गुंतता हृदय हे भाग 64
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?
©️®️शिल्पा सुतार
खुशी कबीर आत येवून बसले. खुशी अजूनही डोळे पुसत होती. कबीरने इशारा केला. विराजने दरवाजा लावून घेतला. उगीच खुशी बाहेर बघेल. घरच कोणी दिसल की रडेल.
" खुशी पुरे ना आता. तुला त्रास होईल." कबीर तिला समजावत होता.
" कबीर आई बाबा..." तिला बोलता येत नव्हत इतक मन भरून आल होत.
" जास्त विचार करायचा नाही. शांत हो." कबीर तिच्या जवळ होता.
"वहिनी पाणी घे. " सुदेश पाणी घेवून आला.
"वहिनी आता तू रडली तर मी तुझे फोटो काढेल. रडके फोटो आले तर मला सांगू नकोस. " विराज म्हणाला.
बाकीचे आता हसत होते. खुशी पण हसत होती. "आपण चहा घेवू या."
हो.
"वहिनी या पुढे धमाल करायची आहे." सुदेश, सोनू तिच्याशी बोलत होते.
सुलक्षणाताई, रश्मी ताई भेटल्या. विलास राव, सतीश राव बोलत होते. "आम्ही निघतो. काळजी करू नकोस सतीश."
" नाही. काळजी कसली. तुम्हा दोघांना मी पूर्वी पासून ओळखतो." सतीश राव रश्मी ताईंना खूप सांभाळत होते. ते त्यांच्या कॉटेज मधे आले. रश्मी ताई नुसत्या बसल्या होत्या. बाकीचे आवरत होते.
सविता मामी खूप कामात होत्या. त्यांनी सगळं सामान व्यवस्थित ठेवलं होतं. सविता, सुलक्षणा ताई, विलास राव पुढे गेले. त्यांना कबीर, खुशीच स्वागत करायचं होतं.
चहा झाला. खुशी आता ठीक होती.
"चला निघू. ड्रायवरचा फोन आला." कबीर म्हणाला.
ते पार्किंग मधे आले. कबीर खुशी सोबत सुदेश, विराज, सोनू होते. कोणी कुठे बसायच ते ठरत नव्हत. सोनूच्या बाजूला खुशी बसली होती. तिच्या बाजूला कबीर. मागे सुदेश, विराज होते. कार मोठी होती.
आता खुशी सगळ्यांशी बोलत होती. ती बघत होती आई बाबा निघाले का? पार्किंग मधून दिसत नव्हत.
"खुशी ठीक आहेस ना?" ती आज खूप रडली म्हणून कबीर काळजीत होता.
"हो. ठीक आहे. आई बाबा गेले असतिल का?" तिने विचारल.
"हो निघतील ते. आता विचार करू नकोस." परांजपे मॅडम ही त्रास करून घेतात त्याने बघितल होत.
ते निघाले. थोड्या वेळाने सतीश राव, रश्मी ताई ते ही निघाले. मागचं आवरायला बरेच लोक होते
कार मधे कबीर जरा नीट बसला होता. कारण मागे सुदेश विराज होते. ते खुशीशी बोलत होते. पुढे ड्रायवर आणि बॉडी गार्ड होते. त्यांची सजवलेली कार गावातून पास झाली.
चौकात रुद्रचा भाऊ विकी गाडीत बसलेला होता. तो तिथल्या मुलांशी बोलत होता. तो कालच गावात आला होता. त्याला समजल होत विक्रांत मामाला मदत केल्या मुळे रुद्रला अटक झाली.
आज सकाळी तो पोलीस स्टेशन मधे जावुन दोघी मामाना भेटला होता. कबीर बद्दल मामा खूप सांगत होते. त्याने लग्नाला बोलवलं नाही. बेल मिळू देत नाही. आम्ही एवढ ही काही केल नाही त्या मानाने ही शिक्षा खूप आहे.
विकीने रुद्रला जामीन मिळवून दिला. काय झाल होत नक्की रुद्रने त्याला पूर्ण केस सांगितली होती. त्याला कबीरचा राग आला होता. मी त्या कबीरला सोडणार नाही.
"गाडीत कोण होत? " विकीने विचारल.
"तो कबीर नाईक. आजच लग्न झाल. नुसत कौतुक सुरू आहे. " एका मुलाने सांगितल.
"कोणाशी?"
