गुरुपौर्णिमा रांगोळी आणि भेट कार्ड

Rangoli and greeting card ideas for gurupaurnima

गुरुपौर्णिमा रांगोळी आणि भेट आयडिया 

महर्षी व्यास यांच्या स्मरणार्थ संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात. 

आपले समाजातील स्थान, प्रतिष्ठा आणि मान केवळ गुरुंमुळे आपल्याला प्राप्त झालेला असतो आणि त्याचीच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात. आपले सगळ्यात पहिले गुरू म्हणजे आपले आई - वडील. आई - वडील आपल्याला चालायला बोलायला शिकवतात, आपल्यावर संस्कार करतात आणि त्यामुळेच आपण समाजात एक चांगले माणूस म्हणून राहू शकतो म्हणून गुरुपौर्णिमेला आपल्या आई - वडिलांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी कृतज्ञता अवश्य व्यक्त करावी. शाळेतील आणि कॉलेजमधील शिक्षक आपल्याला घडवतात. त्यांच्यामुळेच आपण आर्थिकपणे स्वावलंबी होतो त्यामुळे त्यांच्या कार्याप्रती देखील आपण कृतज्ञ असले पाहिजे. 

गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय? 

  • आपले आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या गुरूंनी जी काही मेहनत किंवा कष्ट घेतले आहेत त्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. 
  • आध्यात्मिक दृष्ट्या या दिवसाला खूप महत्त्व दिले जाते. डॉ. अनिरुद्ध जोशी म्हणजेच अनिरुद्ध बापू असे सांगतात की, या दिवशी सद्गुरूतत्व खुलेपणाने बसलेले असते प्रत्येकाला त्याच्या क्षमतेच्या अनेकपट जास्त द्यायला. 

गुरुपौर्णिमा साजरी करताना आपण गुरूंना काय भेट द्यावी? 

खरेतर गुरू कोणत्याही भेटीची अपेक्षा ठेवत नाहीत किंबहुना त्यांना कोणत्याही प्रकारची भेट नको असते. गुरूंना फक्त तुम्ही तुमचे आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवावे हेच अपेक्षित असते. जे आपल्याला घडवतात, ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांना आपण काय भेट देणार? तरीही कृतज्ञता व्यक्त करायला विद्यार्थी आपल्या गुरूंसाठी काही ना काही भेट तयार करावी असा विचार करतातच. तुमच्या भावना जाणून शिक्षक ती भेट स्वीकारतात पण खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्यात प्रगती करावी आणि स्वतःचे समाजातील स्थान उंचवावे हीच भेट त्यांना लाखमोलाची असते. तरीही विद्यार्थांना त्यांच्या भावना गुरूंपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या प्रकारचे भेट कार्ड बनवता येईल हे बघूया. 

भेट कार्ड बनवण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या भावना मनापासून लिहा आणि तुमची कल्पकता वापरून छान डिझाईन करू शकता. खाली आपण काही उदाहरणं बघूया जी लहान लहान मुलांनी अगदी निरागसपणे आपल्या शिक्षकांसाठी बनवलेली आहेत. 

१. रुजुता देशपांडे (इयत्ता दुसरी)

२. स्वरा जोशी  

खास गुरुपौर्णिमेनिमित्त रांगोळी. 

१. अंजली औतकर 

२. वंदना सूर्यवंशी