A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afe799acf14249733596131f89f21c6bb2dc81dc465): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Hadara
Oct 31, 2020
कथामालिका

हादरा

Read Later
हादरा

हादरा:- (भाग:-1)

 

साक्षी एक मस्तिखोर, धांदरट, बिनधास्त मुलगी.पण स्वभावाने खूप स्पष्टवक्तेपणा असल्याने कायम कोणीही तिच्याशी बोलताना जर दबकून  बोलत आणि वागत असे.  दरारा हा तिच्या नजरेतच असल्याने कोणाचीच कधी वावग वागायची आणि बोलायची हिम्मत झाली नाही. तिचा फ्रेंड सर्कल भरपूर मोठा असला तरी खरी मैत्री या भागत मोडणारे फार कमी. तशी मनमिळाऊ पण होती, खर तर तिला कोणी समजून घेऊ शकेल असे भेटले नाही. तिला कोणी जवळचे वाटणारे असे भेटले नाही आणि कोणाला जवळ करायला तीच भीत होती.

दंगा, मस्ती, भांडणं हे तीच कायम सुरू असले तरी सगळ्यांमध्ये लाडकी  होती.

कॉलेज सुरू असताना खूप काही आजूबाजूला आहे, घडतंय, कोणी बघतय हे कळत तर होत पण आपण त्यात गुंतावे अस वाटत नव्हतं. मैत्री ही परिभाषा माहीत असल्याने कोणासाठी काहीही करायची तयारी तिची होती. 

मुळात तिचा जर स्वभाव कोणी लांबून पाहिला तर ती खरच उडाणटप्पू वाटायची.

कॉलेज सरले, पुढील आयुष्य सुरू झाले. आता सगळे फ्रेंड्स आपापल्या गावी, मार्गी गेले. त्या दरम्यान ती पण मोठ्या शहरात आली, हॉस्टेल ला राहून नोकरी करायला लागली. घरी तिच्या बाबांना हे फारसे पसंत नव्हते पण तिच्या हट्टापुढे त्यांना नमतं घ्यावं लागलं.

नवीन शहरात पण काही ओळखी झाल्या त्यात खरंच जिला मैत्रीण म्हणावी अशी एकच तिला भेटली ती म्हणजे अनन्या. अनन्या पण दुसऱ्या शहरातून इथे आलेली पण तिच्या सोबत तिचा भाऊ असल्याने ती हॉस्टेल वर न राहता एका फ्लॅट वर रहात असे.

एका दिवशी संध्याकाळी दोघी स्नॅक्स खायला बाहेर भेटल्या तेव्हा साक्षी म्हणाली,

" अनू, मला ना माझ्या फ्रेंड्स ची खूप आठवण येते. इथे सगळे आजूबाजूला पाहिले न की त्यांची नजरच विचित्र वाटते बघ. माझे जे फ्रेंड्स त्यांच्या हातात हात टाक, टपली मार की गळ्यात पडले तरी कधी काही वेगळं भासले नाही. मला कोणाचा स्पर्श सुद्धा इरिटेट करतो तर मी कोणाला कसे माझ्या लाईफ मध्ये येऊ देणार."

" का ग साक्षी आज अचानक असा विषय काढलाय? काही झालाय का?" अनुने काळजीने विचारले.

" तस खूप असे नाही, पण आमच्या कंपनीत एक मंगेश म्हणून जॉईन झालाय 8 महिन्यांपूर्वी. तसा चांगला आहे तो पण त्याच्या सोबतचे बहुतेक त्याला काहीतरी चिडवतात. मला जाणवतेय की तो पण नकळत बघतो, काहीतरी वेगळं अस जाणवते.  तुला माहीत आहे मला ह्यात नाही इंटरेस्ट आणि उगीच माझ्यासाठी कोणी काही वाटून घ्यावे आणि त्याचे नुकसान व्हावे हे मला आवडत नाही. बोलायचं म्हणले तर एक फटक्यात मला काही कठीण नाही पण तो शांत चांगला वागतो तर नको त्याला ओरडायला अस वाटते !काय करू?"

" हे बघ नाहीतरी तू  जॉब बदलण्याच्या विचारात आहेस. काही बोलू नकोस, दुर्लक्ष कर आणि आपल्याला काही माहीत नाही समजत नाही असे दाखव. "

" गुड आयडिया!" असे म्हणून हायफाय देत ती अनुला म्हणाली.

दोघींनी मस्त पाणीपुरी खाल्ली, भेळ शेयर केली आणि आइस्क्रीम खाऊन आपल्याला मार्गी गेल्या.

नवीन जॉब शोधणाऱ्या साक्षी ला लवकरच चांगला जॉब मिळाला आणि तिने शिफ्ट केले. 

आताच तीचे ऑफिस तिला मनापासून आवडले होते. बिनधास्त असल्याने जवाबदारी घ्यायला ती तयार हाती आणि शिकायला सुद्धा. त्यामुळे एन्जॉय करत होती. आता तिला इथे येऊन पण 6 महिने झाले होते आणि तिच्या ऑफिस मध्ये एक नवीन एन्ट्री झाली.  तिच्याच डिपार्टमेंट मध्ये एक नवीन जॉइनिंग झाले त्याच नाव होतं राहुल. राहुल चा कामाचा अनुभव भरपूर होता त्यामुळे त्याला सगळी माहिती  होती. त्याच काम कुठल्याही एक डिपार्टमेंट शी मर्यादित न राहता तो सगळ्यांना लागेल तिथे मदत करत असे त्यामुळे लवकरच तो सगळ्यांना हवाहवासा झाला.

कामात एकदम हुशार, वागण्याबोलण्यात चंट, बोलका आणि खोडकर असा राहुल तिच्याशीही मोकळा बोलत वागत असे. तिला त्याच्या स्वभावातील खेळकरपणा आवडला होता, तिला त्याच्या सोबत काम करायला आवडायला लागले होते. 

ह्या ना त्या विषयावर discusion कधी मतभेद कधी एकमताने काम असे सुरू होते. राहुल च्या वागण्यावरून त्याला सुद्धा साक्षी ची कंपनी आवडते असे जाणवत होते. यावेळी पहिल्यांदाच साक्षीला जे चालू आहे ते नको असे वाटत नव्हते इंफॅक्ट त्याच्या सोबत असावे, त्याने बघावे असे वाटत होते.

तिच्यातला हळूहळू होणारा बदल अनुला काहीतरी जाणीव देत होता पण अनु गप्प बसली आणि फक्त बघ्याची भूमिका घेऊन एन्जॉय करत होती. स्वतःच्या राहणीमानाचा फारसा दाखल न घेणारी साक्षी आता आरशात कशी दिसते बघत असे. हलकासा मेकअप करायला लागली होगी,  मी कशी दिसते? मला हे सूट होईल का असे विचारायला लागली त्यामुळे अनूची तर पक्की खात्री झाली की कुठेतरी पाणी मुरतंय.

" काय ग साक्षी कोण ग तो ?" एकदा दगड मारायचा असे अनुने चिडवत विचारलं तस साक्षी चपापली हे अनुने नोटिस केले. 

साक्षीला का पण काहीतरी वेगळं होतंय हे जाणवत होतं. स्वतःमधला बदल ती आता ती accept करायला लागली आणि हो मला राहुल आवडतोय हे तिने मान्य केलं.

त्याच्यासोबत असायला वेळ घालवायला, ती निमित्त शोधायला लागली आणि हे राहुल च्या पण लक्षात आले होते. पण तो उघड न  बोलता सगळं छान एन्जॉय करत होता, त्या वागण्याला सपोर्ट करत होता. नाही म्हणायला सोबत जाणे येणे, कधी कॉफी प्यायला तर कधी शॉपिंग इतपत मैत्री झाली होती.

 " ही मीच का जी यापासून पळत होती, घाबरत होती? मग आता का आपण हे असे वागतोय? का राहुल ची सोबत आवडते?"  असे वेगवेगळे प्रश्न ती स्वतःलाच विचारत होती. 

" साक्षी, तुला काय वाटतंय नक्की?" राहुल ने एकदा डायरेक्ट विचारलं.

" कशाबद्दल बोलतोय" हसत कळत नाही असं दाखवत तिने उत्तर दिलं.

" बर ठीक आहे, पुढच्या महिन्यात 9 तारखेला माझ्या घरी ये." 

" का रे राहुल? काही स्पेशल?"

" हो माझी एंगेजमेंट आहे!" त्याने हसत बॉम्ब टाकला .

" काय?" म्हणत खाडकन तिचा चेहरा उतरला.

 तो मुद्दाम हसत निरीक्षण करत होता.

" का? म्हणजे कधी? कसे? आय मिन कोणासोबत?" ती विचारात सुटली.

तिचा झालेला गोंधळ पाहून तो गालातल्या गालात हसला.

"अग हो हो.... किती प्रश्न विचारले एका दमात. तुला काय झाले आणि ? Any problem?" त्याने तोमणा मारला. 

" नाही म्हणजे! एकदम च तू सांगितले ना म्हणूनच!

बरं चल, मी निघते माझ्या मैत्रिणीला भेटायचे आहे." असे म्हणत डोळ्यात आलेलं पाणी लपवत आणि त्याची बोलण्याची वाट न बघता ती पलटली तस तिचा हात कोणीतरी धरला हे तिला जाणवले . मागे वळून बघते तर राहुल होता.

राहुल ने " अगं नाव तर ऐकून घे" म्हणत तिला बसवलं आणि म्हणाला " तिचे नाव आहे.......साक्षी" 

चमकून तिने मान वर केली तर तो खट्याळ हसत होता, ती थोडी लाजली तस "चालेल ना?" म्हणत त्याने हात पकडला.

डोळ्याने होकार देत ती पट्कन त्याला बिलगली. तिने कृतीतून त्याला उत्तर दिले आणि तो ही हसला. 

दिवस एक मागून एक असे जात राहिले आणी त्यांची भावनिक गुंतवणूक, नात्यातील विण घट्ट होती. पाऊस आणि निसर्ग एन्जॉय करण्यासाठी एक  दिवस ते छान प्लॅन करून बाईक ने निघाले. भुरभुरणारा पाऊस कधी धुवांधार रूप घेत होता तर कधी मंद अस्तित्व दाखवत होता. ती निसर्गाची हिरवी शाल बघून साक्षी हरखून गेली होती आणि त्यात राहुल ची सोबत मग तर काय आकाश ठेंगणे असाच तिला वाटत होतं. 

अशाच काही क्षणात हातात हात घेऊन फिरत असताना पावसाची सर चुकवायला ते एक आडोशाला गेले आणि त्या वातावरणाचा म्हणा की सोबतीचा असर म्हणा की उन्मळून येणाऱ्या भावना ह्या त्यांना उद्युक्त करत होत्या.

राहुलचा तो अलगद स्पर्श ती नाकारू शकत नव्हती उलट ती उत्कट भावना तिला ही हेच हवे असे सांगत होती. कधी काय आणि कसे घडतेय हे दोघांनाही समजण्याच्या पलीकडे ते गेले होते आणि त्यांचे प्रेम हे स्पर्शवाटे व्यक्त होत होते. बराच वेळ एकमवकांमध्ये ते दोघेही गुंतून होते, क्षणाची काळाची वेळेची जाणीव ही कधीच विसरले होते. आज त्यांच्या प्रेमाला एक नवीन परिभाषा मिळाली होती जी त्या दोघांनीही मान्य केली होती.

साक्षी साठी स्वतःच हे असे वागणे एक न उलगडणार कोडे होते जे तिने हसत आनंदाने स्वीकारला होते.  मिळणारी ती सोबत, तो स्पर्श,ती ऊब ते प्रेम तिला हवंहवंसं झाले होते. बरेचदा ती आता राहुल च्या घरी सुद्धा जात येत असे. 

आता आपण कायम सोबत असावे या विचाराने दोघांनी एकत्र यावे यासाठी साक्षी ने एकदिवस त्याला तसे विचारले पण राहुल त्या विषयाने गोंधळाला हे तिने नोटीस केलं.

पुन्हा काही दिवस तिने तो विषय काढला नाही पण एक दिवस राहुल स्वतः तिला म्हणाला, " साक्षी मी तुला फसवतो असे तुला वाटतेय का?"

" नाही राहुल, पण काहीतरी कारण नक्की आहे की त्यामुळे तू

 बोलायचं सुद्धा टाळतोस.

काय कारण आहे हे मला नक्की ऐकायचे आहे. "

"साक्षी मी तुझ्यात गुंतलो ते अगदी मनापासून! पण लग्न मी करू शकेन असे मला वाटत नाही. कारण माझं लग्न झालंय, पण मी वेगळा राहतोय, आम्ही एकत्र कधीच येणार नाही पण ती मला डिवोर्स पण देणार नाही हे नक्की."

हे साक्षीला धक्कादायक होते पण राहुलच्या भावना खऱ्या आंहेत याची तिला खात्री होती. त्याही परिस्थित तिने त्याला साथ द्यायची कबूल झाली आणि बंधनापेक्षा भावना श्रेष्ठ या मताची ती राहुल सोबत एकत्र राहू लागली.

दिवस, महिने , वर्ष आनंदात सरत होत. कशाचीही कमी ती त्याला पडू देत नव्हती.

स्वतःला तिने पूर्णपणे राहुल मय करत आयुष्य समर्पित केले होते. तोही तितक्याच प्रेमाने तिला साथ देत होता.

आणि अचानक एके दिवशी ते घडले.

शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये साक्षी ने राहुल ला एका मुलीबरोबर पाहिले. 

ते दोघे जण एका कपड्याच्या दुकानात काही कपडे खरेदी करण्यात गर्क होते.

साक्षी ने मागून जाऊन राहुलच्या खांद्याला हात लावला.

राहुल ने मागे वळून पाहिले तर साक्षी.

त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.

तिच्याशी एक शब्द ही न बोलता हा ताबडतोब त्या मुलीला घेऊन लगेच दुकानाच्या बाहेर पडला.

साक्षी च्या मनाला बसलेला तो एक हादराच होता!

…............

(क्रमशः)

©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!