A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session965315ee058a371fc510a3de59fe87e8fb9b567eb8d88c632ac0a2c78632b983b22bc37f): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hamsfars part 10
Oct 23, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग 10)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग 10)

  आज बारावीचा निकाल होता आणि सावी मात्र टेन्शन मध्ये होती. या वेळी सोहमला मागे टाकलेच पाहिजे असे ती मनोमन म्हणत होती. याला खूपच याच्या हुशारीचा खूपच गर्व आहे अस दाखवतो की याला कशाचाच फरक पडत नाही. असा विचार करत ती तिची मैत्रीण रेश्मा बरोबर कॉलेजमध्ये पाहोचली. जवळ-जवळ सोहम सहित  सगळेच जमले होते निकाल पाहायला. नोटीस बोर्डवर प्युनने निकाल आणून लावला आणि सगळ्यांनी एकदमच धाव घेतली. सोहम आणि आदित्य लांब उभारले होते निवांत आणि सावी देखील अजून लांबच होती. आता जो-तो निकाल पाहून पहिल्यांदा सोहमचे अभिनंदन करत होता आणि नंतर सावीचे आता गर्दी कमी झाल्यावर सावीने जाऊन निकाल पाहिला  तर सोहम सरपोतदार हे नाव टॉपला आणि खाली सावी जाधव म्हणजेच या वेळी ही सोहमने टॉप केले होते तर सावीला दुसऱ्या क्रमांकावर राहावे लागले होते. सोहम आणि तिच्या मार्कां मध्ये फक्त एका पॉईंटचा फरक होता. सोहमला 99.65% तर सावीला 99.64% मार्क मिळाले होते. साविचा चेहरा सर्रकन उतरला आणि ती चिडून निघून गेली. सोहमने मात्र मित्र-मैत्रिणीं बरोबर सेलिब्रेशन केले. त्याला त्याच्या बरोबर कोणी स्पर्धा करत आहे. याचा कधीच फरक पडला नाही. सावी मात्र स्वतःवर नाराज होती आणि सोहमवर खार खाऊन.

 

   JEE चा निकाल लागला.  तरी JEE मध्ये तिला सोहम पेक्षा जास्त गुण मिळाले.  त्यामुळे ती जरा खुश झाली. कॉलेजमध्ये निकाल घेऊन जायला आल्यावर सोहमने तिला अडवले आणि म्हणाला.

 

सोहम,“ अभिनंदन!सावनी JEE मध्ये टॉप केल्या बद्दल!” तो हात पुढे करून म्हणाला.

 

सावी,“ thanks! And congratulations to you too soham for doing top again  in college!” ती ही नाटकीपणे म्हणाली.

 

     सावीला वाटलं की आता सोहम आणि तिच्या वाटा वेगळ्या झाल्या. आता आपल्याला त्याच्या बरोबर स्पर्धा करावी लागणार नाही आणि हरण्याची भीती ही नाही पण नियतीने तर त्यांच्या वाटा केव्हाच एक केल्या होत्या. जन्म-जन्मांतरीसाठी! ज्याची सावीला पुसटशी ही कल्पना नव्हती.

 

       सावी MIIT आळंदीला तिला हव्या असलेल्या म्हणजेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. तिथली मेरिट लिस्ट पाहताना तिला पुन्हा सोहम सरपोतदार आणि त्याच्या  खालोखाल आदित्यचे ही नाव वाचून तिने डोक्यावर हात मारून घेतला. अजून चार वर्षे यांना झेलावे लागणार या विचारानेच ती वैतागली होती. पण काहीच उपयोग नव्हता.

 

     कॉलेज सुरू झाले पुण्यापासून आळंदी लांब पडत असल्याने सोहम आणि आदित्य कॉलेजच्या  होस्टेलवर शिफ्ट झाले दोघ ही एकच रूममध्ये राहिले. सावी ही तिथेच गर्ल्स हॉस्टेलवर शिफ्ट झाली होती. एकाच वर्ग एकाच कॉलेज त्यामुळे रोजची नजरणार ठरलेली. सोहम आणि आदित्यचा  तिथे सहा महिन्यात मस्त मित्र-मैत्रिणींचा ग्रुप तयार झाला. सावी मात्र या सगळ्यांपासून अलिप्त राहत असे. तिची गट्टी तिचीच रूममेट संजालीशी मस्त जमली होती. आता फर्स्ट सेमिस्टर तोंडावर होती त्यामुळे सगळेच अभ्यासाला लागले.

 

          आज पासून exam सुरू होणार होती आणि सावीने रात्र भर जागून चांगला रट्टा मारला होता. ती रात्री एक तास सुद्धा झोपली नव्हती. तरी संजाली तिला सांगत होती की थोडा वेळ तरी झोप नाही तर पित्त होईल आणि मग तब्बेत बिघडली तर तू पेपर कसा लिहिणार आहेस पण दुसऱ्याच ऐकेल ती सावी कसली! तिने आख्खी रात्र जागून अभ्यास केला होता पण तिला आता पित्तामुळे मळमळ करत होते.

 

      कॉलेज मध्ये एक तास आधी सावी आणि संजाली पोहचल्या तर सावीला आता चक्कर येऊ लागली. सोहम कॉलेजमध्ये आला तर  सावी भोवती इतकी गर्दी पाहून त्याने एकाला विचारले की काय झाले तर त्याने सावीला चक्कर येत आहे असे सांगितले. सोहम गर्दी हटवत तिच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या जवळ थांबलेल्या संजालीला  विचारले.

 

सोहम,“ काय झाले सावनीला संजाली?”

 

संजाली,“ अरे रात्र फार जागून अभ्यास केल्यामुळे तिला गरगर करत आहे. पित्त झाले आहे तिला! आता ही exam कशी देणार” ती काळजीने म्हणाली.

 

         सोहमने हे ऐकले आणि तो सरळ स्टाफ रूमकडे वळला. सरांना रिक्वेस्ट करून त्याने त्याची बाईक घेतली. कॉलेज कॅम्पस गावापासून  दोन-तीन किलोमीटर लांब होते व कॅम्पसच्या जवळपास काहीच मिळत नसे. म्हणून सोहमने सरांची बाईक घेतली आणि तो गावात गेला तिथून मेडिकल मधून त्याने सावीसाठी मेडिसीन्स घेतले आणि तो पेपरच्या अर्धा तास आधी कॉलेजमध्ये पोहचला.त्याने ते मेडिसीन्स सावीला दिले आणि तो म्हणाला.

 

सोहम,“ हे घे सावी या गोळ्या आत्ता लगेच खा पेपर सुरू होऊ पर्यंत तुला बरं वाटेल! या पित्तावरच्या गोळ्या आहेत!” तो असं म्हणून तिच्या हातात गोळ्या देऊन निघून गेला.

 

      सावीने गोळ्या घेतल्या आणि खरच तिला आर्ध्या तासात बरे वाटू लागले आणि ती पेपर व्यवस्थित लिहू शकली.पेपर सुटल्यावर तिने सोहमला thanks म्हणण्यासाठी शोधले पण सोहम होस्टेलवर निघून गेला असे तिला कळले. सावी आज सोहमच्याच विचारात होती. तिला सतत असं वाटत होते की आपण सोहम विषयी गेल्या दोन वर्षात उगीचच गैरसमज करून घेतला आहे. त्याच्या बद्दल विनाकारण आपल्या मनात आपणच आढी निर्माण करून घेतली होती. आता तिने ठरवले की नव्याने सोहम विषयी विचार करायचा आणि त्याच्याशी मैत्री करायची! 

 

                 दुसऱ्या दिवशी सावीने  पेपरच्या आधी संजाली बरोबर जाऊन सोहमला गाठला. सोहम आदित्य बरोबर कॅम्पसमध्ये पेपर विषयी चर्चा करत बसलेला तिला दिसला. ती त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली.

 

सावी,“ काल जी तू माझी हेल्प केलीस त्या बद्दल   thanks सोहम! तू जर मला काल मेडिसीन्स आणून दिली नसतेस तर मी कालचा पेपर लिहू शकले नसते!” ती कृतज्ञतेने म्हणाली.

 

सोहम,“ it's ok सावनी! तू माझी स्पर्धक आहेस मग उद्या जर मला तुझ्या पेक्षा जास्त मार्क मिळाले तर अस नको व्हायला की तू आजारी होतीस म्हणून मला जास्त मार्क मिळाले! बरं आणि अभ्यास करत जा पण रात्र रात्र जागत नको जाऊस त्यामुळे तब्बेत बिघडली तर तू पेपर लिहू शकणार नाहीस मग त्या अभ्यासाचा काय फायदा!” तो समजावत म्हणाला.

 

सावी,“ हो बरोबर आहे तुझं सोहम मी नाही आता रात्री जागून अभ्यास करणार! By the way friends?” तिने तिचा हात पुढे करून सोहमला विचारले.

 

सोहम,“ ok! Friends!” तो गोड हसून म्हणाला.

 

        आदित्य मात्र दोघांकडे आश्चर्याने पाहतच होता. सावी आणि सोहमची मैत्री झाली.त्यामुळे आदित्यची ही सावीशी ही चांगली मैत्री झाली पण त्यांची मैत्री नोकझोकवाली होती.मैत्री झाल्यामुळे सावीला सोहमचा आणि सोहमला साविचा स्वभाव  कळला होता.

 

      सोहम खळाळणारा जिवंत झरा, दिलखुलास, मित्र-मैत्रिणीच्या गराड्यात राहणारा, बडबडा तरी वेळ प्रसंगी झुकणारे आणि भावनिक व्यक्तिमत्त्व तरी  सहनशीलता संपली तर टोक गाठनारा असा संमिश्र स्वभावाचा होता.

 

    तर सावी एखाद्या शांत विहिरी सारखी शांत तरी आतून विहिरीत जसे जिवंत झरे असतात  तशी आतून जिवंत, अलिप्त राहणारी, कमी बोलणारी, कमी मित्र-मैत्रिणी असणारी तरी तडफदार, कोणाचा ही अन्याय सहन न करणारी, डॉमीनेटिंग,काही झाले तरी स्वतःच्या धारणा आणि तत्वांना मुरड न घालणारी तरी प्रेमळ आणि केरिंग व्यक्ती होती.

 

     

           सावी सोहमच्या ग्रुपमध्ये सामील झाली. विकेंडला फिरायला जाणे. कॉलेजच्या पिकनिक आणि क्लासेसला एकत्र असणे. या सहवासातून त्यांचे मैत्रीचे नाते आता प्रेमात रुपांतरीत होऊ पाहत होते.आता सावीच्या मनातील सोहम विषयीच्या असूयेचे पहिल्यांदा मैत्रीत आणि आता प्रेमात रूपांतर होऊ पाहत होते. तिला सोहमची हुशारी त्याचा मनमोकळा स्वभाव, त्याचे आकर्षक व्यक्तिमत्त्व  भुरळ पाडत होते तर सोहमला सावीच तडफदार आणि डॉमीवेटिंग असणं आणि तरी ही प्रेमळ, देखणे व्यक्तिमत्त्व त्याला साद घालत असे.

 

            सावी आणि सोहम दोन ध्रुव होते. जणू एखाद्या नदीचे दोन किनारे! सोहम इंद्रधनुषी रंग तर सावी निखळ पांढरा रंग! म्हणतात ना  opposite attract तसे दोघे एकमेकांकडे आकर्षित होत होते. 

 

     पण सावीच्या मनात जरी सोहम विषयी भावना असल्या तरी तिने स्वतः ला एका बंधनात बांधून ठेवलं होतं. एक अदृश्य तटबंदी तिने स्वतः भोवती निर्माण केली होती.

 

          म्हणूनच  सोहम सावीच्या समोर त्याचे प्रेम व्यक्त करायला घाबरत होता कारण सावीचे प्रेम आणि लग्न संस्थे विषयीचे निगेटीव्ह विचार! असच एकदा सोहम,सावी, आदित्य आणि संजाली बाहेर फिरायला गेले असता बोलता बोलता प्रेम आणि लग्न यावर चर्चा सुरू झाली. संजाली म्हणाली

 

संजाली,“ प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील एक राजकुमार असतो आणि तिला वाटत असते की त्याच्या बरोबर लग्न करून ती सुखी होईल पण  बऱ्याच दा तिला तडजोड करावी लागली तरी मुलगी तिच्या जोडीदारा बरोबर सुखी असते.कारण उभयतांमध्ये प्रेम असेल तर सगळं काही शक्य होत.”

 

सावी,“ वेडी आहेस तू संजू अग  प्रेम आणि खास करून लग्न हे मुलगा आणि मुलगी स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात मुलगी लग्न करते तिला एक स्युक्योर आयुष्य हवं असत म्हणून तर पुरुष कमालीचे स्वार्थी असतात ते लग्न करतात त्याच्या शारीरिक, मानसिक, कधी कधी आर्थिक गरजा भागाव्यात म्हणून तसेच मुलंबाळं पण हवी असतात त्यांना! एकदा लग्न झाले की बाईशी कसं ही वागण्याच लायसन्स मिळत त्यांना आणि बाई समाज आणि सुरक्षिततेच्या नावा खाली सगळं सहन करत असते” ती हे सगळं चिडून बोलत होती.तिच्या नजरेत प्रेम आणि लग्न या विषयी एक वेगळीच चीड दिसत होती.

 

       हे पाहून आणि ऐकून  सोहम तर पुरता गारद झाला होता.त्याने सावीच्या नजरेत त्याच्या विषयी प्रेम पाहिले असले तरी  सावीच्या याच विचारामुळे तो त्याचे प्रेम सावी समोर व्यक्त करण्यास धजावत नव्हता

 

            कॉलेजची तीन वर्ष पूर्ण होऊन चौथे म्हणजेच शेवटचे वर्ष सुरू झाले तरी  सोहम त्याच्या प्रेमाची कबुली द्यायला तयार नव्हता. त्यांचे एकमेकांवर प्रेम असले तरी ते अव्यक्त होते.

    

 

      आदित्य हे सगळं गेल्या तीन वर्षांपासून पाहत होता. त्याचे आणि सावीचे  आता एक वेगळे नाते तयार झाले होते भावा-बहिणीचे जे लुटुपटूच्या भांडणाचे होते. सावी त्याला कधीच  राखी बांधत नव्हती कारण तिच्या तत्वात ते बसत नव्हते. तरी आदित्य मात्र दर वर्षी तिला राखी पौर्णिमेला  गिफ्ट न चुकता देत असे. आता डिग्रीचे अर्धे वर्ष ही दोन महिन्यांनी संपणार होते. तरी सोहम आणि सावीच्या प्रेमाची गाडी अजून रुळावर येत नव्हती. म्हणून न राहवून आदित्य एक दिवस सोहमला म्हणाला.

 

आदित्य,“ सोम्या तू नेमकं काय ठरवले आहेस?”

 

सोहम,“ कशा बद्दल बोलतो आहेस आद्या?” त्याने विचारले.

 

आदित्य,“ अरे मूर्खा तुझ्या आणि सावी बद्दल विचारतो आहे मी! असं किती दिवस नुसतं तुमच्या दोघांचं चालणार आहे. तू तिला आता प्रपोज करावेस असं मला वाटते. अरे हे शेवटचे वर्ष आहे आपले डिग्रीचे त्या नंतर कोण कुठे जाईल सांगता येत नाही म्हणून तू तिला प्रपोजकर आणि तुमच्या अव्यक्त प्रेमाला एक नाव द्यावे असे मला तरी वाटते.” तो म्हणाला.

 

सोहम,“ तू म्हणतो ते मला पटते रे पण मला भीती वाटते की सावी माझ्या प्रेम व्यक्त करण्यावर कशी रियाक्ट होईल. तिचे प्रेम आणि लग्न या विषयीचे विचार तुला माहीतच आहेत आणि  ती किती एंबिशिअस आणि डॉमीनेटिंग आहे तुला माहीत आहे. जर तिला मी प्रपोज केलेले आवडले नाही आणि तिने माझ्याशी मैत्री ही तोडली तर!” तो म्हणाला.

 

आदित्य,“ हो माहीत आहे मला तिचे विचार पण तिच्या  डोळ्यात तुझ्या विषयी प्रेम दिसते आणि असंच घाबरत  राहिलास तर तिला कधीच सांगू शकणार नाहीस की तू तिच्यावर प्रेम करतो ते!” तो जरा चिडून म्हणाला.

 

सोहम,“ तू म्हणतो ते बरोबर आहे आद्या मी लवकरच सावीला प्रपोज करेन!” तो म्हणाला.

      

          हे ऐकून आदित्य खुश झाला.सावी मात्र रोज स्वतःशीच एक वैचारीक द्वंद्व लढत होती. तीच मन सोहमकडे  ओढ घेत होत तर डोकं मात्र तिला प्रेम,लग्न या गोष्टीं पासून परावृत्त करत होत.याच द्वंव्दा मध्ये सावी अडकून पडली होती पण सोहमने मात्र आता तिला परिणामांची पर्वा न करता प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता.

 

              दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे सावी आणि संजाली कॉलेजला मध्ये आल्या.कॉलेज सुरू व्हायला अजून वेळ होता. सावी लाब्ररी मध्ये गेली तर संजाली बाहेर मैत्रिणींशी बोलत उभी होती. कॉलेज मधील काही टवाळखोर मुलं संजालीला तिथे येऊन छेडू लागली. सावीने लाब्ररीतून येताना ते पाहिले व ती सरळ त्या मुलांजवळ गेली आणि त्यांना भांडू लागली. ते पाहून गर्दी होऊ लागली सोहम आणि आदित्य ही तो पर्यंत कॉलेजमध्ये आले.  सावीला त्या मुलांशी भांडताना पाहून आदित्य सोहमला म्हणाला.

 

आदित्य,“ जा जा सोम्या हीच वेळ आहे साविच्या नजरेत हिरो बनायची जा त्या पोरांना चोप दे!” तो एक्साईट होऊन म्हणाला.

 

सोहम,“ गप रे आद्या! आज त्या पोरांचा सगळ्यात वाईट दिवस आहे बघ तू! सावीला कोणत्याच हिरोची गरज नाही ती स्वतःच हिरो आहे आगे आगे देखो होता हैं क्या?” तो सावीला पाहत आदित्यला म्हणाला.

 

      सावीने सॅंडल काढले आणि त्या दोघा मुलांना भर       गर्दीत चांगलाच चोप दिला आणि कॉलर धरून प्रिन्सिपॉलच्या ऑफिसमध्ये घेऊन गेली. त्या पोरांनी संजालीची माफी मागितली. तरी प्रिन्सिपॉलने दोघांना दोन आठवड्यांसाठी सस्पेंड केले. बाहेर आल्यावर सोहम सावीला म्हणाला.

 

सोहम,“ मान गये मेरी झाशी की राणी तुम्हे!” तो कौतुकाने म्हणाला.

 

आदित्य,“ आयुष्यात परत कधीच कोणत्या पोरीची छेड ही पोर काढणार नाहीत बघ सावी!” तो म्हणाला.

 

सावी,“ बास बास खूप झाले कौतुक माझे चला लेक्चर सुरू होईल आता! चल ग संजू” असं म्हणून ती हसली.

 

        चौघे ही क्लासमध्ये गेले.

 

सावीच्या मनातील द्वंव्दामध्ये तिचे मन जिंकणार होते की डोके? सोहमने जर सावीला प्रपोज केले तर ती कशी रियाक्ट होणार होती? ती सोहमचे प्रेम स्वीकारणार होती की नाकारणार होती? सोहम सावीच्या प्रेम आणि लग्न या विषयीच्या धारणा बदलू शकेल का?सावी आणि सोहमचे नाते आता कोणते वळण घेणार होते?

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule