Oct 29, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २४)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २४)

 

   नेहमी प्रमाणे सोहम ऑफिसला निघून गेला. सावीला मात्र आज अस्वस्थ वाटत होतं. त्यात तिचे पिरेड्स ही तीन महिन्यांपासून मिस झाले होते.म्हणून सावीने मेडिकल मधून प्रेग्नन्सी किट आणले आणि चेक केले तर ती प्रेग्नन्ट असल्याचे दाखवत होते. सावी फारच खुश होती तरी तिने हे कन्फर्म करण्यासाठी डॉ.सिंगचे क्लिनिक गाठले आणि ब्लड टेस्ट करायला दिले. डॉ.सिंगने  ब्लड टेस्ट करण्यासाठी लॅब मध्ये पाठवले. त्याचा रिपोर्ट दोन तासाने आला तर सावी तीन महिन्यांची प्रेग्नन्ट होती.  पण तिचे सगळे रिपोर्ट पाहून डॉ.सिंग थोडे चिंतीत दिसले. त्यांनी रिपोर्ट पाहिले आणि ते गंभीर होत म्हणाले.

 

डॉ.सिंग,“ मिसेस सोहम आप प्रेग्नन्ट हैं ये तो खुशी की बात हैं लेकिन आपका हिमोग्लोबिन और ब्लड के बाकी रिपोर्ट भी कुछ अच्छे नहीं हैं! आपका हीमोग्लोबिन बस छह हैं जो ऐसी हालत में अच्छी बात नहीं! आप ऐसा कीजिए मिस्टर सोहम को ले के आइए मैं उनसे बात करना चाहता हूँ।या मैं फोन कर के बुला लू उन्हें अभी!”ते रिपोर्ट पाहून काळजीने म्हणाले

 

सावी,“ नहीं नहीं डॉक्टर मैं उन्हें खुद ये खुशी की बात बताना चाहती हूँ! आप समझ रहे हैं ना! तो आप प्लीज उन्हें कुछ मत बताए मैं उन्हें बताकर खुद ही आपके पास उन्हें लेकर आ जावूंगी!”सावी थोडी हसूण म्हणाली.

 

डॉ. सिंग,“ ठीक हैं ठीक हैं लेकिन जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी आइए क्योंकि आपकी सोनोग्राफी करके जल्द से जल्द आपकी ट्रीटमेंट सुरु करनी होगी।मैं मिस्टर सोहम से बात करके आपको गायनिक के पास भेज दूँगा!” ते म्हणाले

 

सावी,“ thanks डॉक्टर!” सावी म्हणाली.

 

     ती क्लिनिकच्या बाहेर पडली आणि तिचे विचार चक्र सुरू झाले. मी कालच सोहमशी माझ्या  भूतकाळ बद्दल बोलले आणि आज मला कळत आहे की मी प्रेग्नन्ट आहे. देवाचे किती आणि कसे आभार मानू तेच कळत नाही मला! खरच मी खूप खुश आहे आज! पण सहा महिने पूर्ण व्हायला सहाच दिवस राहिले आहेत आणि मी जर सोहमला मी प्रेग्नन्ट आहे हे सांगितले तर तो घेणार असलेल्या निर्णयावर याचा नक्कीच परिणाम होईल आणि त्याला जर माझ्या बरोबर राहायचं नसेल तरी तो त्याचा निर्णय बदलून माझ्या बरोबर राहायला तयार होईल.आता मला त्याच्यावर कोणते ही नाते लादायचे  नाही. मनात नसताना नाते निभावण्याला काय अर्थ आहे सावी! म्हणून  त्याला मी प्रेग्नन्ट असल्याचे सांगणार नाही. जर त्याने माझ्या बरोबर राहायचा  निर्णय घेतला तर मग मी ही good news देईनच! पण जर त्याने माझ्याशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला तर मी त्याला मी प्रेग्नन्ट असल्याचे न सांगताच त्याच्या आयुष्यातून निघून जाईल! आता सोहमने कोणता ही निर्णय घेतला तरी मला भीती नाही कारण मी आता एकटी नाही माझ्या बरोबर सोहम आणि माझ्या प्रेमाची आठवण असणार आहे.मी कुठे तरी लांब निघून जाईल आणि माझे आयुष्य नव्याने सुरू करेन माझ्या सोहमच्या मुला बरोबर! हा सगळा विचार करत ती रिक्षातून उतरली!  तरी तिला घरी पोहोचायला  पाच वाजले होते.सोहम आता कधी ही येऊ शकतो म्हणून तिने घाईनेच लॉक खोलले  कारण तिला ती कुठे गेली होती हे सांगायचे नव्हते आणि तिचे प्रेग्नन्सी रिपोर्ट ही लपवून ठेवायचे होते.ती गडबडीने दार लावून बेडरूममध्ये गेली आणि तिने प्रेग्नन्सी रिपोर्ट तिच्या बॅगच्या एका कप्प्यात  ठेवले. तो पर्यंत डोर बेल वाजली. सावीने जाऊन दार उघडलं! समोर सोहम हसतच उभा होता. त्या दिवशी नंतर सोहमचे वागणे आणखीनच बदलले होते. तो सकाळी स्वतःच उठून चहा नाष्टा तयार करत होता. सावीला वाटले की आता थोडेच दिवस एकत्र आहोत आणि तिने सांगितलेल्या भूतकाळ त्यामुळे सोहमच्या मनात तिच्या विषयी सहानुभूती निर्माण झाली असावी. पण तिने सोहम काय निर्णय घेईल याचा विचार  करायचे सोडून दिले कारण ती आता निश्चिंत होती. 

        सहा दिवस असेच निघून गेले.ठरल्या प्रमाणे सोहमचे आई-बाबा आणि आदित्य सोहमचा निर्णय ऐकायला आले होते. त्यांना खात्री वाटत होती की जे काही सहा महिन्यात झाले त्या नंतर सोहम सावीशी फारकत घेण्याचा निर्णय बदलेल.सकाळी चहा नाष्टा झाला आणि सोहमच्या बाबांनी मूळ मुद्याला हात घातला.

 

बाबा,“ मग काय निर्णय घेतला तुम्ही दोघांनी? एकत्र राहणार ना!” त्यांनी  दोघांना पाहत विचारले.

 

सावी,“ बाबा आपलं असं ठरलं होतं की हा निर्णय सोहमने घ्यायचा आहे आणि तो मला मंजूर असेल!” ती सोहमला पाहत म्हणाली.

 

आई,“ सांग बाबा सोहम तुझा काय निर्णय आहे ते मला तर वाटते की तू सावी बरोबर फारकत न घेण्याचा निर्णय घेतला असणार कारण सावी सारखी बायको तुला नाही मिळणार बब्बू!” त्या म्हणाल्या.

 

     सोहम मात्र शांतच होता.थोडावेळ असाच गेला आणि मग न राहवून आदित्य म्हणाला.

 

आदित्य,“ बोलशील का सोम्या आता! का उगीच सस्पेन्स क्रिएट करत आहेस?” तो वैतागून म्हणाला.

 

    इतका वेळ शांत बसलेला सोहम आता बोलू लागला.

 

सोहम,“ तुम्हा सगळ्यांना वाईट वाटेल खास करून सावीला पण माझा निर्णय झाला आहे. मला सावी पासून फारकत हवी आहे!” तो शांतपणे म्हणाला.

 

     हे ऐकून तिघांना ही धक्का बसला.सावी मात्र शांत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

 

बाबा,“ तू भानावर आहेस का की नशा करून आलास रे? तुला बोलावंतच कसं हे? या सहा महिन्यात तुझ्यासाठी खूप काही केलं आहे या पोरीने आणि तुला…” ते पुढे बोलणार तर सावीने त्यांना थांबवले.

 

सावी,“ नाही बाबा त्याला नका बोलू काही आपलं काय ठरलं होतं हॉस्पिटलमध्ये की सोहम जो निर्णय घेईल तो आपण मान्य करायचा बरोबर ना मग! त्याला नाही राहायचं माझ्या बरोबर हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे!” ती शांतपणे म्हणाली.

 

आदित्य,“ सावी खड्ड्यात गेला हा आणि खड्ड्यात गेला याचा निर्णय! तू आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि चल माझ्या बरोबर हा समजतो कोण स्वतःला ग? नालायक कुठला?” तो तावातावाने बोलत होता. सोहम मात्र  खुर्चीवर  मान खाली घालून शांत बसून होता.

