Login

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १९)

This is a love story of before marriage and after marriage

      तिघे ही चेंज करायला गेले. सावी  फ्रेश व्हायला गेली होती तो पर्यंत  सोहमने नुकताच शॉपिंग करून आणलेला ऑफ शोल्डर गुडघ्याचा खाली असलेला पिंच कलरचा  फ्लोरल डिझाईन असलेला वन पीस सावीच्या वोर्डरोब मधून काढला आणि सावी बाहेर आली की तिच्या हातात देत म्हणाला.

सोहम,“ हा ड्रेस घाल आज तुला छान दिसेल!” 

सावी,“ जो हुकूम मेरे आका! आता काय तुम्ही म्हणाल तसच वागलं पाहिजे!” हसून असं म्हणून ती चेंज करायला गेली. 

                  सोहम तो पर्यंत फ्रेश झाला आणि कॅज्युअल कपडे घालून तयार झाला.सावी तो पर्यंत चेंज करून  आली. तिला सोहम दोन मिनिटे पाहतच राहिला आणि तिच्या जवळ जात तिला मागून मिठी मारत म्हणाला.

सोहम,“ you are looking so beautiful! राहूदे जायचं आज बाहेर!” तो तिला हळूच कानात म्हणाला.

सावी,“ अरे दार उघड आहे आदित्य आलाय तुला काय वाटतं का? सोड बरं मला आणि जा मी आलेच! मूर्ख कुठला!” ती स्वतःला सोडवून घेत लटक्या रागाने त्याला रूमच्या बाहेर घालावत म्हणाली.

        सोहम हॉलमध्ये टीव्ही पाहत बसला आणि आदित्य तो पर्यंत तयार होऊन आला आणि म्हणाला.

आदित्य,“ अरे सावी अजून तयार नाही झाली का?”

सोहम,“ you know girls! त्या लगेच रेडी होतात का?” तो तोंड वेडावून म्हणाला.

    तो पर्यंत सावी येऊन त्याच्या मागे उभी होती हे त्याला माहीतच नव्हतं आणि आदित्य त्याच्याकडे तोंड करून उभा असल्याने त्याने सावीला पाहिले होते. सावी सोहमला लटक्या रागाने  म्हणाली.

सावी, “what did you say?”

सोहम,“ nothing!” तो अचानक सावीचा आवाज ऐकून घाबरून म्हणाला.

      आदित्य मात्र सोहमची उडालेली घाबरगुंडी पाहून फिदीफिदी हसत म्हणाला.

आदित्य,“ कारची की दे सोम्या! मी कार बाहेर काढतो तो पर्यंत!” असं म्हणून तो सोहमच्या हातातली कारची चावी घेऊन जाऊ लागला. सोहमने त्याला डोळ्याने थांब असे खुणावले पण तो त्याला डोळ्यानेच नाही म्हणून हसू दाबत बाहेर गेला. सावी त्याच्याकडे रागाने पाहत होती. सोहमने आवंढा गिळला आणि तो म्हणाला.

सोहम,“ अग मला तसं नव्हतं म्हणायचं! सॉरी!”

सावी,“ मग कसं म्हणायचं  होत तुला की मुलींना खूप वेळ लागतो रेडी व्हायला असतंच ना!” ती रागात असल्या सारखी म्हणाला.

     सोहमच्या चेहऱ्याचा उडालेला  रंग पाहून ती हसायला लागली.

सावी,“ काय मग कोण कोणाला घाबरत रे! चेहरा बघ आरशात तुझ्या! माझा शोना ग तो किती घाबरला!” ती त्याच्या गालावर हात फिरवून हसत म्हणाली.

सोहम,“तुला आताच सांगितलं असत पण आदित्य आलाय तुला ना रात्री सांगतो थांब!” तो तिच्या हात हलकेच दाबून म्हणाला.

सावी,“ पाहू मी नाही घाबरत तुला! चल आता!” ती हसून म्हणाली.

           तिघे ही पहिल्यादा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले तिथे  तिघांनी लंच केलं. त्या नंतर सोहम त्या दोघांना इस्कॉन मंदिरात घेऊन गेला. राधा-कृष्णाच्या मंत्र मुग्ध करणाऱ्या मूर्ती पाहून सावी आपोआपच तिथे नतमस्तक झाली. सोहम आणि आदित्य तिच्याकडेच पाहत होते.कारण आदित्य आणि सोहमने असं मंदिरात नतमस्तक होणं नवीन नव्हतं पण सावी आज प्रथमच कोणत्या तरी मंदिरात येऊन अशी नतमस्तक झाली होती. नास्तिक सावनीतील  आस्तिक सावनीने तिला नतमस्तक व्हायला भाग पडले होते. मंदिर नितांत सुंदर होते. तितकेच प्रशस्त आणि शांत ही! थोडावेळ तिथेच बसून तिघे ही इलेंटे  मॉलमध्ये पोहोचले. कारण आदित्यला सावीसाठी गिफ्ट घ्यायचे होते. आदित्य तेथील एका  ज्यूलरी शॉपमध्ये सावीला घेऊन गेला. तिथे त्याने ब्रेसलेट्स पाहायला सुरुवात केली. त्याने एक सुंदर आणि नाजूक असे गोल्ड आणि डायमंड असलेले ज्याच्या मधोमध डायमंड जडीत  ओम होते ते ब्रेसलेट निवडले आणि सावीच्या हातात घालत म्हणाला.

आदित्य,“ माझ्या नवीन नवीन आस्तिक झालेल्या बहिणीसाठी ही सुंदर भेट हे तुझे कायम रक्षण करेल सावी!” तओ भावूक होत म्हणाला.

     हे ऐकून सावीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. ते पाहून सोहम म्हणाला. 

सोहम,“ तुमचा दोघांचा मेलो ड्रामा झाला असेल तर स्माईल करा.आद्या fb वर फोटो अपलोड करणार आहेस ना!” आणि त्याने  फोटो काढला.

   त्यानंतर तिघे सुखना लेकवर गेले.सुंदर गर्द झाडी आणि सुंदर असा लेक आणि त्यावरून येणारा गार वारा मनाला आल्हाददायक वाटत होता. सावीला तर आल्यापासून चंदीगड पाहायलाच मिळाले नव्हते कारण एक महिना सोहम हॉस्पिटलमध्ये होता आणि त्या नंतर तो दोन महिने बेडवरच झोपून होता! आता दीड-दोन महिने तो बरा झाला होता पण तो ऑफिसच्या कामात बिझी झाला होता. नाही म्हणायला ते एकदा डिनरला आणि एकदा शॉपिंगला गेले होते. तसं सावी जवळच्या मार्केट मधून सगळी  खरेदी  करत  असे जे दिलजीतने तिला दाखवले होते.तरी फिरायला म्हणून ती आज बाहेर पडली होती. तसं पाहायला गेलं तर ती तिच्या आई बरोबर अर्धे जग फिरली होते.दर वर्षी उन्हाळ्याच्या  आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये दोघी माय-लेकी  फिरायला जात असत.पण चंदीगड तिला नवीनच होते तसे. 

      तिघांनी मनसोक्त बोटिंगची मजा लुटली. थोडावेळ फेरफटका मारला. तिथून ते झाकीर रोज गार्डनमध्ये गेले. तिथे विविध प्रकारची झाडे-वनस्पती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुलाबाच्या प्रजाती आहेत. इतक्या विविध प्रकारच्या गुलाबाच्या प्रजाती आणि  रंगीबेरंगी  फुले पाहून सावी हरखून गेली. सोहम आणि आदित्यने हे गार्डन आधीच पाहिले होते त्यामुळे ते दोघे तिथेच एका बेंचवर बसले. सावी मात्र फुले पाहत फिरत होती.तिला लांब जाताना पाहून आदित्य तिला म्हणाला.

आदित्य,“ ये झाशीची राणी खूप लांब जाऊ नको हरवशील कुठे तरी! तुला एवढ्या मोठ्या गार्डन मध्ये आम्ही दोघांनी कुठे शोधायचे?” असं म्हणून तो हसू लागला.

सावी,“ मी काय लहान मुलगी नाही हरवायला!  आणि मोबाईल आहे माझ्याकडे!तुम्ही बसा मी पाहून येते गार्डन खूप सुंदर आहेत ना! इथे रंगेबीरंगी गुलाबाची फुले! I love it!” असं म्हणून ती गार्डन पाहत फिरू लागली.तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद विलसतं होता.

       ती थोडी दूर गेली पण नजरेच्या टप्प्यात होती अजून ते पाहून आदित्य सोहमला म्हणाला.

आदित्य,“ सोम्या सावी आज भलतीच खुश दिसत आहे रे!” 

सोहम,“ हो रे! बऱ्याच दिवसांनी ती अशी घराबाहेर पडली आहे! नाही तर घरातच होती.पहिले दोन महिने तर मी झोपूनच होतो.तिचा सगळा वेळ माझी सेवा करण्यातच जात होता आणि त्या नंतर गेल्या दीड-दोन महिन्यापासून मी खूप बिझी झालो रे ऑफिसच्या कामात त्यामुळे तिला कुठे घेऊन जायला वेळच नाही मिळाला!” तो सावीला पाहत बोलत होता.

