Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा

Read Later
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा


गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय - गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मनुष्य प्रत्येक घटनेतून किंवा गोष्टीतून काहीतरी अनुभव घेत असतो व त्या अनुभवातून नवनवीन ज्ञान मिळवत असतो.
आई वडिलांनी कष्ट करून शिकविले.आई वडिलांचे उपकार आयुष्यात कधीही विसरूच शकत नाही.
इयत्ता आठवीत शिक्षण घेत असतांना माझे इंग्रजी विषय शिक्षक आ.श्री.वडतकर सर यांच्या अनमोल मार्गदर्शनाने माझ्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली.
शिक्षण घेत असतांनाच माझ्या घरच्या परिस्थितीची सरांना पुर्णपणे जाणिव असल्यामुळे माझ्या होणाऱ्या चुकांबद्दल त्यांनी कधीही मला शिक्षा केली नाही उलट मला समजावून सांगायचे.
इंग्रजी विषयाचे महत्त्व समजावून सांगताना जीवन जगताना इंग्रजीचे महत्त्व, इंग्रजी भाषेचा पाया, इंग्रजी व्याकरण व भाषा समजायला, लिहायला व बोलायला किती सोपी आहे व अत्यावश्यक आहे हे सरांनी अत्यंत प्रेमाने व आपुलकीने समजाऊन सांगितल्यामुळे माझी इंग्रजी या विषयाची भिती हळूहळू दूर होत गेली व मी इंग्रजी विषयात रस घेऊ लागलो.
सर्वप्रथम मी इंग्रजीचा पाया म्हणजेच व्याकरण समजून घेऊन सराव केला.
इंग्रजीच्या व्याकरणाचा सराव करतांना होणाऱ्या चुकांची जाणीव सर वेळोवेळी करून देत होते.तीन महिन्यांच्या सरावानंतर वाक्य तयार करायला लागलो.
सरांच्या प्रेमळ मार्गदर्शनाने माझा आत्मविश्वास दृढ होत गेला.
वाक्यांच्या सरावानंतर मी स्वतःच इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू लागलो .
सुरवातीला भरपूर चुका होत होत्या.सर त्यात दुरुस्ती सुचवायचे.
त्यानंतर सरांचे व माझे संभाषण पुर्णपणे इंग्रजी तूच सुरू झाले.शाळेच्या प्रत्येक परीक्षेत इंग्रजी विषयात मला सर्वाधिक गुण मिळू लागले.
शालेय भाषणे,सर्व प्रकल ,संचालन मी इंग्रजीतून करू लागलो.
इंग्रजीच्या अध्यापन व मार्गदर्शनासोबतच आ.श्री.वडतकर सरांनी माझ्यात नैतिकतेची सर्व मूल्ये रूजविली व मातीच्या गोळ्याला यथायोग्य आकार दिला.
जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येला व घटनूला आत्मविश्वासाने,खंबीरपणे,समर्थपणे कसे तोंड द्यायचे व यश कसे खेचून आणायचे हे विविध उदाहरणे व अनुभव सांगून शिकविल्यामुळे आज मी यशस्वी जीवन जगत आहे.
आ.श्री.वडतकर सरानसारखे गुरू दीपस्तंभाप्रमाणे कार्य करतात व आयुष्यरुपी महासागरात भरकटलेल्या जहाजांना यथायोग्य दिशा दर्शविण्याचे काम करतात.
माझे आदर्श श्री वडतकर सर यांनी दिलेला ज्ञानरूपी वसा मला क्षणोक्षणी उपयोगी पडत आहे व त्याचे संक्रमण मी पुढील पिढीकडे करून भारताचे सुजाण नागरिक घडविण्याच्या प्रयत्न करीत आहे.
आ.वडतकर सर जर मला भेटले नसते तर माझे जीवन वाळवंटाप्रमाणे विराण बनले असते.
आ.वडतकर सरांच्या चरणी माथा टेकवून प्रत्येकालाच सरांसारखे गुरू भेटो व प्रत्येकाचू जीवन नंदनवन बंधो तसेच सरांना निरोगी निरामय दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आ.सर, तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद.
तुमचे ऋण मी आयुष्यात फेडूच शकत नाही व शकणारही नाही.
©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Suhas Mishrikotkar

Teacher

I like writing poems,playing games,Reading

//