 

  सावी,“ शांत हो आदित्य प्लिज!” ती म्हणाली.

 

बाबा,“ नीता बॅगा घे आपण आत्ताच्या आत्ता सावीला घेऊन निघत आहोत! याला काय करायचं ते करू दे!” ते रागाने म्हणाले.

 

         इतका वेळ शांतपणे ऐकून घेणारा सोहम आता उठला आणि जसं काही झालंच नाही असा बॅग घेऊन ऑफिसला निघून गेला. हे पाहून सावी सह सगळेच चकित होते. सोहमचे बाबा सावीला म्हणाले.

 

बाबा,“ चल बेटा सावी! आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही! जा तुझी बॅग भर!” ते म्हणाले.

 

आदित्य,“ हो सावी आवर तुझं आपण निघू!” तो सावीला पाहून म्हणाला.

 

     सावीला मात्र ना सोहमच्या आई-बाबां बरोबर पुण्याला जायचे होते ना आदित्य बरोबर मुंबईला! पण ती त्या तिघांना ही तसं स्पष्ट सांगू शकत नव्हती म्हणून ती त्यांना म्हणाली.

 

सावी,“ तुम्ही पुढे जा फ्लाईटने मी माझं इथलं सगळं आवरून नंतरच्या फ्लाईटने येईन!”

 

नीताताई,“ पण सावी…” त्या काळजीने बोलत होत्या.

 

सावी,“ आई ऐका ना माझं माझा विचार आहे की मी काही दिवस मन:शांतीसाठी आईकडे जाईन!” ती खोटंच म्हणाली कारण सावीच्या आईने तर तिला स्पष्ट  सांगितले होते की जर सोहमने तिच्याशी फारकत घेतली तर त्यांचा आणि तिचा ही संबंध संपला.

 

आदित्य,“ सावी are you out of your mind!तू हिमालयातील आश्रमात जाणार वय आहे का ग तुझं ते…” तो बोलत होता तो पर्यंत त्याला कोणाचा तरी फोन आला आणि तो बाहेर निघून गेला.

 

      सावीला मात्र आता यांना कसे पाठवून द्यावे तेच कळत नव्हते. पण अचानक आदित्य फोनवर बोलून आला आणि सावीला म्हणाला.

 

आदित्य,“ ठीक आहे सावी आम्ही तिघे निघतो. तू तुझं काय ते ठरव आणि आम्हाला फोन कर!” तो असं म्हणून सोहमच्या आई-बाबांना जबरदस्तीने घेऊन गेला आणि सावीने निःश्वास सोडला.

 

              आता सावी एकटीच घरात होती.हे  घर ज्या घरात तिने सोहम बरोबर खूप सारे आंबट गोड क्षण जगले होते. ती पाणावलेल्या डोळ्याने  हात लावून घराच्या  प्रत्येक कोपऱ्याला स्पर्श करत होती. ती पहिल्यांदा किचनमध्ये गेली. तिथली एक-एक वस्तू तिच्या परिचयाची तिच्या रोजच्या जगण्यातला भाग झालेली.तिने आणि सोहमने बऱ्याच वेळा मिळून केलेला चहा!  ती समोर पाहून काही तरी काम करत असताना त्याने मागून येऊन अलगद मारलेली मिठी ज्याचा सुगंध अजून ही तिच्या श्वासात दरवळत होता.डायनिंग टेबलवर बसून मारलेल्या मनसोक्त गप्पा ,भांडणे आणि देव्हाऱ्यात सांजवात करत असताना त्याने हळूच कानात येऊन बोललेले शब्द अजून ही तिच्या कानात घुमत होते.डोळ्यातून गरम अश्रू धारा वाहत होत्या.तिथून ती हॉलमध्ये आली. बऱ्याच दुपारी तिने त्या सोफ्यावर लोळून काढल्या होत्या. अनेक मोहक क्षण तिने सोहम बरोबर तिथेच अनुभवले होते.त्या आठवणींचा सुगंध तिथे अजून ही दरवळत होता.तिने त्या सोफ्याला हळुवार स्पर्श केला. त्या नंतर ती बेडरूममध्ये गेली. बराच वेळ ती बेडवर हात फिरवत बसून राहिली. तिथे ती कैक रात्री सोहम बरोबर त्याच्या प्रेमाच्या वर्षावात भिजली होती.त्याच्या बाहू पाशात विसावली होती आणि त्याच रात्रींची भेट ती आज तिच्या बरोबर घेऊन चालली होती.तिने सोहमचे वोर्डरोब उघडले आणि ते उघडताच त्याच्या कपड्यांचा एक टिपिकल सुगंध तिला शहारून गेला. ती त्याच्या प्रत्येक वस्तूवरून प्रेमाने हात फिरवत होती.त्याचे कपडे, घड्याळे, रुमाल, परफ्युम या वरून हळूवार हात फिरवत तिने डोळे पुसले. तिने सोहमचा एक शर्ट आणि एक परफ्युची बॉटल तिच्या बॅगेत भरून घेतली. तिने स्वतःला सावरले डोळे पुसले आणि तिच्या कपड्यांची बॅग भरली आणि निघाली पण तिचे पाय मात्र त्या घरातून निघत नव्हते.स्त्रिया असतातच वेड्या त्या माणसां  बरोबर निर्जीव वस्तूं बरोबर ही नाते जोडून बसतात आणि मग ते नाते तुटता तुटत नाही. ती जड पावलांनी घरा बाहेर पडली.तिने मागवलेली टॅक्सी दारात येऊन उभी होती. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी एकदा घराकडे पाहिले आणि ती टॅक्सीत बसली.

         ती एअर पोर्टवर पोहोचली.तिथे वेटिंग एरिआ मध्ये बसून राहिली. आता कुठे जावे हा विचार ती करत होती कारण तिने कुठे जायचे हा विचारच केला नव्हता. अचानक तिच्या लक्षात आले की संजाली तिची बेस्ट फ़्रेंड दिल्लीत आहे तिच्याकडे जावे आणि पुढचे काय ते ठरवावे या विचारत ती मग्न होती.तिचे आजूबाजूला कुठेच लक्ष नव्हते आणि अचानक  अगदी जवळ कोणी तरी समोर उभे आहे याची तिला जाणीव झाली आणि तिने मान वर करून पाहिले तर सोहम तिच्या समोर उभा होता.रागाने धुमसत असलेला डोळे,चेहरा लाल झालेला तिच्याकडे खाऊ की गिळू या अविर्भावाने पाहत असलेला.एक क्षण त्याला पाहून ती दचकली आणि  हा आपला भास आहे असे म्हणून पुन्हा मान खाली घालून विचार करू लागली पण सोहमच्या बोलण्याने पुन्हा भानावर आली. तो बोलत होता.

 

सोहम,“ घरी चल सावी! मला इथे तमाशा करायचा नाही! उठ लवकर!” त्याच्या आवाजात एक जरब आणि हक्क होता.

 

      ते ऐकून सावी यांत्रिकपणे उठली आणि बॅग ओढू लागली तर तिच्या हातातून बॅग हिसकावून घेऊन सोहमने तिचा हात धरून तिला नेऊन कारमध्ये बसवले.तो तिला काहीच बोलत नव्हता.सावी मात्र त्याला आश्चर्याने पाहत होती. तिला कळतच नव्हतं की नेमकं काय घडतंय.हे स्वप्न आहे की सत्य हे ही तिला कळत नव्हतं.सोहमने गाडी घरा समोर थांबवली आणि त्याने सावीचा हात धरून दारा जवळ नेले. बॅग गाडीतच होती. त्याने डाव्या हाताने सावीचा हात घट्ट धरला होता. उजव्या हाताने तिचा हात धरूनच त्याने लॉक काढले.जणू सावी कुठे तरी पळून जाईल अशी त्याला भीती वाटत होती. त्याने सावीला घरात नेले आणि दार लावून घेतले.सावी मात्र एकटक  त्याच्याकडे नुसती पाहत होती. सोहमने ब्लेजर रागाने भिरकावले आणि गळ्याचा  टाय ढील्ला केला आणि तो रागाने बोलू लागला.

 

सोहम,“ कुठे निघाली होतीस तू?” तो ओरडून  म्हणाला

    सावी त्याच्या आवाजाने दचकली आणि भानावर आली.

 

सावी,“ मी….(आठवल्या सारखे करून) मी दिल्लीला जाणार होते.” ती अगदी सहज म्हणाली.

 

सोहम,“ अच्छा दिल्लीत कोण आहे तुझं ग? आणि मला सोडून निघालीस एकट्याला!” तो रागाने म्हणाला.

 

सावी,“ तूच तर जा म्हणालास ना!” ती आश्चर्याने त्याला पाहत म्हणाली.

 

सोहम,“मी जा म्हणालो की निघाली लगेच तोंड वर करून!” तो रागाने धुमसत बोलत होता.

 

सावी,“ मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा होती? आणि इतका राग तुला कशाचा आला आहे!” तिने त्याच्याकडे पाहत विचारले.

 

सोहम,“ वर मलाच विचारतेस काय करायला हवं होतं म्हणून अग माझी कॉलर धरून मला जाब विचारायला हवा होतास! मी का जाऊ म्हणून?मी जाणार नाही इथेच राहणार आणि तुझ्या डोक्यावर बसणार असं ठणकावून सांगायला हवं होतस पण तुला माझी गरज नाही उरली सावी! माझ्या कडून तुला जे हवं होतं ते तू मिळवलस आता काय सोहम जगला काय आणि मेला काय तुला काहीच फरक पडत नाही!” तो रागाने पुढे बोलणार तर सावी त्याला रागाने म्हणाली.

 

सावी,“ काही तरी अभद्र बोलू नकोस सोहम!” ती त्याला धक्का देत म्हणाली.

 

सोहम,“ शुsss माझं अजून बोलणं पूर्ण झालं नाही त्यामुळे शांत राहायचं समजलं! (तिच्या जवळ जात तिच्या ओठांवर हात ठेवत तो म्हणाला आणि पुढे बोलू लागला) तू प्रेग्नन्ट आहेस हे सांगितलंस का मला? तर वाटतंय की तू माझ्या बरोबर याचसाठी राहायला तयार झालीस बरोबर ना!” तो रागाने म्हणाला.

 

सावी,“ हे तुला कोणी सांगितले? डॉ. सिंगने? अच्छा म्हणजे म्हणून तू मला परत देऊन आलास का?” तिने चमकून रागानेच विचारले.

 

सोहम,“ झाला तुझा तर्क काढून! मला डॉ.सिंगने नाही सांगितलं आणि तुला त्यासाठी  घेऊन यायला  हे मला आत्ता नाही कळलं ग मूर्ख! ज्या दिवशी तुझे रिपोर्ट आले ना प्रेग्नन्सीचे त्याच दिवशी मला त्या लॅब मधून मेल आला होता कारण एक्सिडंट नंतरच्या  सगळ्या टेस्ट तिथेच झाल्या आहेत माझ्या आणि ते तुला ही ओळखतात तुझे नाव वाचून त्यांनी मला मेल केला!  मला तुझ्या तोंडून ऐकायचं होत पण तू तर मी जा म्हणलो की निघालीस की! तुला एकदा ही मला सांगावस नाही वाटलं का? का माहीत आहे? कारण तुला माझ्या असण्याचा आणि नसण्याचा काहीच फरक पडत नाही सावी! पण मला फरक पडतो because I love you! हे जे तुझ्या पोटात माझं बाळ आहे ना ते काय मी तू म्हणतेस तसा तुझ्यावर समाज मान्य बलात्कार करून नाही झालं तर माझ्या प्रेमाचं प्रतिक आहे ते! तुला माझ्या स्पर्शात माझ्या डोळ्यात एकदा ही प्रेम नाही जाणवले  का ग? प्रत्येक गोष्ट बोलून दाखवल्यावरच कळणार का तुला? काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात सावी! पण तुला काय या सगळ्याचे तुला तर माझ्याकडून जे हवे ते मिळाले माझी गरज संपली बरोबर ना! त्या परमेश्वराने तुम्हा स्त्रियांना मूल स्वतःच्या उदरात वाढवण्याचा हक्क देऊन आम्हा पुरुषांवर अन्यान केला आहे! कारण तुम्ही कधी ही पुरुषांचा फायदा घेऊन ते प्राप्त करू शकता पण आमचं काय ग आम्हाला भावना नसतात का? तू काय जगाच्या कोणत्या ही कोपऱ्यात जाऊन जगू शकशील  कारण तू एकटी नाहीस पण माझ काय सांग ना?मी तुला जा म्हणालो कारण मी तुला माझ्यावर हक्क देण्यापेक्षा; तू मला भांडून तो मिळवावास अशी अपेक्षा होती माझी! तू म्हणावस की मी आता जाणार नाही कारण आता मी एकटी नाही आता मी आणि माझ बाळ मिळून तुझ्या उरावर नाचणार! पण चूक माझी होती सावी मी चुकीची अपेक्षा केली तुझ्याकडून माझं चुकलं! तुला जायचं आहे ना जा आता माझं बोलणं झालं आहे! माझं माझं मी पाहून घेईन जगायच की मरायच ते! You can go now!” तो रागाने आता थरथर कापत होता. हे सगळं ऐकून सावी मात्र स्तब्ध होती. 

