हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा

Every woman want to be child..this feeling is speechless

हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा

आज रिया नेहमीपेक्षा जास्तच अस्वस्थ होती,भराभर कामे आवरून खोलीच्या एका कोपऱ्यात शांत बसलेली,...तेवढ्यात साहिल ने समोरून हाक दिली...

अग रिया आवरलं का तुझं,मग उशीर झाला का चिडते माझ्यावर...रिया....रिया...कुठे गेलीस ...

हो आले........अगदीच दबक्या आवाजात रिया उत्तरली.

काय ग...तुझ नेहमीच ...जायचं ठरलं ना... चल पटकन, येवढा विचार नको करुस,...सगळं काही छान होईल...

अरे साहिल नेहमीसारखे या ही डॉक्टरांकडून निराशा झाली तर...आतापर्यंत किती तपासण्या केल्या आपण, रिपोर्ट नॉर्मल येतो मात्र अजूनही माझी आई होण्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही,अन् त्यात मग तुझ्या आईचे टोमणे...मला खूप टेन्शन आलं रे......

अग या डॉक्टरांचा चांगला रिझल्ट आहे,माझ्या एका मित्राला पण यांच्याकडेच गुण आला...त्यानेच तर सल्ला दिली मला...एकदा प्रयत्न करुया...प्रयत्न केल्याशिवाय कसे होईल...

अरे पण...

आता काही नको...आवर पटकन,मी हॉल मध्ये तुझी वाट पाहतोय...

रियाने लगबगीने तयारी केली अन् लागलीच ते दोघे डॉक्टरांना भेटायला गेले...

डॉक्टरांनी अगोदर रिया च्या काही टेस्ट करायला सांगितल्या व नंतर साहिल ला एक दोन टेस्ट सांगितल्या,...रिपोर्ट आले की पुन्हा या,अन् काही बेसिक टॅबलेट दोघांनाही घ्यायला दिल्या...

रियाला आता या सर्व टेस्ट तपासण्या असहनिय होत होत्या,तरीसुद्धा आई व्हायचं म्हणून ती वारंवार सर्व टेस्ट करत होती,आतापर्यंत ज्या डॉक्टरांकडे रिया अन् साहिल गेले त्यांच्या म्हणण्यानुसार दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल आहे,कुणाकुणाला नैसर्गिक रित्या थोडे वेळाने मुल  होतात,त्यापैकी च तुम्ही...पण लग्न होऊन सहा वर्षे झाली आणि आता रिया ला आई व्हायचे होते..म्हणून साहिल च्या मित्राने सांगितल्या डॉक्टरांकडे रिया ने जाण्यास सहमती देऊन त्यांची ट्रीटमेंट चालू केली....

नवीन डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू करून सहा महिने होत आले पण अजून रिझल्ट नाही म्हणून रिया ला खूप टेन्शन आलेले,साहिल ने रिया ची समजूत काढली व तिचे लक्ष दुसरीकडे वळविले,..इकडे सासूबाई या ना त्या कारणाने सारखी रियावर चिडत होती,त्यांचा रोष आता पर्यंत नातू मिळाला नाही म्हणून होता कदाचित,पण यात रियाचा काय दोष....

शेवटी सासूबाईंच्या रागावर रीयाने ट्रीटमेंट मध्येच थांबवली,आणि आता कुठलीच औषध मी घेणार नाहीत असे तिने सासूबाईंना सांगितले...

साहिलने औषध चालू राहू देण्याकरिता तिला खूप समजावले पण रिया ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती शेवटी त्याने ही म्हटले आता या नंतर कोणतेच उपचार घ्यायला मी तुला नेणार नाही...

एके दिवशी रिया तिच्या खोलीबाहेर निघाली नाही,म्हणून सासूबाईंनी आवाज दिला,तर रिया डोक्याला रुमाल बांधून झोपली होती,..सासूबाईंनी तिला हाक देत उठवले अन् काय झाले म्हणून विचारणा केली... रियानें सासूबाईंना सांगितले की मला गेल्या दोन तीन दिवसापासून बरं नाही वाटत आहे,..गळण आली,अन् सारखं मळमळ त ,डोकं तर येवढं दुखत आहे की विचारू नका...

सासूबाईंनी लगेच साहिल ला फोन करून घरी बोलावले,...सासूबाईंच्या चेहऱ्यावर आनंद झडाकत होता,मनोमन त्या खूप खुश होत्या...

घरी आल्याबरोबर साहिल ने आईजवळ चौकशी केली...आईने त्याला कोड्यात सांगितले ...त्यामुळे साहिलला फार काही कळले नाही,..रियाची तब्येत चांगली नाही कळल्यावर त्याने लगेच डॉक्टरला बोलावले,...डॉक्टरांनी रिया ला तपासले असता त्यांनी साहिल चे अभिनंदन केले,हो म्हणजेच रिया आई अन् साहिल बाबा होणार होते...हे ऐकण्याकरिता साहिल ला किती वाट पाहावी लागली...थोड्यावेळात रिया ला थोडेफार बरे वाटायला लागले,तिला ही आनंदाची बातमी साहिल कडून कळली,...तिचा तर विश्वासाचं बसेनासा झाला होता,बाप रे किती तो आनंद काय करू अन् काय नाही असे रिया चे झालेले...सासूबाई ही आनंदी आनंद गडे होत्या...

साहिल ने तर मुलगी आणि मुलगा दोघांचे खेळणे देखील आणायला सुरुवात केली,त्याला तर बाबा होणार या आनंदात काय करू अन् काय नाही असे वाटत होते,...

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व काही औषधे रिया न चुकता घेत होती,बघता बघता सातवा महिना रियाला लागला...रियाच्या आईने मोठ्या हौसेने पहिले बाळंतपण म्हणून रियाला माहेरी आणले व तिथे मोठ्या उत्साहाने तिचे डोहाळजेवण केले,...साहिल ला ही या सर्व गोष्टींची उत्सुकता फारच...दोघांनी अगदीच हातात धनुष्य बाण घेऊन ,तर झुल्या वर बसून, नानातरहेचे फोटो काढलेत...खूप छान असे डोहाळजेवण आटोपले...

आता दोघांनाही बाळ केव्हा बाहेर येणार म्हणून उत्सुकता लागलेली,बाळाचे गर्भात फिरणे,खेळणे आता रिया ला प्रत्यक्ष केव्हा बघते अन् केव्हा नाही असे वाटत होते...

दिवस पूर्ण होऊनही रियाला काही कळा येईना म्हणून रीयाच्या आईला थोडी काळजी वाटत होती,दुसऱ्या दिवशी रियाला घेऊन रिया ची आई दवाखान्यात आल्या,डॉक्टरांनी रिया चे चेक उप केले,त्यांनी सरळ सांगितले..बाळाचा विकास पूर्ण झाला आहे,बाळ केव्हा ही बाहेर येऊ शकतो...

बाळ केव्हा पण बाहेर येणार म्हणून रियाला दवाखान्यातच ठेवले,रिया ला बाळ बघण्याची खूपच उत्सुकता लागली होती,..पण मनात तिला काही काही विचार येत होते,तिने फोन करून साहिल ला बोलावले,...साहिल आल्यावर ती त्याला सारखी विचारात होती...आपले बाळ सुखरूप येईल ना...साहिल तिला सारखा धीर देत होता...अग रिया तू फक्त चांगला विचार कर,सर्व काही खूप छान होणार आहे...आपले बाळ लवकरच आपल्या हातात येणार...

पण दुसरा दिवस उजाडला अजूनही कळा येत नव्हत्या,डॉक्टरांनी पुन्हा चेक केले ...त्यांनी साहिल व रिया च्या आई ला सांगितले की बाळाचा विकास पूर्ण झालेला असून आता वाट पाहणे धोक्याचे ठरू शकते,आता रिया ची डिलिव्हरी करणे आवश्यक आहे,...सिजेरियन करावे लागेल,साहिल ने कसलाही विचार न करता फक्त रिया व बाळाला काही होऊ नये म्हणून लगेच स्विकृती दिली....

लागलीच रियाला नेले , साहिल इकडे खूप अस्वस्थ झाला होता,...सारखा इकडून तिकडे व तिकडून इकडे फेऱ्या मारत होता,साहिल ला चिंतेत बघून रीयाची आई सारखी देवाकडे प्रार्थना करत होती....हे देवा सर्वकाही सुरळीत होऊ दे...

आणि डॉक्टर येतांना दिसले,,त्यांच्या मागे दोन नर्स बाळाला घेऊन येत होत्या,बाळ खूप रडत होते,.साहिल लगेच बाळा जवळ गेला,डॉक्टरांनी सांगितले बाळाला श्वास घेण्यास थोडा त्रास होत आहे,म्हणून बाळाला काही दिवस आय सी यू मध्ये  ठेवावे लागेल,...साहिल लगेच बाळाला अडमि ट करतो,...या धावपळीत त्याला मुलगा झाला की मुलगी हे पण कळले नाही....

इकडे काही वेळातच रिया शुध्दीवर येते,डोळे उघडल्या बरोबर ती फक्त बाळ कुठे आहे विचारते,..तिची आई तिला सांगते बाळ सुरक्षित आहे,लगेच साहिल येतो,ती साहिल ला बाळा विषयी विचारते...

बाळ कसे आहे

अग बाळ खूप छान आहे,अगदी तुझ्यावर गेलंय...

केव्हा येणार माझ्याकडे,

हो येईल की लवकरच..

तेवढ्यात पुन्हा डॉक्टर येतात, रियाला चेक करतात,आणि म्हणतात...अभिनंदन रिया,,तुला एक गोड मुलगा झाला आहे...ती लगेच डॉक्टरांना बाळाला केव्हा सुट्टी मिळणार विचारते...चार किवा  पाच दिवसात ...डॉक्टर उत्तर देतात...

पाच दिवस झाल्या नंतर बाळाला सुट्टी मिळते,बाळाला घेऊन साहिल रियाकडे येतो,दोघेही मन भरून बाळाला बघतात,खूप गोंडस बाळ पाहून त्यांना गगनात मावेनासा आनंद होतो...

दवाखान्यातून रिया व बाळ घरी येतात,तर घरी रिया ची आई भाकर तुकडा ओवाळून बाळाचे स्वागत करते...बाळाची दृष्ट काढते....बघता बघता दोन महिने होतात...साहिल रिया व बाळा ला घरी घेऊन जातो...

सासरी मोठ्या आनंदाने बाळाचे नामकरण विधी पूर्ण करण्यात येते,..आजूबाजूच्या बाया पण नामकरण ला येतात,... स्वजस बाळाचे नाव ठेवण्यात येते...बाळाला पाळण्यात ठेऊन काही बाया पाळणा म्हणतात...

हलके हलके जोजवा,बाळाचा पाळणा
हलके हलके जोजवा,बाळाचा पाळणा....

                            * समाप्त*

Ashwini Galwe Pund...