आदित्य,“ सोम्या मला तुझ्याशी बोलायचं होत!” तो त्याला पाहत म्हणाला.

सोहम,“ अरे मग बोल ना तुला केव्हा पासून माझ्या परमिशनची गरज पडायला लागली!”तो हसून म्हणाला.

आदित्य,“ सोम्या तू  तुझ्या आणि सावीच्या नात्या बद्दलचा कोणताही निर्णय आततायीपणे घेऊ नयेस असं मला वाटते. कारण सावीने चुका केल्या मला मान्य!  त्या चुकांना तू ही कुठे तेही जबाबदार होतास.मला माहित आहे तिने तुला खूप दुखावले पण त्याची तिने  पुरेशी शिक्षा भोगली आहे. तिला त्याचा पश्चात्ताप ही आहे.तिने ही खूप भोगले आहे गेल्या काही महिन्यात! तिने मी केलेला अपमान ही सहन केला फक्त तू कुठे आहेस हे जाणून घेण्यासाठी! तुझा एक्सिडेंट झाला तेंव्हा ती खूप जास्त हदरली होती! सोम्या नास्तिक मुलगी फक्त तुझ्यासाठी आस्तिक झाली. खूप बदलली आहे ती! तूच म्हणालास की तुझी खूप सेवा केली तिने तुझ्यावर  या जगात सावी शिवाय इतकं प्रेम कोणीच करू शकणार नाही. मला मान्य ती तिच्या खूप चुकीचा धारणा होत्या. गैरसमज होते. पुरुषां बाबतीत कॉलेजमध्ये ही तिला माझ्या आणि तुझ्या शिवाय कोणी ही मित्र नव्हते. मुलांशी आणि ऑफिसमध्ये ही पुरुष कलीगशी फटकून वागायची! मला वाटत या तिच्या वागण्याला तिचा पास्ट जबाबदार आहे. जो आपल्याला माहीत नाही! कारण her mother is single parents and she is divorcee! त्या दोघींनी त्याच्या लाईफमध्ये काय भोगले आहे ते त्यांचे त्यांनाच माहीत कदाचित म्हणूनच सावीचे पुरुषां बद्दल खूप चांगली मते नाहीत. पण ती साबाह्य बदलली आहे सोम्या! कोणता ही निर्णय घेण्याआधी या सगळ्यांचा विचार कर एकदा आणि मग निर्णय घे! जर तू सावीला डावलशील तर तुझ्या सारखा मूर्ख तूच असशील!” तो कळकळीने हे सगळं बोलत होता आणि सोहमच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.

      सोहम काही बोलणार तो पर्यंत सावी तिथे आली आणि सोहमने तोंड फिरवून डोळे पुसले पण तो तिला पाहून गप्प बसला. सावी तिथे जावून बसली आणि बॅगेतून पाण्याची बॉटल काढून पीत म्हणाली.

सावी,“ खूप मोठं आहे रे  गार्डन आदित्य आणि खूप सुंदर ही! किती विविध प्रजाती आहेत गुलाबांच्या मी तर फिरून दमले!” ती नॅपकीनने घाम पुसत म्हणाली.

सोहम,“ तुला कुणी सांगितलं होतं इतकं फिरायला! उद्या पाय दुखले म्हणालीस तर डॉ.सिंगचे इंजेक्शन आहेच!” तो हसून म्हणाला.

सावी,“ मी नाही येणार तुझ्या त्या सिंगकडे!” ती तोंड वाकडं करत म्हणाली.

आदित्य,“ अरे कोण आहे हा डॉ.सिंग!” तो काहीच न कळल्यामुळे म्हणाला.

सोहम,“ अरे तो…” तो पुढे बोलणार तर त्याला सावी गप्प बसवत म्हणाली.

सावी,“ तू गप्प बस रे! आदित्य श्रेया कुठे आहे रे आणि तुमच्या लग्नाचं काय?” तिने विचारलं.

आदित्य,“ अग तुला तर माहीतच आहे की ती आमच्या भेटी पूर्वी पासून जॉब करते. तिचे तीन वर्षांचे लीगल काँट्रॅक्ट आहे त्या कंपनी बरोबर आणि आम्ही दोन वर्षांपासून डेट करतो आहोत एकमेकांना! ते काँट्रॅक्ट  अजून सहा महिन्याने संपणार आहे. मग ती आमची मुबंईची ब्रँच जॉईन करणार आणि भाई पुण्याची ब्रँच सांभाळणार आहे. म्हणून थांबलो आहोत लग्न करायचे तिचे काँट्रॅक्ट संपले की लग्न करणार आम्ही! ती सध्या U. S मध्ये आहे. सोम्याला असतो की तिचा फोन अधून मधून काय रे सोम्या सांगितले नाही सावीला! यानेच तर ओळख करून दिली होती आमची याचीच तर मैत्रीण आहे ती!” तो मिस्कीलपणे हसत म्हणाला आणि सोहम त्याच्याकडे रागाने पाहू लागला.

सावी,“ राहू दे सोहम इतका अँग्री लूक देऊ नकोस माझ्या भावला! मी तुला नाही भांडणार!” असं नाटकीपणे म्हणून ती हसू लागली आणि तिच्या बरोबर आदित्य ही! सोहम ही मग त्यांना जॉईन झाला.

आदित्य,“बरं घरी चला आता बघा सात वाजले! मला साडे दहाची फ्लाईट आहे!” तो  हातातले घड्याळ पाहत म्हणाला. 

सोहम,“काय तू लगेच जाणार आहेस?मला वाटलं दोन दिवस राहशिल!” तो नाराजीने म्हणाला.

आदित्य,“ हे बघ मी सावीला सांगितले होते मी फक्त एका दिवसासाठी येणार आहे! अरे उद्या माझी खूप महत्त्वाची मिटींग आहे.आधीच खूप दांड्या झाल्यात ऑफिसला माझ्या! भाई ओरडेल मला!मला जावं लागलं” तो सोहमला समजावत म्हणाला.

सावी,“ठीक आहे! उगीच रडू नको आता!चला जाता जाता डिनर करू आणि घरी जाऊ मग सोहम येईल तुला सोडायला एअरपोर्टवर!” ती उठत म्हणाली.

         तिघांनी घरी जाता जाता डिनर केला आणि घरी पोहोचेल तो पर्यंत रात्रीचे नऊ वाजले! सावीने फ्रेश होऊन गरम गरम कॉफी केली. तो पर्यंत सोहम आणि आदित्य ही फ्रेश होऊन आले. तिघांनी कॉफी घेतली आणि  सोहम आदित्यला सोडायला निघाला. आदित्य सावीला म्हणला.

आदित्य,“ चलो झाशीची राणी मी येतो! भेटू लवकरच!”

सावी,“ एक तरी मुक्काम करायचा आदित्य अशी धावती भेट घेऊन निघालास ही!” ती भावूक होत म्हणाली.

आदित्य,“ अग चाललो म्हणजे तिकडेच नाही जाणार येणार की अजून!” तो तिची मायेने पाठ थोपटत म्हणाला.

सावी,“हुंम्म” इतकच म्हणाली.

सोहम,“ मी येतो सोडून याला तू लॉक करून झोप उगीच जागत बसू नकोस! मी लॅच कीने लॉक उघडून येईन!” तो म्हणाला.

सावी,“ बरं!” ती म्हणाली.

      सोहम आणि आदित्य गेले. सावीने दार लॉक केलं. ती बेडरूम मध्ये जाऊन न झोपता सोहमची वाट पाहत टीव्ही लावून सोफ्यावर बसली आणि थकल्यामुळे सोफ्यावरच झोपून गेली.

      इकडे सोहम आणि आदित्य एअर पोर्टवर पोहोचले. सोहमने आदित्यला जाताना मिठी मारली.आदित्य सोहमला जाता-जाता ही म्हणाला.

आदित्य,“ सोम्या मी काय म्हणालो गार्डनमध्ये त्याच्यावर विचार कर!”

सोहम,“ हो! पोहचल्यावर फोन कर आद्या!”

       आदित्यने होकारार्थी मान हलवली आणि गेला. सोहम घरी आला त्याने लॅच कीने दार उघडले तर टी.व्ही. सुरूच होता आणि सावी सोफ्यावर झोपली होती. ही कधीच ऐकत नाही असं मनात म्हणत तिच्या जवळ गेला आणि तिला उठवत म्हणाला.

सोहम,“ सावी उठ बेडरूममध्ये चल!” तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो म्हणाला.

सावी डोळे चोळत उठली आणि त्याला म्हणाली.

सावी,“हुंम” असं म्हणून ती डोळे झाकूनच उठली. ते पाहून सोहमनेच तिचे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले आणि हाताने धरून तिला बेडरूममध्ये नेऊन  व्यवस्थित पांघरून घालून झोपवले आणि तो ही झोपला.

साविचा आणि तिच्या आईचा पास्ट काय होता ज्याचा परिणाम सावीवर अजून ही होता? आदित्यच्या बोलण्याचा सोहम विचार करेल का? तो नेमका काय निर्णय घेणार होता? 



 

 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

©Swamini (asmita) chougule









 

          

           

🎭 Series Post

View all