A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907def347092beebf4c750bebc1bb974357c51f41fb8b0): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hamsafars
Oct 27, 2020
स्पर्धा

हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २)

Read Later
हमसफर्स आगळ्या प्रेमाची वेगळी गोष्ट(भाग २)

 

     दुसऱ्या दिवशी सावी ऑफिसला जायच्या तीन तास आधी तयार झाली होती कारण तिला पुन्हा आदित्यच्या घरी जायचे होते तो तिचा गेल्या सहा महिन्यांपासूनचा दिनक्रम बनला होता. आज ही ती ऑफिसला जायच्या आधी आदित्यच्या घरी जाणार होती.गेल्या सहा महिन्यांपासून ती न चुकता रोज सकाळ-संध्याकाळ त्याच्या घरी जात होती पण अजून तरी तिला सोहमबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती पण तिने हार मानली नव्हती.  तिला खात्रीच होती की सोहम कुठे आहे ते नक्कीच आदित्यला माहीत असणार आणि आदित्यकडूनच तिला सोहम कुठे आहे ते कळणार या एकाच आशेवर ती रोज त्याच्या दारात जात होती. आदित्यने तिला किती ही अपमानित केले तरी!

        तशी ती दोन-तीन वेळा पुण्याला सोहमच्या आई- बाबांकडे ही सोहमची चौकशी करून आली होती पण त्यांना ही सोहमबद्दल काहीच माहीत नव्हते आणि सावीला खात्री होती की सोहमचे आई-बाबा तिच्याशी खोटं बोलणार नाहीत.आज ही ती अदित्यच्या घरी गेली आणि नेहमी प्रमाणे अदित्यने साविला झिडकारले होते.

        सावी डोळ्यातले पाणी पुसत गाडीत बसून ऑफिसला गेली पण संध्याकाळी परत अदित्यच्या घरी जाण्याचा मनोमन निश्चय करून! पुन्हा ऑफिस सुटल्यावर ती आदित्यच्या घरी आली अर्थातच आदित्य अजून ऑफिस मधून आला नव्हता. ती पायरीवर बसली होती तेव्हढ्यात तिचे लक्ष दाराच्या बाहेर पडलेल्या कसल्याशा लिफाफ्या कडे गेले. तिने तो लिफाफा सहज उचलून पाहिला आणि तिच्या डोळयात एक वेगळीच चमक दिसली. लिफाफ्यावर पाठवणाऱ्याचे नाव होते मिस्टर सोहम सरपोतदार! आणि खाली पत्ता होता त्याचा  चंदीगडच्या कुठल्याशा कॉन्व्हेंट स्कुलचा होता. सावीची सहा महिन्यांची तपस्या फळाला आली होती.ते पाहून तिचे डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने डोळे पुसले आणि लगेच तिचा मोबाईल काढून त्या लिफाफ्यावरील पत्त्याचा फोटो काढून घेतला आणि एका कागदावर तो पत्ता लिहून ही घेतला. आदित्य यायच्या आधीच तिने तो लिफाफा दाराच्या फटीतून आत सरकवला कारण तिला आता कोणतेही रिस्क घ्यायची नव्हती. 

       ती आज समाधानाने घरी गेली. आज ती किती तरी दिवसांनी थोडी आनंदित वाटत होती. ती घरी पोहचल्या पोहचल्या तिच्या ट्रॅव्हल अजेंटला फोन करून  चंदिगढला उद्या पहाटेच्या फ्लाईटचे तिकीट काढण्यासाठी सांगितले. अजेंटने तिला अर्ध्या तासातच पहाटे चार वाजताची फ्लाईटचे तिकीट बुक केल्याचे सांगितले.सावीने तिच्या ड्रायव्हरला पहाटे चार वाजता येण्याची सूचना केली. तिने आज किती तरी दिवसांनी पोटभर जेवण केले असेल. ती बेडरूममध्ये सोहमचे तेच ब्लँकेट घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला आज काही केल्या झोप येत नव्हती. उद्या ती सोहमला तब्बल सहा महिन्यांनी पाहणार होती.तिला याचीच एक प्रकारची हुरहुर लागली होती. ती या कुशीवरुन त्या कुशीवर वळत होती.

           तिला सोहम बद्दल एक प्रकारची अनावर ओढ लागली होती. त्याच्याबद्दलच्या विचाराने ती त्यांच्या भूतकाळात रमली. सोहमचे नाव तिने वाचले होते म्हणजे सोहमचा तिच्या जीवनात  प्रवेश झाला होता. तो पुण्यात ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना!


       सावी तशी हुशार आणि टॉपर होती. दहावीत ती शाळेत पहिली आली होती आणि फर्ग्युसन कॉलेजच्या ज्युनिअर विभागात आज अकरावी शास्त्र शाखेची मेरिट लिस्ट लागणार होती. तिला खात्री होती की तीच नाव मेरिट लिस्टमध्ये टॉपला असणार आहे. ती तयार होऊन मैत्रिणी बरोबर कॉलेजमध्ये पोहोचली. मेरिट लिस्ट पाहण्यासाठी ती नोटीस बोर्डकडे गेली  पाहते तर काय? लिस्टला टॉपवर नाव होतं सोहम सुभाष सरपोतदार मार्क होते. 98.70%आणि दुसऱ्या नंबरवर नाव होते सावनी नितीन पाटील मार्क 98.69%! सावनीच्या सोहम तेंव्हाच डोक्यात गेला होता.तिने कधीच विचार केला नव्हता की ती सोहमच्या प्रेमात पडेल आणि त्याच्याशी लग्न करेल पण आयुष्य ही अनपेक्षित गोष्टींनी आणि धक्क्यांनी भरलेले असते म्हणूनच तर ते आयुष्य असते आणि ते जगण्याला मजा असते.

      

      सावनीने मनोमन ठरवले होते की या सोहम नावाच्या मुलापेक्षा आपण बारावीला एक तरी टक्का जास्त मिळवायचा.ऍडमिशन झाले आणि कॉलेज रेग्युलर सुरू झाले. कॉलेजच्या पहिल्या दिवशीच सोहमला लेक्चरला उशीर झाला.सर येऊन ओळख करून घेत होते सगळ्यांची आणि सोहमने सरांना वर्गाच्या बाहेर उभं राहून विचारले 


सोहम,“ may I come in  sir?”त्याने अदबीने विचारले


सर,“ why not? Please come!हो पण तूच आज समोर उभं राहून तुझी ओळख करून द्यायची!” ते हसून म्हणाले.


सोहम, “हो सर नक्कीच मी सोहम सुभाष सरपोतदार!” तो म्हणाला. 

      आणि त्याचे नाव ऐकून सगळ्या वर्गात कुजबुज सुरू झाली की हाच टॉपर! त्याचे नाव ऐकून सावनी डोकेवर करून त्याला नीट न्याहाळत होती. सोहम सरपोतदार एक देखणं व्यक्तिमत्त्व आत्ताच म्हणजे सतरा वर्षातच साडेपाच फूटच्यावर उंची, सावळा पण चमकदार रंग, डोळे पाणीदार जणू सुरमाच घातला आहे.उभट चेहरे पट्टी,केसांचा स्टायलिश कट, अंगावर डेनेमची जीन आणि फेंट लेमन कलरचा शर्ट! त्याला पाहून सावनीच्या मैत्रिणी सहित सगळ्या मुली फिदा होत्या. पण सावनी मात्र शॉक होती तिला वाटले होते की टॉपर म्हणजे भिंगाचा चष्मा घातलेला एखादा बावळट दिसणारा मुलगा असेल पण हा तर स्टायलिश निघाला! ती मनात विचार करत त्याला जागेवर जाऊन बसे पर्यंत पाहत होती. 


      त्या दिवसापासून सावनी त्याला टशन  देऊ लागली. सोहमला मात्र त्याचा काहीच फरक पडत नव्हता आणि सावी त्यामुळे अजूनच चिडत होती.तिला वाटायचं की याला टॉपर असण्याचा माज आहे म्हणून हा असं वागतो. पण सोहम त्याच्याच दुनियेत मस्त राहणारा होता. तो स्वभावाने मनमिळवू खूप सारे मित्र-मैत्रिणी असणारा मुलगा! तो अभ्यासात हुशार होताच पण बाकी ऍक्टिव्हिटी मध्ये ही कुशल होता.वक्तृत्व आणि सूत्रसंचालन छान करत असे.स्पोर्ट मध्ये ही ऍक्टिव्ह असायचा फूटबॉल त्याचा आवडता खेळ! त्याच्या स्वभावामुळे मित्रांच्या गळ्यातील ताईत होता.प्राध्यापकांचा आवडता विद्यार्थी आणि मुलींचा क्रश!

          पण तो कायम त्याच्या बालमित्रा बरोबर दिसायचा अदित्य देशमुख बडे बाप की औलाद दिसायला तसा स्मार्ट  सोहम इतका हुशार नसला तरी चांगले गुण मिळवणारा! दोघांची मैत्री सर्वश्रुत होती. 

       सावीला मात्र सोहम कायम खटकायचा एखाद्या माणसात सगळेच चांगले गुण कसे असतील? त्याच्यात एक तरी वाईट गुण असेलच ना! असा विचार तिला पडायचा

       सावनी मात्र एकांतात रमणारी, मोजकेच मित्र-मैत्रिणी असणारी आणि कमालीची शिष्ठ मुलगी!  सोहम आणि सावनी जणू दोन ध्रुव! एक साऊथ पोल तर दुसरा नॉर्थ कोणी स्वप्नात ही विचार केला नव्हता की दोघे प्रेमात पडतील आणि लग्न करतील! त्या दोघांनी ही हा विचार काही वर्षा पूर्वी केला नसेल पण म्हणतात ना opposite attract! तसंच काहीसं दोघांचे झाले होते.        सावी भूतकाळात रमली आणि विचार करता करता तिला केंव्हा झोप लागली ते तिला ही कळले नाही तिला जाग आली ती कर्ण करकर्कश्श अलार्म वाजल्यावर घड्याळात तीन वाजले होते.सावी तयार झाली तो पर्यंत तिचा ड्रायव्हर ही गाडी घेऊन तयार होता. ती एअर पोर्टवर पोहोचली.सर्व फॉर्मेलिटी पूर्ण करून विमानात बसली.खरं तर तिला एक प्रकारची  हुरहूर आणि भीती ही वाटत होती कारण तिला पाहून सोहम कसा रियाक्ट करेल हे तिला ही माहीत नव्हते.अडीच तासाच्या प्रवासात तिला झोप लागली कारण तिची झोप आज पूर्ण झालेली नव्हती. फ्लाईट लँड झाली आणि ती चंदीगड एअर पोर्टवर उतरली. तिने तिथून एक कॅब बुक केली आणि सरळ सेंट जोसेफ एज्युकेशन ट्रस्ट गाठली. ती तिथे पोहचू पर्यंत सकाळचे दहा वाजत आले होते.दिवस हिवाळ्याचे असल्याने कोवळे ऊन सुखावत होत. ती ट्रस्टच्या ऑफिसमध्ये गेली आणि सोहम विषयी चौकशी केली.तिथल्या क्लर्कनी एका प्युनला बोलवले आणि तो म्हणाला.

क्लर्क,“ मॅडम को s.s सर के पास लेके जावो! सर मैदानपर होंगे!” तो म्हणाला


      तो प्युन तिला निमूटपणे  मौदानाचा रस्ता दाखवत घेऊन निघाला.सावीने त्याला सोहमची चौकशी करण्याच्या हेतूने विचारले.


सावी,“ वैसे तुम्हारे s.s सर इस स्कूल में करते क्या हैं?”