"खुशी परांजपे. तिची कंपनी त्याने टेक ओव्हर केली होती. धमकी दिली असेल तिला आणि तिच्या बापाला. नाहीतर इतक झाल्यावर त्या पोरीने थोडी याच्याशी लग्न केल असत." तोंडाला येईल ते मूल बोलत होते.
"बरोबर, खूपच शहाणा दिसतोय कबीर. रुद्र दादाला ही याच्यामुळे अटक झाली. " विकी म्हणाला.
" असाच आहे तो दादागिरी करतो. पैशाचा माज आहे. "
"त्याची गुर्मी मी अशी उतरवेन. मला याची पूर्ण माहिती हवी. दोघ मामांना जामीन मिळतो का ते बघा. त्यांना बाहेर काढायला हव. वर पर्यंत आपली ओळख वापरा. " विकीने सांगितल.
हो... हो.. एक दोघे त्याचे चमचे म्हणाले. श्रीमंत मुलांसोबत फुकटच खायला. मजा करायला ते नेहमी सोबत असायचे.
" अरे पण या मामा लोकांनी त्या कबीरला त्रास दिला. त्याचे वडील किडनॅप होते. त्यांना किती त्रास झाला. तो चिडणारच. " सौरभ म्हणाला. तो जरी विकीचा मित्र होता तरी तो विराजला ओळखत होता.
"ते सगळं ठीक आहे. तरी रुद्र दादाला का पकडल? ते ही इतके दिवस. त्याने काय केल होत? याचा मला राग आला आहे. तुझ्या लोकांना कर ना काय करायच ते. त्याने रुद्रची माफी मागायला हवी. त्याच्या वरचे सगळे चार्जेस मागे घ्यायचे. " विकी म्हणाला.
" तो ऐकणार नाही. "
"मग तो आहे मी आहे. " विकी फोन बाहेर काढत म्हणाला. तो कोणाशी तरी बोलत होता. उद्या या ऑफिस मधे बोलून घेवू.
......
......
खुशी कार मधे शांत होती. ती विचार करत होती लहान पणा पासुन आई बाबांनी किती लाडाने सांभाळल. काही कमी पडू दिल नाही. बाबा किती चांगले आहेत. माझ्या चुका पोटात घेतल्या. मुलीच्या आई वडलांच किती मोठ मन असत. इतके दिवस जपलेल्या मुलीला सासरी पाठवायच. थोड्या दिवसांनी भक्ती, दिपूच लग्न होईल. आई बाबा एकटे रहातील. त्यांच्या कडे कोण बघेल?
मुलींच काही खर नसत. चांगल घर मिळाल तर ठीक आहे. नाहीतर परवड असते.
कबीर म्हणतोय आपण बघू त्यांच्या कडे . किती जमतय ते माहिती नाही. कबीर चांगला आहे. तिने त्याच्या कडे हसुन बघितल.
"काय विचार सुरू आहे खुशी?" त्याने विचारल.
"आई बाबांचा विचार येत होता. कस असत ना आयुष्य? ज्या मुलांसाठी इतक करायच त्यांना एक दिवस सासरी पाठवून द्यायच किंवा शिक्षणासाठी पाठवून द्यायच. त्यांना खूप त्रास होत असेल ना." तिचे डोळे भरून आले होते.
"रडायच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतोच. सगळे यातून जातात. उद्या आपल्याला मूल होतील. ते हो थोडे वर्ष आपल्या सोबत असतिल. मग त्यांना त्याचं आयुष्य असेल. आपण सदोदीत त्यांना आपल्या सोबत नाही ना ठेवू शकत. मग आपण दोघच राहू. पण काळजी करू नकोस तेव्हा ही मी तुझ्यावर असच खूप प्रेम करेन. उलट या पेक्षा जास्त करेन . " कबीर म्हणाला.
"जास्त का?" खुशी हसत म्हणाली.
"तेव्हा तुला प्रेमाची जास्त गरज असेल. तरुणपणात कोणी ही नीट वागत. खरी पारख उतार वयात होते." कबीर म्हणाला.
खुशीला खूप छान वाटल. तिने त्याचा हात हळूच हातात घेतला.
घर आल सगळीकडे लाईटींग होती. खूप उत्साही वातावरण होत. खूप फटाके वाजत होते. बॅन्ड ही वाजत होता. मुल कार मधून उतरून पळाले.
" चल खुशी. " कबीरने तिचा हात धरला. ते दोघ थोड नाचले. सविता मामीने दोघां वरून पैसे ओवाळून टाकले.
चला...
"दादा अस नाही वहिनीला उचल मग दारा पर्यंत ने." विराज म्हणाला.
हो. सगळे म्हणत होते. कबीरने खुशीला अलगद उचलून घेतल. ती लाजली होती. दोघ दारापुढे आले.
"उतरव ना खाली कबीर. काका काकू बघतील." खुशी म्हणाली. ती इकडे तिकडे बघत होती.
कबीर तिच्या कडे बघत होता. त्याला इतक जवळ बघून खुशी गडबडली होती. "नाही खुशी. आधी आय लव यू म्हण. त्याने गाल पुढे केला. "
" काय?" खुशी त्याच्या कडे बघत होती.
"समजल ना?" त्याने विचारल.
"काहीही काय? सगळे बघता आहेत. सोड ना कबीर ." खुशी लाजली होती.
"मला फरक पडत नाही. पटकन लव यु बोल. मी म्हणतो ते कर. नाहीतर असच रहा माझ्या जवळ. मी तुला माझ्या रूम मधे घेवून जाईल. "
" तुला जड लागत नाही का?" खुशी हसत म्हणाली.
" हो वाटतय आटोप लवकर."
सुलक्षणा ताई औक्षण साठी ताट घेवून आल्या. त्या दोघांकडे बघून हसत होत्या.
" कबीर..." खुशी त्याच्या हातातून सुटायची धडपड करत होती.
"कबीर अरे सोड तिला खाली. अस कस ओवाळणार? " सुलक्षणा ताई म्हणाल्या.
खूप जोक सुरू होते. बाकीचे हसत होते.
" खुशी पटकन बोल." कबीर हळूच म्हणाला.
" काय सुरू आहे कबीर सोड तिला. " सविता म्हणाली.
" नाही मामी . पटकन खुशी. "
" लव यु. " ती हळूच म्हणाली. त्याने तिला खाली उतरवलं. " बाकी नंतर... इथे लहान मुल आहेत म्हणून सोडल." कबीर हळूच म्हणाला. तो खूप हात दुखल्या सारख करत होता. बाकीचे हसत होते.
" काकू सांगा ना. "खुशी म्हणाली.
" कबीर नको तिला त्रास देवू. खुशी तू मला आई म्हण काकू नाही." सुलक्षणा ताई म्हणाल्या.
सुलक्षणा ताई, मामींनी दोघांना ओवाळून घरात घेतल. त्यांनी मोठ्यांचे आशिर्वाद घेतले. सगळे खुशीच्या आजुबाजूला होते.
"खुशी तुला काय हव ते सोनूला सांगायच." सविता म्हणाली.
"ठीक आहे."
कबीर नेहमी प्रमाणे विलास रावां जवळ बसला होता.
" उठ इथून कबीर. जा आता तिकडे बघा तुमच मुलांच. " विलास राव ही थकले होते ते रूम मधे गेले.
कबीर खुशी जवळ येवून बसला.
मामी इतर नातेवाईक पुढच्या खेळाची तयारी करत होते. एकीकडे चहा पाणी झाल.
"इकडे या कबीर, खुशी." पुढचे कार्यक्रम सुरू झाले. दोघ पाटावर बसले. मधे मोठ घंगाळ होत त्यात पाणी फुल थोड दूध होत. विराज, सुदेश, सोनु, खुशीच्या बाजूने होते.
"इकडून या." कबीर त्यांना बोलवत होता.
" नाही आम्ही वहिनीला सपोर्ट करू." सगळे म्हणाले.
"का अस?" कबीरने विचारल.
"तू किती ओरडतो. अभ्यास करायला सांगतो. " सुदेश विराज म्हणाले.
" कोणी तरी एकट." सोनू म्हणाली.
खुशी हसत होती. कबीरचा तिच्या कडे बघून राग पळून गेला.
" मी आहे त्याच्या कडून. माझा मुलगा एकटा कसा राहील. " सुलक्षणा ताई म्हणाल्या.
" आई थँक्यू. आता? घरचा बॉस माझ्या कडून आहे. " कबीर म्हणाला.
अंगठी शोधायचा कार्यक्रम सुरू झाला. खुशी दोन वेळा जिंकली. ती आनंदात होती. मुल तर खूपच खुश होते.
" कबीर अरे काय हे? " सुलक्षणा ताई म्हणाल्या.
" खुशी वहिनी हुशार आहे. " विराज म्हणाला त्या दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या.
कबीर मुद्दाम हसत होता." जिंकु दे जावू दे. आज ती खूप रडली ना म्हणून. " तो म्हणाला.
"अस नाही कबीर मी माझ्या हुशारीवर जिंकली. " खुशी म्हणाली.
" हो बरोबर. लगेच काय स्वतःला क्रेडिट घेतो." मुल म्हणाली.
"अस? चल मामी अंगठी टाक. बघु आता कोण जिंकत. " कबीरने चॅलेंज घेतल.
मामीने अंगठी टाकली. कबीरने एका मिनिटात शोधली. हातात घट्ट धरून ठेवली. खुशीने त्याच्या हातातून अंगठी घ्यायचा प्रयत्न केला. ती त्याच्या कडे बघत होती. तो अंगठी सोडत नव्हता.
तो हसुन बघत होता . त्या सोबत तिचा हात ही धरून ठेवला .
" कोणी घेतली अंगठी?" सगळे बघत होते.
"अर्थात मी आणि चोर बघायचा का. ही बघा. माझ्या हातातून अंगठी घेत होती." त्याने खुशीचा हात दाखवला.
"अजिबात नाही, वहिनी अस करणार नाही." बाकीचे म्हणाले.
"हो ना." कोणीच ऐकल नाही. सगळे तिच्या बाजूने होते.
"चांगल आहे. खुशी नीट गेम खेळ. चीटींग करायच नाही."
हळद उतरवण्याचा कार्यक्रम झाला.
" सविता खुशीला आत ने."
खुशीने कपडे बदलले. सगळ्यां सोबत जेवण झालं.
" खुशी लाजू नकोस. आरामात जेव. कबीर बघ तिला काय हव ते. " सविता म्हणाली.
हो. तो खुणेने विचारत होता. माझ्या हाताने जेवते का? खुशी हसत होती.
खुशी सोनूच्या रूम मधे होती. तिने सतीश रावांना मेसेज केला. "बाबा घरी पोहोचले का?"
" हो आत्ताच. तुझ्या शिवाय घर सून सून वाटत आहे." त्यांनी रीप्लाय दिला.
खुशी रडत होती." वहिनी काय झाल?"
सोनु बाहेर गेली. " दादा वहिनी रडते आहे."
सगळे आत आले . ते तिच्या आजुबाजूला जमा झाले. कबीर लांबून बघत होता. त्याला काळजी वाटत होती.
"वहिनी तुझ काय करायच? दादा तू बॅग भर वहिनी कडे रहायला जा. " विराज म्हणाला.
" हो चला कबीरची तयारी करा. " सविता म्हणाली.
आता खुशी हसत होती. बाकीचे ही हसत होती.
"मी बोलू का खुशीशी पाच मिनिट." कबीर विचारत होता.
हो... बाकीचे बाहेर गेले. तो तिच्या जवळ येवून बसला . "खुशी त्रास करून घ्यायचा नाही. काय झालं? आई बाबांची आठवण आली का?"
खुशी मानेने हो म्हणाली.
" मी आहे ना."
तिने कबीरला मिठी मारली.
" रडण बंद कर बर. माझ्या सोबत रहाते का? तू सोनू सोबत उगीच रडत रहाशील." त्याने विचारल.
"अस चालेल का?"
"का नाही. मी आईला विचारतो. "
" हो मी येते. " खुशी म्हणाली. आता तिला बर वाटत होत.
"आपण आईस्क्रीम पार्टी करू. अजून तुला काय आवडत खुशी ? पटकन सांग." कबीर तिच्याकडे काळजीने बघत होता. खूपच हळवी आहे ही. विराज, सुदेश, सोनू चला आइस्क्रीम आणा. ते सगळे बाहेर बसले होते.
" खुशी ठीक आहे का? " सतीश रावांचा मेसेज आला.
" हो ठीक आहे. आईस्क्रीम खाते आहे. " कबीरला आश्चर्य वाटल. यांना कस समजल खुशी रडते आहे ते. बहुतेक हेच प्रेमाच नात असेल. त्यांच्या मुलीला त्रास झाला की त्यांना बरोबर समजल.
" आता मी खुशीला मेसेज केला तर उत्तर आल नाही. अस होत नाही. ती रडत होती का?" सतीश रावांना बरोबर समजल.
"नाही काका. तुम्ही काळजी करू नका. खुशी ठीक आहे." कबीरने उत्तर दिल.
"अरे वाह वहिनी तुला जास्त आइस्क्रीम. " सुदेश चिडवत होता.
"हो ना आम्हाला ही द्या. वहिनी आता सगळ्यांची लाडकी झाली. " विराज म्हणाला.
सुलक्षणा ताई, मामी किचन मधे होत्या.
"आई मी खुशीला माझ्या सोबत रूम मधे घेवून जावू का?" कबीरने विचारल.
आता काय म्हणणार याला. कस बोलू सुलक्षणा ताई विचार करत होत्या. "अरे कबीर उद्या...."
"मला माहिती आहे उद्या पूजा आहे. देव दर्शन आहे. खुशी सोनू सोबत रडत राहील. माझ्या सोबत थोडी शांत असते. " कबीर काय म्हणाला ते सुलक्षणा ताईंना समजल.
"हो घेवून जा तिला तुझ्या सोबत . सकाळी लवकर उठा. पूजा आहे." सुलक्षणा ताई सविता कडे बघत होत्या. कबीर बाहेर गेला.
" सविता अग ठीक केल ना मी? "
"हो ताई राहू दे त्यांना सोबत."
" चल खुशी तुझ सामान कुठे आहे?" कबीर आनंदात होता.
खुशी, कबीर रूम मधे आले. किती छान मोठी रूम आहे. कबीर तीच सामान नीट ठेवत होता. त्या बाजूला बाथरूम होत. इकडे बाल्कनी. खुशी सगळीकडे बघत होती. आता तिला बर वाटत होत.
" रूम आवडली का? " कबीरने विचारल.
" छान आहे. तुमच घर मोठ आहे. " खुशी म्हणाली.
" आपल. "
खुशी हसली.
"थकली असशील झोप आता. कसलाच विचार करायचा नाही. " कबीर म्हणाला. ती त्याचा मिठीत शिरली.
" नाही खुशी बाजूला हो."
"काय झालं? " ती त्याच्या कडे बघत होती.
" उद्या पूजा आहे ना, देव दर्शन ही."
" ओह अस असत का? कबीर आपण कधी जायच आई कडे?" तिने विचारल.
" आता लगेच नाही. उद्या पूजा होईल मग आपल्याला फिरायला जायच ना. नंतर फर्स्ट लॉटची मीटिंग आहे. मी बिझी आहे. " तो लॅपटॉप घेवून सोफ्यावर बसला.
"तू काय करतोस? " तिने विचारल.
" ईमेल चेक करतोय."
" तू नाही झोपणार ."
" झोपेने ना. "
" कुठे? "
" तुझ्या जवळ. "
"मी तिकडे येवू? " खुशीने विचारल.
"नको, तू झोप. गप्प एकदम. " कबीर म्हणाला.
कबीर मला त्याच्या जवळ येवू देत नाही. खुशी बघत होती. तिला हसू आल. त्रास देवू का याला? नको. कबीर काल पर्वा पर्यंत किती गडबड करत होता. नुसता मला सतावुन सोडल होता. माझ्या मागे मागे करत होता. उद्या पूजा होई पर्यंत सोबत नसत रहायच वाटत. आज किती शांत झाला आहे. आज त्याच त्याच काम करतो आहे. ती त्याच्या कडे बघत होती. हा छान दिसतो.
" खुशी इकडे बघू नको." कबीर त्याच काम करत म्हणाला.
का?
"मला कसतरी होत." तो हसत म्हणाला.
"तु ऑफिस काम करतांना किती सिरियस छान दिसतो. डॅशिंग वाटतो." ती म्हणाली.
कबीर हसत होता. "पुरे सांगितल ना अस बोलू नको."
"का पण?"
"कारण काहीही झाल तरी मला तुझ्या जवळ येता येणार नाही. मी आईला तस सांगितल आहे. उद्या पूजा झाली की मग तू मला काहीही म्हण." कबीर म्हणाला.
"तु छान आहे अस बोलायच ही नाही का? तू माझा नवरा आहेस. " खुशी हसत म्हणाला.
"नाही. "
"काय अस?" खुशी तिकडे तोंड करून झोपली.
कबीर बर्याच वेळ काम करत होता. नंतर तो खुशीच्या बाजूला आला. तिला नीट पांघरुन दिल कपाळावर ओठ टेकवले. तो पण झोपला. आज तो खूपच खुश होता. माझ प्रेम, माझी बायको आज माझ्या सोबत आहे. किती छान वाटत आहे. खुशी मुळे या रूम मधे वेगळच वाटत आहे. तो तिच्या चेहर्याकडे बघत होता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा