Login

गुंतता हृदय हे भाग 62

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 62
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

खुशी, भक्ति बाहेर आल्या. कबीरने त्यांना हात दिला. "चल खुशी." ती कबीर सोबत गेली.

भक्ती त्यांच्याकडे बघत तिथेच उभी होती. विराज तिच्या बाजूला उभा होता. हाय... तो म्हणाला.

हाय.

ही एकटीच बर झाल.

"तुझे भाऊ झोपले वाटत. ते नाही आले तुझ्या सोबत तुझ्या सौरक्षणासाठी? " विराज हसत होता.

" तुला काय. तू त्यांना घाबरतोस वाटत ?" भक्ती म्हणाली.

" मी कशाला घाबरू? माझी बॉडी बघितली ना. " विराजने नुकतीच जिम लावली होती.

" संध्याकाळी चेहर्‍यावरून तसच वाटत होत. तेव्हा तर तू घाबरला होता. " भक्ती नाक मुरडत म्हणाली.

"तू का थांबली आहेस इथे?" विराजने तिच्या जवळ जात विचारल .

" मी खुशीची वाट बघत आहे ." तिने सांगितल.

" ते लवकर येणार नाहीत. जा तू आराम कर. दादा सोडून देईल वहिनीला. "

" तू का थांबला आहेस? "भक्ती त्याच्या कडे बघत होती.

" कोणी आल तर दादाला सांगायला मी उभा आहे. "विराज म्हणाला.

"मला पण तिकडे कोणी विचारल तर? खुशी कुठे आहे? सगळ्यांना वाटेल आम्ही दोघी सोबत आहोत म्हणून मला इथे थांबव लागेल. "भक्ती म्हणाली.

" थांब मग इथे माझ्याशी बोल." विराज तिच्या कडे बघत म्हणाला. तो खुश होता.

याची ही हिम्मत? हा आज दिवसभर माझ्या मागे होता.

तेवढ्यात कोणी तरी बाहेर आल. ते लपले. ते गेले का भक्ती बघत होती. ती विराजच्या जवळ होती. तो कसातरी उभा होता. थोडी जागा होती.

" भक्ती जरा सरक." विराज म्हणाला.

" ओह सॉरी." भक्ती बाजूला झाली.

तो तिला हसत होती.

" हसायला काय झाल?" भक्ती म्हणाली.

"तु हुशार आहेस अस दाखवते. पण खर तर तू ही डरपोक आहे. "विराज तिला चिडवत होता.

"नाही मी डरपोक नाही." तिला राग आला. आता ते झाडाखाली बोलत बसले.

" तू छान डान्स करते. तुझा ड्रेस ही मस्त होता. तू केस कापू नकोस." तो तिच्या कडे बघत होता.

" थँक्स. " याच बरच लक्ष आहे माझ्या कडे. भक्ती विचार करत होती.

"तु आत्ताशी कॉलेज करते आहेस? नाही म्हणजे तू मोठी वाटते." विराजने विचारल.

"हो माझा गॅप होता. मी आता थर्ड इयरला हवी होती. मी जॉब करत होती. कॉलेज केल असत तर खर्चाच काय झाल असत. म्हणून शिक्षण थांबवल होत. " भक्ती म्हणाली तिला जूने दिवस आठवून अंगावर काटा आला.

" खुशी वहिनी कुठे भेटली?"

" जेल मधे. "

"म्हणजे?" विराजला आश्चर्य वाटल.

ती सांगत होती.

" ओह मामाने कंप्लेंट केली होती का ? एवढ्या साध्या वहिनीला चक्क पोलिसात दिल. " विराजला आश्चर्य वाटल. त्याला काय माहिती खुशीला किती त्रास झाला ते.

" हो आणि कबीर जिजुंनी तिला सोडवल. "

" तेव्हा ते प्रेमात पडले का?" विराजने विचारल.

"तुला माहिती नाही यांची स्टोरी?" भक्तीने विचारल.

"नाही आम्ही घरी याबद्दल कधीच बोललो नाही. "

"ते कॉलेज मधे भेटले. " भक्तीने अजून काही सांगितल नाही.

"पण वहिनी तर लहान आहे दादा पेक्षा. "

" तेच तर. कबीर जिजु खुशी साठी मुद्दाम कॉलेज मधे जात होते."

"ओह अस आहे का? तू का जेल मधे होतीस. तू काय केल होत?" त्याला प्रश्न पडला होता.

"माझ्या वर खोटा आरोप होता. मी जेल मधून बाहेर आल्यावर परांजपे काका काकूंनी मला आधार दिला. त्यांच्या घरात जागा दिली. आजपर्यंत एकदा ही दुजाभाव केला नाही, की टोमणे मारले नाही. मला मुलीसारख समजतात." भक्ती म्हणाली.

"परांजपे किती चांगले आहेत."

"खरच, माझ्या साठी तर ते देव आहेत. मी कायम त्यांच्या ऋणात राहणार आहे." भक्ती म्हणाली.

"तुझे आई बाबा कुठे आहेत काही समजल का? " विराजने विचारल.

"माहिती नाही कोण आहेत ते."

"कठिण असत एकट रहाण."

"हो खूप त्यात एका मुलीला तर खूपच मुश्किल असत." दोघ खूप बोलत होते.

"विराज ज्यानी आई बाबा असतात. घर असत. ते खूप लकी असतात. नाहीतर आमच्या सारख्या अनाथ मुलांचे खूप हाल असतात. लोक त्रास देतात. "

" हो खरच. भक्ती तुझ खूप चांगल होईल. " विराज मनापासुन म्हणाला.

" एक सांग पोलीस ठाण्यात कस वाटत? नाही म्हणजे तुला खूपच अनुभव आहे ना. "तो म्हणाला.

तिला समजल तो चिडवतो आहे ती त्याला मारत होती. भयानक वाटत." इथून पुढे काय होईल? कोण वाचवेल आपल्याला अस वाटत. चार भिंतीच्या आत वेगळ जग आहे ते. कधी तर फटके ही बसतात. मला तर आठवण ही नको वाटते. विराज तू साधा चांगला मुलगा आहेस. असाच रहा. "

विराज शांत पणे ऐकत होता.
....

खुशी कबीर चालत मागच्या बाजूला आले.

"अस भेटण बरोबर नाही कबीर ." खुशी म्हणाली.

" आपल फार्म हाऊस आहे. आपल लग्न होणार आहे. असा प्रसंग आपल्या आयुष्यात कधी येणार नाही. एन्जॉय खुशी. काळजी करायची नाही. आहे तो मोमेंट एन्जॉय करायचा." कबीर म्हणाला.

दोघ खूप बोलत होते. ते एका बाकावर बसले.

"खुशी थोड जवळ ये. "

ती त्याचा जवळ सरकली. त्याच्या खांद्यावर डोक ठेवून बसली होती. हात कबीरच्या हातात होता.

" कबीर आपल पुढच आयुष्य कस असेल?"तिने विचारल.

"असच असेल शांत छान. आता काही प्रॉब्लेम नाही. तू सांगशील ते मी करेन खुशी. आपण दोघी आई बाबांना सांभाळू. " कबीर म्हणाला.

"कबीर तू खूप चांगला आहेस." ती म्हणाली.

" खुशी, आपण फिरायला जावू."

"कधी?"

"पूजा झाल्यावर मला नंतर वेळ नाही." कबीर म्हणाला.

"कुठे जायच?"

"मी ठरवल आहे. हिल स्टेशन वर तिथे आपली प्रॉपर्टी आहे. तिकडे जावु आरामात." दोघ बराच वेळ बोलत बसले.

" कबीर झोप येते. "

"चल. " त्याने तिला मिठीत घेतल. कपाळावर ओठ टेकवले. तो अजून पुढे येत होता. त्याची नजर तिच्या ओठांवर होती. खुशी बाजूला सरकली. ती लाजली होती.

" माझ्या सोबत आरामात रहायचा खुशी. तू खूप लाजतेस." तो तिला जवळ ओढत म्हणाला. खुशी त्याच्या मिठीत होती. त्याने पुढे होवुन तिच्या ओठांवर ओठ टेकवले. खुशी लाजून अर्धी झाली होती. ती खाली बघत होती.

"ह्या गोष्टी आपल्याला नंतर आठवतील खुशी. तेव्हा तू विचार करशील तेव्हा मी का इतकी लाजत होते. "कबीर म्हणाला.

खुशी चिडली. "कबीर तू गेलास." ती कबीरच्या मागे पळत होती. "मी तुला सोडणार नाही कबीर. तू मला नुसता त्रास देतो."

कबीर झाडा जवळ थांबला. खुशीला त्याने जवळ घेतल. दोघ शांत उभे होते." मजा आली ना सांग बर. लग्नानंतर थोडी अस भेटणार आपण खुशी. तो चंद्र बघ किती छान आहे .मस्त चांदण पडल आहे. "

" हो ना मला पण अश्या मोकळ्या वातावरणात खूप आवडत. कबीर आपण लग्नानंतर का अस भेटणार नाही?" तिने विचारल.

"तेव्हा तर तू माझ्या सोबत माझ्या खोलीत असशील ना. जायच का? की अजून काही ?" त्याने विचारल.

" हो. जावू या. "

" उद्या ही असच भेटायच का? "त्याने मुद्दाम विचारल.

"नको आता लग्नानंतर." खुशी म्हणाली.

" काय लग्नानंतर. ओह हे किस वगैरे ." कबीर तिला चिडवत होता.

खुशी त्याला मारत होती ." तू कस काय अस स्पष्ट बोलतो कबीर."

" त्यात काय तू माझी आहेस. तुझ्या सोबत मी काहीही करू शकतो. "

दोघ परत आले.

भक्ती ,विराज छान गप्पा मारत होते. खुशी कबीर एकमेकांकडे बघत होते." यांच काय सुरू आहे?"

"दादा वहिनी आले. " विराज म्हणाला.

"तुम्ही लोक गेले नाही. " कबीरने विचारल.

"आम्ही तुमची वाट बघत होतो. "भक्ती म्हणाली.

"जा खुशी आराम कर. भक्ती उठ. गुड नाइट. "कबीर म्हणाला.

विराज अजून त्या दोघींकडे बघत होता.

"विराज."

" काय दादा?"

"काय गप्पा मारल्या?"

"दादा मी तुला विचारल का तू वहिनी सोबत काय बोलत होता ते. "तो निघून गेला.

बापरे छोटे भावंड खूप डेंजर असतात.

दोघी आत येवून आराम करत होत्या. भक्ती विराजचा विचार करत होती. चांगला मुलगा आहे.

खुशी कबीरचा विचार करत होती. लग्न झाल्यावर कबीर सोबत रहाव लागेल. तो मला असच जवळ घेईल का? मला अजूनही धडधड होते आहे. पण तो चांगला आहे. तो असला की टेंशन नसत. होईल सवय. कबीरचा परफ्युमचा वास तिच्या ड्रेसला येत होता. ती खूपच खुश होती.
......

दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता. मेहंदी आर्टिस्ट आलेल्या होत्या. खुशी तयार होती. तिने हिरवा लाल ड्रेस घातला होता.

आधी सगळ्यांचा नाश्ता झाला. सगळे मुल एकत्र बसले होते. भक्ती विराज खूप सोबत होते. यांच्यात मैत्री कशी झाली बाकीचे विचार करत होते. मंगेश, प्रकाश एकमेकांकडे बघत होते.

"आता आमचा मेहेंदी प्रोग्राम आहे. तुम्ही मुल काय करणार? " खुशीने विचारल.

" आम्ही ही येणार प्रोग्रामला." कबीर म्हणाला.

"काय करणार तिथे?"

"मी बघेन तुला काय हव ते. मी तुझी काळजी घेईन." तो तिच्या कडे बघत होता. ती लाजली होती. ते दोघ बोलत होते. दोघांचे तसेच नॅचरल सुंदर फोटो घेत होते .

खुशीची मेहेंदी काढायला सुरुवात होणार होती . कशी डिझाईन हव ती सांगत होती.

"कबीर तू काढ ना माझ्या हातावर थोडी मेहेंदी ." तिने आग्रह केला. तुझ्या नावाची मेहेंदी. तू सुरवात कर.

"मला येत नाही. " कबीर म्हणाला.

"थोडी, माझी इच्छा आहे. "

त्यांने कोन हातात घेतला एक गोल काढला. सुरवात करून दिली. आता मेहेंदी आर्टिस्ट मेहेंदी काढत होत्या.

" मेहेंदीत नाव काय लिहायच?"

" कबीर. " खुशी लाजून म्हणाली. तिचे गालावर गुलाबी रंग आलेला होता. कबीरची नजर तिच्यावर होती. ते दोघ वेगळ्याच जगात होते.

भक्ती, श्रुती एका बाजूला बसलेल्या होत्या. त्यांच्या हातावर मेहेंदी काढत होते.

"तुम्हाला काय गरज आहे मेहेंदी काढायची? वहिनीच ठीक आहे तीच लग्न आहे. दादा साठी ती मेहेंदी काढते आहे. तुम्ही कोणासाठी काढताय?" विराज विचारत होता.

"अस काही नाही आम्ही आमच्या साठी काढतोय." भक्ती म्हणाली.

" श्रुती वहिनी तुझ लग्न कधी आहे?" विराजने विचारल?

" अजून तारीख ठरली नाही."

"तु तिला वहिनी का म्हणतोस? " भक्ती म्हणाली.

" रोहित दादा, कबीर दादाचा मित्र आहे ना म्हणून. "

"कबीर तू ही थोडी मेहेंदी लाव." सुलक्षणा ताई त्यांच्या जवळ येवून बसल्या .

"नाही आई .काहीही काय ." त्याने ऐकल नाही.

सगळ्या मेहंदी लावून तयार होत्या. मुलं उगाच त्यांच्यामध्ये मध्ये करत होते.

कबीर तर जिथे खुशी होती तिथून हलला सुद्धा नव्हता. कोणी बोलावलं तरी सुद्धा तो जायचा नाही. खुशीशी बोलत बसला होता. दुपारी त्या दोघांनी सोबत जेवण केल. खुशीला त्याच्या हातून जेवायला छान वाटत होत. ती इकडे तिकडे बघत होती कोणी बघत का ते.

"लाजू नकोस आरामात जेव. काय हव?" कबीर तिला घास भरवत म्हणाला.

"इथे छान सुरु आहे. " विराज सुदेश त्या दोघांजवळ आले. यांचा फोटो घ्या अस एकत्र जेवताना. "वहिनी भाजी गोड लागते का?"

" मुलांनो जा इथून. आम्हाला डिस्टर्ब करू नका. नाहीतर तुमच नंतर काही खर नाही. समजल ना. " कबीर म्हणाला.

ते गेले." दादा जास्त करतो." विराज चिडला होता.

"हो ना. आपण वहिनीला आपल्या बाजूने करून घेवू." सुदेश म्हणाला.

" घे खुशी." कबीरने तिला भात खाऊ घातला. ते प्रेमाने बोलत होते.

विराज, भक्ती जवळ येवून बसला." काय म्हटले जिजु?"

" आम्हाला ओरडला तो." भक्ती हसत होती.

" विराज तू आता एमबीए करणार ना?" तिने विचारल.

" हो. मी ऑफिस मधे ही जातो मधून मधून. मी बॉस आहे ." विराज म्हणाला.

" तुमच काय स्वतः च ऑफिस. बॉस असणारच." भक्ती म्हणाली.

" तुझ ही आहे की परांजपे इंडस्ट्री. आता तू ही त्यांची मुलगी आहेस. " विराज म्हणाला.

" हो. मी पण नंतर काम शिकून घेणार आहे. नीट शिक्षण करणार आहे. तुझा खरच फोन नंबर दे मला विराज. अभ्यासात काही अडलं तर विचारता येईल. "ती म्हणाली. विराज खुश होता.

सोनु, दिपू मेहेंदी लावत होत्या. त्या कॉलेज बद्दल बारावीच्या परीक्षे बद्दल बोलत होत्या. सुलक्षणा ताई, रश्मी ताई अजूनही कामात होत्या. सगळे त्यांना बोलवत होते. सविता मामीने ही अजून मेहेंदी काढली नव्हती. ती नुसती बसुन सगळीकडे बघत होती. रश्मी ताई, सुलक्षणा ताई तिला आत घेवून आल्या. खूप आग्रह झाल्या मुळे तिने एका हातावर मेहेंदी काढली.

विलास राव, सतीश राव बिझनेस बद्दल बोलत होते. त्यांच्या गप्पा खूपच रंगात आल्या होत्या. त्यांनी रोहितच्या घरी फोन लावला. देशमुख साहेब त्यांच्याशी बोलत होते.
" या इकडे आता. रात्रभर रहा बोलता येईल."

ते दोघ इकडे यायला निघाले. तसे ते रोहित सोबत लग्नाला येणार होते.

आज आता आराम करा उद्या सकाळपासून कार्यक्रम आहेत ते संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी ही सगळे गप्पा मारत बसले होते.
.....

सकाळी लवकर हळद होती. खुशी रेडी होती. तीची मेहेंदी खूपच रंगली होती. सगळे तिला चिडवत होते. "कबीरच खूपच प्रेम दिसतय."

ती पण स्वतःचे हात बघत होती. कबीरच्या प्रेमाची परीक्षा या मेहेंदी वरून होणार नाही. सगळे काहीही म्हणतात.

पिवळी साडी नेसून खुशी तयार होती. फुलांचा साज अतिशय शोभत होता. भक्ती तिला तयार करत होती. "खुशी इकडे बघ लिपस्टिक राहिली आता."

"पुरे भक्ती खूप लावु नकोस. कबीरला आवडत नाही." खुशी म्हणाली.

"अति झाल आता खुशी. सगळं काही कबीरला आवडेल तेच करणार का?" भक्ती ओरडत होती.

" हो प्रेमाचा रंग तसा चढला आहे." खुशी हाताकडे बघत म्हणाली.

रश्मी ताईंनी तिची नजर काढली. कानामागे काजळ लावल.

" चल बाहेर खुशी . आज लग्न आहे या आनंदात कबीर जीजु रात्रभर झोपले की नाही काय माहिती. " भक्ती म्हणाली. खुशी हसत होती.

सतीश राव आले. तिला जवळ घेतलं. खूप गोड दिसते आहेस बेटा. ते तिला बाहेर घेवून आले.

सुलक्षणा ताई, मामी, कबीर बाहेर उभे होते. तिघ खुशी कडे बघत राहिले.

" ही बघ किती सुंदर दिसते आहे. " सुलक्षणा ताई तिच्या जवळ गेल्या.

कबीरला तर काही सुचत नव्हतं. ही साडीत किती छान दिसते.

"खुशी आज तू फुलराणी सारखी दिसते आहे." सविता मामी म्हणाली.

"चला फोटो काढायला."

कबीरने खुशीला हात दिला. त्या बाजूला गार्डन मधे फोटो छान येतील. तिच्या सोबत भक्ती होती.

फोटो ग्राफर सुंदर पोज सांगत होता. खुशी अगदी कबीरच्या जवळ होती. दोघं एकमेकांकडे बघत होते . कबीरच्या नजरेतच तिला प्रेम समजत होतं. ती अगदीच लाजली होती.

ती त्याला मेहेंदी दाखवत होती. कबीरने तिच्या हातावर ओठ टेकवले. तिने कोणते फुल लावले ते तो बघत होता उगीच तिला चिडवत होता. सुंदर फोटो येत होते.

" चला लवकर. उशीर होतो आहे." मामी बोलवायला आली.

आधी कबीरची हळद होती. त्यानंतर खुशीला हळद लागली. खुशी हळवी झाली होती. पण बाकीच्यांनी तिला रडू दिल नाही. लगेच लग्न आहे. आटोप तयारी करावी लागेल.

लग्नाची तयारी सुरू झाली.
........

कथा दोन तीन भागात संपेल. पुढे कंटीन्यु करायची का? की संपवू. बोर झाल का?


🎭 Series Post

View all