Oct 30, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १३)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १३)

 

   दुसऱ्या दिवशी सकाळी सावीला जाग यायला जरा उशिराच झाला होता. तिने जेंव्हा उठण्याचा प्रयत्न केला तर तिला उठता येईना. तिने  खडबडून पाहिले तर सोहमच्या हाताचा विळखा तिच्या कमरे भोवती होता. ज्याची सवय गेल्या बऱ्याच महिन्यांपासून मोडली होती. टेबलावर ठेवलेल्या घड्याळात पाहिले तर घड्याळात सात वाजले होते. तिला खरं तर सोहमच्या मिठीतुन सुटावेसे वाटत नव्हते आणि रात्री झालेल्या उत्कट मीलनामुळे तिचे अंग ही ठणकत होते पण आज सोहमला ऑफिसला जायचे असल्यामुळे आज नाष्टा,डबा सगळे तिला वेळेत बनवायचे होते म्हणून  तिने सोहमचा हात अलगद बाजूला केला आणि ती उठली. सोहम अजून गाढ झोपला होता. त्याच्याकडे एकवार हसून पाहून ती बाथरूममध्ये गेली. तयार होऊन ती किचनकडे वळली. 

 

         सावीने ब्रेकफास्टसाठी उपमा केला. डब्यासाठी पोळी-भाजी करत होती. आत्ता तर घड्याळात आठ वाजले होते आणि तिचे काम आता जवळ-जवळ होत आले होते. सोहमला दहा वाजता ऑफिसला जायचे होते म्हणून ती जरा निवांत झाली चहा तिने करायला गॅसवर ठेवला आणि आता सोहमला उठवावे म्हणून ती बेडरूममध्ये  जाणार होती!

 

     इकडे सोहमला साडे आठ वाजता जाग आली होती.त्याला रात्री काय झाले आपण काय केले हे सगळे आठवले. तो विचार करत होता. तो स्वतःवरच चिडला होता कारण तो सावीला  समोर पाहून वाहवत गेला होता आणि त्याला तेच नको होते. आता त्याला कोणत्याच बंधनात स्वतःला बांधून घ्यायचे नव्हते आणि सावीला ही कोणत्याच बंधनात अडकवायचे नव्हते आणि काल त्याच्याकडून तीच चूक झाली होती. तो स्वतःवर चिडतच उठला आणि तयार झाला. सावी बेडरूमकडे निघाली तर सोहम बेडरूममधून तयार होऊन बॅग घेऊन बेडरूमच्या बाहेर पडत असलेला दिसला. ती त्याला पाहून म्हणाली.

 

सावी,“ सोहम अरे आत्ता तर साडे नऊ झाले आहेत तू तयार पण झालास! बरं झालं ये ब्रेकफास्ट करून घे! मी चहा देते आणि तुझा टिफिन तयार आहे. बाहेरच काही खाऊ नकोस!तुझे मेडिसीन्स ही ठेवले आहेत मी तुझ्या बॅगेत आठवणीने घे! मी फोन करेणच म्हणा तुला लंच ब्रेक मध्ये!” ती बडबडत किचनकडे वळली तर सोहम तिला काहीच न बोलता दाराकडे निघाला.

 

         सावी त्याला हाक मारत होती ती दारा पर्यंत त्याच्या मागे गेली  पण तो तिचे काहीच न ऐकता कारमध्ये बसून निघून गेला. सावी आत आली आणि निराश होऊन  सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यातून पुन्हा धारा सुरू झाल्या. ती विचार करत होती की आता याला काय झाले? रात्री तर बरा होता बरं मी काहीच केलं नाही. याला राग येण्यासारखं मग हा चिडून निघून का गेला असा! आज काल सोहम खूपच मुडी झाला आहे. डॉक्टरने ही सांगितलंय म्हणा की त्याच्या ब्रेनला इजा झाल्यामुळे त्याचे मूड स्विंग होत आहेत. राहू दे मीच जाऊन देऊन येते टिफिन नाही तर एक तर तो उपाशी राहील नाही तर मग बाहेरच काही तरी खाईल. त्या पेक्षा मीच जाते. अशी मनाची समजून घालून ती उठली.चहा तिने ओतून घेतला आणि ती हॉलमध्ये येऊन टी. व्ही. पाहू लागली. सोहम असा उपाशी  निघून गेल्यामुळे तिचा ही ब्रेकफास्ट करण्याचा मूड नाही झाला.

 

          त्यांचा लंच ब्रेक कधी असतो हे तिने दिलजीतला फोन करून विचारून घेतले. तिला दिड वाजता लंच ब्रेक होतो हे कळल्यावर तिने  बारा वाजता जेवण गरम करून टिफिनमध्ये भरले व ती साडे बारा वाजता तयार होऊन घरातून बाहेर पडली. सोहम त्याच्या केबिनमध्ये होता.  दिलजीतने तिला सोहमचे केबिन दाखवले व तो निघून गेला.सावीने डोर नॉक केले. सोहम ते ऐकून म्हणाला.

 

सोहम,“ yes come in!  (तो वर न पाहताच दिलजीत असेल म्हणून बोलू लागला.) क्या काम हैं दिलजीत अभी तो तुम्हे सब समझाया था ना!” तो वैतागून म्हणाला. सावी त्याच्याकडे पाहत शांत उभी होती. समोरून काहीच प्रतिक्रिया येत नाही म्हणाल्यावर त्याने वर पाहिले आणि सावीला समोर पाहून त्याला आश्चर्य वाटले. आता सावी बोलू लागली.

 

सावी,“ तू ब्रेकफास्ट न करता आणि टिफिन न घेताच ऑफिसला निघून आलास! दुपारची मेडिसिन ही चुकेल ना तुझी म्हणून मी टिफिन घेऊन आले!” ती नॉर्मली बोलत होती.

 

सोहम,“ ठीक आहे ठेव तो टिफिन आणि जा तू!” तो रागानेच म्हणाला.

 

सावी,“ इतकं चिढायला काय झालं सोहम तुला?माझी चूक तरी मला कळू दे!” ती डोळ्यातले पाणी डोळ्यातच अडवत म्हणाली.

 

सोहम,“ सावी चूक तुझी  नाही माझी आहे! तू दिलास ना मला टिफिन आणून तुझे समाधान झाले ना!निघ तू आता!” तो कडवटपणे म्हणाला.

 

     सावी निमूटपणे डोळे पुसत खाली मान घालून केबिनच्या बाहेर पडली. तिला त्याच्या ऑफिसमध्ये तमाशा करायचा नव्हता म्हणून ती घरी निघाली होती. सोहमच्या अशा  विनाकारण कडवट वागण्याने ती खूप दुखावली गेली होती. तिने सोहम घरी आल्यावर काय ते पाहू असा विचार केला आणि ती घरी गेली. सोहमच्या अशा वागण्याने ती दुपारी ही जेवली नाही. ती हॉलमध्येच सोफ्यावर पहुडली. रात्री झोप न झाल्याने आणि सकाळी लवकर उठल्याने तिला पडल्या-पडल्याचं झोप लागली. ती जागी झाली ते सोहमच्या बेल वाजवण्याने! तिने उठून दार उघडले. सोहम तिला  काहीच न बोलता टिफिन तिच्या हातात देऊन बेडरूममध्ये निघून गेला. सावीला टिफिन जड लागला म्हणून तिने तो किचनमध्ये नेऊन उघडला तर सोहम ही दुपारी जेवला नव्हता म्हणजेच त्याने मेडिसीन्स ही घेतले नसणार सावीने कयास बांधला. आता मात्र सावीची शीर तडतडली. याला अचानक काय झाले याचा जाब विचारलाच पाहिजे म्हणून ती बेडरूममध्ये जात होती तर सोहमच फ्रेश होऊन पाणी घेण्यासाठी बाहेर जार घेऊन पडत  होता. सावीने तिला हॉलमध्येच अडवले आणि ती बोलू लागली.

 

सावी,“ तुला अचानक काय झाले रे? इतका अपसेट आहेस तो? जेवण ही नाही केलंस दुपारी म्हणजे औषधे ही नाही घेतलीस ना! का वागतो आहेस सोहम तू असा? असं वागून तू स्वतःला त्रास देत आहेस आणि मला ही!रात्री तर बरा होतास आणि अचानक काय झाले रे तुला?” तिने तावतावाने विचारले.

 

सोहम,“ तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तर आहे सावी!” तो तिला चिडून म्हणाला.

 

सावी,“ म्हणजे?” तिने असमंजसपणे विचारले.

 

सोहम,“ काल रात्री जे काही झाले रादर मी जे काही केले त्याचे गिल्ट आले आहे मला! त्याचा त्रास होतो आहे मला!” तो चिडून म्हणाला.

 

सावी, “what? Are you mad! अरे आपल्यात काल जे काही झाले ते नवीन होत का सोहम? आपण नवरा-बायको आहोत सोहम त्यात तुला गिल्टी फील करण्यासारखं काहीच नाही!” ती त्याला समजावत त्याचा हात धरून म्हणाली.

 

सोहम,“हे बघ सावी! माझ्या कडून ते नाते कधीच संपले आहे! आणि माझा निर्णय बदलणार नाही! मग तुझ्या बरोबर असे वागणे किंवा असे रिलेशन निर्माण करणे म्हणजे मला तुझा फायदा घेतल्या सारखे वाटते!” तो तिचा हात झटकून स्वतःवरच चिडून बोलत होता.

 

     सावी सोहमचे हे बोलणे ऐकून दहा मिनिटं स्तब्ध झाली. तो असा काही विचार करेल आणि असं काही बोलेल हे तिला कधीच वाटले नव्हते. तिला आता कळून चुकले होते की सोहम तिला माफ करून स्वीकारणार नाही. तिच्या सगळ्या आशा संपल्या होत्या. पण तिने विचार केलेली किंवा ठरवलेली दुसरी गोष्ट म्हणजे सोहमचे मूल तिला हवेच होते.म्हणून तिने आता आक्रमक पवित्रा घेतला आणि दहा-पंधरा मिनिटं पसरलेली शांततेचा तिने बोलायला सुरुवात करून  भंग केला.

 

सावी,“ अच्छा! म्हणजे तुला आपल्यात काल जे काही झाले त्याचे गिल्ट आले आहे  पण एक तू विसरतो आहेस सोहम मी तुझी अजून ही लग्नाची बायको आहे ती ही कायद्याने आणि माझ्या सगळ्या म्हणजे आर्थिक आणि हो शारीरिक गरजा भागवणे तुझे कर्तव्य आहे. पुढचे आणखीन चार महिने तुला हे कर्तव्य पार पडावेच लागणार आहे तुझी इच्छा असो वा नसो!” ती त्याची कॉलर धरून त्याला हलवत म्हणाली.

 

सोहम,“ are you out of your mind! तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का सावी!” तो चिडून तिचे दंड धरत म्हणाला.

 

सावी,“ हो चांगलंच कळतंय मला! मी काय बोलते ते! पुढचे चार महिने तुला माझ्या इच्छेनुसार वागावेच लागेल!” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.

 

सोहम,“ अच्छा! ठीक आहे मग!” असं म्हणून त्याने तिचे दंड जोरात पकडून तिला भिंतीला टेकवले आणि तिला हार्डली किस केले जो पर्यंत तिचा श्वास गुदमरत नाही तो पर्यंत! तो जणू त्याचा सावीवरचा राग आणि फसस्ट्रेशन या मार्गाने तिच्यावर काढत होता. थोड्या वेळाने त्याने सावीला ढकलले आणि तो बेडरूममध्ये निघून गेला त्याने बेडरूमचे दार आतून लावून घेतले.

 

         सावी मात्र सोहमच्या अशा वागण्याने आतून पूर्णपणे उध्वस्त झाली होती. तिला वाटत असलेली दोन महिन्यांपासूनची आशा आज पूर्णपणे संपली होती.  तिने सोहमला कायमचे गमावले आहे ही भावना तिचे हृदय पिळवटून काढत होती. तिने केलेल्या चुका या क्षमा करण्या पलीकडे आहेत का? हा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला तर तिच्याच मनाने उत्तर दिले ‛हो तू केलेल्या चुका अक्षम्य आहेत’ ती याच सगळ्या विचारात तिथेच खाली बसली आणि रडून रडून तिथेच जमिनीवर झोपली.

 

          कधी कधी माणूस स्वतःच्याच आपल्या म्हणवणाऱ्या माणसांना इतका दुखावतो की समोरचा त्याचा हक्काचा आणि आपला वाटणारा माणूस त्याच्या पासून मनाने खूप दूर निघून जातो पण माणसाच्या हे लक्षात तेंव्हा येत जेंव्हा त्याचा हक्काचा माणूस शरीराने ही त्याच्या पासून दूर निघून जातो.मग त्या माणसाच्या मागे पळून आणि त्याची मनधरणी करून ही तो आपल्या जवळ परत येईल हे मात्र सांगता येत नाही आणि मागे राहतो फक्त पश्चात्ताप! सावीने तीच चूक केली होती आणि सोहम ही सावीला न समजून घेता  कुठे तरी हीच चूक पुन्हा करत होता. 

