हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १८)

This is love story of before marriage and after marriage

        सोहमला जाग आली. तेंव्हा सावी त्याच्या बहु पाशात होती. सोहम तिला निरखत होता ती गाढ झोपली होती. एखाद्या निरागस मुली सारखी केसांच्या लांब बटांनी तिचा एक गाल पूर्ण झाकला गेला होता सोहमने अलगद त्याच्या बोटांनी तिचे केस बाजूला केले. घड्याळात सात वाजले होते. सोहम तिला थोडावेळ निहाळत राहिला आणि मग तिला न उठवताच अलगद त्याने तिला बाजूला करून पांघरून घातले. रात्री खूप वेळ जागी असल्याने आणि विचारांमुळे मानसिक थकवा आल्यामुळे ती खूप गाढ झोपली होती.

      सोहम आवाज न करता किचनमध्ये गेला आणि त्याने दोन कप चहा आणि ब्रेडला बटर लावून ब्रेकफास्ट तयार केला आणि ट्रे घेऊन तो बेडरूममध्ये गेला आणि सावीच्या केसातून हात फिरवत तिला म्हणाला.

सोहम,“ उठा सावी मॅडम good morning!” तो हसून बोलत होता.

     सावी डोळे चोळत उठली म्हणाली.

सावी,“ good morning! आज इतक्या लवकर कसे उठले साहेब?(ती हसून केस बांधत घड्याळ पाहून म्हणाली) अरे देवा आठ वाजले. मीच उशिरा उठले. अजून माझी अंघोळ व्हायची मग  ब्रेकफास्ट तयार करायचा तो पर्यंत कामवाली येईल ती काय नुसत्या पोळ्या करणार भाज्या करायच्या आणि पूजा बरीच कामे आहेत अजून” असं स्वतःशीच बडबडत ती गडबडीने उठू लागली. सोहम तिची बडबड आणि गडबड पाहून हसत होता त्याने तिचा हात धरून तिला बसवले आणि म्हणाला.

सोहम,“ अग श्वास तर घे! आणि हा बघ ब्रेकफास्ट तयार आहे आणि चहा ही! तू फ्रेश होऊन ये लवकर मग शॉवर घे निवांत!चहा थंड होईल नाही तर आणि पूजा मी करेन तुझ्या बाप्पाची!” तू हसून म्हणाला.

सावी,“ अरे वा! आज साहेब भलतेच मेहरबान आहेत की! आलेच मी!” ती त्याचा गाल ओढत म्हणाली.

सोहम,“ सावीss गाल नको ओढत जाऊस माझे! जा फ्रेश हो जा!” तो गाल चोळत तिला रागाने म्हणाला.

सावी,“ मी नाही तर कोण ओढणार मग माझ्या शोनाचे गाल!” असं म्हणून तिने पुन्हा त्याचा गाल ओढला आणि त्याला चिडवत बाथरूममध्ये पळून गेली.

        सावी फ्रेश होऊन आली आणि दोघांनी ब्रेकफास्ट केला. कामवालीबाई आली आणि सावी टिफिन  तयार करू पर्यंत सोहम तयार होऊन आला. सावीने टिफिन त्याच्या हातात दिला.सोहम तिला टिफिन घेऊन बॅगेत ठेवत म्हणाला.

सोहम,“ संध्याकाळी तयार होऊन बस आपण शॉपिंगला जाऊ  आणि बाहेरच जेवून येऊ आज मी ऑफिस मधून आल्यावर!”

सावी,“ अरे कशाला उगीच मी करेन मॅनेज आणि मला लागलं काही तर मी जाऊन आणेन माझी माझी!” ती म्हणाली.

सोहम,“ का माझ्या बरोबर फिरायला लाज वाटते का तुला? तसं असेल तर मी दिलजीतला सांगतो त्याच्या बरोबर जा! आणि मॅनेज करीन काय? किती दिवस तेच-तेच कपडे घालणार ग! मग सांगू का दिलजीतला तुझ्या बरोबर यायला?” तो चिडून तोंड फुगवून बोलत होता.

