Oct 25, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १५)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १५)

 

 

   पावणे आठ वाजत आले एरवी सहा पर्यंत येणारा सोहम अजून आला नव्हता. सावी  आता रडकुंडीला आली तिला सोहमची अधिकच काळजी वाटू लागली. ती दारातच वाट पाहत उभी होती.तिने आता पंधरा मिनिटे वाट पाहून सोहमचे ऑफिस गाठायचे असे मनोमन ठरवले तेवढ्यात तिला सोहमची कार येताना दुरून दिसली आणि तिच्या जीवात जीव आला. सोहमने कार पार्क केली आणि तो आत आला सावीला असे दारात चिंतीत पाहून त्याला कळून चुकले की आपण आज ही माती खाल्ली आहे. आता सावी चिडणार, रागावणार आता काय खा बोलणी असा विचार मनात   करून तो घरात शिरला सावी त्याच्या मागे दार लावून आत आली आणि सोहमने आता बोलणी खायची आहेत म्हणून मनाची तयारी केली व त्याने हॉलमधील टीपॉयवर बॅग ठवली तशी त्याला सावी जोरात येऊन बिलगली आणि हुंदके देऊन रडू लागली. सोहमला मात्र सावीचे हे वागणे नवीन होते. सावीने त्याला घट्ट मिठी मारली होती आणि ती काहीच न बोलता नुसती रडत होती.सोहमने तिला एका हाताने मिठीत घेतले आणि दुसरा हात तिच्या पाठीवरून मायेने फिरवत तिला विचारले.

 

सोहम,“ काय झालं सावी इतकं रडायला?”

 

सावी,“ किती वेळ लावलास यायला! फोन पण उचलला नाहीस माझा मी किती घाबरले!” ती रडतच बोलत होती.

 

सोहम,“ अग घाबरायचं काय त्यात मला काम होत थोडं म्हणून उशीर झाला. तू रडणं बंद कर आधी!” तो तिला समजावत म्हणाला.

 

सावी,“ घाबरायचे काय त्यात म्हणजे? किती वाजले पाहिलेस का? रोज किती वाजता येतोस तू? मला वाटलं तुला काही….” ती पुढे बोलायची थांबली आणि पुन्हा रडू लागली.

 

     सोहमने तिला सोफ्यावर बसवले आणि स्वतः तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिचे डोळे पुसत बोलू लागला.

 

सोहम,“ हे काय नवीन आहे का सावी आपल्यासाठी? तुला तर माहिती आहे की बऱ्याच वेळा अर्जंट मिटिंग लागतात  मग फोन करून कळवायला आणि फोन उचलायला ही वेळ मिळत नाही! तू पण ना आधी असं कधी घाबरली नाहीस मग आजच का? रडणं बंद कर आधी ते!” तो तिला समजावत म्हणाला.

 

सावी,“ आधीची गोष्ट वेगळी होती सोहम! आताची वेगळी आहे!” डोळे पुसत म्हणाली.

 

सोहम,“ तुला काय वाटलं मी तुला सोडून पळून गेलो की काय?” तो तिच्या जवळ सोफ्यावर बसत हसून तिचा मूड हलका करण्यासाठी म्हणाला.

 

सावी,“ नालायका मला इथे तुझ्या काळजीने पोखरूण काढले आणि तुला मस्करी सुचते आहे. पळून जाऊन तर दाखव आता! एकदा पळालास तुला सोडलंय परत करच अस तुला नाही फोडून काढला तर...” ती त्याची कॉलर धरून त्याच्या मांडीवर बसत म्हणाली.

 

सोहम,“ that's like a my savi! ( तो हसून तिला मिठीत घेत म्हणाला आणि पुढे बोलू लागला) तू तयार नाही झालीस अजून जा तयार हो! मी कॉफी करतो आपल्यासाठी मग मी कॉफी घेऊन फ्रेश होतो नंतर  जाऊया क्लिनिकमध्ये!” तो म्हणाला.

 

सावी त्याच्या मिठीत विसावली होती. ती त्याच्या शर्टच्या बटनावर नखाने नक्षी  काढत म्हणाली.

