A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session3d0a7b9daa3fef70beef33d192a17e02e2cfeca7d3e69ad49129b84cfde04b2e68c4eaa4): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hamsafars22
Oct 30, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २२)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २२)

 

      आज एक नवीन दिवस उगवला होता.एक नवीन पहाट! सोहम आणि सावीचे नाते ही एका  नव्या वळणावर  पोहोचले होते. त्यांच्या नात्यात ज्या गैरसमजातून दुरावा निर्माण झाला होता. तो गैरसमज आता दूर झाला होता. त्यांच्या नात्यावर आलेले मळभ दूर झाले होते.सावी  सकाळी उठली आज तिला उठायला उशिरच  झाला होता. सोहमला तिने गडबडीने उठवले आणि ती फ्रेश होऊन टिफिन आणि नाष्टा तयारी करायला निघून गेली. तो पर्यंत कामवालीबाई आली.सावीने पटापट आवरले. सोहम तयार होऊन आला आणि ऑफिसला निघून गेला. 

 

          सावी ही आज जरा रिलॅक्स होती.कारण ती ज्या कामासाठी चंदिगढला आली होती ते काम झाले होते म्हणजे ती सोहमची माफी मागण्यासाठी चंदिगढला आली होती आणि काल तिने त्याची माफी मागितली होती.अर्थात सोहमने स्पष्टपणे तिला माफ केले असे म्हणले नसले तरी सोहमच्या कालच्या एकंदर वागण्यातून त्याने तिला माफ केले आहे याची जाणीव काल तिला झाली होती. त्यामुळे सोहम त्याचा निर्णय बदलेल असं तिला वाटत होते.तिच्या मनावरचे खूप मोठे ओझे आज हलके झाले होते.तरी ही तिच्या मनात अजून ही एक प्रकारची हुरहूर होती. कारण सोहमने तिला स्पष्टपणे सांगितले नव्हते आणि त्याचा निर्णय अजून ही गुलदस्त्यात होता. त्याची वागणूक सावी प्रति पॉजीटिव्ह होती तरी  ही तो काय निर्णय घेईल हे कोणीच सांगू शकत नव्हते. त्यामुळे सावीने जास्त आशा लावून न बसनेच योग्य असा विचार केला.

 

    सावीचा फोन वाजला आणि सावीची तंद्री भंगली.फोन तिच्या आईचा म्हणजेच सुमेधा ताईंचा होता.सावीने फोन उचलला आणि ती बोलू लागली.

 

सावी,“ हॅलो आई! कशी आहेस? आणि किती दिवसांनी फोन केलास  ग! तुला मी खूप फोन लावले पण नेटवर्क नसल्यामुळे लागलेच नाहीत आणि तू केंव्हा आश्रमातून खाली येतेस याचे टाईम टेबल माझ्या लक्षात राहिले नाही!” ती बोलत होती.

       सावीच्या आई सुमेधाताईंनी सावीच्या लग्नानंतर नोकरी वरून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मन: शांतीसाठी हिमालयातील त्यांच्या गुरूच्या आश्रमात जाऊन राहिल्या होत्या. तिथे फोन करण्यासाठी  नेटवर्क नसे पण आठवड्यातून ठरावीक दिवशी आश्रमातील शिष्यगण त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आणण्यासाठी गावात जात असत तेंव्हा त्याच्या  मोबदला नेटवर्क असे  आणि त्याच्या गावात जाण्याचे टाईम टेबल ठरलेले असे नेमके तेच सावीच्या लक्षात राहत नव्हते. तिचे बोलणे ऐकून सुमेधा ताई बोलू लागल्या.

 

सुमेधाताई,“ सोहमला सांग की त्याने पाठवलेली इथे मिळत नसलेली औषधे दर महिन्याप्रमाणे या ही महिन्यात मला मिळाली आहेत. त्याचा फोनच लागत नाही आणि ऑफिसच्या  लँड लाईनवर केला तर तो बाहेर गेला आहे असे कळले त्यामुळे मी फोन केला आहे तुला!” त्या रुक्षपणे म्हणाल्या.

 

सावी,“काय सोहम तुला औषधे पाठवतो? कधी पासून?” तिने आश्चर्याने विचारले.