 

      सोहम रागाच्या भरात रूममध्ये पाणी न घेता आणि पाणी न पिताच जार तिथेच टाकून  बेडरूममध्ये गेला होता. तो बराच वेळ बेडवर धुमसत बसून होता. रात्री दहाच्या सुमारास त्याला प्रकर्षाने तहान लागल्याची जाणीव झाली. त्याचा राग ही आता काही प्रमाणात शांत झाला होता म्हणून तो पाणी प्यावे असा विचार करून बेडरूमचे दार उघडून बाहेर आला. तर त्याला सावी तिथेच जमिनीवर थंडीने कुडकुडत आखडून झोपलेली दिसली. त्याने सावीला खूप वेळा हाका मारल्या बेडरूममध्ये येऊन झोप म्हणून पण सावी कडून काहीच प्रतिउत्तर मिळत नव्हते म्हणून तो घाबरून खाली बसला आणि तिला हलवून उठवावे म्हणून तिच्या  हाताला हात लावला तर त्याला चटका बसला म्हणून त्याने तिच्या कपाळाला आणि गळ्याला हात लावून पाहिले तर ती तापाने फनफनत होती. त्याने तिला उचलून बेडवर नेवून झोपवले आणि तिला पांघरून घातले. थर्मामीटर शोधून त्याने तिचा ताप चेक केला तर थर्मामीटर शंभरच्या वर ताप दाखवत होता. आता मात्र सोहम चांगलाच घाबरला आणि त्याच्या घरा जवळ असणाऱ्या एका डॉक्टरला त्याने फोन करून बोलवून घेतले.डॉक्टरांनी सावीला तपासले तिच्या हार्ट बिट्स पाहून तिचा बी.पी. ही चेक केला आणि सोहमला विचारले.

 

डॉक्टर,“ आपकी पत्नी को बी.पी.की तकलीफ हैं क्या?”

 

सोहम,“ नहीं तो ऐसी कोई तकलीफ नहीं डॉक्टर इसे!क्यों क्या हुआ आप ऐसा क्यों पूछ रहे हैं?” त्याने काळजीने विचारले.

 

डॉक्टर,“ टेम्प्रेचर के साथ साथ इनका बी.पी.भी बढ़ गया हैं! किसी बातकी टेंशन या आप दोनों में कोई झगडा हुआ हैं क्या?”  त्यांनी सोहला तिरकस पाहत विचारले. सोहमने या प्रश्नावर मान खाली घातली आणि डॉक्टर काय समजायचे ते समजून गेले.

 

सोहम,“कोई घबराने की बात तो नहीं हैं ना डॉक्टर?”

 

डॉक्टर,“ देखिए मेरे पास अभी कुछ मेडिसिन्स हैं; मैं वो दे देता हूँ! और कुछ मेडिसिन्स लिखकर देता हूँ!कल आप लेकर आइए। फिलहाल इनको बुखार भी बहुत हैं और बी.पी.भी! आप ये मेडिसिन्स इन्हें अभी दे दीजिए पर खाली पेट नहीं और हा ठंडे पानी की पट्टीयाँ इनके माथे पर रखिये। कल शाम को इन्हें क्लीनिक लेकर आ जाइए फिर से बी.पी. देखना होगा। खयाल रखिये इनका!मैं चलता हूँ।” ते असं म्हणून निघून गेले.

 

       सोहम चांगलाच काळजीत पडला. या सगळ्यासाठी तो स्वतःलाच दोष देत होता. सावी अजून ही ग्लानीत होती. तो किचन मध्ये गेला.कारण सावी रात्री जेवली नहीं हे त्याला माहित होतं आणि औषध घेण्यासाठी काही तरी पोटात जान गरजेचं होतं.म्हणून तो दूध गरम करून सावीला द्यावे हा विचार करत होता.म्हणून त्याने दूध फ्रीज मधून काढले व तापायला ठेवले तर किचन कट्ट्यावर सकाळी केलेला उपमा, पोळी-भाजी तसेच असलेले त्याला दिसले आणि सावीने  सकाळपासून काहीच खाल्ले नाही हे ही त्याच्या लक्षात आले. तो अजूनच स्वतःला दोष देऊ लागला.त्याने दूध गरम करून एका ग्लासात घेतले आणि सगळा स्वयंपाक फ्रीजमध्ये ठेवला. तो दुधाचा ग्लास घेऊन बेडरूममध्ये गेला आणि ग्लास टीपॉयवर ठेऊन सावीला उठवत म्हणाला. 

 

सोहम,“ सावी उठ हे बघ गरम दूध घे! गोळ्या घे आणि मग झोप! तू दिवसभर ही जेवली नाहीस!” तो काळजीने तिच्या केसातून हात फिरवत बोलत होता.

 

     सावी त्याच बोलणं ऐकून त्याच्याकडे पाठ करून कुस बदलून झोपली. सोहमला चांगलच माहिती होत की सावी जर हट्टाला पेटली तर ती कुणाचंच ऐकत नाही. पण त्याला ही तिला चांगलंच हँडल करायला येत होतं या काही वर्षात! ते पाहून तो तिच्या मानेत हात घालून  जबरदस्तीने उठून बसवत म्हणाला.

 

सोहम,“ गूपचुप दूध घे सावी नाही तर नाक दाबून जाबरदस्तीने पाजीन मी!” तो तिच्याकडे पाहून तिला धमकावत म्हणाला.

 

सावी,“हे  बघ मला काही नको आहे आणि मी इथे कशी आले? मला तुझ्याशी काही बोलायचे ही नाही  आणि तुझे काही ऐकायचे ही नाही!” ती रागाने उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण चक्कर आल्यामुळे पुन्हा खाली बसली.

 

सोहम,“ हे बघ सावी नको बोलूस माझ्याशी! तुला काय भांडायचे ते नंतर भांड पण आता हे दूध घे आणि औषध घे प्लिज तुझी तब्बेत ठीक नाही!” तो काळजीने दुधाचा ग्लास समोर धरत  तिला म्हणाला.

 

सावी,“ मला नको आहे काही!” ती अजून चिडून  म्हणाली.

 

सोहम,“ गप्प दूध पी आणि औषध घेऊन मग  झोप!” तो तिच्या तोंडाला जबरदस्तीने ग्लास लावत म्हणाला.

 

     त्याच्या अशा वागण्याने सावीच्या नाईलाज झाला. तिला दूध प्यावे लागले.तिने नाही म्हणत चिडचिड करत शेवटी औषध ही तिने घेतली आणि ती झोपली. सोहमने पाणी आणि रुमाल आणून तिच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरवात केली. पहाटे पहाटे तिचा ताप उतरला आणि सोहमला डोळा लागला. सकाळी आठ वाजता सावीने डोळे उघडले तर सोहम तिच्या जवळ झोपलेला तिला दिसला. तेव्हढ्यात सोहमची चुळबूळ तिला जाणवली सोहम जागा होत असलेला पाहून तिने डोळे झाकून घेतले. सोहम उठला आणि सावीच्या कपाळावर हात लावून त्याने ताप चेक केला. ताप उतरला होता. हे पाहून सोहमच्या जीवात जीव आला. त्याच्या मनात आता अपराधीपणाची भावना दाटून आली होती. तो स्वतःलाच मनोमन दोष देत होता.त्याने सावीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिचा हात धरून तो डोळ्यात पाणी आणून घोघऱ्या आवाजात बोलू लागला.

 

सोहम,“ I am really very sorry savi! खरंच माझं खूप चुकलं ग! मी तुझ्यावर असा राग काढायला नको होता! पण इथून पुढे मी नाही करणार चिडचिड तुझ्यावर!” तो रडत बोलत होता. 

       

        तो बराच वेळ सावी जवळ तिचा हात धरून बसून होता. 

 

      माणूस हा खूप विचित्र प्राणी आहे. जेंव्हा एखादं माणूस त्याच्या समोर धडधाकट वावरत असते. त्याच्या पुढे पुढे करत असते तेंव्हा त्या माणसाची किंमत त्याला नसते पण जेंव्हा तेच धडधाकट माणूस आजारी  पटते आणि ते माणूस अंथरूण धरते. तेंव्हा त्या माणसाची किंमत माणसाला कळते.सोहमच्या ही बाबतीत सावीबद्दल हेच घडत होते. गेल्या दोन महिन्यांपासून सावी सोहमच्या मागेपुढे करत होती. पण सोहमला तिची किंमत कळत नव्हती तो तिला सतत झिडकारात होता पण काल जेंव्हा सावी आजारी पडली तेंव्हा सोहम घाबरला आणि झोपेतून जागा झाल्यासारखा खडबडून जागा झाला.

     

       या घटनेमुळे  सोहम आणि सावी मधील दुरावा कमी होईल का? ही घटना सोहम आणि सावीच्या नात्याला कोणते नवे वळण देणार होती? 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule