हादरा भाग 5 शेवटचा

Will Sakshi get her own love back again or not Do read in the last part.

हादरा:- भाग 5 (अंतिम)

ऑफिस मध्ये सगळे खूप अचंभित झाले होते, साक्षी ला कधी मेमो  मिळेल हे स्वप्नांत पण कोणी विचार केला नव्हता इतकी डॅशिंग, स्मार्ट आणि ऍक्टिव्ह होती साक्षी.
पण जे घडत आहे त्यात ती स्वतःला गमावते आहे ह्या जाणिवेने तिला जवळची मानणारे माणसे नक्कीच दुःखी होत होते पण काहीच करू शकत नव्हते कारण काही समजणे, काही ऐकणे ह्याच्या ती फार पलीकडे गेली होती.
मेमो हातात घेवून ती वेड्यासारखी फक्त आपल्या जागे वर किती वेळ बसून होती हे तिलाच कळले नाही, जेव्हा ऑफिस बॉय "मॅडम ऑफिस बंद करायचे आहे" म्हणाला तेव्हा उठली आणि यंत्रवत चालू लागली.
राहुल च्या प्रेमात वेडी झालेली ती याही स्थितीत त्याला फोन करायचा प्रयत्न करीत होती आणि तो सरळ फोन कट करून बंद करून टाकत होता. बंगलोर ला गेलेला राहुल जवळपास 10 दिवसांनी परत आला पण त्या दरम्यान जे त्याचे फोटो FB ला पोस्ट होत होते ते मात्र वेगळी वेगळी ठिकाण दर्शवत होते.
एक दिवस ती ऑफिस ला जायला निघाली असतानाच राहुल बॅग सांभाळत कॅब मधून उतरताना दिसला तशी ती लगेच परत लॅच उघडून घरात आली आणि त्याला बघताच तिच्या मनाला जो उत्साह वाटला  त्याला अनुसरून त्याच स्वागत करायला तयार झाली.
तो किल्ली लावायच्या आत तिने दार उघडले आणि त्याला एक स्माईल दिली, त्याने मात्र वैतागतच एक कटाक्ष टाकला आणि म्हणाला " गेली नाहीस तू ऑफिस ला?"
" निघालेच होते पण तू दिसलास, आज मी सुटी घेते खूप दिवसांनी भेटत आहोत आपण आज" म्हणत लाडिकपणे त्याच्या जवळ गेली.
पण त्याने झिडकरल्यासारखे करत " तू जा ऑफिस ला, मी खूप दमलोय! मला झोपायचे आहे" म्हणत वॉश रूम ला निघून गेला.
घायाळ मनाने तिने बॅग उचलली आणि ती ऑफिसमध्ये गेली. खरंतर तीचे मन कशातच लागत नव्हते, न काम न जेवण खान न मित्र मैत्रीण आणि न ही नवीन काही करण्याचा उत्साह. कसातरी दुपारपर्यंत वेळ गेला, अचानक तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबर वरून फोन आला. आधी तिने दुर्लक्ष केलं, पण पुन्हा जेंव्हा कॉल आला तेव्हा मात्र तिने तो उचलला.
" हॅलो कोण साक्षी बोलताय का?" पलीकडून कोणी स्त्री बोलत होती.
" हो! आपण कोण?" साक्षीने विचारले.
"मी कोण हे कळेलच तुम्हाला, आज 4.30 वाजता या आपण भेटुयात. मी पत्ता मेसेज करते."
साक्षी काही बोलायच्या आत फोन कट झाला आणि दुसऱ्या क्षणी एक मोठ्या हॉटेल चा पत्ता तिला वॉट्स अप ला रिसिव्ह झाला. कोण असेल? का भेटायचे असेल? मी जावे की नाही? असे विचार मनात सतत येत होते तरीही कुठेतरी जावेच अस मन कौल देत होत. शॉर्ट लिव्ह घेऊन ती 4 वाजता बाहेर पडली आणि कॅब ने दिलेल्या पत्यावर पोचली. ते एक आलिशान हॉटेल होते, जरा बिचकतच जाऊ का नको विचार करत ती थोडा वेळ थांबली. पण तीचे मन म्हणत होते की तू जा.
शेवटी बघुयात कोणी फोन केला म्हणून तिने रिसेप्शनला चौकशी केली आणि त्या रूम नंबर प्रमाणे 3 रया मजल्यावर निघाली. मनात अनामिक हुरहूर जाणवत होती, कसलीशी भीती होती.  कशाची तिला कळात नव्हते पण ती चालत राहिली.
तिसऱ्या मजल्यावर डाव्या हातांशी दोन नंबर चा तो दरवाजा होता ज्याचा पत्ता तिला आला होता.
जवळ जाताच तिने लॅच ला हात लावला तर दरवाजा फक्त लोटलेला होता. हलकेच तिने दार ढकलले आणि पुढे आली, तो एक खूप मोठा हॉल वजा रूम होती जी आणखीही काही रूम सारख्या भागाला जोडली होती. ती हलकेच पुढे आली आणि तिला एकदम मोठा आवाज आला
"हॅपी बर्थडे साक्षी"
"हॅपी बर्थडे टू यु डिअर हॅपी बर्थडे टू यु"
ती स्तब्ध होऊन पाहत होती तर राहुल हसत तिच्याकडे पाहत उभा होता. अनेक लोक आजूबाजूला होते त्यात ती स्त्री जी राहुल बरोबर होती ती पण होती.
साक्षी ला।काहीच कळत नव्हते काय झाले आहे.
राहुल पुढे आला आणि म्हणाला
"साक्षी, पहिल्यांदा तर तुझी माफी मागतो, माझ्या या वागण्याबद्दल! माझे वागणे असे घडण्याचे कारण तुझा हट्टी आणि संशयी स्वभाव.
तुझे माझ्या प्रत्येक बाबतीत संशयी वागणे मला त्रास देत होते
मग माझे काय चुकत आहे नक्की हे पाहण्यासाठी मी आत्मचिंतन केले आणि म्हणून मी डॉ. टाळसनिया यांची मदत घेतली.
तू ज्या स्त्री ला पाहिले त्या माझ्या डॉक्टर.
त्यांच्याच 10 दिवसाच्या हिलींग कोर्स ला मी बंगलोर ला गेलो होतो.
माझे वागणे बदलले की तू कशी वागतेस आणि तुझ्या या हट्टी पणाला माझ्याकडे काय उत्तर असावे म्हणून मी हा हिलींग चा कोर्स केला.
"मला एकदा सांगायचे होते, राहुल"
"खूप ईच्छा झाली ग, पण मला बंधने होती. जेवढा मी अलिप्त वाजब तेवढे मला कळणार होते की माझया आणि तुझ्या नात्यात काय हवे आहे"
"परीक्षा घेतलीस माझी?"
"नाही ग, मी परीक्षा दिली. तुला कायमस्वरूपी माझीच बनवण्यासाठी"
"आणि.....
"आणि काय, आणि हे की साक्षी मी कायम फक्त तुझाच आहे आणि तुझाच आहे...आणि तू माझी"
डोळ्यातून बाहेर पडणारे पाणी न थांबवायचा प्रयत्न करत ती राहुल च्या गळ्यात पडली.
तिथे असणाऱ्या सगळ्याच लोकांनी जोरदार टाळ्या वाजवत याचे स्वागत केले.
साक्षीचा वाढदिवस जो ती विसरली होती तो तिथे जोरदार सेलिब्रेशन सोबत झाला.
त्या हॉटेल चा खास सुईट राहुल ने बुक केली होता, साक्षी बरोबर अमूल्य क्षण व्यतीत करायला आणि तिच्या मनाला बसलेला प्रत्येक हादरा पुसायला!

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all