 

सुमेधाताई,“ हो पाठवतो! तुझी सगळी कर्तव्य तो पार पाडतो पण एव्हढ सगळं करून त्याला मात्र!”  त्या बोलायच्या थांबल्या.

 

सावी,“ मला तर माहीत ही नव्हतं हे सगळं! म्हणजे तुला सगळं कळलेलं दिसतंय हो ना?” तिने आवंढा गिळत विचारले.

 

सुमेधाताई,“ हो माहीत आहेत मला सगळे तुझे पराक्रम! खरं तर मला हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळे कोणीच काही सांगितले नव्हते पण चार-पाच महिन्या पूर्वी महिना होऊन गेला तरी माझे टाईम टेबल लक्षात ठेवून मला नेहमी फोन करणाऱ्या सोहमने मला महिनाभर फोनच केला नाही तरी औषधे वेळेवर पोहोचली होती.मला मात्र त्याची काळजी वाटू लागली पण त्याचा फोन ऑफ होता.शेवटी मी आदित्यला फोन केला तोही उडवा उडवी करू लागला मग मी शपतेवर त्याला विचारले तेंव्हा त्याचा एक्सिडेंट झाला आहे म्हणून त्याचा फोन बंद आहे. तरी  त्याने आदित्यला सांगून मला औषधे पोहोचवली हे सगळे कळले आणि तू सोहमशी कशी वागलीस इथं पासून तुम्ही सोहमच्या बाबांच्या सांगण्यावरून सहा महिने  एकत्र राहत आहात हे ही कळले! सावी खरच मी आई म्हणून हरले ग! मी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले पण माझ्या संस्कारावर तुझ्यातल्या त्या नीच माणसाच्या रक्ताने मात केली बघ! तू ही त्याच्या सारखीच निघालीस नीच आणि अप्पल पोटी! तुला मी खूप समजावले सगळे पुरुष सारखे नसतात पण तू ऐकलं नाहीस.शेवटी तू ही तुझ्या बापावरच गेलीस! सोहमने इतके होऊन ही मला काहीच सांगितले नाही आणि माझी काळजी तो घेतच राहिला मला अजून ही फोन करतो तो त्याला हे ही माहीत नाही की मला सगळं कळले आहे. तू कोणते पुण्य केलतेस काय माहीत तुला असा नवरा मिळाला पण तू त्याला नाही जपू शकलीस सावी! दैव देत आणि कर्म नेत यालाच म्हणतात बघ!” त्या अगदी शांतपणे बोलत होत्या.

 

    हे ऐकून सावी मात्र रडत होती ती रडतच म्हणाली.

 

सावी,“ माझं चुकलं आई पण मी माझ्या बापासारखी नाही ग!मी तुझ्यासारखी आहे!” तिला तिच्या आईने तू तुझ्या वडीलांसारखी आहे असे म्हणलेलं खूप लागलं होतं कारण सावी जगात कोणाचा सगळ्यात जास्त तिरस्कार करत असेल तर तिच्या वडिलांचा! त्यामुळे तिच्या आईचे असे बोलणे तिच्या काळजाला घरे पडत होत.

 

सुमेधाताई,“ हो सावी तू तुझ्या बापा सारखीच निघालीस हे कटू असले तरी सत्य आहे.आणखी एक जर सोहमने तुला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला तर मी ही तुला मेले असं समज कारण तू जे काही सोहम बरोबर वागली आहेस ना ते सोहम एक वेळ माफ करेल पण मी तुला माफ करणार नाही! खरं तर तुला फोन  करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती पण सोहमचा फोन लागत नव्हता आणि तो औषधे पोहोचली का नाही म्हणून काळजी करत बसला असता जे त्याच्या तब्बेतीसाठी चांगले नाही म्हणून मी तुला फोन केला.सांग त्याला माझा निरोप आणि जमलं तर प्लिज त्याची काळजी घे!” असं म्हणून त्यांनी सावीचे काहीच ऐकून न घेता फोन ठेवला.

 

    सावी मात्र हे सगळं तिच्या आईच्या तोंडून ऐकून खूपच दुखावली गेली होती. तिला सगळ्यात जास्त दुःख याच होत की तिच्या आईने तिला तू तुझ्या बापावर गेली आहेस तुझ्यात त्याचच रक्त आहे म्हणून तू ही तशीच झालीस! हे तिला सुनावले होते. सावी सगळ्यात जास्त तिरस्कार तिच्या वडिलांचा करत होती आणि तिची तुलना तिच्याच आईने त्यांच्याशी केली म्हणून ती आतून आज तुटली होती. दुसरी गोष्ट तिच्या आईने तिला स्पष्ट सांगितले होते की सोहमने जर तिला घटस्फोट दिला तर त्या ही तिच्याशी संबंध ठेवणार नाहीत.आता तिला या जगात आपण एकटेच आहेत आपलं या जगात कोणीच नाही या एकटेपणाच्या भावनेने आणि दुःखाने ग्रासले होते.

     

           माणसाला सगळ्यात जास्त भीती एकटेपणाची वाटत असते. प्रत्येकाला स्वतःची हक्काची प्रेम करणारी माणसे हवी असतात.माणूस एकटा जगू शकत नाही आणि सावीला मात्र आज एकटेपाणाची भावना सतावत होती.

 

         तिला राहून-राहून सोहमचे कौतुक ही वाटत होते आणि त्याचा राग ही येत होता. तिला वाटत होते की तिची आई तिच्या पासून आज त्यांच्या मुळेच दूरावली आहे. तिच्या मनात राग आणि कृतज्ञता या दोन्ही भावनांमध्ये आंदोलन चालले होते. ती याच मानसिक आंदोलना मध्ये रडत बेडवर पडून होती. किती वेळ ती अशीच रडत होती हे तिला ही माहीत नव्हती. बेलचा आवाज आला आणि तिने जाऊन दार उघडले आज सोहम लवकरच आला होता. तो घरात आला आणि त्याला पाहून सावीच्या मनातला त्याच्यामुळे तिची आई दूरावली  गेल्याचा राग उफाळून आला.तिने सोहमने बॅग ठेवली तो पर्यंत बोलायला सुरुवात केली.

 

सावी,“ माझ्या आईचा फोन आला होता मला!” ती म्हणाली.

 

सोहम,“ हो मी बाहेर गेलो होतो मिटींगला!  तिथे नेटवर्क इश्यू होता त्यामुळे आईंना माझा फोन लागला नाही आणि लँड लाईनवर त्यांनी फोन केला तर मी ऑफिसमध्ये नव्हतो.मी नेटवर्कमध्ये आल्यावर मेसेज पाहून फोन केला.त्यांची औषधे वेळेवर पोहोचली म्हणून फोन केला होता. त्यांची काही औषधे तिकडे मिळत नाहीत ग!” तो थकून सोफ्यावर बसत म्हणाला.

 

सावी,“ आपलं भांडण झाल्यावर तू मला सोडून आल्यावर ही माझ्या आईच्या टचमध्ये तू होतास तर बरोबर!” तिने  खोचकपणे विचारले.

 

सोहम,“ हे काय माझी आई माझी आई लावलं आहेस ग तू?” तो उठून उभा राहत म्हणाला.

 

सावी,“ हो माझीच आई आहे ती आणि माझ्यामुळे तुझा आणि तिचा संबंध आहे ना! मग माझ्याशी संबंध तोडल्यावर तुझा तिच्याशी काय संबंध राहिला रे? सांग ना!” ती रागाने म्हणाली.

 

सोहम,“ हे काय बोलत आहेस सावी तू? त्यांचा आणि माझा संबंध तुझ्यामुळे असेल ही पण आता त्या माझ्या आई सारख्या आहेत सावी!” तो ही रागाने बोलत होता.

 

सावी,“ आई सारखी आहे ती तुझी आई नाही माझी आई आहे ती! तुला कसं जमत रे इतकं महान बनायला कायम दुसऱ्याशी छान छान वागायला! तुझ्यामुळे माझी आई माझ्या पासून दूरावली सोहम! ती मला म्हणाली की तू जर माझ्या पासून फारकत घेतली तर ती ही माझ्याशी संबंध तोडणार! तुला काय रे तुला आई-बाबा आहेत आदित्य आहे पण मी या जगात एकटी पडले सोहम! तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे!” ती सोहमकडे पाठ करून उभी होती.

 

         हे सगळं ऐकून  सोहमच्या डोक्यातून एक कळ आली आणि तो उभ्या-उभ्याच  कोसळला. त्या आवाजाने सावीने वळून पाहिले तर सोहम निपचीत पडला होता.सावी त्याच्या जवळ घाबरून गेली ती सोहमला हलवून उठवत होती पण तो   तिला काहीच प्रतिसाद देत नव्हता.

 

               इकडे सोहमने बेल वाजवली तर सावी दार उघडत नव्हती. सोहम काळजीत पडला आणि त्याने लॅच कीने दार उघडले. तर बेडरूम मधून सावी मोठ-मोठ्याने ओरडत होती. सोहम तिच्या जवळ घाबरून गेला तर सावी बेडवर डोळे झाकून पडून “सोहम सोहम” म्हणून ओरडत होती. तिचा चेहरा घामाने डवरला होता.ती खूप घाबरलेली दिसत होती.ते पाहून सोहमने तिला जोर-जोरात हलवून उठवले.

      सावीने डोळे उघडले आणि तिने सोहमला समोर पाहून मिठी मारली आणि ती  मोठ्याने रडत सोहमला घाबरून विचारत  होती.

 

सावी,“सोहम तू ठीक आहेस ना! सोहम बोल ना मला खूप भीती वाटतेय तू असा गप्प नको राहूस!”

 

          सोहमच्या लक्षात सगळा प्रकार आला सावीने काही तरी भयंकर स्वप्न पाहिले होते आणि ती त्यामुळे खूप घाबरली होती.सोहम  तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत म्हणाला.

 

सोहम,“ सावी शांत हो! नीट बघ मी ठीक आहे! तू काही तरी भयंकर स्वप्न पाहिलेस!भानावर ये!” तो तिची मिठी सोडवत तिचा चेहरा दोन्ही हातात धरत म्हणाला.

 

     सावी आता जरा भानावर आली. तिने सोहमला पाहिले आणि तिच्या लक्षात आले की तिच्या आईचा फोन येऊन गेल्यावर ती रडत बेडवर पडून राहिली आणि तिथेच तिला डोळा लागला.तिने जे काही अनुभवले आणि पाहिले होते ते सगळे एक भयंकर स्वप्न होते. सोहम तर आत्ताच आला होता. तिने सोहमला पाहिले आणि ती डोळे पुसत त्याला म्हणाली.

 

सावी,“ बाप रे!मी खूप भयंकर स्वप्न पाहिले.बर तू फ्रेश हो!तू चहा घेणार का कॉफी!” ती म्हणाली.

 

सोहम,“ काय हे सावी किती घाबरली होतीस तू!मी किती बेल वाजवली पण तू दार उघडत नाही म्हणाल्यावर मी ही घाबरलो की म्हणून लॅच कीने दार उघडून घरात  आलो तर तू बेडरूममध्ये ओरडत होतीस! बघ स्वतःला घाबरून किती घम्याघुम झालीस ग! माझी इतकी पण चिंता करू नको सावी की झोपेत सुध्दा तुला ती सतावेल!अशाने आजारी पडशील तू!” तो तिला तिथल्याच टी पॉय वर ठेवलेल्या मगातील पाणी  देत काळजीने समजावत होता.

 

सावी,“ खूपच भयंकर स्वप्न पडले रे मला!वैरी न चिंती ते मन चिंती म्हणतात ते अगदी खरं आहे बघ! मी ठीक आहे बरं सांग ना तू काय घेणार मी बनवते लगेच?” तिने पाणी पित विचारले.

 

सोहम,“ काही नको मी बनवतो स्ट्रॉंग कॉफी  दोघांसाठी तू जा फ्रेश हो! किती घाबरशील सावी आणि किती चिंता करशील! घरात बसून बसून तू तोच तोच विचार करतेस सतत! मनी वसे ते स्वप्नी  दिसे म्हणतात ते उगाच नाही! अशाने तब्बेतीवर परिणाम होईल तुझ्या! मी कॉफी करतो तू रिलॅक्स हो जरा! आज आपण बाहेर जाऊ  डिनर ही बाहेरच करू आणि फिरून ही येऊ तुला चेंज मिळेल आणि तुझे विचार ही बदलतील! प्लिज सावी नको इतका विचार करत जाऊस! बरं आवर आणि हॉलमध्ये ये! मी कॉफी करतो!” तो असं म्हणून  जावू लागला तर सावीने त्याचा हात धरला आणि त्याला जवळ बसवत म्हणाली.

 

सावी,“ आईचा फोन आला होता.औषधे पोहोचली म्हणून! Thanks सोहम माझे कर्तव्य तू केल्या बद्दल!मी तर माझ्याच प्रॉब्लेममध्ये गुरफटून गेले पण तू स्वतः  हॉस्पिटलमध्ये असताना ही आईची औषधे वेळेवर पोहोचवली होतीस!आपल्यात इतकं सगळं होऊन ही तू मात्र आईचे टाईम टेबल लक्षात ठेवून तिला फोन करून तिची विचारपूस आस्थेने करत असतोस अगदी तिला आपल्यातले काही ही कळू न देता! कसं जमत रे तुला सगळ्यांची काळजी घेणं? मी मात्र खूप स्वार्थी आहे सोहम कदाचित माझ्या बापा सारखी!” आवंढा गिळत उदासपणे पण सोहमचे कौतुक करत ती बोलत होती.

 

सोहम,“ हे बघ सावी असं काही नाही आणि मला thanks म्हणण्याची तुला काहीच गरज नाही आईंशी माझे ही काही तरी नाते आहे आणि माझ्या आईची तू नाही का फोन करून चौकशी करत! तुमचं दोघींचं चांगले गुलपीठ चाललेले असते की!” तो  हसून म्हणाला

 

     सावी मात्र बराच वेळ तशीच उदास बसून होती. सोहम सावी हॉलमध्ये आली  नाही हे पाहून कॉफी घेऊन बेडरूममध्ये गेला. तर सावी अजून तशीच बसलेली होती तिचे लक्ष की नव्हते सोहमकडे. तिचा उतरलेला चेहरा पाहून सोहमने तिला  विचारले.

 

सोहम,“ नेमकं काय झालं आहे सावी तुला? इतकी का उदास दिसते आहेस स्वप्न पडल्यामुळे की आणखीन काही कारण आहे?” त्याने  कॉफीचा मग पुढे करत तिला विचारले.

 

     सावी त्याच्या बोलण्याने भानावर आली आणि तिने  कॉफी मग घेतला. ती अजून ही विचारातच होती. ती विचार करत होती की खरंच आई म्हणाली ते खरे आहे का?  मी माझ्या बापा सारखी आहे का?त्याचे माझ्या शरीरात रक्त वाहते म्हणून मी त्याच्या सारखी वागत असेन का?  नाही मला माझ्या बापा सारख व्हायचं नाही! मला माझ्या आई सारख व्हायचं आहे!तिच्या मनात वैचारिक द्वंद्व सुरू होते. सावी शांत  आहे हे पाहून सोहम पुन्हा तिला म्हणाला.

 

सोहम,“ काय विचारतोय मी सावी!लक्ष कुठे आहे तुझं काय झालं तुला कोणी काही बोलले का?” तो विचारत होता.

 

सावी,“ नाही रे मला कोण काय बोलणार!बरं मी तयार होते तू ही तयार हो! बरं मी कोणता ड्रेस घालू आज?”ती मनातील विचार लपवून हसत म्हणाली.

 

सोहम,“ अरे मी एकदा सांगितले तुला हा ड्रेस घाल म्हणून तर तू मागेच लागली की माझ्या! तुला आवडेल तो घाल!” तो हसून तिची खेचत म्हणाला.

 

      सावी ही  त्याच्या बोलण्यावर हसली पण तिच्या डोळ्यातील उदासी सोहमच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याला कळले होते की  आज नक्कीच काही तरी झाले आहे पण सावी ते त्याच्या पासून लपवत आहे हे तो जाणून होता.  आत्ता तिचा मूड चांगला करणे त्याला गरजेचे वाटत होते म्हणून तो शांत होता. पुन्हा वेळ पाहून तिला विचारावे काय झाले ते असा त्याने विचार केला.

 

   सावीची आई असं का म्हणाली असावी की ती तिच्या वडिलांसारखी आहे? सावीला तिच्या वडिलांसारखे का बनायचे नव्हते? असं काय घेडलं होतं सावी आणि तिच्या आईच्या आयुष्यात? 

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule