे रूपांतर प्रेमात पण त्याच्या मनात  काही तरी वेगळच होत.आमच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले!” ती म्हणाली.

 

सोहम,“ आता तो लग्नाला नकार देतोय इतकेच ना मग दे ना सोडून आज काल काही राहूले नाही तू कोणत्या जमान्यात जगते आहेस तारा! तुझी चूक झाली म्हणून सोडून दे!” तो तिला समजावत म्हणाला.

 

तारा,“ गोष्ट इतकीच नाही सर त्याने माझे व्हिडीओ शूटिंग काढले आहे.त्याची एक पॉर्न साईड आहे त्यावर तो व्हिडीओ अपलोड करेन मी त्याच ऐकलं नाही तर  असं तो मला धमकावत आहे!” ती अजूनच रडायला लागली.

 

सोहम,“ काय? पण त्याची मागणी काय आहे?पैसे मागत असेल तो! आपण पोलीस कंप्लेट करू या त्याची!” तो म्हणाला.

 

तारा,“ सर हे प्रकरण इतके ही सोपे नाही त्याची मागणी आहे की मी तो सांगेल त्याच्या बरोबर….. त्याने असं अनेक मुलींना फसवुण देह विक्रेय व्यवसायात ढकलले आहे.खूप मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे यात सर” असं म्हणून ती रडायला लागली.

 

सोहम,“ o my god म्हणजे हे लोक सेक्स रॅकेट चालवत आहेत! आणि तू त्याचा बळी पडत आहेस” तो काळजीने आणि धक्का बसून म्हणाला.

 

तारा,“ हो सर तो मला गेल्या आठ दिवसांन पासून ब्लॅकमेल करत आहे त्याने मला आठ दिवसांची मुदत दिली आहे आजच! नाही तर माझा व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी देतोय. मी मुंबईत स्वतः ला सिद्ध करायला आले होते सर हे असलं काही तरी करायला नाही!” ती रडत म्हणाली.

 

सोहम,“ म्हणजे अजून आपल्याकडे आठ दिवस आहेत तारा! तू ऑफिस सुटल्यावर मला कॉफी कॉर्नर कॅफे मध्ये भेट मी माझ्या मित्राला बोलवून घेतो आपण यातून काही तरी मार्ग काढू नक्की! आणि सायबर क्राईम पोलिसांची मदत घ्यावी लागेल आपल्याला या सगळ्यासाठी!” तो म्हणाला.

 

तारा,“ ठीक आहे सर! मी तयार आहे. तुम्ही जर आज विचारले नसते आणि माझी मदत करायला स्वतः हुन तयार झाला नसतात तर मी आत्महत्या करणार होते सर! Thanks!” ती हात जोडून म्हणाली.

 

सोहम,“तारा तू मला लहान बहिणी सारखी आहेस!  माझ्या परीने मी तुला सर्वोत्तपरी मदत करेन आणि या सगळ्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न करेन!” तो म्हणाला.

 

        त्यानंतर सोहमने आदित्यला या प्रकरणात इंव्हॉल्व करून घेतले.तिघांनी सायबर क्राईममध्ये कंप्लेन्ट केली.सोहमने ती साईट हॅक केली. पोलिसांना पुरावा मिळवून दिला आणि  पहिल्यांदा तिथले सगळे व्हिडिओ डिलिट केले. आणि वीरेंद्रला अटक झाली आणि एक सेक्स रॅकेट उघडकीस आले.तारा सारख्या अनेक मुलींची आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचली. पण सिक्युरिटीच्या कारणास्तव सोहमचे नाव मात्र पोलिसांनी  कुठेच येऊ दिले नाही.