सावी,“ झाली तुझी चिडचिड सुरू! आज काल तुझ्याशी काही बोलणे खूप अवघड झाले आहे! आणि मला लाज  का वाटेल बरं? उलट मला आधीपासूनच माझ्या हँडसम नवऱ्या बरोबर मिरवायला आवडत! बरं तयार राहीन  मी संध्याकाळी जाऊयात आपण! आता अस पुरी सारख फुगलेले तोंड घेऊन जाणार का ऑफिसला?” ती त्याच्या जवळ जात त्याचे गाल ओढत म्हणाली.

सोहम,“ गाल नको ओढूस ना! बरं पण स्माईलसाठी पेनल्टी द्यावी लागेल!” तो तिला गाल पुढे करत म्हणाला.

हे ऐकून त्याच्या गालावर किस करत  हसून  म्हणाली.

सावी,“ तू ना आज काल लहान मुलांसारखा झाला आहेस. जा आता by!

       सोहम हसून ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी तो यायच्या आत सावी रेडी होऊन बसली होती कारण तिला तयार न झालेली पाहून सोहम पुन्हा चिडचिड करेल म्हणून!  सोहम आला तो फ्रेश होऊ पर्यंत तिने चहा केला.दोघांनी चहा घेतला.सोहम आणि सावी शॉपिंगला गेले. सोहमने सावीला डझन भर ड्रेस घेतले. पंजाबी सूट,लेगिंग-टॉप,शॉर्ट वन पीस, जीन्स-टॉप! सावी नको वगैरे  काहीच म्हणाली नाही कारण तिला माहीत होते की तो अजून चिडचड करणार! बिल करताना सावीने तिचे कार्ड स्वीप करण्यासाठी काढले तर सोहमने तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि सावीने तिचे कार्ड पुन्हा पर्समध्ये ठेवले. हे पाहून सोहमला खूप हसू येत होते पण त्याने ते दाखवले नाही. सोहम आणि तिने डिनर ही बाहेरच केला आणि घरी पोहोचले.

           सावी सगळे कपडे वोर्डरोब मध्ये ठेवत होती.सोहम बेडवर येऊन बसला. सावी कपडे ठेवत ठेवत त्याला म्हणाली.

सावी,“काय गरज होती का इतक्या कपड्याची सोहम? मुबंईमध्ये ही वर्डरोब भरले आहेत दोन माझे कपड्याने!” 

सोहम,“ मग काय झालं? पण सावीss तू इतकी घाबरतेस मला? मला आधी माहीत असत तर चांगलच तुला ताब्यात ठेवलं असत ” तो तिला पाहून मोठ्याने हसू लागला.

       सावीला  मॉल मधला प्रसंग आठवला आणि ती चिडून म्हणाली.

सावी,“ मोठा आला मला ताब्यात ठेवणारा! उगीच मी गप्प बसते  तब्बेत ठीक नाही म्हणून तर डोक्यावर बसू नको माझ्या कळलं का? उगीच तिथे चिडचिड नको म्हणून शांत बसले मी! आणि तुझे पैसे माघारी देणार आहे मी कळलं!” ती चिडून त्याच्या समोर उभी राहून बोलत होती.

सोहम उठून उभा राहिला आणि तिच्या जवळ जवळ जाऊ लागला तसं ती मागे मागे जात होती शेवटी ती भिंतीला टेकली.तिच्या अगदी समोर उभा राहत तो बोलू लागला.

सोहम,“ अच्छा तर तू मला पैसे परत देणार आहेस! अजून काय काय परत देणार आहेस मला ते पण सांग? माझे जे काय तुझ्या जवळ आहे ते सगळे मला परत हवे आहे!” तो तिच्या डोळ्यात पाहत तिचे दंड धरून  काहीशा रागाने म्हणाला.

सावी,“ you are hurting me!सोड सोहम मला!” ती हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.

सोहम,“ you are  also hurting me savi! आपल्या नात्यात व्यवहार केव्हा पासून आला ग?” त्याचे चिडून तिला न सोडता विचारले.

सावी,“तो सात-आठ महिन्यान पूर्वीच आला आहे सोहम! आणि जेंव्हा काल तू चार महिने नंतरचा निर्णय मला आधीच सांगितला तेव्हाच!” ती स्वतःला सोडवून घेत डोळे पुसत म्हणाली.

सोहम,“ अच्छा! मग माझी तू जी दोन महिन्यांपासून सेवा करत आहेस त्याचे पण पैसे मला द्यावे लागतील ना! सांग किती झाले ते?” त्याने रागाने विचारले.

सावी,“ are you mad!काय बोलतो आहेस तू? मी तुझी सेवा व्यवहार म्हणून नाही केली सोहम” ती चिडून म्हणाली.

सोहम,“का आता का राग आला ग तुला? मी ही तुला कपडे व्यवहार म्हणून नाही घेतले!” तो असं म्हणून सावीच्या उत्तराची वाट न पाहताच बेडवर त्याच्या जागेवर जाऊन तिच्याकडे पाठ करून झोपला.

      सावीच्या लक्षात आले की आपण चिडून काही तरी चुकीचं बोललो आहे आणि आता हा तोंड फूगवुन झोपला.देवा मी किती मूर्ख आहे  आता याचा रुसवा काढायला काही तरी करावे लागणार उद्या! याच विचारत ती झोपली.

       दुसऱ्या दिवशी सकाळी सावी उठून कामाला लागली. सोहम ही सावीने उठवायच्या आधीच उठला  आणि तयार झाला. त्याने तिला एक शब्द ही न बोलता नाष्टा केला आणि तिच्या हातातून टिफिन घेऊन तो तोंड फूगवून गेला. सावीने त्याला बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण सोहम तिला न बोलताच निघून गेला.आता सावीने त्याचा रुसवा काढण्यासाठी त्याच्या आवडीचा मेन्यू रात्रीच्या जेवणासाठी बनवायचा प्लॅन केला आणि मार्केटमध्ये जाऊन सगळी खरेदी करून आली. 

           ती सोहम येण्या आधीच स्वयंपाकाला लागली. तिने  यु ट्यूबवर पाहून  पालक पनीर, भरवा बैगन, मसाले भात बनवला आणि पुऱ्या तळल्या, मार्केट मधून ती आम्रखंड  आधीच घेऊन आली होती. सोहमच्या गाडीचा आवाज आला तसा तिने सगळे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले. दाराची बेल वाजली आणि सावीने दार उघडले. सोहम आत आला आणि बेडरूमध्ये तिला काहीच न बोलता निघून गेला. सावीने त्याला न विचारताच कॉफी केली आणि त्याला कॉफी बेडरूममध्येच नेऊन दिली. ती सांजवात करत होती. सोहम टी. व्ही. लावून हॉलमध्ये कॉफी घेऊन येऊन बसला. सावीने ही त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले.

        सोहम मात्र मनातल्या मनात  बोलत होता.हिला काही फरकच पडत नाही सोहम तू बोललास काय किंवा नाही बोललास काय?  असं नाही की एकदा तरी बोलावं किंवा रुसवा काढण्याचा प्रयत्न तरी करावा! जाऊदे मीच जास्त अपेक्षा करत आहे. तो हा सगळा विचार करत तिथेच सोफ्यावर लवंडला आणि टी. व्ही. पाहता पाहता त्याला तिथेच झोप लागली. सावीने ते पाहिले आणि तिने हसून टी.व्ही बंद केला. बरोबर नऊ वाजता तिने सोहमला जेवायला उठवले. सोहम येऊन गुपचूप जेवायला बसला. सावी त्याच्या ताटात जसजसे एक-एक पदार्थ वाढत होती तसतसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. कधी  तो आश्चर्याने सावीकडे पाहत होता तर कधी ताटाकडे! सावीने ते पाहिले आणि हसून आम्रखंडाचा एक चमच्या त्याला भरवत म्हणाली.

सावी,“ सॉरी ना मी काल रात्री चिडून तुला जास्तच बोलले I am sorry!”  

सोहम,“ अच्छा तुला फार लवकर कळले ग!” तो तोंड फूगवून म्हणाला.

सावी,“ सॉरी ना! हे बघ कान धरते वाटलं तर उठाबशा काढू का मी?” ती खुर्चीवरून उठत म्हणाली.

