Nov 26, 2020
कविता

हा प्रवास दोघांचा...

Read Later
हा प्रवास दोघांचा...

प्रवास तुझ्यासोबतचा,
कधीच न संपणारा असावा,

कितीही खडतर असला तरी,
हवाहवासा वाटणारा असावा.

सुखं दुःखाच्या वाटेवर,
सोबत चालणारा असावा.

दोघांच्या अतूट विश्वासाचा,
झरा तिथून वहावा.

भटकले मी जरी,
तरी सावरणारा असावा.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
नवीन वाटणारा असावा.

मी हरवताना,
मला साथ देणारा असावा.

स्पर्शातूनी नेहमी,
मला समजून घेणारा असावा.

प्रवास तुझ्यासोबतचा,
कधीच न संपणारा असावा...

कधीच न संपणारा असावा...

                                                                                        Ashu.

 

Circle Image

Dhamodkar Aishwarya Ganapathi

Student

I am Aishwarya...I like to write and read aslo...