Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

गुरू शिष्य

Read Later
गुरू शिष्यशिर्षक : शिक्षकांना पत्र


प्रति,
माननीय श्री. निकम सर,

मी पल्लवी ढवळे. तुमच्या शाळेत इयत्ता पहिलीला आले तेव्हा पासून तुमची विद्यार्थीनी आहे. आज ही आहे. जेव्हा pn तुम्हाला भेटते तेव्हा काही ना काही शिकायला मिळते.
आज शिक्षक दिन आहे. पहिला तुम्हाला प्रणाम करते. आपल्या पंडित विष्णु दिगंबर विद्यालयात १०वी पर्यंत होते. त्यावेळी सावंत सर, बामणे सर, कांबळे सर,पोतदार सर, पवार सर, पाटील सर, गुरव सर, शिरतोडे सर, पुदाले सर, नरूले मॅडम, बिराज मॅडम, कोळी मॅडम, मेरू मॅडम यांची मोलाची साथ मिळाली.
अस वाटत होते की आपली भेट आता लवकर होणार नाही पण तुम्ही एक निर्णय घेतला की कॉलेज पण चालू करायचे तर आमच्या तुकडीच्या आनंदाला पाराच राहिला नाही. आम्हाला परत एकदा तुमची साथ लाभली आणि आम्ही १२वी पास झालो
तुम्ही नेहमी सांगत असता की प्रत्येक वेळी काही ना काही शिकत राहायचं. हे मी माझ्या आयुष्यात नीट निभावले. मी नेहमीच काहीतरी शिकण्याच्या प्रयत्नात असते.
तुम्ही माझ्या आजीकडे भाजी आणायला गेल्यावर माझी चौकशी करत असता की मी कशी आहे माझ्या मुली कश्या आहात. तुम्ही भेटला की आजी मला सांगत असते.
आता पलुसला आल्यावर नक्की शाळेत येऊन तुमची सर्वांचीच भेट घेईन. तुमच्या आशिर्वादाचा हात नेहमी असाच माझ्या डोक्यावर राहो. हीच देवाकडे प्रार्थना करते

तुमची लडकी विद्यार्थीनी
सौ. पल्लवी स्वप्निल ढवळे
इचलकरंजी, कोल्हापूर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

@swapallu

Blogger

✍️Intention is very important in every action in my life ✍️

//