प्यून,“ मैडम ये सिर्फ एक स्कूल नहीं इस ट्रस्ट के पंजाब और हरियाणा में और भी कई स्कूल हैं।जिसकी व्यवस्था यहाँ से होती हैं। s. s सर सारे स्कूलों को वो कम्प्यूटर होता हैं ना उससे जोड़ने का काम करते हैं।मुझे तो इतना ही पता हैं।”तो म्हणाला.

             प्युन बरोबर सावी मैदानात पोहोचली.प्युनने तिला तिथेच थांबायला सांगितले आणि तो मैदानात मुलांबरोबर फुटबॉल खेळत असलेल्या सोहमकडे निघाला..सोहम मुलांमध्ये लहान होऊन फुटबॉल खेळत होता.आधीच सोहमला लहान मुलांची भारी हौस होती. सावी त्याला तब्बल सहा महिन्यांनी पाहत होती आणि तिचे अश्रू तिला दगा देत होते.डोळ्यात  साचणाऱ्या अश्रूमुळे सोहम तिला धूसर दिसत होता पण ती नेटाने ते अश्रू पुसून बेभान होऊन खेळत असलेल्या सोहमकडे पाहत होती.प्युन सोहम जवळ पोहोचला तो खेळायचा थांबला आणि प्युनने सावीकडे बोट करून त्याला काही तरी सांगितले.त्याने साविला पाहिले आणि मुलांना काही तरी सांगून तो सावीकडे येऊ लागला.तोच रंग तेच रूप तेच वेड लावणारे व्यक्तिमत्त्व फरक फक्त एकच झाला होता तो म्हणजे त्याचे वजन कमी झाले होते आणि ते लगेच जाणवत होते.इकडे त्याला येताना पाहून सावीचे हृदय जोरात धडधडत होते.हा अनुभव तिने सोहमला  प्रपोज केलं तेंव्हा घेतला होता. हो तिनेच तर सोहमला प्रपोज केले होते. सोहम जवळ आला आणि साविला म्हणाला.


सोहम,“ सावी आपण तिथे बेंचवर बसून बोलू!” तो रुमालाने आलेला घाम टिपत व बेंचकडे जात म्हणाला.

          सावी फक्त त्याला निहाळत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होती पण त्याच्या चेहऱ्यावर तिला कोणतेच भाव दिसत नव्हते.यंत्रवत ती त्याच्या मागे बेंचवर जाऊन बसली. सावीला वाटत होते की त्याला घट्ट मिठी मारावी आणि मनसोक्त रडावे पण ती तसं करू शकत नव्हती. सोहमने तिला न पाहताच विचारले.


सोहम,“ तुला इथला पत्ता कोणी दिला?” 


सावी,“खरच ते  महत्वाचे आहे?” त्याला पाहत ती म्हणाली.


सोहम,“ काय काम होत तुझं? एखाद्या पेपर वर सही राहिली आहे का?त्यासाठी तुला इथं पर्यंत येण्याची काहीच गरज नव्हती. माझ्या वकिलांकडे गेली असतीस तर मला निरोप पोहचला असता आणि मी लगेच पूर्तता करून पेपर पाठवले असते” तो रुक्षपणे बोलत होता.


सावी,“ तुला काय वाटते सोहम मी यासाठी तुला सहा महिन्यांपासून शोधून इथे येईन?मला तुझ्याशी बोलायचे आहे! तुझी माफी मागायची आहे!”ती डोळे पुसत पोट तिडकीने बोलत होती.


सोहम,“ बोलायचे होते माझ्याशी कशा बद्दल? आणि माफी कशाची you did nothing for say sorry!”तो रुक्षपणे म्हणाला.


सावी,“ आपल्याबद्दल and you really think so that; I did nothing for say sorry!” ती काहीसं उपरोधक हसून म्हणाली.


सोहम,“हे बघ सावी आपल्या बद्दल बोलण्यातच काय पण आपल्या मध्ये बोलण्यात सारखे ही काही राहिलेले नाही आणि तेच तेच उगाळण्यात मला स्वारस्य ही नाही.तुला सॉरी म्हणावं  वाटलं माझं भाग्य! मी तुला माफ केले असं समज!” तो असं म्हणून उठला व चालू लागला.


      सावी त्याच्या मागे पळत बोलू लागली.


सावी,“ माफ केलं असं समज म्हणजे” ती रडत म्हणाली.


सोहम,“ तुला मी माफ केले.” तो पुन्हा रुक्षपणे म्हणाला.


सोहम आता ट्रस्टच्या आवारातून मेन गेट मधून बाहेर पडला.समोर वाहता रोड होता आणि त्याची बाईक रोडच्या पलीकडे असणाऱ्या पार्किंग झोन मध्ये होती.म्हणून तो रोड क्रॉस करू लागला पण सावी आता त्याच्या पुढे येऊन उलट चालत त्याला बोलत होती.


सावी,“ एकदा माझं ऐकून तर घे ना सोहम!” तुझे कुठेच लक्ष नव्हतं ती फक्त वेड्यासारखी सोहमच्या पुढे त्याच्याकडे तोंड करून उलटे चालत होती.


सोहम,“वेड लागलं आहे का तुला! अग रोड कसा क्रॉस करत आहेस आणि हे बघ सावी आल्या पावली माघारी जा! तुझा वेळ वाया घालवू नकोस उगीच!” तो रागाने बोलत होता 


   पण सावी तशीच चालत होती.  आता दोन पावले टाकली की रोड संपणार होता पण सावीचे कुठेच लक्ष नव्हते आणि सोहम ही तिला बोलत असल्याने त्याचे ही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे लक्ष नव्हते. पण अचानक त्याचे लक्ष सावीच्या अगदी जवळ आलेल्या एका भरधाव टेम्पोकडे गेले.तो मोठ्याने सावी असं म्हणून ओरडला आणि तिला जोरात धक्का दिला.सावी रोडच्याकडेला जाऊन पडली.तिला दोन मिनिट काहीच कळले नाही पण ती जेंव्हा उठून उभी राहिली तेंव्हा सोहम असं म्हणून मोठ्याने ओरडली. सोहमला त्या टेम्पोने उडवले होते आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पालथा निपचीत पडला होता.सावी त्याच्याकडे धावली. त्याचे डोके मांडीवर घेऊन रडत म्हणाली.


सावी,“सोहम डोळे उघड! तुला काही नाही होणार! 

Someone  please help. Call an ambulance!” ती ओरडत होती.


          सोहमने तिला किलकिले डोळे उघडून पाहिले आणि तिचा हात धरून खिन्नपणे हसला आणि डोळे बंद केले. सावी ते पाहून त्याला घाबरून हलवत होती पण त्याची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. श्वास ही मंदपणे सुरू होता. सोहमच्या डोक्याला जबर जखम झाली होती त्यातून भळाभळा रक्त येत होते.हाताला ही खूप जास्त लागलेले दिसत होते आणि रोडवर चेहऱ्याच्या एकाच साईडला पडल्यामुळे चेहऱ्यावर ही जखम झाली होती.साविचा आवाज ऐकून लोक गोळा झाले.ट्रस्टच्या ऑफिस मधून मघाशीचा क्लर्क, प्युन आणि अजून दोन-तीन लोक आले.सोहमची अवस्था पाहून त्यांनी अब्युलन्स फोन करून बोलवून घेतली आणि सावी व सोहम बरोबर ते ही हॉस्पिटलमध्ये गेले. पण एकूणच सोहमची अवस्था बिकट होती. 

 

 सोहम वाचू शकेल का?की सोहमला सावी कायमच गमावून बसेल? सावी आणि त्याच्या मध्ये असं काय झाले होते की सोहम तिच्यावर इतका नाराज होता? सोहमने  सावीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव का धोक्यात घातला होता म्हणजेच त्याच्या मनात अजून ही सावी बद्दल भावना शिल्लक होत्या का तिला वाचवण्याचे दुसरेच कारण होते?


क्रमशः


 या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.


©Swamini (asmita) chougule