A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_sessionb9b8467089128da5e5941c8f519dcefd8199ec6f0f3b65574090cfede3fd05eccc6af987): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hamsfars part 1
Oct 27, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग १)

 

 

 सावी आज  पुन्हा आदित्यच्या घरा बाहेर त्याची ऑफिस मधून येण्याची वाट पाहत बसली होती. गेल्या सहा महिन्यापासून तीच हे नित्याचेच झाले होते. आदित्यने चारचाकी दारात पार्क केली आणि तो गाडीतून उतरला. साविला पाहून तो चिडला होता. त्याच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत होते. पण साविला  त्याच्या चिडण्याचा काहीच फरक पडत नव्हता. सावी त्याला येताना पाहून उठली आणि तो आला की तिने त्याला विचारले.


सावी,“ आदित्य सांग ना तो कुठे आहे? मला त्याला भेटायचे आहे प्लिज इतका कठोर नको रे बनू! मी  गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्या शिवाय कशी जगतेय मला माहित!” ती रडत बोलत होती.


आदित्य,“ हे बघ सावी मी तुला गेल्या सहा महिन्यांपासून  सांगतोय की सोहम कुठे आहे मला माहित नाही आणि मला माहित असत तरी मी तुला सांगितले नसते. You don't deserve him! तुला कशाला पाहिजे ग तो आता? तो तुझ्या बरोबर असताना त्याला जो तू त्रास दिलास तो बास नाही का? की अजून त्याला शोधून तुला त्याला त्रास द्यायचा आहे आणि प्लिज माझ्या दारात रोज असं सकाळ संध्याकाळ येऊन बसणं बंद कर! माझ्या सोसायटीतील लोक आता कुजबुजायला लागले आहेत. तुझ्या अशा वागण्याने! आणि तू इथे येऊन तुला काही मिळणार नाही. मला नाही माहीत सोहम कुठे आहे! जा तू!” तो रागाने बोलत होता


सावी,“ खोटं बोलू नकोस अदित्य मला खात्री  आहे की सोहम कुठे आहे हे तुला नक्कीच माहीत आहे.पण तू मला सांगत नाही आहेस मला फक्त त्याला एकदा भेटायचे आहे रे! माझ्या चुकांची माफी मागायची आहे मला! मला कळून चुकलय की मी नाही राहू शकत त्याच्या शिवाय so please! सांग ना मला तो कुठे आहे!” ती रडत विनवणी करत होती.


आदित्य,“ प्लिज सावी तू जा इथून मला खरंच माहीत नाही सोहम कुठे आहे ते! आणि आता काहीच उपयोग नाही या सगळ्या गोष्टींचा कारण तो तुझ्या बरोबर होता तेंव्हा तू फक्त त्याला त्रास आणि दुःख दिलेस मग आता कशाला ग तुला तो हवा आहे! प्लिज तू जा!" तो तिला तिरस्काराने म्हणाला.


सावी,“ ठीक आहे मी आत्ता जात आहे पण उद्या सकाळी मी ऑफिसला जायच्या आधी अजून येणार तोपर्यंत  येत राहणार जोपर्यंत तू मला सोहम कुठे आहे ते सांगत नाहीस.” असं म्हणून ती निघाली.


     सावी म्हणजे सावनी सोहम सरपोतदार! नितळ पण बऱ्याच दिवसांपासून नीट काळजी व झोप न घेतल्यामुळे मलूल झालेली कांती, डोळे मोठे काळे पण निस्तेज, केस काळे लांब पण कसे तरी गुंडाळलेले, सडपातळ आणि सुंदर शरीर यष्टी पण आता थोडी कृश झालेली. तिचा नवरा सोहम  सरपोतदार गेल्या सहा महिन्यांपासून तिच्यावर रुसून कुठे तरी निघून गेलेला! अदित्य देशमुख व तो अगदी जीवश्चकंठष्य मित्र त्यामुळे सावीला वाटत होते की आदित्यला सोहम कुठे आहे माहीत असणार म्हणून ती रोज ऑफिसला जायच्या आधी सकाळी आणि ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी त्याच्या दारात गेल्या सहा महिन्या पासून येऊन बसत असे! आज ही ती आली होती आणि रोजच्या सारखी निराश होऊन तिच्या घरी निघाली होती.

             ती कारमध्ये बसली आणि ड्रायव्हरने तिने काही ही न बोलता गाडी सुरू केली.गाडी एका आलिशान अपार्टमेंट समोर थांबली आणि सावी लिफ्टने सातव्या मजल्यावर गेली. तिने लॉक उघडले आणि आत जाऊन सोफ्यावर बसली. तिचे घर म्हणजे एक आलिशान थ्री.बी.एच.के फ्लॅट जो तिने अट्टाहासाने स्वतःच्या नावाने करून घेतलेला होता. हॉलमध्ये सोफ्यावर बसून ती सगळीकडे  पाहत होती.इतक्या सुंदर हॉलमध्ये सगळीकडे लहान-मोठ्या फोटो फ्रेम होत्या पण सगळ्या रिकाम्या! एकाही फोटो फ्रेममध्ये फोटो नव्हता. ती अश्रू ढाळत त्या फ्रेम पाहत होती. तीच आयुष्य ही आज त्या फोटो फ्रेम सारख रिकाम आणि रीत झालं होतं सोहमच्या निघून जाण्याने!

       ती उठली आणि किचनमध्ये जाऊन थोडं पाणी  प्याली कॉफी मशीन मधून एक कप कॉफी घेऊन ती हॉल मध्ये आली  व पर्स मधून एक लिफाफा काढून ती त्यातला कसला सा कागद काढून वाचू लागली.तो कागद म्हणजे सोहमने तो जाताना तिला लिहिलेले पत्र होते. ज्याची सावीने गेल्या सहा महिन्यांत लाखो पारायणे केली असतील.


प्रिय, (हे म्हणण्याचा मला अधिकार आहे का?)


  सावी, खरं तर आता आपल्यात बोलण्यासारखे आणि सांगण्यासारखे काहीच राहिले नाही.तरी पण हा शेवटचा संवाद तुझ्याशी साधावासा वाटतो आहे.खरं तर आपण प्रेम विवाह केला पण विवाहनंतर ना प्रेम राहिले ना विवाह! कदाचित मीच कोठे तरी कमी पडलो असेन ग तुझा विश्वास जिंकण्यात! कारण लग्न होऊन एक वर्ष होत आले तरी तुझा माझ्यावर अजून ही विश्वास नाही आणि विश्वास हाच तर नात्याचा श्वास असतो. तो नसेल तर नात मरून जात जसं आपलं नात मरून गेलंय!

             खरंच मी तुला समजून घेण्याचा आणि तुझा विश्वास संपादन करण्याचा खूप प्रयत्न केला पण मला नाही जमले ते कदाचित माझे प्रयत्न तोकडे पडले असतील! मी हरलो ग आज! काल जे काही झाले तू जे आरोप माझ्यावर केले त्याचे स्पष्टीकरण मला तुझ्या समोर देण्यात अजिबात रस नाही. पण काल जे तू शब्द वापरले ते ऐकून मला वाटले की मी का जिवंत आहे? तुला माझ्या अस्तित्वाची शिसारी वाटते अस तू म्हणालीस म्हणूनच मी  माझे अस्तित्व घेऊन तुझ्यापासून खूप दूर जात आहे इथून पुढे तुला माझ्या अस्तित्वाचा कधीच त्रास होणार नाही. याची मी तुला खात्री देतो. याचसाठी मी या घरातील माझ्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा पुसत आहे. जर एखादी माझ्या अस्तित्वाची खूण चुकून राहिली तर तू ती जाळून टाक आणि हो हे लिहिलेले पत्र ही! कारण हे पत्र सुध्दा माझे अस्तित्व दाखवते!  

            या पत्रा बरोबर डिव्होर्स पेपर आहेत. मी आपल्या वकिलांकडून सगळी पूर्व तयारी करून घेतली आहे तुला डिव्होर्स मिळवायला काही ही अडचण येणार नाही. हे घर तुझ्याच नावावर आहे आणि हो मी नोकरीवरून रिजाईन केले आहे आणि प्रॉव्हीडन्ट फंडाचे पैसे तुझ्या खात्यावर जमा होण्याची सोय केली आहे तो तुझा अधिकार आहे!

                  तू स्वतःची काळजी घे आणि आनंदी राहा. मला शोधू नकोस असे मी तुला नाही म्हणणार कारण तू मला शोधणार नाहीस याची मला खात्री आहे! Good by!

                                      

                                                   कमनशिबी,

                                                      सोहम,       

 (तुझा म्हणणार नाही कारण तो अधिकार मला नाही आता) 

                                            ●●●●

        हे पत्र उराशी कवटाळून  ती हमसून रडत बोलली.


सावी,“ कमनशिबी तू नाहीस सोहम मी आहे.चूक कधीच तुझी नव्हती आणि नाही. चूक तर माझीच आहे.मला तुझी किंमत आणि तुझे प्रेम कळले नाही. मी सतत तुला हेटाळत राहिले. तुला नाही नाही ते बोलले खरंच मी चुकले खूप चुकले पण त्याची इतकी मोठी शिक्षा नको देऊस मला प्लिज मला एकदा माफी मागण्याचा चान्स तर दे! मला माहीत आहे माझ्या चुका माफ करण्यासारख्या नाहीत पण एकदा मला माफी तर मागू दे! तुझ्या शिवाय मी जगू ही शकत नाही आणि मरु ही शकत नाही. पण मी हार नाही मानणार तू कुठे आहेस तिथून मी तुला शोधून काढेनच!”


                  सावी बराच वेळ तिथेच बसून राहिली नंतर उठून ती फ्रेश झाली आणि मोलकरणीने बनवून ठेवलेले जेवणाचे चार घास कसे तरी खाल्ले. ती उठून बेडरूममध्ये गेली आणि बेडवर ठेवलेले ब्लँकेट कुरवाळत बेडवर बसली. ते ब्लँकेट फक्त सोहमकडून कदाचित चुकून राहिले होते. त्याच्या अस्तित्वाची सावीकडे आज असलेली एकमेव खूण ज्यात आज ही त्याचा सुगंध दरवळत होता. ते ब्लँकेट सावीने गेल्या सहा महिन्यांपासून जीवापाड जपले होते आणि रोज ती ते स्वतः जवळ घेऊन झोपत होती.


असं काय झाले होते सावी आणि सोहममध्ये की सोहम तिला असं एकटीला तडफडत सोडून गेला होता? 


क्रमशःचला तर मग आज पासून माझ्या बरोबर एका नवीन प्रवासाला सावी आणि सोहमच्या संगतीने!

 एका वेगळ्या नात्याची जगा वेगळी कथा!एक नवीन कथा एक नवीन प्रवास!     

    हमसफर्स! 

                आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट


या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. लेखिकेच्या नावा सहित कथा शेअर करण्यास लेखिकेची हरकत नाही!

©swamini(asmita) chougule