 

सावी,“ आता कुठे साडे आठ वाजले की! क्लिनिक बंद झाले असेल आणि असं ही मला आता बरं वाटतंय” ती लाडाने म्हणाली.

 

सोहम,“ सावी तुला मी चांगलाच ओळखून आहे. तुझे हे सगळे चाळे ना क्लिनिकमध्ये जाणे टाळण्यासाठी आहेत. पण  याचा काही उपयोग नाही उठ आणि तयार हो लवकर डॉ. सिंग रात्री दहा वाजेपर्यंत असतात क्लिनिकमध्ये!तुला अजून ही ताप आहे!  जा तयार हो जा पंधरा मिनिटात!” तो तिला मांडीवरून उठवत म्हणाला.

 

     आता मात्र साविचा नाइलाज झाला ती तयार व्हायला निघून गेली.सोहमने कॉफी केली आणि दोन मग घेऊन तो हॉलमध्ये आला. सावी तो पर्यंत तयार होऊन आली. तिने व  सोहमने कॉफी घेतली आणि सोहम पाचच मिनिटात तयार होऊन आला. दोघे ही डॉ. सिंगच्या क्लिनिक मध्ये गेले. डॉ.सिंग क्लिनिकमध्ये अजून होते. वेळ खूप झाल्याने कोणी पेशन्ट डॉक्टरच्या केबिनमध्ये नव्हते म्हणून रिसेप्शनिस्टने त्यांना डॉक्टरच्या केबिनमध्ये  पाठवले.डॉ. सिंगने दोघांना ही पाहून स्माईल दिली आणि ते म्हणाले.

 

डॉ.सिंग,“ Mr.and Miss.soham please site!  मिसेस सोहम आपकी तबियत अब कैसी हैं?” डॉक्टरने विचारले.

 

सावी,“ मैं ठीक हूँ डॉक्टर अब!” सावी म्हणाली

 

डॉ. सिंग,“ चलिए  आपका टेंप्रेचर और बी.पी. चेक करते हैं!”(असं म्हणून त्यांनी सावीला बेडवर झोपायला लावले व टेंप्रेचर व बी.पी. चेक केला)ते म्हणाले.


 

       दोघे पुन्हा आप-आपल्या जागेवर येऊन बसले. डॉक्टर काही बोलायच्या आधीच सोहमने काळजीने त्यांना विचारले.

 

सोहम,“डॉक्टर अब इसका बी.पी.कम हुआ या नहीं टेंप्रेचर थोड़ा कम था! मैंने चेक किया था। कोई घबरानेकी बात तो  नहीं ना डॉक्टर?”त्याने काळजीने विचारले.

 

डॉ.सिंग,“ calm down Mr.soham! मैं आपकी चिंता समज सकता हूँ। she is alright now! टेंप्रेचर कम हो गया हैं कल के मुकाबले!पर अब भी थोड़ा हैं। लेकिन बी.पी. अब भी हैं।” असं बोलून त्यांनी नर्सला बोलवून घेतलं.

 

सोहम,“मतलब बी.पी कम नहीं  हुआ अब तक और आप कहते हैं कि मैं चिंता ना करू?” तो काहीसा चिडून म्हणाला ते पाहून सावीने त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याला डोळ्याने चिडू नकोस असा इशारा केला.

 

डॉ.सिंग,“ Mr. सोहम मैंने ऐसा कब कहा कि बी. पी. कम नहीं हुआ कम हुआ हैं बी.पी.लेकिन अब भी हैं। हम एक इंजेक्शन दे देते हैं मिसेस. सोहम को और आठ दिन की दवाई लिख देता हूँ! अब चिंता की कोई बात नहीं हैं।नर्स इनको लेके जाइए और ये वाला इंजेक्शन दे दीजिए।” ते कागद नर्सच्या हातात ठेवत म्हणाले.

 

           सावी सोहमला डोळे वटारून पाहून नर्स बरोबर गेली. तिचा अविर्भावातून तुझ्यामुळे मला इंजेक्शन घ्यावं लागतं आहे असं सोहमला स्पष्ट दिसत होते. सोहम तिला पाहून खाली मान घालून हसत होता कारण त्याला माहित होतं की सावीला इंजेक्शन वगैरेचा तिटकारा होता.डॉक्टर ही त्यांची नेत्र पल्लवी पाहून हसत होते. सावी गेल्याची खात्री करून सोहम डॉ.सिंगला आता बोलू लागला.

 

सोहम,“ डॉक्टर मुझे सावी की थोड़ी चिंता हो रही हैं क्योंकि आज कल उसका बिहेवियर उसके स्वभाव से बिलकुल अपोजिट हैं!”तो काळजीने म्हणाला

 

डॉ. सिंग,“ मतलब?” डॉक्टरने विचारले.

 

सोहम,“ आज की ही बात ले लीजिए आज मुझे ऑफिस से आने में थोड़ी देर क्या हुई  मेमसाब फूटफूटकर रोने लगी! इतनी इमोशनल वो पहले नहीं थी!” तो सांगत होता.

 

डॉ. सिंग,“ कुछ दिन पहले आपका बहुत बड़ा एक्सीडेंट हुआ था वो भी इनके सामने इन्ही को बचाते हुए Am  I right Mr.soham?” त्यांनी विचारले.

 

सोहम,“ हाँ लेकिन इससे सावी के बिहेवियर का क्या संबंद्ध डॉक्टर?” त्याने विचारले.

 

डॉ. सिंग,“ आपको इस हालत में देखकर मिसेस. सोहम आपके प्रति ओहर प्रोटेक्टिव और पजेसिव हो गई हैं। ये सब उस का परिणाम हैं!”त्यांनी सांगितले.

 

सोहम,“ लेकिन डॉक्टर अब क्या करना होगा?” त्याने काळजीने विचारले

 

डॉ. सिंग,“ कुछ नहीं! वो आपकी चिंता करती हैं आपका ज्यादा ख्याल रखती हैं ये एक फेज हैं! जब तक फेज हैं आप आपनी पत्नी से सेवा करवाए और मजे लिजिए!”

 

    डॉ. सिंग सोहमला डोळा मारून हसले त्या बरोबर सोहम ही हसला. सावी आली आणि दोघे घरी निघाले जाता जाता सोहमने मेडिकल मधून डॉक्टरने लिहून दिलेली औषधे घेतली. घरी गेल्यावर दोघे ही फ्रेश झाले.सावी म्हणत होती मी जेवण गरम करते. पण सोहमने तिचे ऐकले नाही त्याने जेवण गरम केले व डायनिंग टेबलवर व्यवस्थित लावले.दोघे ही जेवले. सोहम आता खूप थकल्या सारखा वाटत  होता. एक तर रात्री त्याचे जागरण झाले होते आणि सकाळ पासून त्याची धावपळ झाली होती. सावीने त्याला जबरदस्तीने रूममध्ये पाठवून दिले आणि तिने बाकी सगळे आवरून घेतले.मेन डोर लॉक केले आणि रूममध्ये गेली तर सोहम लॅपटॉपवर काम करत असलेला तिला दिसला.त्याला पाहून ती म्हणाली.

 

सावी,“ काय हे सोहम झोप आता किती थकवा आला आहे तुला आणि झोपायचं सोडून काम करत बसलास!” ती काळजीने म्हणाली.

 

सोहम,“ हुंम! झोपतो मी थोड्या वेळाने तू औषध घे आणि झोप! अग आज ट्रस्टचे सगळे ट्रस्टी आले होते अचानक महत्वाची मिटिंग बोलावली. त्यांना ट्रस्टच्या शाखा म्हणजेच शाळा आणि कॉलेजेस नॅशनल लेव्हलवर सुरू करायची आहेत आणि त्या नंतर इंटरनॅशनल लेव्हलवर म्हणजेच त्यांना आता ट्रस्टचे ग्लोबलायझेशन करायचे आहे आणि त्याच सगळं नेटवर्किंग करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्यांनी! त्यामुळेच मला आज उशीर झाला घरी यायला आता पुढचे काही महिने खूप काम आहे.पंधरा दिवसात प्रेझेन्टेशन द्यायचे आहे मला सगळ्या नेटवर्किंग स्ट्रेटजीचे!” तो सांगत होता.

 

सावी,“ बरं पण आता झोप ना! काल रात्री ही झोपला नाहीस तू अशाने तब्बेत बिघडेल तुझी! हवं तर या प्रोजेक्टमध्ये मी हेल्प करीन तुला!” ती काळजीने त्याच्या मांडीवरचा लॅपटॉप काढून घेत म्हणाली.

 

        डॉक्टरचे मघाशीचे शब्द आठवून सोहमला मात्र हसू आलं. सावीने ते पाहिलं आणि त्याला विचारलं.

 

सावी,“ काय झालं हसायला तुला?”

 

सोहम,“ काही नाही.झोपतो आता खरंच खूप कंटाळा आला आहे” असं म्हणून तो झोपला. सावीने ही लाईट बंद केली आणि ती ही झोपली. 

     सकाळी सावी आज लवकरच उठली. एक दिवसाच्या संपूर्ण आरामाणे आणि औषधामुळे आज तिला फ्रेश वाटत होते.आज तिला ताप ही नव्हता. तिने नाष्टा तयार केला. तिने आज मुद्दामच सोहमला उठवले नाही कारण तो काल खूप थकलेला दिसत होता. तिने ऑफिसला जायच्या एक तास आधी त्याला उठवावे असा विचार केला. तो ही अजून गाढ झोपला होता. कामवाली बाई ही आली होती. सावीने तिला आज ही स्वयंपाक करायच्या सूचना दिल्या आणि साडे आठ वाजून गेले म्हणून सोहमला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. सोहम अजून ही झोपला होता. त्याच्या जवळ बेडवर बसून त्याच्या केसात हात फिरवत ती म्हणाली.

 

सावी,“ उठ सोहम! तुला ऑफिसला जायचं आहे ना!”

 

      त्याने डोळे उघडे. ते पाहून सावी त्याला म्हणाली.

 

सावी,“ good morning!”

 

             तिला इतकं जवळ बसलेलं पाहून त्याने तिला हात धरून  स्वतः जवळ ओढून घेतले आणि तिला काही कळायच्या आतच त्याने तिला बाहुपाशात कैद करून तिच्या ओठाचा ताबा घेतला. सावीने ही त्याला काहीच विरोध केला नाही. तीही त्याच्या सुगंधी श्वासात अडकत गेली. बराच वेळ दोघांचे श्वास आणि ओठ एकमेकांत गुंतत राहिले.बराच वेळ होऊन गेला तरी सोहम तिला सोडायला तयार नव्हता शेवटी सावीनेच भानावर येत स्वतःला सोडवून घेतलं व पालथ्या हाताने स्वतःचे ओठ पुसत ती लटक्या रागाने म्हणाली.

 

सावी,“ काय हे सोहम! बेडरूमचे दार उघडे आहे कामवाली बाई आली आहे आणि तुझं काही तरीच!” ती तोंड फुगवून बोलत होती.

 

सोहम,“ आता झाली खरी  good morning! मग काय झालं? माझं घर माझी बेडरूम माझी बायको! मी काही ही करीन” तो उठून बसत तिला पुन्हा जवळ ओढून मिठी मारत तो म्हणाला.

 

      सावी ही त्याच्या मिठीत विसावली. त्याच्या शारीराचा येणारा मंद सुगंध त्याच्या लयबद्ध उष्ण श्वासांची तिच्या गालावर होणारी जाणीव आणि त्याचा हातांचा तिला होणारा रेशमी स्पर्श तिला जाणवणारी त्याच्या हृदयाची धडधड हे सगळं तिला धुंद करत होत आणि ती त्याच्या बरोबर वाहवत जात होती. सोहमने तिला अलगद बेडवर झोपवली आणि दोघ ही एकमेकांच्या सहवासात तृप्त होत राहिले त्यांना वेळेचे आणि काळाचे भान राहिले नाही. बऱ्याच वेळाने सावी त्याच्या छातीवर विसावली आणि त्याला म्हणाली.

 

सावी,“खुश! झालं ना आता समाधान मग उठ आता आणि आवर!” त्याचे गाल प्रेमाने ओढत ती म्हणाली. 

 

सोहम,“ थांब थोडावेळ!” असं म्हणून त्याने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली.

