H3N2 लक्षणं- हा वेगळाच ताप आहे

H3N2 Symptoms In Marathi



गेल्या काही दिवसांपासून वेगळाच ताप जाणवत होता. याआधीही ताप येऊन गेलेला पण हा ताप फारच वेगळा वाटत होता. एकेक करत घरात सर्वांना संसर्ग झाला, नेहमीचंच आहे म्हटलं..व्हायरल आलं की सर्वांनाच येणार. त्यात कोरोनानंतर प्रतिकारशक्तीचे तीन तेराच वाजलेले. औषध गोळ्यांनी बरं व्हायला वेळ लागला, अशक्तपणा अजूनही आहे. एकेक करत आजूबाजूलाही या तापाबद्दल ऐकू आलं. "साथ चालू आहे, साथ चालू आहे" सगळे म्हणू लागले. मग कळलं, हा H2N3 व्हायरस आहे. काय एकेक व्हायरस जन्माला येतात, असो. तर या व्हायरस बद्दल काही माहिती.



H2N3 symptoms in Marathi

H2N3 एच2एन3 influenza A virus

H2N3 एच2एन3 influenza A virus ची लक्षणे



1. घसा खवखवणे

2. सर्दी

3. ताप

4. खोकला

5. अशक्तपणा

6. थंडी वाजून येणे.


हा ताप बरा झाला तरी अशक्तपणा बरेच दिवस असतो. काहींना ताप येत नाही पण खोकला आणि अंगदुखी होते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणे योग्य नसेल, एरवी आपण अंगावर काढतो, काय सतत गोळ्या औषधं म्हणून उपचार टाळतो, पण या आजाराला हा वेडेपणा करू नये. प्रकरण वाढलं तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.


h2n3 virus structure


1. कुठलाही व्हायरस हा आत जनुकीय घटक आणि बाहेर प्रथिनांचे आवरण अश्या रचनेनुसार असतो.

2. या प्रथिनांमध्ये 2 महत्वाचे घटक असतात- त्यांना HA (हेमॅग्लुटिनिन) आणि NA (न्यूरामिनिडेस) म्हणतात. हे प्रथिने आहेत जे इन्फ्लूएंझा विषाणूचे उपप्रकार निर्धारित करतात


H1N1 आणि H3N2 मधील फरक-

H1N1 आणि H3N2 हे इन्फ्लुएन्झा A विषाणूचे उपप्रकार आहे .


H1N1

प्रथिनांचे कवच H1 (hemagglutinin1) and N1 (neuraminidase1), पासून बनलेले असते.


H3N2

प्रथिनांचे कवच H3 (hemagglutinin3) and N2 (neuraminidase2) पासून बनलेले असते.


उपाय:

गाडी काढायची आणि गपचूप डॉक्टरकडे जायचं, स्वतः गुगल डॉक्टर बनायचा प्रयत्न करायचा नाही. ते जे औषधं देतील ती घ्यायची आणि आराम करायचा.


डॉक्टर खालीलप्रमाणे औषधं देऊ शकतात,

oseltamivir, zanamivir, peramivir, and baloxavir


पण हेच देतील असं नाही, जी दिली ती घ्यायची.


Get well soon..!!!