सोहम आठ दिवसांनी परत आला. सावीला आदित्यने तो परत आल्याचे सावीला फोन करून सांगितले. सावी नुकतीच होस्टेलवर पोहोचली होती व फ्रेश होत होती. सावीला सोहम आल्याचे कळल्यावर कधी त्याला भेटेन असं झालं होतं. ती तयार झाली आणि बॉईज होस्टेलवर पोहोचली. सोहम आदित्य बरोबर त्याच्या प्रोजेक्ट विषयी चर्चा करत होता. सावीला पाहून आदित्य काही तरी काम आहे म्हणून रूम मधून बाहेर गेला. सावी सोहमला म्हणाली.
सावी,“ कसं वाटतंय तुला सोहम? जखम कशी आहे तुझी आता? खूप दुखतंय का अजून?स्टीचेस काढले का तुझे?” तिने एकावर एक प्रश्न काळजीने विचारायला सुरवात केली.
सोहम,“ अग हो हो किती प्रश्न! जरा दम घे!” तो हसून म्हणाला.
सावी,“ तुला हसू येतेय आणि इथे माझा काळजीने जीव जातोय!” ती रडत म्हणाली.
सोहमने तिला जवळ बेडवर बसवले आणि तिचे डोळे पुसत म्हणाला.
सोहम,“ मी ठीक आहे. इतकं ही काही लागलं नाही मला!” तो तिला समजावत म्हणाला.
सावी,“ हो का? म्हणून डॉक्टर म्हणत होते की खोल आहे जखम आणि स्टीचेस उगीच घातले का त्यांनी? ते काही नाही मला तुझी जखम पहायची आहे असं ही मला वेळच नाही मिळाला तेंव्हा या सगळ्याला!” ती काळजीने म्हणाली.
सोहम,“ अग स्टीचेस घातले की जखम मोठी आहे असं नसत ग! हे काय नवीन खुळ आता? तू जखम पाहून काय करणार आहेस?” तो तिला समजावत होता कारण त्याला माहित होतं की सावी जखम पाहून अजून काळजीत पडली असती आणि गिल्टी फील केलं असत म्हणून तो तिला रोखत होता.
सावी,“ मला पहायची आहे म्हणलं ना!” ती जरा रागाने म्हणाली.
आता मात्र सोहमचा नाईलाज झाला.त्याने शर्ट काढला आणि सावीकडे पाठ करून बसला.सावी त्याच्या पाठीवरची खपली धरलेली जखम अश्रू पूर्ण डोळ्यांनी पाहत होती. तिने थरथरत्या हाताने त्या जखमेवरून आणि नंतर सोहमच्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शाने सोहम शहारला आणि त्यानी सावीला त्याच्या समोर हाताने ओढून घेतले. सावी बेसावध असल्याने आणि अचानक लागलेल्या झटक्याने सोहमच्या अगदी जवळ ओढली गेली. सोहमने तिचे अश्रू त्याच्या हाताने हलकेच पुसले आणि तिच्या आणखीन जवळ जवळ जाऊ लागला. त्याने तिचा चेहरा त्याच्या दोन्ही हाताच्या ओंजळीत धरला आणि तो इतका जवळ गेला की सावीला त्याचे श्वास तिच्या श्वासात मिसळले जाणवू लागले तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणार तर सावीने इतका वेळ मिटून घेतलेले डोळे उघडले आणि ती सोहमपासून दूर झाली आणि त्याच्याकडे पाठ करून ती निघुन चालली तर सोहमने तिचा हात धरला ती त्याच्या हातातून हात सोडवून घेत पाठमोरी उभी राहून सोहमकडे न पाहतच त्याला म्हणाली.
सावी,“ आराम कर सोहम तू!” असं म्हणून ती जाऊ लागली.
सोहम,“ सावी ऐक तरी माझे! मला तुला काही तरी सांगायचे आहे!” तो म्हणाला तो आज तिला प्रपोज करण्याच्या विचारात होता.
पण सावी त्याच काहीच न ऐकून घेता निघून गेली. आता मात्र सोहम टेन्शनमध्ये आला. आज आपण जे काही केले ते सावीला आवडलेले दिसत नाही.मी पण ना माती खाल्ली आज तो स्वतःवर रागावत तो चरफडत होता.उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर तिला बोलू! हवं तर माफी मागू असा त्याने विचार केला.
दुसऱ्या दिवशी सोहम आदित्य बरोबर कॉलेजमध्ये गेला. तो सावीला शोधत होता पण सावी त्याला कुठेच दिसली नाही. त्याने सावीला फोन केले तरी सावी त्याचा फोन ही उचलत नव्हती. ती लेक्चरला ही आली नव्हती. सोहमने संजालीला विचारले सावी कुठे आहे तर संजाली म्हणाली की ती सकाळ पासून तिला ही दिसली नाही कोणत्या तरी नातेवाईकाकडे जाते आहे आणि तिला उशीर होईल असे रेक्टरला सांगितले आहे. आता मात्र सोहम चांगलाच काळजीत पडला आता हिला कुठे आणि कशी भेटायची हा विचार त्याला सतावू लागला. असाच दिवस निघून गेला. कॉलेज सुटले.तो पर्यंत सोहमने सावीला पन्नास वेळा कॉल करून झाला.सोहमला बेचैन पाहून आदित्यने त्याला विचारले.
आदित्य,“ काय झालं सोम्या? दुखतेय का रे जखम?” त्याने काळजीने विचारलं.
सोहम,“ नाही रे काल सावी आली होती ना! तर तिला माझा राग आला बहुतेक म्हणून माफी मागावी म्हणलं पण आज ती कॉलेजला आली नाही आणि फोन ही नाही उचलत माझा ती!” तो रंकुडीला येऊन म्हणाला.
आदित्य,“असं काय केलंस तू की तिला इतका राग आला?” त्याने विचारले.
सोहम,“ तुला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी का?” तो वैतागून म्हणाला.
आदित्य,“ नको सांगूस जा!” तो ही रागाने म्हणाला.
संध्याकाळी सातच्या दरम्यान सावीचा फोन सोहमला आला त्याने तो उचलला व तो सावीला म्हणाला.
सोहम,“ काय सावी? किती वेळा फोन केला तुला? कुठे आहेस तू?”
सावी,“ हे बघ तू हॉटेल प्यारेडाईजमध्ये ये अर्ध्या तासात!” ती म्हणाली.
सोहम,“ मी नाही येऊ शकणार कारण मी बाईक नाही चालवू शकत!” तो खट्टू होत म्हणाला.
सावी,“ मी आदित्यला सांगितले आहे तो तुला सोडेल तिथे!” तिने इतकच म्हणून फोन ठेवला.
सोहमच तिने पुढचं काहीच ऐकलं नाही.सोहम आता आणखीन टेन्शनमध्ये आला. आदित्य त्याच हसू लपवत सोहमला म्हणाला.
आदित्य,“जा तयार हो हा बघ तुला सोड असा मेसेज आला आहे सावीचा मला हॉटेलमध्ये!”तो मोबाई नाचवत म्हणाला.
सोहम,“मला नाही जायचं! आज ती महामाया हॉटेलमध्ये बोलवून माझा कसा पान उतारा करणार आहे काय माहीत?त्या पेक्षा मी जाताच नाही!”तो बेडवर बसत वैतागून म्हणाला.
आदित्य,“ इतका घाबरला आहेस सोम्या नेमकं काय केलंस रे तू काल! जा आवर जा!” तो मुद्दामहून म्हणाला.
सोहम,“ माती खाल्ली मी काल! तिला किस करण्याचा प्रयत्न केला मी काल! आधीच ती किती डॉमीनेटिंग आणि इगोस्टिक आहे माहीत आहे ना तुला! संजालीला त्या संकेत आणि नीरजने छेडले तर त्यांचे काय हाल केले होते त्या बयेने मग आता माझे काय हाल करेल?” तो रडकुंडीला येत म्हणाला.
आदित्य,“ काय? वेडा आहेस का तू सोम्या? आता तर तुला हॉटेलमध्ये जावेच लागेल! नाही तर सावी इथे येऊन तमाशा करणार!” तो त्याला आणखीन घाबरवत म्हणाला आणि त्याला बळेच तयार व्हायला लावले.
आदित्यने सोहमला फेंट लेव्हेंडर कलरचा शर्ट आणि ब्यु जिन्स घालायला लावली. सोहम त्याला वैतागून म्हणाला.
सोहम,“ तू दोस्त आहेस का दुष्मन रे आद्या! मार खायला मला इतकं तयार व्हायला सांगतो आहेस.”
आदित्य त्याला त्यावर काहीच बोलला नाही. तो सोहमला जबरदस्तीने बाईकवर बसवून हॉटेलमध्ये पोहचला. सावी बाहेर कॉरिडोर मध्ये त्याची वाट पाहत होती. आदित्यने त्याला तिथेच सोडलं आणि तो बाईक वाळवून निघून गेला. ही बया बाहेरच आहे आता इथून पळून जायचा ही ऑप्शन संपला. आता चपल्या खायला तयार व्हा सोहमराव असा विचार करून सोहमने आवंढा गिळला. सावीने सोहमला हात धरून हॉटेलच्या प्रायव्हेट एरियामध्ये नेले. सोहमचे मात्र कशातच लक्ष नव्हते. हॉटेलच्या प्रायव्हेट एरियामध्ये छोटे-छोटे तंबू होते. त्यातल्या एका तंबूत सावी आणि सोहम पोहोचले. सावीने आधीच डिनरची ऑर्डर दिली होती वेटर ती ऑर्डर घेऊन आला. सोहम न राहवून सावीला म्हणाला.
सोहम,“ सावी माझं ऐकून तर घे काल ते…” तो पुढे बोलणार तर सावी त्याला म्हणाली.
सावी,“ अरे जेवण तर करू पहिले मग बोलू!” ती म्हणाली.
सगळा मेनू सोहमच्या आवडीचा होता. पालक पनीर, शाहीकुर्मा, कोफ्ते, पुलाव, तंदुर रोटी,रसगुल्ले! तिने सोहमला सर्व्ह केले. हे पाहून सोहम मनात म्हणाला बकऱ्याचा बळी द्यायच्या आधी असेच बकऱ्याला खाऊ घालतात. तो कसा बसा जेवला आणि पुन्हा बोलू लागला.
सोहम,“ सावी ऐक तर ना काल ते चुकून…!” तो पर्यंत सावीने त्याच्या ओठांवर बोट ठेवले. सावी उठली आणि सोहमच्या समोर गुडघ्यावर बसली आणि त्याच्या समोर अंगठी आणि गुलाबाचे लाल फुल धरून त्याला म्हणाली.
सावी,“ I love you Mr.soham sarpotadar! Do you love me?”
सोहम दोन मिनिटे ब्लँक झाला.त्याला कळलेच नाही की काय चालले आहे आणि एकदम भानावर येत त्याने सावीला मिठी मारली आणि हळूच तिच्या कानात म्हणाला.
सोहम,“ I love you too!(तो दोन मिनिटे तसाच तिला मिठीत घेऊन उभा होता नंतर मिठी सोडून तिला पाहून बोलू लागला.) म्हणजे तुला माझा राग नाही आला तर कालसाठी पण मग ते सगळे काय होते आणि हे सगळे मला वाटलं की तू आज माझा पान उतारा…” तो पुढे बोलणार तर पुन्हा सावीने त्याच्या ओठावर बोट ठेवले आणि ती बोलू लागली.
सावी,“ जरा डोक्यावर पडलास का रे तू सोहम? अरे आल्या पासून माझ्याकडे एकदा तरी पाहिलेस का? कोणी कोणाचा पान उतारा करायला इतकं तयार होऊन येत का?आणि हा कँडल लाईट डीनर,रोमँटिक वातावरणात, प्रायव्हेट प्लेस, पहा की जरा आसपास! एव्हढा कसा बुध्दू रे तू?” त्याचा हात हातात धरून त्याच्या बोटात अंगठी घालत ती म्हणाली.
सोहमने भानावर येत सगळीकडे पाहिले आणि सावीला तो पाहू लागला. स्लीव्हलेस सुंदर आसा चेरी रेड कलरचा वन पीस, मस्त मेकअप, ओठावर चेरी रेड कलरची लिपस्टीक, हातात नाजूक ब्रेसलेट, ब्लंट कट असलेले मोकळे सोडलेले केस एकूणच आधीच सुंदर असणारी सावी कातील दिसत होती. सोहम तिला निहाळत होता आणि ती लाजून खाली मान घालून उभी होती. आता सोहमने तिला हात धरून जवळ ओढले आणि तिला मिठीत घेत म्हणाला.
सोहम,“ are you blushing! माझ्या झाशीच्या राणीला लाजता ही येते तर!” तो गालात हसत तिचा लाजेने आरक्त झालेला चेहरा तीची हनुवटी धरून वर करत म्हणाला. तसे तिने पुन्हा तिचा चेहरा त्याला मिठी मारून त्याच्या मिठीत लपवला आणि त्याला म्हणाली.
सावी,“ love you!”
सोहम,“ म्हणजे इतकी नाटकं मला सरप्राईज देण्यासाठी चालली होती तर? आणि कालच्या गोष्टीचा तुला राग नाही आला!” तो म्हणाला.
सावीने नुसती नकारार्थी मन हलवली.
सोहम,“ म्हणजे कालचे अर्धवट राहिलेले काम आज पूर्ण करायला हरकत नाही तर!” तो तिला खोडसाळपणे हसून म्हणाला.
आणि सावी काय बोलण्याच्या आतच त्याने तिच्या ओठावर ओठ ठेवले. बराच वेळ दोघे गुंतत होते.अगदी तृप्त होऊ पर्यंत सावीने ही सोहमला रोखले नाही. सावी पुन्हा त्याच्या मिठीत विसावली. ती काहीच बोलत नव्हती.सोहमच तिला म्हणाला.
सोहम,“ काही बोलशील का की अशीच गप्प राहणार आहेस सावी!” ते ऐकून सावी त्याचा हात धरून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
सावी,“ काय बोलू अजून मी? सगळं तर बोलले by the way thanks!” ती म्हणाली.
सोहम,“ thanks for what?” त्याने विचारले.
सावी,“ for everything! For giving me such a wonderful relationship and for being in my life!” ती त्याच्या गालावर किस करत म्हणाली.
सोहम,“ अच्छा! अजून कशा कशा साठी thanks म्हणणार आहेस त्याची लिस्ट काढून ठेव आणि मग आभार प्रदर्शन कर!” तो तोंड फुगवून तिच्या पासून दूर होत म्हणाला.
सावी,“बरं नाही म्हणत thanks!” त्याच्या जवळ जाऊन त्याच्या गलाला आणि ओठाला लागलेली लिपस्टिक हाताने पुसून त्याच्या गळ्या भोवती दोन्ही हात गुंफत ती म्हणाली.
सोहम,“ that's like a good girl!बरं चल आता उशीर होतोय!” तो रिस्ट वॉच पाहत म्हणाला.
सावी,“ आत्ता साडे नऊ झालेत इथून जाऊ पण हॉस्टेलवर नाही तर इथे जवळच बाग आहे तिथे! थोडावेळ बसू मग जावू!” ती म्हणाली.
सोहम,“ हॉस्टेलचा रूल विसरलीस काय? आठ वाजण्याच्या आता हॉस्पिटलमध्ये जायचे आणि आता तर साडे नऊ वाजून गेले आहे. We have already broke the rule! sweetheart!” तो तिच्या चेहऱ्यावर रुळणारी केसांची बट काना मागे करत म्हणाला.
सावी,“ you don't worry for that! मी नातेवाईकाच्या घरी गेले आहे आज रात्री उशिरा येणार आहे आणि तू दूध घेऊन औषध घेऊन झोपला आहेस हॉस्टेलमध्ये!” ती त्याला हसून डोळा मारत म्हणाली.
सोहम,“ you mean to say! आद्याला हे सगळं माहीत होतं आज त्याच खरं नाही! त्याला माहित असून त्याने मला आणखीन भीती घातली!तो मार खाणार आज! आणि तू ही मला आज किती सतवलेस! तुला पण शिक्षा मिळणार!” तो तिला कमरेत हात घालून जवळ ओढत म्हणाला.
सावी,“तू मला शिक्षा देणार?काय शिक्षा देणार मग ती पण सांग?” ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली.
सोहम,“करणार ना शिक्षा! पण ती पेंडिंग ठेवली बरं चल आता!”
सोहम आणि सावी जवळच असलेल्या बागेत जाऊन बराच वेळ भविष्याची स्वप्ने रंगवत बसले. त्यानंतर स्कुटीवर दोघे होस्टेलकडे निघाले. सावी स्कुटी चालवत होती आणि सोहम तिला मागुन मिठी मारून तिच्या खांद्यावर हनुवटी टेकून बसला होता. सावीला ही त्याचा अवखळ स्पर्श सुखावत होता.ती कोणाचा तरी प्रेमळ पुरुषी स्पर्श पहिल्यांदा अनुभवत होती तर सोहम ही आज पहिल्यांदा एका मुलीला असा अर्थपूर्ण स्पर्श करत होता. आज त्याने पहिल्यांदाच कोणा तरी मुलीला किस केले होते!
सावी झोपलेल्या सोहमच्या चुलबुळीमुळे भूतकाळातून वर्तमानात आली.सोहम झोपेत तिला आणखीन जवळ ओढून घेत होता.त्याची ही कृती आणि भूतकाळातल्या गोड आठवणी आठवून सावी गालातल्या गालात हसत होती.ती ही त्याला बिलगून झोपेच्या आधीन गेली.
म्हणजेच भूतकाळात ही सावीने तिच्या चुकीच्या धारणांमुळे आणि विचारामुळे सोहमची बरीच परीक्षा घेतली होती पण आता मात्र सोहम तिची परीक्षा घेत होता? प्रेमाच्या या परीक्षेत सावी उत्तीर्ण होईल का? ती दुखावलेल्या आणि मनाने तिच्या पासून दूर गेलेल्या सोहमला पुन्हा स्वतः जवळ आणू शकेल का?
या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.
©Swamini (asmita) chougule