 

       सावीने घड्याळ पाहिले आणि ती भानावर येत सोहम पासून स्वतःला सोडवून घेत म्हणाली.

 

सावी,“ उठ बरं सोहम बघ नऊ वाजून गेले! मग ऑफिसला जायला उशीर झाला की चिडचिड करतोस आणि न नाष्टा करताच जातोस तू!” ती त्याला हाताने उठवून बसवत तक्रारीच्या सुरात म्हणाली.

 

सोहम,“तुला सोडावसच वाटत नाही आज! पण काय करणार चला आवरतो!” तो  तोंड पाडून तिचा हात सोडून बेडवरून उठत म्हणाला.

 

           त्याच पडलेल तोंड पाहून सावी उठून उभी राहिली आणि त्याच्या गळ्यात हात गुंफूण त्याच्या गालावर किस करत त्याच्या कानात  म्हणाली. 

 

सावी,“ इतकं तोंड पाडायला काय झालं शोना? मी कुठे पळून चालले का?इथेच आहे love you!” ती लाडाने म्हणाली.

 

सोहम,“ हुंम्म! तुला अशी तर सोडणार नाही!” तो तिच्या कमरेत हात घालून तिला पुसटसा किस करून  खट्याळ हसत बाथरूममध्ये गेला.

 

   सावी त्याच्याकडे पाहून समाधानाने हसली.आज किती दिवसातून पूर्वीचा खट्याळ आणि नटखट सोहम भेटला आज! जो कुठे ही आणि कधी ही रोमान्स करायला तयार असायचा! आज किती दिवसातून त्याच्या सहवासाचे सुख लाभले या आधी ही एकदा त्याचा सहवास मिळाला पण त्यात ही बात नव्हती. जी आज त्याच्या सहवासात अनुभवली.कारण आज माझा पूर्वीचा सोहम भेटला मला! तोच आवेग तेच जीवघेणे खट्याळ हसू आणि मला स्वतः जवळ पाहून डोळ्यात तीच चमक!  सोहमच्याच विचारात तिने बेड नीट लावला. स्वतःला आरशात पाहून केस नीट करत मानेवर सोहमने आत्ताच दिलेले लेणे पाहून ती स्वतःशीच हसून लाजली आणि पुन्हा किचनकडे वळली. 

 

         सोहम तयार होऊन आला. आज बऱ्याच दिवसाने त्याचा फेव्हरेट स्काय ब्यू शर्ट त्यावर डार्क ब्यु कोट आणि पॅंट! त्याचा आवडीचा सूट जो सावीनेच  गिफ्ट दिलेला होता. आज सोहम कातील दिसत होता आणि सावीची नजर त्याच्या वरून हटत नव्हती. सोहमने ते हेरले होते पण कामवाली बाई भांडी घासत होती. सावीने सोहमला ब्रेकफास्ट सर्व्ह केला आणि तीही ब्रेकफास्ट करायला बसली. कामवालीची भांडी झाली आणि सावीने तिला लादी आज पुसू नको म्हणून घालवून दिले. कामवाली गेली आणि सोहम हसायला लागला.सावी चिडून त्याला म्हणाली.

 

सावी,“ हसायला काय झालं रे तुला?”

 

सोहम,“ काही नाही!” तो हसू दाबून म्हणाला व ब्रेकफास्ट संपवला.

 

      सावी त्याला भरून ठेवलेला टिफिन देत होती तर  सोहमने तिला हाताने धरून जवळ ओढले व तिच्या कमरेत हात घालून तिला म्हणाला.

 

सोहम,“ राहू दे आज जात नाही ऑफिसला!” 

 

सावी,“ वेड लागलं आहे का तुला?  By the way you are looking killer! पण आज काय विशेष?” तिने त्याचा टाय नीट करत विचारले.

 

सोहम,“ असच मूड चांगला आहे आज माझा!” तो अजून जवळ ओढत खट्याळ हसून  म्हणाला.

 

सावी,“ अरे वा! परफ्युम ही मस्क का आज! जर लेडीज असतील ना ऑफिसमध्ये तर आज घायाळ होणार! बरं घड्याळ बघ दहा  वाजायला पंधरा मिनिटे कमी आहेत निघ!” स्वतःला सोडवून घेत सावीने त्याला हसून दारा पर्यंत जवळजवळ ओढतच नेले.

 

सोहम,“ तू झालीस ना घायाळ मग बास!” तो तिला डोळा मारून म्हणला”  कारमध्ये बसला.

 

  सावी त्याच्या या बोलण्याने लाजली. तो कारमध्ये बसून कार लांब जाऊ पर्यंत ती दारात त्याला पाहत उभी होती. हसतच दार लावून घेत ती सोफ्यावर येऊन बसली. सोहम गेला तरी त्याच्या मारलेल्या मिठी मुळे त्याने मारलेल्या परफ्यूमचा तिच्या कपड्याला आणि अंगाला येणारा सुगंध तिला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. ती स्वतःशीच हसली.

 

         ती आज खुश होती. पण हे फक्त चार महिनेच आहे.  विसरू नकोस सावी सोहमने तुला चार महिने तुझ्या मना सारख वागण्याच वचन दिले आहे.त्याने त्याच दिवशी तुला त्याचा निर्णय त्याच्या वागणुकीतून तुला सांगितला आहे. हे सुख चार महिन्यांच आहे त्यानंतर तुला जावं लागेल त्याला कायम सोडून पण जो पर्यंत तो  तुझ्या बरोबर आहेस तर त्याचे अस्तित्व पुरेपुर तुझ्यात उतरवून घे! या परफ्यूम सारख! रिकामी अत्तराची कुपी हो आणि त्याच्या अस्तित्वाचा सुगंध भरून घे! त्याच्या कडून तुला हवी असलेली त्याची आठवण घे सावी! तुला या चार महिन्यात जितकं तुझ्यात त्याला साठवता येईल इतकं साठवून घे! तुला राहिलेले पूर्ण आयुष्य याच मधुर आठवणीवर घायवायच आहे सावी! तो तुझ्या बरोबर कायमसाठी होता तेंव्हा तुला त्याची त्याच्या प्रेमाची  किंमत नाही कळली. तुला सतत तुझ्या चुकीच्या धारणा तुझे भूतकाळातील दुःख कुरवाळत बसायचे होते. त्यापुढे तुला तुझेच सुख नाही दिसले.सोहम त्याचे निर्मळ आणि नि:स्वार्थी प्रेम तुला नाही कळले आणि जेंव्हा तो दूर गेला तेंव्हा त्याची किंमत तुला कळली सावी! पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. सावी सोहम तुझ्या पासून कायमचा दुरावला आहे. तो जे हे सगळं करतोय ते तुला त्याने वचन दिले आहे म्हणून हे लक्षात ठेव! हा सगळा विचारात असताना तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. या सगळ्या विचाराने  तिचा आत्ता पर्यंतचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला.तिला सोहमपासून दूर जाण्याच्या विचाराने गलबलून आले. आपण त्याच्या शिवाय कसे जगणार आहोत? हा प्रश्न तिला सतावू लागला.आपण केलेल्या चुकांची हीच शिक्षा आहे. सोहमला आपण जो त्रास दिला त्याची हीच शिक्षा आपल्याला मिळालीच पाहिजे ना! आपण त्याला किती त्रास दिला तरी त्याने मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचवले. तेंव्हा ही त्याला किती त्रास झाला तो माझ्याच मुळे मरणाच्या दारात पोहोचला होता. पण आता माझ्याकडून त्याला कोणताच त्रास होणार नाही ज्या दिवशी सहा महिने पूर्ण होतील त्या दिवशी मी निमूटपणे त्याच्या आयुष्यातून निघून जाईल कायमची! ती हा सगळा विचार करत होती. फोनच्या आवाजाने तिची विचार शृंखला खंडित झाली आणि ती कोणाचा फोन आहे ते पाहायला उठली.

 

       सोहममध्ये झालेला आमूलाग्र बदल हा सावीला वाटत होतं तसं त्याने तिला वचन दिलं म्हणून झाला होता का? की सोहमच्या मनात अजून काही वेगळं होत ज्याचा थांग पत्ता सावीला नव्हता? 

 

      

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule