गुरूने दिला ज्ञान रुपी वसा..

आई रोज तिला किती तरी कामाच्या गोष्टी सांगायची पण ती या कानांनी ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची.


गोष्ट छोटी डोंगराएवढी..

गुरूने दिला ज्ञान रुपी वसा..

©️®️शिल्पा सुतार
......

नितू शाळेत जाणारी गोड मुलगी एकुलती एक. सगळं अगदी स्वतः च्या मनाप्रमाणे व्हायला हव अस तिला वाटायच. कोणाच काही ऐकुन घ्यायच नाही अस ठरवल होत तिने. शाळेतल्या गोष्टी लगेच ऐकायची ती. तेच घरच्यांनी सांगितल तर पटायच नाही तिला. आजी आई नुसत्या रागवत असतात. सारख शिकवत असतात. अस वाटायच तिला. त्यामुळे ती नाराज असायची. त्यातून चांगला घ्यायची नाही. मुद्दाम दुर्लक्ष करायची.

आई रोज तिला किती तरी कामाच्या गोष्टी सांगायची पण ती या कानांनी ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायची. काही विशेष नाही त्यात आई अतीच करते. उगीच मागे लागते. आई तू जरा शांत रहात जा ग. मला समजत आता. मी काही लहान नाही. अस सुरू असायच तीच.

आईसमोर भाजी निवडत होती, आजी टीव्ही बघत होती. आजीचे सांगेल ते सगळं आई ऐकत होती, आजी पण काही दुखलं खुपल की आईला सांगत असे.

" काय ग आई तुला माहिती नाही का कसं करायचं स्वयंपाक? आजी सारखं सांगते हे कर ते कर आणि तू ऐकते",.. नितु

" असू दे सांगू दे त्यांना, कोणाच ऐकलं तर दोन गोष्टी शिकायला मिळतात, त्यांना ही समाधान वाटत ",... आई

नितु काही म्हटली नाही.

"मिळुन मिसळून राहायच असत ग, तू ही जरा ऐकायची सवय ठेव ",.. आई

आज ही असच झाल मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टी साठी नीतु गेली.

" यायला खूप उशीर करू नकोस ग नितु",.. आई

पण जे व्हायचं ते झालं. नितुने आईच्या सूचनांकडे लक्ष दिले नाही. एकदमच रात्रीची ती घरी यायला निघाली. त्या कॉलनी पासून या कॉलनीत येण्यासाठी मध्ये एक गार्डनच्या बाजूने रस्ता होता. तिथे दोन-तीन लोक बसून टवाळक्या करत होते. नीतू तिथून येत होती तर ते लोक गाणी म्हणून हसत होते. एक दोन जणांनी मागे येण्याचा प्रयत्न केला.

नीतू अजून का आली नाही हे बघायला आई बाबा येतच होती त्यामुळे पुढचा प्रसंग टळला. नीतू पटकन घरात निघून गेली. अगदीच कोंडल्यासारखं झालं होतं तिला. आईचा ऐकायला पाहिजे असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं.

"रोज रात्री शाळेची बॅग भरून ठेवत जा ग नितु. तुझी सकाळी खूप धावपळ होते, लवकर उठत नाहीस तू ",.. आई

तरीसुद्धा नितुने बॅग भरली नाही. होत दोन मिनिटात. काय त्यात.

दुसऱ्या दिवशी परत उठायला उशीर झाला तिला. मग जो काही पळापळी सुरू झाली.

आजही आईने पुढे जाऊन बस थांबवली. पटकन जे आहे ते घेऊन नितु शाळेत गेली, दोन वह्या घरीच राहिल्या टीचरने शिक्षा केली ती वेगळी.

नीतू घरी आली आईजवळ बसली... "आई आय एम सॉरी तू मला काल म्हटली होती की बॅग भरून ठेव. तरी मी तुझा ऐकलं नाही. त्या दिवशी ही तू सांगितल होत रात्र करू नकोस लवकर ये तरी मी लक्ष दिल नाही. माझ नुकसान होत अश्याने. मी तुझ ऐकायला हव होत. तू मला छान वेळापत्रक करून देना. कुठल्या वेळेत काय करायचं ते. मी बरोबर तू सांगते त्याप्रमाणे करेल. मला ऐकायच आहे तुझ",

"बेटा समोरचा त्यांच्या अनुभवातून दोन गोष्टी सांगत असतो, त्यातून काही शिकता आल तर चांगल असत" ,.. आई

"हो आई मोठे नेहमी चांगल सांगतात",.. नितु

"बेटा गुरू छोटा मोठा नसतो, तुझ्या काही गोष्टी छान आहेत त्या तू सांगितल्या तर आम्ही आत्मसात करू. नवीन पिठी कडुन शिकण्यासारख खूप असत ",.. आई

" जस आजी तुझ ऐकते तू आजीच ",.. नितु

हो..

" आणि आता मी तुझ ऐकणार",..नितु

"आणि मी पण तुझ ",.. आई

दोघी हसत होत्या.

अनुभव हा ही सगळ्यात मोठा गुरू असतो, पण आपली कोणी काही सांगितल की ऐकायची तयारी नसते, अशा प्रसंगात स्वतः अनुभव आला तर त्या गोष्टीच महत्त्व पटत.