गुरूपौर्णिमा

आपल्या आयुष्यात कोणी न कोणी गुरु असतोच तसेच मी माझ्या आयुष्यात असलेले सर्व गुरुचे मनापासून आभार मानते


गुरू पौर्णिमा....!!!

गुरु...!!
आपल्या आयुष्यात गुरू असणे हेच भाग्य. माझ्या आयुष्यातही गुरू शाळेतील शिक्षक,आई बाबा,आजी आजोबा, माझी मुले याचबरोबर माझे मित्र मैत्रिणी आहेत.

काही न काही कोणत्याही कोणत्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीत साऱ्यांनी मला खुप काही शिकवून दिले.

आज मी माझा पहिला गुरु म्हणजे माझी आई.अम्मी.
हिचा उल्लेख आवर्जून करणार आहे.म्हणतात ना कि .‌\"मॉ हि बच्चों का पहिला मदरसा होता है।\" तसेच आई म्हणजे माझे एक चालते बोलते विद्यापीठ होते. सर्व गुण संपन्न अशी माझी आई.स्वयंपाक करायची इतका उत्कृष्ट म्हणजे खाणारेनीं बोटे चाटून खावी. हि अगदी अतिशयोक्ती होणार नाही बरे का.शिवणकाम, भरतकाम, विणकाम,कापड पेंटिंग यामध्ये निपुण.

शिक्षण तिचे पुणे ऐथील हुजुर पागा शाळेत झाले.आजी आजोबांना एकुलती एक मुलगी.अगदी लाडाने वाढलेली.आजोबा आमचे शिस्त प्रिय होते.पण आईस शिक्षणासाठी खुप प्रोत्साहन दिले.एवढेच नाही तर आजीसही आजोबांनी शिकवले.आजी अ आ इ ई काही शिकली नव्हती तर आजोबांनी तिला शिकवले ती पुस्तके वाचणे लिहिणे एवढेच नव्हे तर सही देखील करण्यास शिकली होती.

मला कधी काही लिखाणामध्ये कोणताही शब्द नाही आला तर मी लगेच आईला फोन करायची मग लगेच ती सांगायची की या जागी हा शब्द अगदीच छान वाटणार बघं.मग मी लगेच त्या शब्दाचा वापर करून लिहायची.

इतकेच नव्हे तर अम्मीने गरजू होतकरू मुलींना शिवण क्लास घेऊन त्यांना स्वावलंबी बनविले.क्लासची फि ज्यांना देणे जमेल ते फक्त १० रु .इतकीच.नाही जमणार त्यांना तसेच शिकविले.त्यांना शिवणकाम करायला लागणारे साहित्य देखील आईने आणून दिले होते. यामुळे मी आमच्या अम्मी कडून हेच शिकले की गरजूंना मदत करण्यासाठी कधी मागे पुढे करू नये. अम्मीला आमच्या अब्बाजानची खुप साथ होती. या दोघांनी खुप लोकांना अशी मदत केली आहे की आम्हाला त्याबाबतीत माहिती तेव्हा मिळाली जेव्हा हे या जगातून निघून गेले.

आजी आजोबा.
काटकसरीचे धडे मी यांच्या कडून शिकले.गरजूंना मदत करून त्यांच्या तोंडावर ओसंडून वाहणारा आनंद यात समाधान कसे मानावेत हे मी माझ्या बाबांकडून शिकले.
आज हे दोघेही नाहीत याचे खुप वाईट वाटते.

शिक्षकांचे तर किती आभार मानले तरी कमीच आहे. मला यामध्ये आमच्या प्रार्थमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री वि.गो. कुलकर्णी सरांचे नाव घ्यावे वाटते. शिस्तप्रिय असणारे आमचे सर पण मनाने मात्र खुपचं मायाळू होते. आमच्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल यावर त्यांचे नेहमी लक्ष असायचे. आमच्या शिक्षणाचा पाया मजबूत झाला तो यांच्याच मुळे.याचबरोबर आमचे वर्ग शिक्षक शिक्षिका यांचा कधीही विसर पडणार नाही. या शब्दांच्या दुनियेत जे मी वावरत आहे याचे सारे श्रेय आमच्या शिक्षकांनाच मी देईन.

याचबरोबर आपले अनुभव हा आपला सर्वांत मोठा गुरू आहे असंही कधी कधी मला वाटते.

या सर्व गुरू मध्यें मी माझ्या सासूबाईनां कसे विसरू.त्यांनीही मला कळत नकळत खुप काही शिकविले.

And the last but not the least ...!!! माझा छोटू म्हणजे आमचे छोटे चिरंजीव.यानेच मला फेसबुक, इंटरनेट व्हाट्स्अॅप कसे चालवावे.यावर टाइप कसे करावे.हे सर्व शिकविले.पण कधी कधी तो धमकी ही देतो बरे का कि अम्मी माझ्या आवडीचा स्वयंपाक नाही झाला तर मी काही तुझा फोनच ब्लॉक करतो.

आणि माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणी ह्या देखिल कधी न कधी काही न काही हसता बोलता शिकवतात.

या सर्व गुरुनां माझ्या कडून गुरू पौर्णिमींच्या हार्दिक शुभेच्छा .

©® परवीन कौसर...
बेंगलोर