Login

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १६)

This is a love story of before marriage and after marriage

       सावीने डोळे पुसून मोबाईल पाहिला तर सोहमच्या आईचा म्हणजे निताताईचा फोन होता. तिने फोन उचलला आणि म्हणाली.

सावी,“ हा बोला आई!”तिचा आवाज आताच रडल्यामुळे जरा रडका वाटत होता.

नीताताई,“ काय ग रडत होतीस का बेटा?” त्यांनी काळजीने विचारले.

सावी,“ नाही ओ आई! खूप वेळ झालं एकटीच टी. व्ही. पाहत होते कोण बोलायला नसल्यामुळे बोलले नाही कोणाशी खूप वेळ म्हणून भरल्या सारखा वाटत असेल माझा आवाज!” तिने स्पष्टीकरण दिले.

निताताई,“ खरं ना? का बब्बू तुला काही म्हणाला ग? एक तर तुझी तब्बेत ठीक नाही बरं वाटतंय का बेटा तुला? त्या सोम्याला बघतेच थांब आता!” त्या म्हणाला.

सावी,“ बरं वाटतं मला आता!काही नाही म्हणाला मला सोहम उलट बरं नाही  मला म्हणून दोन दिवस झाले माझी सेवा करत होते साहेब! पण तुम्हाला कसं कळलं! अरे देवा मी कस विसरले टेलिफोन बूथ तर माझ्या बरोबरच राहत की!” सावी असं म्हणाली आणि दोघी ही हसल्या.

निताताई,“ हो त्याच तुझ्या टेलिफोन बुथने सांगितले आम्हांला बेटा खरंच बरं वाटतंय ना तुला? खरं सांग सावी बब्बू तुझ्याशी बरा वागतो ना ग? नाही तर मी कान उपडू का त्याचे?” त्या काळजीने म्हणाल्या.

सावी,“हो आई मी आता ठणठणीत आहे आणि सोहम छान वागतो माझ्याशी मी म्हणाले ना की त्यानेच सेवा केली माझी रात्र भर उशाला बसून माझ्या कपाळावर  गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता बिचारा! आणि मला काही काम करू दिलं नाही त्याने सगळं स्वतःच केलं!” ती कौतुकाने बोलत होती.

नीताताई,“ त्याची चिडचिड कमी झाली का ग? का तशीच सुरू आहे! त्याचे बाबा विचारत होते नाही तर त्याची काही खैर नाही!” त्या म्हणाल्या.

सावी,“ हो कमी झाली आहे त्याची चिडचिड! उलट आज तर मी खूप खुश आहे!” ती उत्साहाच्या भरात बोलून गेली आणि जीभ चावली.

नीताताई,“ अगो बाई आमच्या सावी मॅडम इतक्या खुश का आहेत पण आम्हाला ही कळू दे की!” त्या खोडसाळपणे म्हणाल्या.

सावी,“ काही नाही वो आई असच!” सावी लाजत म्हणाली.

नीताताई,“ असं कसं काही नाही काही तरी नक्कीच झालंय म्हणूनच आमची सुनबाई इतकी खुश आहे. गुड न्यूज लवकरच मिळणार वाटत आम्हांला!” त्या सावीच्या आवाजातील बदल हेरून म्हणाल्या.

सावी,“ काय आई तुम्ही पण!” ती पुन्हा लाजत म्हणाली.

नीताताई,“ बरं बाई नको लाजूस इतकं आणि अशीच खुश राहा! आणि त्या येड्याची काळजी घ्यायच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नकोस. तो आता चांगला ठणठणीत आहे. तुम्ही दोघ खुश तर आम्ही खुश बेटा अजून काय हवं आम्हाला! बरं ठेवते बब्बूला फोन करते आता लंच ब्रेक झाला असेल त्याचा!” त्या म्हणाल्या.

सावी,“ बरं! त्याला गोळी खायची आठवण करा आई जरा! आजकाल तो कंटाळा करतो! ठेवते मी!” 

         सावीने फोन ठेवला तो पर्यंत सोहमचा फोन तिच्या मोबाईलवर आला. तिने फोन उचलला.

सोहम,“  हॅलो सावी जेवलीस का?आणि मेडिसीन्स घेतलीस का?” त्याने विचारले.

सावी,“ नाही अजून आत्ता जेवेण आणि घेईन मेडिसीन्स मी! मी काय तुझ्या सारखी आहे का? तू ही जेव आणि गोळी घे!” ती म्हणाली.

सोहम,“ माझ्या सारखी म्हणजे कसली ग?” त्याने विचारले.

सावी,“ तुझ्या सारखी म्हणजे मी वेडी नाही!” ती खोडसाळपणे हसून म्हणाली.

सोहम,“ अच्छा म्हणजे मी वेडा काय बरं आल्यावर तुला सांगतो! मी किती वेडा आहे ते!” तो सुचकपणे म्हणाला.

सावी,“ तुझा फाजीलपना झाला असेल तर फोन ठेव आई फोन करणार आहेत तुला?” ती म्हणाली.

सोहम,“ ये बाई माझी तक्रार तर नाही केलीस ना तिच्याकडे? माझा क्लास लागणार वाटत आज!” तो नाराजीने म्हणाला.

सावी,“ नाही रे मी तक्रार वगैरे नाही केली. त्यांचा फोन आला होता नेहमी सारखा आणि माझ्या तब्बेतीची विचारपूस करायला ही त्या फोन ठेवता ठेवता म्हणाल्या माझ्या बब्बूला फोन करते!” ती त्याला चिडवत हसून म्हणाली.

सोहम,“ ये बब्बू म्हणालीस ना तर बघ! तुला ना घरी आल्यावर बघतो!” तो चिडून म्हणाला.

सावी,“ सकाळी तर बघून झालं की आता अजून बघणार का?” ती खट्याळपणे म्हणाली.

सोहम,“ मी ऑफिसमध्ये आहे नाही तर तुला...!” तो केसातून हात फिरवत जरा लाजून म्हणाला.

सावी,“ नाही तर मला काय?” ती पुन्हा हसून म्हणाली.

सोहम,“ घरी आल्यावर सांगतो तुला! बरं by आईचा फोन येतोय आणि जेवण कर आणि मेडिसीन्स घेऊन झोप! नाही तर तुला उद्योग करायची सवय आहे!” असं म्हणून त्याने फोन ठेवला.


 

       सावीने ही फोन कट केला आणि ती स्वतःशीच हसली. आज किती तरी दिवसांनी सोहमने तिला असा लंच ब्रेक मध्ये फोन केला होता. मुबंईत एकाच ऑफिसमध्ये असून ही लंच एकत्र घेता नाही आलं की सोहम सावीला फोन करायचा असा. हे आठवून ती  हसली.तिने टी. व्ही पाहत जेवण केले. मेडिसीन्स घेतले आणि बेडरूमध्ये गेली. तिला काही केल्या झोप येत नव्हती. सोहमच्या परफ्यूमचा तिच्या शरीराला येणारा वास तिला सतत सकाळच्या धुंद क्षणांची आठवण करून देत होता आणि तिला पुन्हा एकदा त्याच्या कुशीत केंव्हा शिरते असे झाले होते. मग तिने सोहमचे वोर्डरोब खोलले आणि त्याचे कपडे, घड्याळे,परफ्यूम सगळ्यावरून  हात फिरवत राहिली. तासा भराने तिला औषधांमुळे गुंगी येऊ लागली आणि ती झोपली.

            तिला जाग आली ती डोर बेल वाजल्यावर. तिने घड्याळ पाहिलं आणि सोहम आला असेल म्हणून दार उघडले. तर सोहम हसतच दारात उभा होता. सोहम आत आला आणि तिने दार लावून घेतलं आणि आळस देतच त्याला म्हणाली.

सावी,“ फ्रेश हो जा! बरं तू कॉफी घेणार का चहा? मी करते तो पर्यंत!” 

सोहम,“ चहा कर मी आलोच!” तो बेडरूममध्ये निघून गेला.

     सावी किचनच्या बाथरूममध्ये फ्रेश झाली. तिने चहा ठेवला आणि देव्हाऱ्यात सांजवात लावली आणि हात जोडून डोळे झाकून उभी राहिली तर तिला मागुन येऊन सोहमने  मिठी मारली आणि तिला कानात म्हणाला.

सोहम,“ किती त्रास देणार त्या देवाला बिचारा मनात म्हणत  असेल नवीन झालेली ही माझी भक्त खूपच पिडते बाबा!” तो तिची चेष्टा करत बोलत होता.

सावी,“ काय हे लहान मुला सारख लावलं आहेस तू सोहम! तुला दिसत नाही का मी  प्रार्थना करत होते ना! असं मिठी मारतात का?” ती काहीशी चिडून म्हणाली.

सोहम,“  तुम्ही देवाचे नवीन भक्त आहात आणि आम्ही जुने भक्त आहोत त्यामुळे आमची हार्ड डिस्क जुनी आहे.तर  आम्हाला जास्त कळत!” तो तिला स्वतः कडे वळवत हसून म्हणाला.

सावी,“ असं आहे का? बरं असुदे! चहा उकळतोय माझा सोड मला!” असं म्हणून ती  किचन कट्ट्या जवळ जाऊन जाऊन चहात दूध ओतून चहा कपात गाळू लागली.

      सोहम तिच्या जवळ उभा राहून तिला रोखून पाहत होता.त्याच असं रोखून पाहणं तिला अस्वस्थ करत होत म्हणून  ती त्याला म्हणाली.

सावी,“ जा ना सोहम मी चहा घेऊन येते हॉलमध्ये!”

सोहम,“ का? मी तर हात पण नाही लावला तुला आता!मी इथेच उभा राहणार तू चहा देत नाही तो पर्यंत!” तो खट्याळ हसून म्हणाला.

सावी,“ तू ना खूप जास्त शेफारला आहेस या काही दिवसात! पुरे झाला तुझा नालायक पणा जा आता!” ती वैतागुन चहा कपात ओतत  म्हणाली.

सोहम,“  मी शेफारलो आहे का? बरं ते सगळं राहू दे तू मला दुपारी काय म्हणालीस ना ते सांग आधी?”  तिला स्वतःकडे वळवत तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला.

सावी,“ मी काही बोलले नाही. हा घे चहा!” तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला आणि ती स्वतःचा  कप घेऊन हॉलमध्ये सोफ्यावर जाऊन बसली आणि टी. व्ही. सुरू केला.

सोहम,“ अच्छा म्हणजे तुला काहीच आठवत नाही का?” तो सोफ्यावर तिला खेटून बसत म्हणाला.

सावी,“ हे बघ उगीच टाईम पास करू नको तुला प्रेझेन्टेशन तयार करायचे आहे ना? मग चहा पी आणि जा तुझं काम कर जा! मला पण स्वयंपाक करायचा आहे!” ती चहाचा सीप घेत रिमोटने  टी. व्हीचे चायनल बदलत म्हणाली.

सोहम,“ आज स्वयंपाक करण्याची गरज नाही आणि माझ्या कामच मी पाहीन! पहिल्यादा तुला दुपारी काय म्हणाली ते आठवून देतो!” तो चहा पिऊन कप टीपॉय वर ठेवत म्हणाला.

    

सावी,“ का आज तुझा उपवास आहे?” ती मिश्कीलपणे म्हणून कप किचनमध्ये घेऊन जायला उठली.

      सोहमने तिच्या हातातला कप टीपॉयवर ठेवला व तिला जवळ बसवून घेत म्हणाला.

सोहम,“ नाही माझ्या बायकोला आवडत नाही मी उपाशी राहिलेलं ती खूप खडूस आहे. ती आणि मी आज डिनरला जाणार आहोत बाहेर!” तिचे बांधलेले केस मोकळे सोडत तो म्हणाला.

सावी,“हो का? पण तुझ्या बायकोला विचारलंस का ती येणार आहे का ते? नाहीच आली ती तर!” ती नाटकीपणे म्हणाला.

सोहम,“ ती नाही म्हणणारच नाही! तू मला दुपारी काय म्हणाली ते सांग आधी” तो तिला जवळ ओढत म्हणाला.

सावी,“ खरंच नाही आठवत मला! तूच सांग!” त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत ती म्हणाली.

सोहम,“ मी आठवण करून दिल्यावर  काय मिळणार मला!”त्याने डोळे मिचकावून विचारले.

सावी,“तू म्हणशील ते झालं! सांग आता मला खरंच आठवत नाही रे!बरं पण असं काय बोलले मी की तू ते इतकं लावून धरलं आहेस?” ती तोंड बारीक करून म्हणाली.

सोहम,“ अग एव्हढं तोंड पाडायला काय झालं? इतकं सीरिअस काही नाही. कशावरून तरी मी म्हणालो की तुला घरी आल्यावर बघतो तर मला उत्तर काय दिलस तू आठवलं का आता तरी?” तो तिचा चेहरा दोन्ही आताच्या  ओंजळीत धरून म्हणाला.

सावी,“ अssss देवा मी म्हणाले की सकाळी तर बघून झालं अजून बघणार का?” असं म्हणून तिने लाजून मान खाली घातली. बोलण्याच्या ओघात आपण हे काय बोलून गेलो याची तिची तिलाच लाज वाटत होती.

सोहम,“ हुंम्म! मग मला अजून एकदा बघायचं आहे तुला!” तो तिच्या लाजेने आरक्त झालेल्या गालावर किस करत म्हणाला.     

    

      सावी मात्र लाजून सोहमला बिलगली आणि सोहमने पुन्हा तिचा ताबा मिळवला. काही वेळाने सोहम टी. व्ही पाहत होता आणि सावी त्याच्या मांडीवर झोपली होती.सोहमने घड्याळ पाहिले तर आठ वाजले होते. ते पाहून तो सावीला म्हणाला.

सोहम,“ सावी चल  तयार हो लवकर! हो पण मी सांगेल तो ड्रेस घालायचा नऊ पर्यंत निघू आपण!” तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला.

सावी,“ आता हे काय नवीन तू सांगशील तो ड्रेस घालायचा? बरं  ठीक आहे घालीन पण कोणता घालू ते तरी दाखवतील का?” ती उठून बेडरूमकडे वळत म्हणाली.

सोहम,“ चल सांगतो.”तो तिच्या मागे बेडरूममध्ये गेला.

      त्याने तिचे  वार्डरोब उघडले आणि त्याने हँगरला लावलेले ड्रेस  पाहत विचारले.

सोहम,“ हे काय सावी इतकेच कपडे आणि त्यात एकच शॉर्ट वनपीस! what is that?” तो नाराजीने म्हणाला.  

सावी,“ मी काय इथे फिरायला आले होते का सोहम की कायमच इथेच राहायला? जे आणि जितके  हाताला लागले ते आणि तितके कपडे बॅगेत कोंबुन आले होते मी!” ती स्पष्टीकरण देत म्हणाली.

सोहम,“ हुंम! या सगळ्या गोंधळात तुला शॉपिंगपण करायला वेळ मिळाला नाही इथे! ठीक आहे.उद्या मी ऑफिसमधून आल्यावर तुझ्यासाठी शॉपिंग करू! आज तू हा शॉर्ट वनपीस घाल मग!” तो म्हणाला.

सावी,“ वेड लागलय का तुला सोहम! सध्या मी असलं काही घालत नाही! तुझं पण ना काही तरीच असत.” ती नाराजीने म्हणाली.

सोहम,“ अरे मुंबईत तर सगळं घालत होतीस की मग आताच काय झालं तुला? हे असलं काकू बाई सारख केंव्हा पासून राहायला लागलीस ग! ओ मी तर विसरलोच की तू तर दोन महिन्यांपासून पूजापाठ करणारी! सती सावित्री टाईप टिपिकल गृहिणी झालीस ना! राहू दे तुला काय घालायचे ते घाल.”तो असं टोचुन बोलून चिडूण निघून गेला.

     सावी तिथेच बेडवर बसून  विचार करत होती. झाली याची पुन्हा चिडचिड सुरू! याला सगळे वेस्टर्न कपडे आवडतात आणि इंडियन म्हणलं तर फक्त साडी जी मला तर नसता ही येत नाही आणि कॅरी ही करता येत नाही.चला सावी मॅडम साहेबांचा पारा अजून चढायच्या आत तयार व्हा! असा विचार करून ती तोच शॉर्ट वनपीस  घेऊन चेंज करायला गेली. सोहम सोफ्यावर डोळे झाकून पडला होता.सावी तयार होऊन सोहमच्या समोर जाऊन उभी राहिली आणि त्याला म्हणाली. 

सावी,“ साहेब मी झाले तयार जा तुम्ही तयार व्हा!की आजच डिनर कॅन्सल होणार? मग डाळ-भात करू का कपडे बदलून!” ती असं म्हणताच सोहमने डोळे उघडले आणि तो तिला झोपल्या ठिकाणी पडून पाहू लागला.

     सावीने तोच  गुडघ्या पर्यंतचा स्लीव्ह्ज लेस बेबी पिंक कलरचा शॉर्ट वनपीस घातला होता. लाईट मेकअप, बेबी पिंक लिपस्टिक, कानात नाजूक लोम्बत्या इअर रिन्ज आणि पिन्स लावून मोकळे सोडलेले केस! एका हातात रिस्ट वॉच दुसऱ्या हातात नाजूक ब्रेसलेट! आणि मंद रोज परफ्युमचा सुवास! मुळातच सुंदर असणारी सावी अजूनच सुंदर दिसत होती. सोहम तिला दोन मिनिटं पाहतच राहिला आणि मग तिला खुश होऊन म्हणाला.

सोहम,“ o my God you are looking beautiful!” 

सावी,“ मग जा ना तयार हो आता! निघायला वेळ झाला तर घरी यायला ही वेळ होईल सोहम!” ती त्याला उठवत म्हणाली.

सोहम,“ चल माझ्या बरोबर एक मिनिट!( त्याने तिला हात धरून बेडरूममध्ये नेले आणि म्हणाला) तुझा ज्यूलरी बॉक्स कुठे आहे?” त्याने विचारले.

सावी,“ तो कशाला हवा तुला? जा ना सोहम तयार हो!” ती त्याच्यावर वैतागून म्हणाली.

      सोहमने तिच्या वोर्डरोब मध्ये स्वतःच तिचा ज्यूलरी बॉक्स शोधला आणि त्यातून त्याने एक  हार्टचे पेंडल असणारे नाजूक लॉकेट काढले आणि तिला ड्रेसिंग टेबल समोर उभी करत म्हणाला.

सोहम,“ हे बघ हे लॉकेट या तुझ्या ड्रेस बरोबर जाते. ते मंगळसूत्र नाही. थांब मी ते काढतो आणि हे लॉकेट घालतो” असं म्हणून तो तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढू लागला.

      ते पाहून  सावी त्याच्यावर चिडली आणि त्याचा हात झटकत त्याच्यावर खेकसली.

सावी,“ सोहम! मला नाही घालायचे ते लॉकेट आणि हे मंगळसूत्र नाही काढायचे! प्रत्येकच गोष्ट मी तुझ्या मनासारखी करेन असं नाही होणार! तुला जायचं ना जा तू डिनरला मी नाही येणार!” ती चिडून तणतणत होती.

     तिला इतकी चिडलेली पाहून सोहम हैराण होता. त्याने तिला बेडवर बसवले आणि तिला पाणी देत तो म्हणाला.

सोहम,“ ok!ok! Relax! इतकी पॅनिक नको होऊ! तुला नाही काढायचे तर नको काढूस ते मंगळसूत्र! मी तयार होऊन आलो!” तो बाथरूमकडे वळला तर सावीने त्याचा हात धरला आणि बोलू लागली.

सावी,“ I am sorry! मी जास्तच रागावले तुझ्यावर!” ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

सोहम,“ it's ok!  बरं आता रडू नकोस बाई!  नाही तर तुझा मेकअप खराब होईल ना! मी पाच मिनिटात आवरून आलो!” तो तिचे डोळे हाताने अलगद पुसत म्हणाला.

     सावीने नुसती होकारार्थी मान हलवली. सोहम तयार होऊन आला आणि दोघे हॉटेलमध्ये पोहचले. हॉटेलचे नाव होते कपल्स व्हीला! खास कपल्ससाठीच्या प्रायव्हसीसाठी ते हॉटेल प्रसिद्ध होते.एक  गार्डन रेस्टोरंट! एका वेटरने त्यांना त्याच्या रिजर्व टेबल पर्यंत नेऊन सोडले. जिथे थोड्या थोड्या अंतरावर इग्लु सारख्या सिमेंटच्या पण त्याला पोट मातीचा अशा झोपड्या होत्या. त्या झोपडीत मस्त वेलबुट्टीचे नक्षी काम होते. मधोमध  टेबल आणि खुर्च्या मस्त सेंटेड कॅन्डल्स आणि लाईटचा मंद प्रकाश! एकूणच वातावरण रोमँटिक होते. सावीला सोहमने खुर्ची ओढून बसायला लावले. सावी हसून खुर्चीवर बसली.

             तिथल्या इंटरकॉमवरून सोहमने फोन करून वेटरला बोलावून घेतले. वेटरला ऑर्डर दिली.सगळं सावीच्या आवडीचा मेनू तिला आवडणारे पंजाबी पदार्थ मलई कोफ्ता, पालक पनीर, दाल तडका, तंदूर रोजी, जीरा राइस आणि रबडी! सावी फक्त त्याच्याकडे पाहून हसली. सोहम तिला तिथली माहिती सांगत होता.चंदीगडमध्ये काय काय प्रसिद्ध आहे.मानली, कासौली ही हिलस्टेशन्स चंदीगड पासून खूप जवळ आहेत हे सर्व तो सांगत होता. पण सावी मात्र वेगळ्याच विचारात गढली होती.

  

          सोहमला हे अचानक काय झाले. तो असा का वागत आहे? इतके दिवस तर माझ्याशी नीट बोलत ही नव्हता आणि या दोन दिवसात इतका आमूलाग्र बदल?काळजी काय घेतोय? रोमान्स काय करतोय?सतत माझ्या पुढे मागे असतो!  त्याच्या आवडीचेच कपडे घाल म्हणून हट्ट! मी इतकी चिडले त्याच्यावर तरी तो शांतच होता! आता हा रोमँटिक डिनर! इतका बदल का आणि कशामुळे? मी त्याच्यामुळे आजारी पडले म्हणून?की त्याने मला वचन दिले म्हणून! की खरच सोहमने मला माफ करून स्वीकारले आहे! नाही नाही सावी तू नकोस स्वतःला आशा दाखवू ही आशा फोल ठरेल कारण त्या रात्री तुझ्याशी कसा वागला तो विसरलीस का? त्याने तुला त्याच्या मनातून केंव्हाच काढून टाकलं आहे! कदाचित हे सगळं मी त्याच्या वागणुकीमुळे आजारी पडले म्हणून अपराधी भावनेतून चाललं असेल त्याच! तसा तो हळवा आहे पण एककल्ली आणि स्वतःचा शब्द पळणारा आहे! त्याच्या हळव्या स्वभावामुळे तो माझ्यावर इतका मेहरबान आहे कारण मी आजारी होते. तो स्वतःचा शब्द पळतो आणि म्हणूनच तो असा वागत असावा पण हे विसरू नको सावी सोहम एककल्ली आहे त्याने घेतलेला निर्णय तो सहजासहजी बदलत नाही म्हणून तू या सगळ्यातून  आशा नको लावूस जास्त कारण शेवटी त्रास तुलाच आहे. ती सोहमच्या वागण्याचे मनातल्या मनात विश्लेषण करत होती.

     तिला विचारात गढलेली पाहून सोहमने तिच्या समोर चुटकी वाजवली आणि तो म्हणाला.

सोहम,“कुठे भटकताय मॅडम मनाने?” त्याने हसून विचारले.

सावी,“ अssss कुठे नाही रे आहे इथेच! तो बघ वेटर आला ऑर्डर घेऊन!” ती सोहमच्या चुटकी वाजवण्याने भानावर आली आणि वेटरला पाहून विषय बदलत म्हणाली.

        

      दोघांनी जेवण केले आणि घरी निघाले.सावी शांत शांतच होती. सोहम मात्र तिला मध्येच गाडी चालवता चालवता काही तरी बोलत होता आणि fm वर गाणे लागले होते.

रोज रोज आँखों तले

एक ही सपना चले

रात भर  काजल जले

आँखों में जिस तरहा ख़्वाब का दिया जले!

        सावीच्या सिचवेशला अगदी साजेस गाणं होत ते! 

सावी दोन-तीन दिवसांपासून सोहमच्या वागण्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होती पण तिला त्याच्या वागण्याचा अंदाजच लावता येत नव्हता! सोहम सावीशी असं का वागत असावा? त्याच्यात हा बदल सावी विचार करत होती तसा अपराधी भावनेतून झाला होता का? या सगळ्या विचार चक्रात सावी मात्र चक्रावून गेली होती! पण या प्रश्नांची उत्तरे फक्त आणि फक्त सोहमच देऊ शकत होता.

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत

©swamini chougule      

 

🎭 Series Post

View all