गुरुदक्षिणा अशीही

Students love n commitment for teacher.

गुरुदक्षिणा 

- स्वाती  बालूरकर, सखी


चव्हाण सरांना रात्रभर झोप लागली नाही घरामध्येच महाभारत झाले होते त्याचा परिणाम सकाळी काय होईल याची कल्पना करवत नव्हती.
त्यांच्या एकुलत्या एक मुलाने खूप च असभ्य भाषेत बोलून त्यांना घरातून निघण्याच्या आदेश दिला होता.
इतक्या रात्री ते निघू शकत नाहीत उदया सकाळी जातो आम्ही असे आईच्या सांगण्यावरून त्याने वडिलांना रात्रभर जणु घरात राहू दिलं होतं. तीन खोल्यांचं घर मागच्या महिन्यातच त्याने आपल्या नावावर करून घेतलं होतं.


दोन बॅगांमध्ये सामान भरून त्यांना आणि पत्नीला कुठेतरी निघून जायचं होतं .
कुठे ते माहीत नाही, खिशामध्ये पेन्शनमध्ये उरलेले काहीच विशेष नव्हतं फक्त पाचशे रूपये ! ते पाचशे रुपये किती दिवस पुरणार होते तेही माहीत नाही.
आयुष्यभर इमानेइतबारे प्रायव्हेट नोकरी करून रिटायर झाल्यावर माणसाच्या नशिबी म्हातरपणा हे असे दिवस यावेत ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे.
मुलाला त्यांच्या कष्टाची किंमत नव्हती, त्यांनी पैसा ठेवला नाही हेच त्याला कळत होतं. तो बोलला तेव्हा किंवा बोलताना त्याच्या बायको किंवा मुलाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
त्यागोष्टीचं अजूनही वाईट वाटलं. अपलं कुणीच नाही अन आपण नकोसे आहित ही भावना खूपच वाईट.
जिथे आपलं नाणंच खोटं तिथे त्या सुनेकडून काय अपेक्षा करणार ?
या घरांमध्ये उद्याची सकाळ काय दाखवणार आहे त्याची कल्पना नव्हती.
झोपताना बायको म्हणाली," उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरूला वणवण भटकावे लागणार आहे, त्याची मानसिक तयारी ठेवा!
देव कुठल्या जन्माची वैर काढतो आहे माहीत नाही!"

गुरुपौर्णिमा शब्द ऐकताच चव्हाण सरांना घाबरल्यासारखं झालं . " अरे बापरे गुरुपौर्णिमा म्हणजे उद्या तो येईल. . . सुहास!"
मनात विचारचक्र सुरू झालं.
चार वर्षांखाली भेटलेला तो जुना विद्यार्थी.
अचानक एका दुकानाबाहेर भेटला होता त्यांना त्याने ओळखलं आणि भर बाजारात तो त्यांच्या पाया पडला.
त्या क्षणी त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं.
इतके उंची कपडे , फोन व त्याचं थाट पाहून आनंद झाला होता.
हातातलं सामानाच्या पिशव्या घेऊन त्यांना स्वत च्या कारमध्ये बसवून त्यांने त्यांना घरी आणून सोडलं होतं.
तिथेच प्रेमाने मायेने चव्हाण सरांनी बायकोला चहा करायला लावला होता. खूप घाईत असतानाही त्यांचं मन मोडू नये म्हणून कपभर चहा पिऊन तो गेला होता.
त्यानंतर त्याचा नियमच बनला होता , दर गुरुपौर्णिमेला तो त्यांना शोधत यायचा .

गुरुजींसाठी भेटवस्तू, पुष्पगुच्छ मिठाई असं काही ना काही घ्यायचं आणि म्हणायचा
\" काहीही माझ्या योग्य सेवा असेल तर सांग तुमच्यामुळे अाज मी हे सगळं ऐश्वर्य बघतोय . तुमच्या शिकवणी मुळेच मी सफल आहे. गुरुजी मी फक्त एक फोन दूर आहे. माझा नंबर असू द्या!"

चार वर्षांपासून दर गुरुपौर्णिमेला तो येत होता.
वर्षभर भेट झाली नव्हती.
उद्या नक्की तो येईल.
त्याच्यासमोर घरातली भांडणं आणि लक्तरं बाहेर यायला नकोत.
आयुष्यभर इमाने इतबारे नोकरी केली आता विद्यार्थी म्हणाला म्हणून त्याची मदत घ्यायची त्यापेक्षा घराला कुलूप लावून निघून जावे. नाहीतर सर घरी नाहीत गावाला गेले असे सांगावे लागेल.
त्यांनी मनाची तयारी केली.
रात्री बॅग भरून ठेवायचं अवसानही राहिलं नव्हतं . त्यांच्या लक्षात जुने दिवस राहिले , डोळ्यात पाणी गळत होतं.

केव्हातरी त्यांना झोप लागली, रात्री जागरण झाल्याने सकाळी जाग आली नाही.

सात वाजताच्या सुमारास घराची बेल वाजली

\" आता कोणाला कडमडायला आलं?" सुनेने रागातच दार उघडले. दारात अनोळखी व्यक्तीला पाहून तिने नवऱ्याला आवाज दिला.

त्यांच्या मुलाने चौकशी केली आणि कळलं तो सरांचा जुना विद्यार्थी आला होता.

सामाजिक भान म्हणून त्याला बसायला सांगणं आवश्यक होतं.
तो बसला बाबांना थोडं बरं नाही.
"अरे काय झालं? डॉक्टर कडे जायचं का ?" त्याचा चेहरा चिंतातुर झाला.
" गरज असेल तर सांगा मी घेऊन जातो"

मुलाने आवाज दिला, "बाबा तुमचं विद्यार्थी आलाय
चव्हाण सरांना तो इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. पटकन दात घासून आवरून आले.
पत्नी तोपर्यंत आवरत होती.

"अरे सकाळीच येणं केलंस, सुहास कसा आहेस?" तो सरांच्या पाया पडला त्यांचा स्नेह सन्मान पाहून नकळत सरांना स्वतःच्या मुलाचं कालचं असभ्य बोलणं आठवलं आणि डोळ्यांतून अश्रू व्हायला लागले.

ते त्याच्या गळ्यात पडले.
" काय झालं सर तब्येत बरी नाहिय का?"
काही त्रास आहे का? चलामी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो."

नको रे बाबा मी बरा आहे. हे आनंदाश्रू आहेत.

" आज लवकरच आलो कारण हो कंपनीसाठी साईट बघायला जायचे आहे मग नागपूरला जायचय. पु न्हा दोन दिवस वेळ मिळणार नाही म्हणून सकाळी सकाळीच दर्शन घेण्यासाठी आलो. सर ,तुमचे आशीर्वाद असावेत.

"आरे ते आहेतच नेहमी."

मिठाई व पुष्पगुच्छ देऊन निघण्याच्या बेतात होता.
आतमध्ये सून मुलाला म्हणाली "स्वत च्या लेकाला पाहून कधी एवढं प्रेम येत नाहीत केवळ विद्यार्थ्यांवरप्रेम. इतके श्रीमंत शिष्य असून काय उपयोग आहे ?"

एखादी मदत तर नाही करत कधी?"

हे शब्द नकळत त्याच्या कानावर पडले आणि त्याला कळालं की घरामधली परिस्थिती बरी नाही.

" सर बाहेर चहा घेऊयात ,चला माझ्याबरोबर"

सूनेला वाटलं सुंठेवींना खोकला गेला.

सर बाहेर पडले . बाहेर येताच त्याने सरांना आपल्या गाडीत बसवलं आणि विचारलं सर कुठे न्यायची गाडी दवाखान्यात की चहाच्या टपरीवर ?

सर एकदम रडायलाच लागले.
सत्तरीचं माणुस सुद्धा धाय मोकलून रडतो सुहासनच्याने बघवले गेले नाही.

" सर मनमोकळं बोला!"
" घरोघरी मातीच्या चुली, घरातली परिस्थिती काय सांगावी, प ण आम्हा दोघा म्हातार्‍याना या वयात दोन बॅगा घेऊन घराच्या बाहेर निघा लागणार आहे.

कुठे जायचं ठरवलंय का?

नाही रे बाबा देवाच्या मनात काय माहीत नाही .
जगु कुठे तरी वृद्धाश्रमात नाहीतर राहू कुठेतरी पुलाच्या खाली.

सर माझ्या घरी चलता काय?

नाही रे बाबा तू देव माणूस आहेस पण हे घरी वगरे नेण्याची भाषा करू नकोस माझ्याच्याने ते सहन होणार नाही.
ठीक आहे सर

कुठे भाड्याने राहाल का?
हो !भाड्याने एक खोली झाली तरीही ठीक आहे.

त्यामुळे गाडी स्टार्ट केली अाणि चहा पिण्यासाठी हॉटेलजवळ थांबवली.
हॉटेलमध्ये बसल्यानंतर त्यांनी दोन चार कॉल केले .
"सर चला तुमची सोय झालेली आहे."

सरांना घेऊन तो घरी आला तोपर्यंत सरांच्या बायकोने बॅगा भरून ठेवल्या होत्या.
या दोघांना घेऊन तो गाडीत निघाला .
त्यांच्या ओळखीने त्याने दोघांसाठी खोली आणि एक मेस ची ही व्यवस्था केली होती.

खोली खूपच चांगली होती अद्ययावत आणि हवेशीर आणि खालचा मेसवाल्या मुलाला वरती बोलावून सांगितलं," वेळेवर ते नाश्ता दोन वेळ जेवण यांना आणून द्यायचं वाढून द्यायचं यांचे डबे घेऊन जायचे. एवढी जिम्मेदारी तुझी. त्याचे काय घेशील ?"

सरांनी सुहासला लाखो आशीर्वाद दिले. नको वाटलं हे पण नाईलसज होता.
" मी काय सांगतोय, मी आहे सर !तुम्ही असेपर्यंत हा सगळ्या खर्चाची जबाबदारी माझी. तुमचा अजून एक मुलगा आहे!"

" अरे पण तुला ?"

"सर हे माझ्यासाठी काहीच नाही. तुम्ही जे ज्ञान दिले आणि दिशा दाखवली त्यापुढे खूप क्षुल्लक आहे !"

"इतक्या वर्षांत मी तुम्हाला परतून काही दिलं नाही.
तुम्ही माझे गुरू , ही माझी गुरुदक्षिणा आहे असे समजा!"

आयुष्यभर शाळेत हजारो विद्यार्थ्यांना शिकवलेल्या शिक्षकांसाठी आजची गुरुपौर्णिमा खूप वेगळे होती.

असं एक शिष्य जरी एका गुरूला मिळाला तर त्यांचे आयुष्य धन्य झाले असे समजावे .

त्यांनी खूपच उदारतेने त्याला आशीर्वाद दिले.

सुहास परत निघाला असल्याची चेहऱ्यावर ते खरंच गुरुपौर्णिमा साजरी केली त्याचं तेज दिसून येत होतं !


©® स्वाती  बालूरकर , सखी

दिनांक १७. ०७ .२०२२