हादरा:- (भाग:-3 )

Sakshi tries to resolve the issue by negotiating with Rahul. But Rahul keep ignoring her. She tried to get him normal by communication but what happens exactly, do read in this story.

हादरा:- (भाग 3)

साक्षी मनातल्या मनात तडफडत होती, तो येईल हा विश्वास खोटा ठरत होता.
रडता रडता कधी डोळा लागला तिलाच कळले नाही, तशीच ती बाहेर सोफ्यावर झोपली. सकाळी काहीश्या उशीरानेच तिला जाग आली, खडबडून उठली तर बेड रूमचे दार उघड होत. लगेच आत जाऊन पाहिले पण तिथे राहुल नव्हता.
ओला टॉवेल बेड वर फेकला होता आणि त्याची बॅग मात्र दिसत नव्हती.
त्या वरून तो रागातच न सांगता न बोलता निघून गेलाय हे तिच्या लक्षात आलं.
घड्याळाकडे पाहिलं तर 8 वाजून गेले होते, तसे तिने पण लगेच आवरले कॉफी घेतली  विचार केला हा भेटेलच ऑफिस ला आणि ऑफिस ला गेली.
ऑफिस मध्ये पाऊल टाकताच तिची नजर त्याला शोधत भिरभिरत होती पण तो कुठे दिसला नाही, कामात मन लागणार तर नव्हतं पण जागेवर बसून नॉर्मल आहे हे दाखवणे गरजेचे होते सो PC स्टार्ट करून बसली.
"राहुल कुठे दिसत नाहीय?" कॉफी आणणाऱ्या बॉय ला तिने विचारले तसे
" मोठ्या साहेबासोबत बाहेर मीटिंग ला गेलेत" तो बोलला तशी ती थोडी रिलॅक्स झाली.
आता येईल मग येईल करत विचार करत होती पण ऑफिस सुटायची वेळ झाली तरी तो आला नव्हता. खट्टू मनाने एकटीच घराकडे निघाली, लॅच ने दरवाजा उघडला तर राहुल घरात होता आणि आवरून कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होता. तिने अपेक्षेने त्याच्याकडे पाहिले पण काहीच न बोलता लक्ष ही न देता तो दरवाजा खाडकन ओढून निघून गेला. ती बघतच राहिली, हाच का तो राहुल जो घरी आला की बडबड करत मला भंडावून सोडतो?
तिने काही न करता फक्त मॅग्गी बनवले आणि TV बघत बेचवपणे खाल्ले, प्रत्येक 10 मिनिटे झाली की घड्याळ बघत होती. राहुल ची वाट बघत बघत ती आडवी झाली, कालपासून च्या वैचारिक दगदगीने  ती तशीच झोपून जळू.
अचानक जाग आली बघते तर 12.30 वाजले होते आणि राहुल अजून आला नव्हता. तिने लगेच मोबाईल हातात घेतला आणि कॉल केला तर त्याने 3 रिंग जाताच कट केला,हिने पुन्हा कॉल केला तर यावेळी स्विच ऑफ चा मेसेज आला. चिडत चरफडत तिने पण मोबाईल बंद केला आणि आता झोपली.
सकाळी लवकरच जागी झाली राहुल बाजूला झोपला होता. त्याच्याकडे बघत तिला त्या क्षणी तो खूप निरागस भासत होता.
"आपणच चुकतोय का? त्याला समजून घेत नाहीय का?" हे विचार तिच्या मनात डोकावून गेले.
पडती बाजु घेत तिने राहुल उठला हे जाणवताच गोड " गुड मॉर्निंग" म्हंटले आणि त्याच्या हातात कॉफी चा मग दिला.
फारसा भाव न देता त्याने कॉफी घेतली आणि लगेच आवरून निघालाही.
"अरे जरा थांब मी पण येतेच आहे?"
"नको, माझी अपॉइंटमेंट आहे मी दुसरीकडे जातोय" असे बोलत तो निघून गेला सुद्धा आणि ही दिगमूढ उभी राहिली.
त्याचे असे तुटक वागणं तिला खर तर सहन होत नव्हतं, आतून तीचे मन आक्रदंत होते पण तरीही त्याच्यावरच प्रेम तिला समजूतदारीने घे हेच सांगत होत.
तिने राहुल ला छानसा इमोशनल मेसेज केला आणि रिप्लाय ची वाट बघत होती पण 3 तास झाले तरी त्याने साधं रीड पण केलं नव्हतं.
" राहुल तू घरी कितीला येणार आहेस?"
"का आता ते पण अपडेटस हवेत का?"
"नाही रे,मला वाटत आज आपण छान डिनर डेट ला जाऊ यात.जरा वेळेत ये ना प्लिज?"
"बघतो जमले तर,वाट पाहू नकोस."
तरी पुन्हा पूर्ववत करायचे सगळे या विचारात आणि नादात तिने छानसे आवरलं.मस्त गुलाबी साडी,लिपस्टिक आणि त्याला साजेसे दागिने घालून ती तयार होती.
राहुल घरी आला तर 8 वाजून गेले होते,आढेवेढे घेत जायला तरी तिने त्याला मनवलेच आणि दोघे छान त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये गेले.
मंद उजेड, light music शा वातावरणात ती हरखून राहुल कडे बघत होती पण तो आपला मोबाईल मध्येच गर्क होता. तिने त्याच्या आवडीचा मेनू ऑर्डर केला आणि छानस स्टार्टर, ड्रिंक सुद्धा मागवलं.
जुजबी बोलत तिच्या हो ला हो करत तो वेळ काढत होता तितक्यात ती कालची स्त्री एक छोट्या मुलासोबत येताना दिसली. तीच लक्ष गेलं तेव्हा राहुल त्यांच्या दिशेने निघाला ही होता.
त्यांच्या टेबलापासून थोडेसे लांब टेबलावर ते दोघे बसले आणि राहुल पण तिथे जाऊन बोलत बसला.
10 मीनीटे झाली, 15 झाली तरी तो आला नाही. जेवण गार झाले, तिने कॉल केला तर त्याने तो कट केला. आता मात्र तिची सहनशक्ती संपली, होत त्याचे बिल पे केले आणि न जेवताच ती निघून घरी आली.
रडत बसली, 2 तास होऊन गेले घरी येऊन तरी राहुल आला नव्हता. सगळं छान आवरलेलं तिने काढून फेकून भिरकावून दिले रूम मध्ये. रात्री 2 वाजता राहुल आला आणि तोही इतका ड्रिंक करून की तिला शिसारीच आली.
तिला त्याच्या बाजूला ही राहवत नव्हतं.
वैतागून तिने आपले ब्लॅंकेट घेतले आणि बाहेर सोफ्यावर जाऊन बसली. राहुल चे प्रत्येक वागणे तिला हादरवून सोडत होते आणि विचारांच्या गर्तेत फेकत होते.
का हा असा अचानक बदलला? नक्की काय झालंय? का सांगत नाहीय? असे अनेक विचार तिला मनातून हादरवून टाकत होते.

बाकी बघुयात पुढील भागात.

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all