         या सगळ्यात  सावीचा मात्र गैर समज झाला.सोहमला ताराने सारखा सारखा फोन करणे. सोहम सावी पासून लांब जाऊन ताराशी बोलने हे सगळं  सावीला मात्र खटकत होत.सोहम तिच्या बसून  काही तरी लपवतो आहे म्हणजेच त्याचे आणि ताराचे अफेर सुरू आहे असा तिचा समज झाला. ती सोहमवर संशय घेऊ लागली. त्यातच ऑफिसमध्ये  प्रमोशनच्या अलाऊसमेंट झाली..पण सोहमला प्रमोशन मिळाले नाही याचे खरं तर सावीला आश्चर्य वाटत होते कारण सोहमचे परफॉर्मन्स तिच्या पेक्षा चांगले होते.सावीला C. E. O.चे प्रमोशन मिळाले.सोहमने पार्टी दिली त्यामागे कारण तिचा मूड चांगला व्हावा आणि तिला रात्री सगळे सांगावे असा होता.

               सोहमने त्याच्या अपर्टमेंटच्या टेरेसवर एक छोटे खाणी पार्टी अरेंज केली होती पण सावी म्हणावी तशी खुश दिसत नव्हती. कारण तिच्या मनात सोहम आणि ताराचे काही तरी आहे हा संशय मूळ धरून होता. ताराला ही सोहमने पार्टीला बोलवले होते.तिला पाहून सावीची पहिल्यांदाच सटकली होती आणि   पार्टी चांगली रंगात आली असताना  सावीने प्रमोद आणि श्वेताचे बोलणे ऐकले ते बोलत होते. सोहमचे सावीवर खूप प्रेम आहे म्हणूनच त्याने प्रमोशन नाकारले. सावीचा ते ऐकून असा समज झाला की सोहमने त्याला मिळालेले C. E. O. चे प्रमोशन नाकारले आणि त्याने प्रमोशन नाकारल्यामुळे ते प्रमोशन तिला मिळाले. हे ऐकून सावी मात्र भडकली. सोहम मित्रांबरोबर  गप्पा मारण्यात दंग होता. सावीने रागाच्या भरात हार्ड ड्रिंक घेतली आणि ती सोहमच्या समोर जाऊन उभी राहिली व बोलू लागली.

 

सावी,“ वाह सोहम सरपोतदार वाह! तू खरच टॉपर आहेस रे एका दगडात दोन पक्षी मारलेस तू! प्रमोशन नाकारून मला दिलेस म्हणजे बायको खुश आणि तिकडे तुझी  गर्लफ्रेंड ही खुश!” ती बोलत होती.

 

सोहम,“ सावी तू ड्रिंक घेतलीस!चल घरी!” तो तिचा हात धरून म्हणाला. त्याचा हात झटकून ती बोलू लागली.

 

सावी,“ घरी कशाला इथेच बोल ना! आरे तुम्ही पुरुष एक जात सारखे तुमच्यावर किती ही प्रेम केले ना तरी तुम्ही बाहेर तोंड मारणारच!  you are bloody cheater! मला ना तुझ्या अस्तित्वाची घृणा येते आहे सोहम! I really hate you!” ती रागाने बोलत होती.

 

         सोहमने मात्र सगळ्याची हात जोडून माफी मागितली आणि पार्टी संपली असे जाहीर केले.सगळे निघून गेले. सोहम सावीला घेऊन घरी आला.घरी ही सावी त्याला भांडत होती.

 

सावी,“ by the way! सोहम त्या  तारामध्ये काय पाहिलेस रे जे माझ्यात तुला इतक्या वर्षात दिसले नाही?” तिने विचारले 

 

सोहम, “mind your language savi! ताराचा इथे काहीच संबंध नाही! तीच नाव घेऊ नकोस!” तो रागाने म्हणाला.

 

सावी,“ आला राग तुला ताराचे नाव घेतलं की आला ना राग! किती नीच आहेस रे तू!तुझं आणि त्या ताराच काय नात आहे रे! तू प्रमोशन म्हणूनच नाकारलेस ना  कारण ते मला मिळावे म्हणजे तुला मी ही हवी आणि तीही हवी! म्हणूनच मी म्हणतेय माला ना तुझ्या अस्तित्वाची शिसारी वाटते! ” ती रागाने म्हणाला 

 

        सावी बोलत होती पण सोहमच्या मनाला तिचा  एक-एक शब्द घरे पाडत होता. तो आतून तुटत होता.सोहम तिला म्हणाला.

 

सोहम,“ मला तुझ्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही द्यायचे सावी आणि तुला कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण ही मी देणार नाही!” तो म्हणाला.

 

       तो रात्र भर हॉलमध्ये सोफ्यावर झोपला आणि सावी बेडरूममध्ये! सावी त्याला काहीच न बोलता ऑफिसला निघून गेली. पण सोहम मात्र सावीच्या बोलण्याने आणि आरोपांनी आतून पूर्णपणे उध्वस्त झाला होता.त्याला जगावस वाटत नव्हतं. म्हणून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला पण ऐन वेळी दिल्लीला गेलेला आदित्य आला आणि त्याने सोहमला सावरले आणि तो चंदीगडला निघून आला. 

 

       सोहम बराच वेळ काही बोलत नाही म्हणल्यावर त्याच्या केसात हात फिरवत  सावी त्याला म्हणाली.

 

सावी,“ सोहम झोपलास काय?” ती त्याला पाहत म्हणाला.

 

    तिच्या आवाजाने सोहम  भानावर आला आणि तो उठून बसत म्हणाला.

 

सोहम,“ सावी  तू म्हणालीस की आदित्य दुसऱ्या दिवशी रात्री तारा, श्वेता, प्रमोद आणि कोणाला तरी घेऊन आला? काय झाले ग त्या रात्री?

 

सावी,“ सांगितले की तुला शॉर्ट कट मध्ये!” ती म्हणाली.

 

सोहम,“ पण मला सविस्तर ऐकायचे आहे कारण ज्या गैरसमाजातून तू इतका तांडव केलास पण आज तू ताराचा मला फोन आला तरी इतकी शांत कशी?” तो तिला पाहत म्हणाला.

 

सावी,“ सोहम खरच माझं चुकलं ना!” ती त्याला बिलगत म्हणाली.

 

सोहम,“ अग किती वेळा सॉरी म्हणणार तू? मी तुला फक्त या साठी विचार आहे की नेमकं काय झालं मला जाणून घ्यायचं होत.ठीक आहे नाही सांगायचे तुला तर नको सांगूंस!” तो तिचा हात धरून म्हणाला.

 

सावी,“ तुला ऐकायचे आहे ना तर ठीक आहे सांगते मी! तू निघून गेलास तुझी चिठ्ठी मला मिळाली होती. मी सगळ्यांना फोन करून विचारले पण तू कुठेच नव्हतास! मग मी आदित्यला फोन लावणार तर तोच आला तारा बरोबर सगळ्यांना घेऊन दुसऱ्या रात्री दहा वाजता  आणि म्हणाला.

 

आदित्य-“ सावी काय तमाशा केलास ग काल पार्टीत? आणि सोहम कुठे आहे? मला प्रमोदने सगळं सांगितले मला काल घडलेले! काय ग तुझा इतका ही विश्वास नाही का ग तुझ्या नवऱ्यावर की त्याच्यावर इतके घाण आरोप केलेस! कॉलेज पासून ओळखतेस ना त्याला तरी ही तू असं वागलीस त्याच्याशी! मला माहित आहे की त्याने त्याला कोणते ही स्पष्टीकरण दिले नसेल कारण त्याचा स्वभावच तो नाही पण मी आलो आहे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला.तारा सांग तुझे आणि सोहमचे काय नाते आहे सावी मॅडमला.”

 

तारा,“ मॅम सोहम सर मला मोठ्या भावा प्रमाणे आहेत आणि त्यांनी ही मला छोट्या बहिणी प्रमाणे खूप मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे.तुम्ही या चार दिवसात  बातमी वाचली किंवा ऐकली असेल एक मोठे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे ते फक्त आणि फक्त सोहम सरांमुळे ते रॅकेट उघडकीस आले आहे आणि  माझ्या सारख्या हजारो मुलींचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले आहे.मी एका मुलाच्या प्रेमात पडले आणि त्या रॅकेटमध्ये अडकले सोहम सरांनी माझी अस्वस्थता ओळखली आणि माझ्याकडून सगळे विचारून घेतले आणि माझी मदत केली. त्यांनी तेच तुमच्या पासून लपवले आणि मी याच कारणासाठी त्यांच्या संपर्कात सतत होते. त्या मध्ये जीवाची ही रिस्क होती कारण यामध्ये मोठमोठे लोक अडकले होते. तुम्ही सरांना ही रिस्क घेऊ दिली नसती म्हणून कदाचित त्यांनी तुमच्या पासून हे लपवले असेल! पण तुम्ही तर भलताच समज करून घेतला मॅम! आता सोहम सर कुठे असतील मला खूप काळजी वाटत आहे. तुमच्यातल्या भांडणाला मीच जबाबदार आहे!” असं म्हणून ती रडू लागली.इन्स्पेक्टरने ही या गोष्टींना दुजोरा दिला

 

        हे सर्व  ऐकून माझ्या तर पाया खालची जमीनच सरकली सोहम! खरच मी किती चुकले होते.अजून पुढचा धक्का तर  अजून बाकी  होता.

 

     प्रमोद आणि श्वेता ज्या प्रमोशन बद्दल बोलत होते ते C.E.O.चे नसून ते असिस्टंट ब्रँच मॅनेजरचे होते ते तू नाकारले होते कारण त्यासाठी तुला बेंगलोरला जावे लागणार होते कारण मुबंईमध्ये ती पोस्ट रिकामी नव्हती. पण मी बंगलोरला येणार नाही म्हणून तू प्रमोशन नाकारलेस याची मला पुसटशी कल्पना ही तू दिली नाहीस  याचीच चर्चा प्रमोद आणि श्वेता करत होते आणि मी ती अर्धवट ऐकून तुला नाही नाही ते बोलले.

 

       आदित्य आणि सगळे निघून गेले सोहम पण मी मात्र जळत राहिले पश्चात्तापाच्या अग्नीत! त्याच दिवशी माझ्या कानाखाली देऊन हे सगळं सांगायचं होतास ना रे मला! मी तर मुर्खच आहे!” ती असं म्हणून पुन्हा रडू लागली.

 

सोहम,“ काय ग सारख सारख रडतेस! But do you really think that? मी आणि तारा! अग मी तुझ्या जागी कोणालाच इमॅजिन नाही करू शकत.you are only one! hot and beautiful for me!” असं म्हणून त्याने तिला हसून अजूनच जवळ घेतले.

 

सावी,“ धत! झोपा आता उद्या ऑफिसला जायचे नाही का?” ती काहीशी लाजत त्याला म्हणाली.

 

सोहम,“ हुंम  ऑफिस तर आहेच की उद्या पण आज तारा बद्दल बोलून खूप मोकळं वाटत आहे पण तू लाजते आहेस ” तो हसून म्हणाला.

 

सावी,“ झोप आता बास झालं! love you!” असं म्हणून ती त्याच्या कुशीत शिरली.

 

 आज सोहम आणि सावीच्या मनातील मळभ खूप दिवसांनी दूर झाले होते.ढग दाटून आल्यावर सगळे आकाश अंधारून येते पण पाऊस पडून गेल्यावर जसे ते निरभ्र होते तसे दोघां मधील नाते आज निरभ्र झाले होते. अंधारून आलेले संशयाचे आणि दुखावले गेलेले ढग आता निवळले होते.

 

    ही रात्र सोहम आणि सावीच्या नात्याला कलाटणी देणार होती का? सोहम सावीला या तिच्या सगळ्या चुकांसाठी माफ करू शकेल?

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule