गुरू आहे जीवनाचा शिल्पकार.

गुरू शिवाय शिष्याला ज्ञानाचा अमृतरूपी वसा मिळणे अशक्य आणि जेव्हा शिष्य यशस्वी होते गुरुने दिलेले ज्ञान सार्थ होते. गुरुची गुरूदक्षिणा हीच.

एक गाव सुंदर निसर्गरम्य असे.‌गावातील लोक सुखासमाधानाने रहायचे. गावात सर्व काही प्रमाणात सुख - सुविधा शासनाने दिल्या होत्या पण गावात अजूनही शाळेची व्यवस्था नव्हती. गावातील पोरांना शहरातील शाळेत पाठवण्याची इच्छा त्यांच्या पालकांची नसली तरी आपल्या मुलांनी शिकावं असं त्यांनी ठरवले जरी.... शासनाने दुर्लक्ष जरी केले तरी या गावात शाळा चालू करायची असे इथल्याच ग्रामस्थांनी ठरवले.‌गावापासून थोडं दूर एक वापरात नसलेली जमीनीवर शाळा बांधायची ठरवली. सर्व गावकऱ्यांनी ही गोष्ट सरपंचाच्या कानावर घातली.‌ सरपंचाना याबाबतीत काही अडचण नव्हत उलट पोरांचं भले होईल म्हणून त्यांनी होकार दिला.‌

दुसऱ्या दिवसापासून शाळेच्या बांधकामला सुरूवात झाली. काही आठवड्यांत शाळा पूर्ण झाली. गावातील उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले संतोष आणि अजिंक्य या दोघांनी या शाळेत मुलांना शिकवण्याची जबाबदारी घेतली.
‌सुरूवातीला आवश्यकता म्हणून शाळेचे वर्ग १० वी पर्यंत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्याचं गावातील असलेले पण शहरातील शाळेत शिकवणारे व आत्ता निवृत्त झालेले भरत यांना केले गेले. शाळेत हळूहळू विद्यार्थी येऊ लागले. संतोष आणि अजिंक्य यांनी मुख्याध्यापक यांच्या संमतीने मुलांना एक नवीन शिकवण्याची संकल्पना मांडली.
गाणे, कविता किंवा मुलांचे आवडते खेळ छोटे छोटे ज्यातून त्यांच्यात शिकवण्याची आवड निर्माण होईल. सुरूवातीला तर भरत यांना ही संकल्पना काही खास नाही वाटली कारण ते शाळेत ज्या होते तिथे कडक शिस्तीखाली पोरांकडून अभ्यास करून घेतला जायचा पण मारले कधी नाही गेले पण शिस्तीमुळे मुले अभ्यास करायची.  शेवटी त्यांनी नकार दिला तरी संतोष आणि अजिंक्य त्यांच्या मतांवर ठाम राहिले. त्यांना या साठी मुलांवर खूप मेहनत घ्यायची होती.

सगळी मुले - मुली आत्तापर्यंत अशिक्षितच होते. त्यामुळे त्यांना सुरूवातीपासून शिकवावं लागणार होते. सुरूवातीला ते दोघेच शिक्षक होते.त्या दोघांच तिथल्या विद्यार्थ्यांवर प्रेम असेल तरी शिस्त मात्र त्यांनी तशीच ठेवली.‌ ते विद्यार्थ्यांना मारत नसतं पण अशी शिक्षा देत जी त्यांना काही शिकवलं, त्यांच्या ज्ञानात भर पडेल. यामुळेच विद्यार्थ्यां बद्दल त्यांच्या मनात भिती नव्हती तर आदर होता.

हळूहळू शाळेचा नावलौकिक वाढत होता.‌ विद्यार्थ्यांची प्रगती होत होती.‌ संतोष आणि अजिंक्य अजूनही या आशेवर होते की शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मुलांना शिकवलं जाईल पण अजूनही भरत मुख्याध्यापक आपल्या मतावर ठाम होते कारण यामुळेच शाळेचा नावलौकिक वाढत आहे.‌पण कुठेतरी संतोष आणि अजिंक्यला वाटत होते की विद्यार्थ्यांवर अजूनही दडपण आहेच पण मुख्याध्यापकासमोर ते बोलू तर शकत नव्हते.‌ संतोष आणि अजिंक्य हे मात्र विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते जरीही शाळेत‌ नवीन शिक्षक आले तरीही.

आता दहावीच्या शाळेपुढे कॉलेज ही उभारण्यात आले. शेजारच्या गावात असलेल्या कॉलेज शिक्षणासाठी अनुपयुक्त होते. मग गावातील लोक, संतोष, अजिंक्य, भरत यांनी प्रयत्न केले आणि शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर कॉलेजच्या निर्माणसाठी शासनाने अनुदान दिले व काही शिक्षकांना शहरातील तिथे नियुक्त ही केले आणि संस्थाही तिथे सरकारी जी कॉलेजचा कारभार पाहिल अशी व्यवस्था केली. ज्या विद्यार्थ्यांनी अजिंक्य आणि संतोषला शाळेत शिकवले त्यांनी त्या कॉलेजमध्येही आपल्याला शिकवावे अशी विनंती केली पण अजिंक्य आणि संतोषने मात्र याला नकार दिला पण तरीही त्यांना काही अडचण वाटली तरी अभ्यासात तरी मदत करतील असे सांगितले. कॉलेजमध्ये त्यांना शिकवायला अडचण नव्हती पण सरकारी संस्थांच्या हाताखाली शिकवणे त्यांना मान्य नव्हते कारण त्यांना माहित होते.‌ त्यांना शाळेतच शिकवणं जास्त मान्य होते‌.

शाळेत हळूहळू आधुनिकीकता येत होती ज्या गोष्टीला शेवटी मुख्याध्यापक भरत यांनीही मान्यता दिली व संतोष आणि अजिंक्य यांना त्यांच्या कल्पकतेनुसार शिकवण्याची परवानगी दिली. शाळेच्या बरोबरच त्या कॉलेजचाही नावलौकिक काही वर्षांत वाढला‌.‌याला काही अंशी अजिंक्य आणि संतोष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करणारे होते.काही दिवसांनी भरत सर मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या सत्कार केला. अजिंक्य आणि संतोषने त्यांना या निवृत्तीच्या समारंभात शाळेला मिळालेला आदर्श पुरस्कार व आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार असे दोन्ही सन्मानचिन्ह दिले.‌ यामुळे ते भारावून गेले.‌ शाळेतील विद्यार्थ्यांनी ही त्यांच्या लाडक्या मुख्याध्यापकांचा सत्कार केला आणि भावी आयुष्यासाठी त्यांचा आशिर्वाद घेतला.

अजिंक्य आणि संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली तय्यार झालेले विद्यार्थी आता वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कार्यरत झाले होते.शाळेत, कॉलेजमध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या. ते पाहून संतोष आणि अजिंक्य यांना खूप आनंद झाला.‌ संतोष आणि अजिंक्यला वाटले आता यातून निवृत्त व्हावे आणि नवीन शिक्षकांना संधी मिळावी. खरंतर नवे आणि जुन्या विद्यार्थ्यांची इच्छा नव्हती की त्यांनी निवृत्त व्हावे पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी त्यांचा निवृत्त साधाच झाला सर्व विद्यार्थ्यांनी त्यांनाही त्यांची आठवण राहील अश्या छोट्या पण सुंदर भेटवस्तू दिल्या. भरत सर , अजिंक्य आणि संतोष यांना शासनाने त्यांचं आयुष्य सुखी , समाधानाने इतकं निवृत्ती वेतन दिले. अजिंक्य आणि संतोष शेतीत परत गुंतले होते.
पण त्यांनी लावलेल्या शाळेच्या इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष आज बहरला होता, त्यांच्या मेहनतीचे यश‌ आनंदाने भरत सर, अजिंक्य आणि संतोष पाहत होते.
समाप्त.