सोहम,“ त्याची काही गरज नाही.its ok!” तो फुगलेले तोंड घेऊनच म्हणाला.

सावी,“ मग आता हे गालाचे दोन फुगे कसे फुटणार? त्यांना टाचणी लावू का?”  ती नाटकीपणे त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाली.

      हे ऐकून सोहम हसला आणि म्हणाला.

सोहम,“ त्याची काही गरज नाही हे माझ्या आवडीचे जेवणच बास! कुठून मागवलेस हे जेवण?” तो जेवण करत म्हणाला.

सावी,“ मी बनवले आहे हे सगळं  यु ट्यूबवर पाहून  हा आम्रखंड तेव्हढे विकत आणले आहे! कसं झाले आहे रे?” तिने उत्सुकतेने विचारले.

सोहम,“ काय तू केलंस हे सगळं नाही म्हणजे  तुला सगळा बेसिक स्वयंपाक येतो हे माहीत आहे मला पण हे सगळं!मस्तच झालंय ग सगळं आणि मसाले भात तर अप्रतिमच आणि  हे पालक पनीर आणि भरावा बैगण तर लाजवाब आणि सोने पे सुहागा पुरी आणि आम्रखंड! क्या बात!” तो खात-खात कौतुकाने  बोलत होता आणि सावी त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला असं पाहताना बघून सोहम तिला म्हणाला.

सोहम,“ सावी अग असं पाहतेस काय जेव ना जेवण थंड होतय!”

सावी,“ हो जेवते!” ती भानावर येत म्हणाली आणि जेवली.

      सोहम जेवून रूम मध्ये जाऊन लॅपटॉपवर त्याच काम करू लागला आणि सावी किचन आवरून मेन डोअर लॉक करून सगळ्या लाईटी बंद करून रूममध्ये गेली.ती बेडवर बसत सोहमला म्हणाला.

सावी,“ खरंच सॉरी सोहम! मी चिडून बोलले रे!” ती खाली मान घालून म्हणाली.

सोहम,“ सोड ना रात गयी बात गयी! आणि बरच झालं एका अर्थी आज मला मस्त जेवायला मिळालं माझ्या आवडीचं तेही तुझ्या हातचे!” तो  लॅपटॉप बंद करून तिचा हात धरत म्हणाला.

सावी,“ हो का बब्बू!” ती त्याला चिडवत म्हणाली.

सोहम,“ मला बब्बू म्हणू नकोस आ तुला माहीत आहे मला नाही आवडत ते!” तो चिडून म्हणाला.

सावी,“ बरं नाही म्हणत झोप आता!” ती म्हणाली.

             पुढचे पंधरा दिवस दोघांचं ही रुटीन व्यवस्थित सुरू होत. सोहम  प्रेझेन्टेशनमुळे चांगलाच  बिझी होता. त्याचे प्रेझेन्टेशन झाले आणि ट्रस्टीजना ही ते आवडले.त्यामुळे सोहम खुश होता. उद्या राखी पौर्णिमा होती आणि ठरल्या प्रमाणे आदित्य पहाटे फ्लाईटने चंदीगडला येणार होता. त्यामुळे सावी आणि सोहमच्या आनंदाचे ते एक कारण होते. सोहमला पहाटे चारला आदित्यला आणायला एअरपोर्टवर जावे लागणार होते म्हणून सावीने चारचा अलार्म लावला होता. तिने आजच दुसरी बेडरूम कामवालीकडून स्वच्छ करून घेतली होती आणि बेडवरचे पेडशीस, पिलो कव्हर, रूम मधले पडदे सगळं चेंज केलं होतं. चारचा आर्म वाचला आणि सावीने सोहमला उठवले. सोहम फ्रेश होऊन आदित्यला घ्यायला गेला. एअरपोर्टवर सोहमला पाहून आदित्य भलताच खुश झाला आणि त्याला मिठी मारली. तब्बल अडीच महिन्याने दोघे मित्र भेटत होते. दोघांच्या ही डोळ्यात आनंद अश्रू होते. आदित्य सोहमला म्हणाला.

आदित्य,“ कसा आहे सोम्या तू ?” 

सोहम,“ तुझ्या समोर आहे बघ?” त्याच्या समोर दोन्ही हातवर करत उभे राहून तो म्हणाला.

आदित्य,“ साल्या माझ्या बहिणी कडून खूप सेवा करून घेतलेली दिसतेय तू! आणि माझी झाशीची राणी कशी आहे?” तो त्याला पाठीत हलकेच मारत म्हणाला.

सोहम,“ अरे इथेच सुरू झाल्या का तुझ्या चौकशा घरी तर चल आणि हो तुझी झाशीची राणी मजेत आहे!” तो हसून म्हणाला.

      दोघे घरी आले.सावी त्यांचीच वाट पाहत टीव्ही पाहत बसली होती. सोहमने तिला सांगितले होते तू झोप मी लॅच कीने दार उघडून येईन आणि आदित्यची सगळी व्यवस्था लावीन पण सावीला आदित्यला भेटायचे होते.म्हणून ती जागीच होती. गाडीचा आवाज ऐकून तिने दार उघडले सोहम आणि आदित्य घरात आल्यावर तिने दार लॉक केले. आदित्यला पाहून तिने मिठी मारली आणि म्हणाली.

सावी,“ मग कसा आहे माझा बंधुराज?” 

आदित्य,“ मस्तच मग आणि तू कशी आहे? या सोम्याने तुझ्याकडून जास्त सेवा करून घेतली का ग?” तो सोहमकडे नाटकीपणे डोळे वटारून म्हणाला.

सोहम,“ हे सगळं ना सकाळी उठल्यावर विचार तिला आता जा आणि झोप थकला असशील!” सोहम हसून म्हणाला.

आदित्य,“ हो रे या मिड नाईट फ्लाईट्स म्हणजे ना वैताग आहे नुसता!” तो आळस देत म्हणाला.

       सोहमने त्याचे समान रूममध्ये ठेवले आणि सगळे झोपायला निघून गेले.सकाळी लवकर उठून सावीने चहा नाष्टा तयार केला.   सोहम आज  ऑफिसला जाणार होता कारण  आज  त्याच्या ऑफिसमध्ये महत्वाची मिटिंग होती पण त्याने हाफ डे घेतला होता आणि तो लंचला सावी आणि आदित्यला जॉईन करणार होता. सोहम तयार होऊन आला. सावीने  आदित्यला रूम बाहेरुन हाक मारून उठवले.आदित्य ही तयार होऊन नाष्टा कारायला आला. सोहमला फॉर्मल कपड्यात पाहून आदित्य म्हणाला.

आदित्य,“हे काय सोम्या मी आलो आहे आणि तू ऑफिसला निघालास!” तो काहीशा नाराजीने म्हणाला.

सोहम,“ अरे मी जाणारच नव्हतो आद्या पण खूप important मिटिंग आहे म्हणून जावे लागेल. मी लंचला तुम्हाला जॉईन होईन मग जाऊ कुठे तरी बाहेर लंच ही करू आणि भटकू ही! तो पर्यंत होऊ दे तुमच्या भावा-बहिणीचे गुलपीठ!” तो हसून म्हणाला.

आदित्य,“ ठीक आहे! मला ही माझ्या बहिणीला व्यवस्थित बोलता येईल आणि तू काय-काय त्रास दिला विचारता येईल म्हणजे तुझा क्लास लावतो!” तो नाटकीपणे सोहमकडे पाहत म्हणाला.

सोहम,“ हो बाबा लावा दोघे मिळून माझा क्लास काय करणार मी बिचारा एकटा!” तो ही नातकीपणे खूप दुःखी आहे असं भासवत म्हणाला.

सावी,“ जातो का आता ऑफिसला झाला ना नाष्टा! खूप झाली नाटक तुझी!” ती हसून त्याला म्हणाली.

सोहम,“ ये भगवान घोर कल युग आ गया! भाई क्या मिला बेचारे पति की कोई किमत ही नहीं रही!” असं नाटकीपणे म्हणून तो निघून गेला.

     यावर सावी आणि आदित्य बराच वेळ असत होते.आदित्यने परत थोडावेळ आराम केला आणि तो हॉलमध्ये येऊन बसला. सावी किचनमध्ये राखी बांधण्यासाठी ताट तयार करत  होती त्याला हॉलमध्ये आलेलं पाहून सावीने त्याला तिथूनच विचारले.

सावी,“ आदित्य चहा किंवा कॉफी करू का?”

आदित्य,“ नको ग मला काही! तूच ये!” तो म्हणाला.

      सावी औक्षणाचे ताट आणि राखी घेऊन हॉलमध्ये आली. तिने आदित्यला औक्षण करून राखी बांधली. तसे आदित्यच्या डोळ्यात पाणी उभे  राहिले. सावीने ते पाहिले आणि त्याला विचारले.

सावी,“ आदित्य काय झाले?”

आदित्य,“ काही नाही ग असच! By the way सॉरी सावी तुला खूप बोललो गेल्या काही दिवसांत! I am really sorry!” तो डोळ्यातले पाणी पुसत बोलला. 

सावी,“ सॉरी नको म्हणून आदित्य प्लिज तू जर मला बोलला नसतात ना तर मला सोहमची अवस्था कळलीच नसती रे! मी मूर्ख स्वतःच्याच विश्वास जगत होते स्वतःचा अहंकार स्वतःच्या धारणा कुरवाळत बसले होते. तू माझे डोळे उघडले! त्यासाठी thanks!” ती त्याचा हात धरून मनापासून बोलत होती. तिच्या ही डोळ्यात पाणी होते.

आदित्य,“ बरं बरं बास झाला मेलो ड्रामा आता! सोम्याची तब्बेत कशी आहे त्याची ब्रेन इंज्युरी बरी झाली का? आणि तुझी तब्बेत कशी आहे ग बी.पी कसा वाढला तुझा एकदम?” तो काळजीने विचारत होता.

सावी,“ अरे हो हो श्वास घे जरा किती प्रश्न विचारशील! सोहमची ब्रेन इंज्युरी आता बरी झाली आहे पण त्याच्या इफेक्ट अजून आहे त्याच्यावर  mood swings होतायत त्याचे फार हल्ली! तो  चिडचिड करतो! डॉक्टरांचे म्हणणे आहे की होईल कमी हळूहळू पण तो पर्यंत थोडं जपा त्याला!आणि मेडिसीन्स ही बंद झाले आहेत त्याचे फक्त एक गोळी सुरू आहे! पण स्टीचेस दुखतात म्हणत होता काल परवा हाताचे आणि कपाळाचे!” ती दीर्घ श्वास घेत म्हणाली.

आदित्य,“ हुंम काळजी तर घ्यालाच हवी त्याची! मी खूप घाबरलो होतो सावी खरं तर त्याला i. c.u. मध्ये त्या अवस्थेत पाहून! पण finally he is safe!”तो भावूक होऊन बोलत होता.

          सावी ही ते सगळं आठवून भावूक झाली.थोडा वेळ शांततेत गेला. मग पुन्हा आदित्य बोलू लागला.

आदित्य,“ पण माझ्या झाशीच्या राणीचा बी.पी.कशाने वाढला होता आणि ताप ही आला होता म्हणे?” तो वातावरण हलकं करण्यासाठी म्हणाला.

सावी,“ काही नाही रे! थोडा व्हायरल फिवर झाले होते आणि बी.पी.वाढला होता थोडा! आणि तू बिचाऱ्या माझ्या नवऱ्याला काय-काय धमकावले रे!” ती त्याला एक फटका मारत म्हणाली.

आदित्य,“ अरे बापरे! तुझा बिचारा नवरा!(तो हसून म्हणाला) बरं सावी तुमच्यात सगळं नीट झालं का? म्हणजे वरून तर सगळं आलबेल दिसतंय मला!” तो गंभीर होत म्हणाला.

सावी,“ नाही रे वरून सगळं आलबेल वाटत असेल तरी तसं नाही आहे आदित्य!सोहमचा निर्णय झाला आहे त्याला नाही राहायचं माझ्या बरोबर!” ती डोळे पुसत म्हणाली.

आदित्य,“ म्हणजे? सोम्या माझ्या समोर नाटक करतो आहे का?” त्याने आश्चर्याने विचारले.

सावी,“तसं काही नाही रे! मी मध्ये आजारी पडले आणि सोहम खूप घाबरला मग त्याने प्रॉमिस केलंय मला की तो हे चार महिने माझ्या मना प्रमाणे वागेल म्हणून!” ती निःश्वास सोडत म्हणाली. 

आदित्य,“ मी बोलू का सावी त्याच्याशी तो ऐकेल माझं!” तो गंभीर होत म्हणाला.

सावी,“ नको रे! खरं तर चुका माझ्याच आहेत आदित्य मला किंमत नाही कळली त्याची! आणि जेंव्हा कळली तेंव्हा खूप उशीर झाला होता. तो मनाने खूप दूर गेला आहे माझ्या पासून! मी ठरवले आहे हे साडे तीन महिने त्याच्या बरोबर जगून घ्यायचे! कारण मला माझे आयुष्य याच आठणीं वर घालवावे लागणार आहे!” ती म्हणाली.

आदित्य,“पण सावी ….” तो पुढे बोलणार तर सावीने त्याला थांबवले आणि ती त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

सावी,“ प्लिज आदित्य नको ना! आधीच मी त्याला खूप त्रास दिला आहे रे! आता अजून त्याच्यावर हे जबरदस्तीचे नाते लादून त्याला त्रास नाही द्यायचा मला! ज्या दिवशी सहा महिने पूर्ण होतील त्या दिवशी त्याचा निर्णय ऐकणे फॉर्म्यालिटी असेल माझ्यासाठी कारण त्याचा निर्णय ऑल रेडी झाला आहे.  तो ऐकून मी निघून जाईन त्याच्या आयुष्यातून कायमची! नाही देणार त्याला त्रास आणखी! तू म्हणतो ते खरं आहे आदित्य I am not deserving him!” ती अश्रूंना वाट करून देत बोलत होती. आज किती तरी दिवसांनी ती तीच मन कोणा समोर तरी मोकळं करत होती.

आदित्य,“ सावी आग ते सगळं मी रागाच्या भरात बोललो होतो! तू इतकं मानला नको ना लावून घेऊ! प्लज सॉरी ग!” तो भावुक होऊन बोलत होता.

सावी,“ बरं ते सोड सगळं माझं गिफ्ट कुठे आहे? या वर्षी तर मी राखी पण बांधली की!” ती हसून  हात पुढे करत म्हणाली.

आदित्य,“ अग हो हो देणार की मी गिफ्ट जरा दम खा!” तो हसून म्हणाला.

      ते हे सगळं बोलत होते तो पर्यंत बेल वाजली. ते किती वेळ बोलत होते याचे भान दोघांना ही नव्हते. सोहम ऑफिसमध्ये जाऊन आला देखील होता आणि सावी आणि आदित्य अजून बोलतच होते. सावीने जाऊन दार उघडले आणि सोहम तिला पाहून म्हणाला.

सोहम,“ हे काय तू अजून तयार नाही झालीस? अरे देवा! आद्या तू पण अजून तयार नाहीस मला वाटले तुम्ही रेडी असाल. गेलं की निघायचे! बरं जा तयार व्हा जाऊन!” तो श्वास न घेता ऑफिसची बॅग हॉल मधील टी पॉयवर ठेवत म्हणाला.

सावी,“ अरे हो! जरा श्वास तर  घे! पाणी पी आम्ही होतो रेडी!” ती काळजीने म्हणाली.


 

      तिघे ही तयार होऊन बाहेर फिरायला निघाले.

सावी आणि सोहमच्या आयुष्यात आदित्यची अशी प्रत्यक्ष एन्ट्री त्याच्या नात्याला कलाटणी देणार होती का? आदित्य सोहमशी या विषयावर बोलेल की सावीच ऐकून तो सोहमशी काही ही बोलणार नाही? आणि आदित्य बोलला तरी त्याचे बोलणे सोहम ऐकेल का?

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

©Swamini (asmita) chougule







 






 

      





 

             

       

        

🎭 Series Post

View all