हादरा (भाग 4)

Sufferings of Sakshi continued and as of Behavior of the Rahul as well. She is not in her control to understand what is happening. Let's find out what happens exactly

हादरा :- (भाग 4)

उगवणारी सकाळ पुन्हा शांत, स्तब्ध आणि तितकीच परकी वाटणारी उगवली. आज उलट झाले ती उठली आणि बघते तर राहुल अजूनही घोरत पडला होता. साक्षी फ्रेश होऊन आली आणि स्वतःसाठी कॉफी बनवून पित आपल्याच विचारात ब्रेकफास्ट बनवायला घेतला तरी तो लोळतच होता.
कालच्या घडल्या प्रकाराने तिला खूप मनःस्ताप झाला होता, पुन्हा रडून रडून डोळे सुजले होते आणि डोकेही खूप दुखत होत.स्वतःचा नाश्ता केला आणि एक पेन किलर घेऊन आवरून ती ऑफिस ला निघाली तरी तो उठला नव्हता. जाऊन त्याला हलवावे काही बोलावे असेही तिच्या मनात आले नाही. त्यामुळे आपली बॅग उचलून लॅच ओढून ती कामावर आली आणि स्वतःला कामात व्यस्त करायचा प्रयत्न करू लागली.
काम तर सुरू केलं पण आपल्या कामात अचूक असणारी ती आज काय करतेय हे तीचे तिलाच कळत नव्हतं. तो आज ऑफिस ला आलाच नव्हता, कसाबसा दिवस ढकलला आणि ती घरी आली, पहाते तर तो घरी नव्हताच. कुठे गेलाय , कोणासोबत असेल असे अनेक विचार तिला सतावत होते. मागच्या आठवड्यापर्यंत आयुष्य कास छान सुरळीत सुरू होते आणि हे असे काय अचानक घडलं? विचारांच्या नादात तिला भान राहीले नाही की आपण काय करतोय आणि काय नाही.  गॅसचे बटन सुरू करून दूध गरम करायला ठेवून वेड्यासारखी उभी होती,दूध तापलं, उतू गेले तरी ती आपल्याच नादात होती. जेवण नाही खाणंपिणं नाही वेड्यासारखी बसून होती, गेल्या 4 दिवसात भूक तर जणू ती विसरली होती.
फोन वाजला तशी ती भानावर आली " साक्षी काय करतेस? "समोरून तिची मैत्रीण म्हणाली.
"कोण?" 
"अग काय हे!माझा आवाज नाही ओळखला पण नंबर तर आला असेल ना मोबाईल वर? अक्षता बोलतेय मी."
"हं बोल" अगदी रुक्ष स्वरात ती म्हणाली.
"साक्षी बरी आहेस ना?  आपलं दोघींचं  ठरलं होतं ना गेल्या आठवड्यातच की आपण लेट एव्हीनिंग मूव्ही ला जाणार आणि मग डिनर! खूप महिने झाले भेटलो नाही. कशी ग विसरलीस?"
" मला बरं नाही वाटत आहे! पुढल्या वेळी आपण जाऊ."
"अग काय डोकं हललय का तुझं? तुला आठवतेय ना पुढच्या 4 दिवसात मी प्रोजेक्ट वर 1 वर्षासाठी जर्मनी ला जातेय सांगितलं होतं ना. मला माहित नाही, मी 1 तासात घरी येतेय तू गोळ्या घे आणि तयार राहा."
नाईलाज झाला साक्षीचा मनात नसूनही आवरणें भाग होते
साधीशी जीन्स आणि टॉप घालून तिने आवरलं, मेक अप नाही, हेअर स्टाहल नाही असा तिचा अवतार बघून अक्षता ला नवल वाटलं. 
" काय ग, नेहमी उत्साही अशी तू आज पार निस्तेज दिसतेय." तिला घट्ट मिठी मारत अक्षता म्हणाली.
त्यावर फारसे लक्ष न देता साक्षी ने तिला पाणी दिल आणि" कॉफी घेणार का?" इतकाच विचारले.
" नको बाहेर बघू, चल निघायचं का?" 
दोघी मॉल ला गेल्या, अक्षता बोलेल तेवढेच जुजबी बोलत साक्षी सोबत करत होती. स्वतःहून काही फारसं विचारणा नाही, बोलणं नाही की उत्साह नाही.
" साक्षी राहुल सोबत सगळं ठीक न?" अक्षता ने न राहवून विचारलं.
टचकन डोळ्यात पाणी आलं,पण काहीच बोलली नाही. "मी मूव्ही च बुकिंग करते" म्हणत काढता पाय घेतला.
पिक्चर सुरू झाला तसे साक्षी चे विचार सुद्धा. अक्षता ने आणलेलं पॉपकॉर्न क्वचितच खात होती खरंतर लक्षच नव्हतं तीच त्याकडे कारण समोर च्या लेनमध्ये बसलेला व्यक्ती हा राहुल आहे ही तिची पक्की खात्री होती.
इंटरवल ला ती मुद्दाम जाऊन बघितले तर राहुल त्याच मुलीसोबत स्नॅक्स कॉर्नर ला काहीतरी घेत होता, जस त्याच लक्ष गेले तसे  पुन्हा इग्नोर करून त्या मुलीसोबत निघून गेला. साक्षी काष्ठावत उभी राहिली, अक्षता ने हलवलं तेव्हा भानावर आली. कसंबसं नंतर डिनर केलं आणि घरी आली तर हा आधीच येऊन झोपला होता.
आता मात्र पार हद्द झाली, त्याच्या वर प्रेम करणारी साक्षी हे मान्यच करू शकत नव्हती की हे खरंच घडतंय. 
ती तडफडून झोपायला गेली.
सकाळी बॅग भरत तो सामान आवरत होता
 " राहुल!" इतकेच ती म्हणाली तर चिडत " मला वेळ नाही फालतू बडबड करायला! मी 4 दिवसासाठी बंगलोर ला जातोय."म्हणत निघून गेला आणि ती नुसतीच बघत राहिली.
त्याच्या वागण्यामुळे सतत बसणारे हादरे तिला सहन होत नव्हते, आठवडा भरात डोळे खोल गेले चेहरा पार उतरला. सुटी घेऊन 2 दिवस वेड्यासारखी एकटीच घरात बसली तरी मन लागत नव्हतं. 
ऑफिस जॉईन केले तर अशी त्याच अवस्थेत काहीतरी घोड चूक केल्याने हातचा प्रोजेक्ट गेला त्यामुळे बॉस ची खूप बोलणी खाल्ली.
साक्षी पूर्णपणे डिप्रेसड झाली होती, राहुल जो गेला तो त्याचा फोन नाही, मेसेज नाही आणि आठवडा झाला तरी तो आला पण नाही.ऑफिस मध्ये विचारल्यावर तिला कळले की तो 15 दिवसाच्या सुट्टीवर गेलाय, साक्षी तिथेच चक्कर येऊनच पडली.
तिला तिच्या स्टाफ ने ऍडमिट केलं, डॉक्टर म्हणाले अति स्ट्रेस ने विक झालीय. तिने फोन केला तरी राहुल रिस्पॉन्स देत नव्हता.
आता मात्र साक्षी पार खचून गेली. तिला कधीच वाटलं नव्हतं की राहुल असा वागेल किंवा आपल्यात काही प्रॉब्लेम येतील.
 त्याचे प्रत्येक वागणं तिला अंतर्गत हादरून देत होते. 
इकडे राहुल फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर वर रोज त्याचे नवीन फोटो टाकत होता त्यात तो कुठेही दुखवलेला दिसत नव्हता. उलट आनंदात एन्जॉय करतो हेच दिसत होते.
तिच्यात बोलायला सुद्धा त्राण राहिले नव्हते, आपण काय बोलू त्याच्याशी की तो उत्तर देईल असा वेडा विचार करत होती. 
आपण सगळं गमावल ,संपले का सगळे हाच विचार करत करत ती आतल्या आत कुढत होती.
त्याच दरम्यान कामात लक्ष नाही म्हणून कंपनी कडून तिला मेमो मिळाला.
इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत तिला पहिल्यांदा मेमो मिळाला होता. 
आणि त्याचे तिला अजिबात वाईट वाटले नव्हते कारण त्या मेमो पेक्षा जास्त हादरे तिला त्याच्या प्रिय व्यक्ती कडून गेल्या काही दिवसांत मिळाले होते.

बघुयात  काय होते साक्षी आणि राहुल चे,  ते पुढच्या भागात ....

क्रमशः- 

©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all