          तिने सोहमला रागाने थरथरताना पाहून त्याला मिठी मारली आणि रडत बोलू लागली.

 

सावी,“I am sorry! मला फरक पडतो तुझ्या असण्याने आणि नासण्याने सोहम! Because I love you!” असं म्हणून ती बराच वेळ त्याला मिठी मारून रडत राहिली.

 

        भावनांचा आवेग ओसरला आणि ती भानावर आली तशी सोहमला तिने ढकलले आणि बोलू लागली.

 

सावी,“you stupid! म्हणजे तू  हे सगळं नाटक केलंस तर! तू इतके दिवस झालं माझी परीक्षा घेत होतास तर! नालायक माणसा तुला तोंड नव्हतं हे सगळं बोलायला आणि मी मात्र झुरत राहिले मनातल्या मनात!” असं म्हणून ती सोहमला तिच्या हातात जे पडेल ते फेकून मारू लागली.सोहम तिने फेकून मारलेल्या वस्तू चुकवत होता!

 

      शेवटी सावी थकून सोफ्यावर बसली. ते पाहून सोहम तिच्या जवळ येऊन बसला.सावी सोहमला बिलगली. हे सगळे नाट्य होऊ पर्यंत पाच वाजून गेले होती आणि सावी दुपारी जेवली नसल्याने तिला आता चांगलीच भुकेची जाणीव होत होती.तशी ती सोहमला म्हणाला.

 

सावी,“ मला भूक लागली आहे!” ती म्हणाली.

 

सोहम,“ तुला भूक पण लागते का?( अस म्हणून तो हसला)बाई स्वयंपाक करून गेली आहे. मी फोन केला होता तिला आणि की ही पाठवून  दिली होती प्युनकडे आणि तुझ्यावर नजर ठेवायला सांगितली होती मी!”तो म्हणाला आणि उठून तिला ताट वाढून आणून दिले.

 

सावी,“  खूपच हुशार झालास की तू!  अरे पण आई-बाबा आणि आदित्य नाराज होऊन निघून गेले की!” ती त्याला घास भरवत आणि स्वतः खात म्हणाली.

 

सोहम,“ नाही गेले ते कुठे आहेत लॉजवर! मी बाहेर जाऊन आदित्यला फोन केला होता नाही तर ते तुला एकटीला सोडून गेले असते का वेडे!” तो तिला पाहून हसत म्हणाला.

 

सावी,“ अच्छा! म्हणजे आदित्यला कोणाचा तरी फोन आला आणि तो आई-बाबांना घेऊन गेला!मग बोलवून घे की त्यांना!” ती म्हणाली.

 

सोहम,“ येतील ते उद्या! तू जेवण कर आणि  सावी तुझे रिपोर्ट पाहिलेस का तू? डॉ.सिंगचा मला फोन आला होता त्यांनी तुला मला घेऊन बोलावले होते ना? तू सांगितले तरी का मला?शेवटी त्यांनी तुझी वाट पाहून मला फोन केला. तुझे ब्लड रिपोर्ट चांगले नाहीत सावी ते चिंतीत वाटत होते.उद्या आपण जात आहोत डॉ.सिंगकडे! हिमोग्लोबिन तर किती कमी झालाय तुझ!” तो काळजीने बोलत होता.

 

सावी,“ हुंम जावू यात उद्या आपण मी तर विसरूनच गेले होते!” ती म्हणाली.

 

सोहम,“ही विसरण्यासारखी गोष्ट आहे का सावी? तुला ना फटकवायला पाहिजे चांगलं आणि इतकं कसं हिमोग्लोबिन कमी झालं तुझं मी ऑफिसला गेल्यावर तू जेवत होतीस की नाही ग! मी पण मूर्ख इतका बिझी झालो या चार महिन्यात की लक्षच नाही दिलं तुझ्याकडे आणि वरून तू समजून घेशील म्हणून तुला काहीच बोललो नाही मी! चुकलंच माझं सावी! खरं तर ज्या दिवशी तू आजारी पडलीस आणि आदित्यने माझी कान उघडली केली तेव्हाच मी तुला कुठे तरी माफ केल होत! पण नाही सांगितलं तुला I am sorry for that!” तो  तिला पाणी  देत काळजीने बोलला आणि ताट ठेवून आला.

 

      सावीने त्याला जवळ ओढले त्याला मिठी मारत त्याच्या कानात म्हणाली. 

 

सावी,“ sorry आणि हेच सगळं बोलनार आहेस का आता? की मला जे ऐकायचे ते पण बोलणार आहेस!” ती हळूच कानात कुजबुजली.

 

      सोहमने तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.

 

सोहम,“I love you savi! I can't live without  you! You are my life!” असं म्हणून त्याने अलगद तिच्या ओठांवर ओठ ठेवले.

        

      बराच वेळ सावी सोहमच्या मिठीत विसावली होती. दोघे ही काहीच न बोलता एकमेकांशी खूप काही बोलत होते.

       

 

      सावी आणि सोहम मधील समज- गैरसमजाचे ढग आता दूर झाले होते. पाऊस पडून गेल्यावर जसे आकाश निरभ्र होते  आणि  आकाशात सप्तरंगी  इंद्र धनुष्य फुलते तसे दोघांचे ही नाते आता फुलले होते. खरं तर दोघांचे ही एकमेकांवर नितांत प्रेम होते पण दोघांमध्ये गैरसमजातून दुरावा निर्माण झाला होता. तो आता दूर होऊन त्यांच्या प्रेमाला नवीन पालवी फुटू पाहत होती. पण सगळे आलबेल होत आहे असे दिसत असताना नियती  तिचे फासे अजून टाकणार होती. ज्यात अजून  सोहमच्या प्रेमाची परीक्षा बाकी होती.

 

       नियतीने अजून कोणता डाव सावी आणि सोहमच्या पुढ्यात मांडून ठेवला होता?  

 

   

 

     या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

 

©Swamini (asmita) chougule

 

★★★

 

  खरं तर मला कधीच  वाचकांशी संवाद  साधायची गरज वाटली नाही किंवा आज पर्यंत कोणत्याच कथेच्या खाली  मला असे काही लिहावेसे वाटले नाही कारण मला असं वाटतं की माझ्या कथेमध्ये इतकं जडत्व असले पाहिजे की मी माझ्या कथेतूनच तो संवाद वाचकांशी साधला पाहिजे. 

     पण या  कथेचा हा भाग लिहीत असताना मला आलेला एक छोटासा अनुभव मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. या कथेतील हा भाग लिहीत असताना जेंव्हा सावी घर सोडून निघत असते तेव्हा तिच्या मनातील भाव मी व्यक्त करत असताना मलाच अचानक भरून आले आणि डोळे झरू लागले.खरं तर  भावनिक लिहण्याची ही माझी पहिली वेळ नाही पण हा अनुभव मात्र माझ्यासाठी नवीन आणि विलक्षण होता.  हमसफर्स  ही कथा माझ्या हृदया जवळची आहे. मी आज पर्यंत खूप कथा लिहील्या पण हमसफर्स  ही कथा माझ्यासाठी  तरी खास आहे. तुम्ही वाचकांनी  माझ्या अनेक कथा  अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यासाठी तुमचे आभार आणि असाच लोभ असावा हीच विनंती! हमसफर्सवर ही तुम्ही भरभरून प्रेम करत आहात आणि ते मला रोज तुमच्या कॅमेन्टच्या रूपातून  अनुभवायला मिळत असते.माझ्या लेखणीवरचे तुमचे  प्रेम असेच ह्रधिंगत होत राहो हीच आशा!