Feb 22, 2024
कथामालिका

गुंतता हृदय हे भाग 28

Read Later
गुंतता हृदय हे भाग 28


गुंतता हृदय हे भाग 28
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

खुशी किचन मधून तीच सामान घेत होती. आता नेमक कबीर थोड तरी काय झाल ते सांगत होता तर त्या मामाने मला काढून टाकल. असिस्टंट होती तरी ठीक होत. काम तर होत . घरासाठी पैसे हवे. आई एकटी काम करते. तिचा ही पगार उशिरा होईल. कस करू? तिला खूप टेंशन आल होत. गरीब असण कठिण आहे. लगेच दुसरी नोकरी मिळेल का?

आता या पुढे कबीरला भेटणार कस? आम्हाला आमची कंपनी वापस कशी मिळणार? आत जावून कबीरशी बोलू का? मी रीक्वेस्ट केली तर कबीर ऐकेल. नको तिथे तो प्रशांत मामा असेल तो मला परत ओरडेल.

परत इथे येता येईल का? माझ ऑफिस. ती डोळे भरून सगळीकडे बघत होती.

काका मावशी सगळे तिच्या आजुबाजूला उभे होते. "काका लक्ष द्या. तसच काही वाटल तर मला फोन करा."

"हो खुशी मॅडम."

"कबीरला भेटू का?" ती केबिन कडे बघत होती.

"तिथे ते दुसरे साहेब आहेत." काका म्हणाले.

ती बाहेर आली. राघव, बरेच मित्र, अंजली सगळे उभे होते. अंजली तिच्या जवळ आली.

"मला तुला भेटायच आहे खुशी. काय झाल ते ऐकायच आहे."

"हो नक्की भेटू. मला पण कबीर बद्दल माहिती हवी आहे ." दोघी बोलत होत्या.

ती राघव जवळ आली. " राघव काय करू इथून गेली तर पुढचा तपास कसा करू?"

"सापडेल काहीतरी मार्ग. कबीरला फोन कर. सांग ना राहू द्या इथे. काही नोटिस पिरेड वगैरे नाही का? "

"नको ते मामा आहेत. माझ्या साठी नसेल नोटिस पीरेड. डायरेक्ट कमी केल. "

"कबीर सरांना मेसेज कर."

हो. तिने फोन हातात घेतला. मेसेज टाइप केला.

"कबीर सर मला या कामाची गरज होती. मला आता का काढून टाकल? काही करता येईल का? " तिने मेसेज केला. कबीरने फोन बघितला.

" तुला पैसे हवे का? " त्याचा रीप्लाय आला.

" माझा जॉब हवा. " याच्या कडे पैसे मागणार नाही.

" मामा ऐकणार नाही. तुला काही लागल तर मला सांग." कबीरला वाईट वाटत होत.

" ठीक आहे. मामा बॉस आहेत की तुम्ही आहात कबीर सर?"

" मी आहे. "

" मग तुम्ही निर्णय नाही घेवू शकत का? "तिने विचारलं.

कबीरने उत्तर दिल नाही.

" मी दुसरीकडे नोकरी करू शकते ना? मागे तुम्ही नाही म्हटले होते. प्लीज परमिशन द्या. " खुशीने विचारून घेतल.

"हो कर. त्या पेक्षा एमबीए ची तयारी कर. "

" जॉब नाही तर घर कस चालेल?" तिने मेसेज केला. लगेच डिलीट केला. कबीरने वाचला होता त्याला ही वाईट वाटत होत. मीच तर केल हे. तिच्या घरच्यांना शिक्षा द्यायची होती तर यात खुशीला त्रास होतो. ती काळजीत आहे.

" बाय. मी निघते सर."

बाय.
......

"मी निघते फ्रेंड्स. कबीर जा म्हणतोय. " खुशी हळू आवाजात म्हणाली.

" आपण भेटू."

"हो अंजली मॅडम."

कबीर आतून खुशीला जातांना बघत होता. त्याला वाटल की तिला थांबवाव. असू दे मामा विरुद्ध अगदीच स्टँड घेता येत नाही. मला दोघी हवे. घरचे ही, खुशी ही. करू काही तरी यापुढे इथे अगदी करमणार नाही. खुशी गेली तर कंपनी भकास वाटते आहे.
....

खुशी बर्‍याच वेळ बस स्टॉप वर बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. या पुढे काय करायच. नवीन जॉब शोधावा लागेल. सध्या श्रुती कडून पैसे घेवू का. सोन्याचे कानातले आहेत ते मोडता येतील. जो पर्यंत चालतय तो पर्यंत बघू. आईशी बोलून बघू. बाबा ही म्हणत होते ते जॉब करतील मग तर प्रश्न नाही. तरी एक तारखे पर्यंत अॅडजेस्ट कराव लागेल.
.....

"खुशी निघाली का? " कबीरने त्याच्या माणसाला फोन केला.

" नाही, दोन तीन बस गेल्या, मॅडम बस स्टॉप वर बसून आहेत. काहीतरी विचार करता आहेत."

" तिच्या कडे पैसे नसतील म्हणून काळजीत असेल." कबीर विचार करत होता. हिला कस काय मदत करता येईल.
....

कबीर शांत पणे केबिन मधे काम करत होता. मामा समोर बसुन त्याच्या कडे बघत होता. त्याला वाटल हा विचारेल की खुशीला का काढल? तो चिडेल पण कबीर काही म्हटला नाही.

" कबीर राग आला का? " मामांनी बोलायला सुरुवात केली.

" कसला?"

"मी कंपनी तून काही लोकांना काढून टाकल म्हणून." मामांनी मुद्दाम खुशीच नाव घेतल नाही.

नाही.

"मी तुझ्यासाठी जे चांगल ना तेच करतो कबीर."

" ठीक आहे मामा. आपल्याला सप्लायरची मीटिंग आहे. तू येतो ना."

"हो. मी जातो मीटिंग साठी. मी बघेन . तू नाही. तू आटोप आता. तुला संध्याकाळी डिनर साठी जायच आहे." मामा बरोबर स्टेप घेत होते.

"नाही, मला ही मीटिंग साठी यायच आहे. ही सप्लायर सोबतची महत्वाची मीटिंग आहे. या सगळ्या गडबडीत त्यांना वेळ देता येत नाही. त्यांचे खूप प्रश्न आहेत. नवीन काम आहे. त्यांना वेळ द्यावा लागेल. " कबीर पेपर घेत होता.

"डिनरच काय? मी त्या लोकांना शब्द दिला आहे."

"तू ठरव काय सांगायच ते. मुळात तुला माझे विचार माहिती आहेत मामा. तरी तू का अस करतोस ते मला समजत नाही. " कबीर चिडला.

" कारण काय? "

" मला हे लग्न पसंत नाही. मला अस वाटत खूप घाई होते आहे. सध्या मी खूप बिझी आहे. तू काहीही मधे काढू नकोस. "कबीर तुटक पणे म्हणाला.

" मग कोण पसंत आहे ती खुशी? "मामा चिडला.

कबीरने उत्तर दिल नाही. कबीर उठला

" कुठे जातो आहेस कबीर? तू अस स्वतः च नुकसान नाही करून घेऊ शकत. आजचा हा दिवस बघायला मी रक्ताच पाणी केल. " मामा ही चिडले.

"तू आमच्या साठी काय काय केल ते लक्ष्यात आहे मला मामा. सारख सांगायची गरज नाही. मामा मला माझ चांगल वाईट मला समजत. इतका ही लहान नाही. माझ्या आयुष्यात कोण हव ते मी ठरवणार. तू घेतला ना तुझा निर्णय. खुशीला ऑफिस मधून काढल. मी काही म्हटलो का? आता ह्या लग्नाचं मी ठरवेन. "कबीर म्हणाला.

" ठीक आहे तू एवढा हुशार आहेस तर मग मी गावाला वापस जातो. माझ इथे काय काम. " मामा म्हणाला. त्याला वाटल कबीर घाबरेल.

" हो मामा तू गावाला जा मी बघेन इकडे. " कबीर ही चिडला होता . नुसती आपली कटकट. कबीर मीटिंग साठी निघून गेला.
.....

मामा रागाने ऑफिस मधून निघाला. जावयाच पोर हरामखोर म्हणतात ना तेच खर. मी या लोकांसाठी किती केल पण शेवटी ते फणा उगारणार. इतके दिवस मी म्हणेल ते हा करत होता. आता मला क्रॉस करतो. ते पण त्या पोरी साठी. मी पण काही कच्च्या गुरूचा चेला नाही. नाही त्या कबीरला झुकवला तर प्रशांत नाव नाही सांगणार. सगळ माझ्या नावावर करून घेईन. जो माझ ऐकणार नाही त्याला घराबाहेर काढेल.

प्रशांत मामा बंगल्यावर पोहोचला. त्याने रूम मधून त्याची बॅग घेतली. तो लगेच गावाकडे जाणार होता . खूपच रागात होता.

विराज घरी होता. "मामा कुठे चालला? "

"घरी. तू येतो का?"

" नाही मला क्लास आहे. पण एवढ्या घाईने का? काय झाल? कबीर दादाला तर येवू दे. तू चिडला का?" विराज म्हणाला.

" नाही रे बाबा मी का चिडेन? तुम्ही हुशार मुल. तुम्हाला माझी काय गरज आता. " मामा कार मधे बसला.

विराज आत गेला. याला काय झाल काय माहिती? दादाला फोन करावा लागेल.

थोड पुढे आल्या वर मामाने एक फोन केला. तो बराच वेळ बोलत होता. "सगळ ठीक आहे ना. नीट काम करा. मला कामात हयगय चालणार नाही. "

" हो नीट सुरू आहे तुम्ही सांगितल त्या प्रमाणे सगळीकडे बंदोबस्त आहे . तुम्ही कुठे आहात साहेब?"

" घरी परत येतो आहे. "

"थांबा विकास दादा आला." त्याने फोन दिला. विकास दादा प्रशांत मामाचा चुलत भाऊ होता.

" कुठे आहे प्रशांत? "

" घरी येतो आहे. " मामाने रागाने सांगितल.

"का? काय झालं? तुला तिकडे कबीर कडे बघायला सांगितल होत ना?"

प्रशांत मामा विकास दादाला काय झाल ते सांगत होता." ते मूल आता मोठे झाले माझ ऐकत नाहीत."

"तो कबीर एक मूर्ख आहे. तू दहा मूर्ख. तुझा इगो महत्वाचा की आपल काम? किती प्रॉपर्टी आहे त्या कबीर, विराजच्या नावावर माहिती आहे ना. परत जा आणि त्या पोरांना धाकात ठेव. उगीच तिकडचा सगळा कारभार कबीर कडे जाईल. त्या स्थळाच काय झाल?" विकास दादा ओरडला.

"कबीर नाही म्हणतो लग्नाला. मी खूप प्रयत्न केले. " प्रशांत मामाने हळू आवाजात सांगितल.

" कारण काय? "

" त्याला दुसरी मुलगी आवडते. "

" कोण?"

" तीच परांजपेची पोरगी. सही साठी तिच्या मागे होता आता तिच्या प्रेमात पडला. " प्रशांत मामा म्हणाला.

" हे चालणार नाही. सुलक्षणा ताईला हाताशी घे. आपण म्हणतो ते लग्न जमव. मला कोणतेही कारण चालणार नाही. पोरगा हातचा जाईल. तिकडे लक्ष द्यायला हव. आपल्या ताब्यात पूर्ण कारभार हवा. " विकास म्हणाला.

" बरोबर दादा. आता काय करू?"

"परत जा. जरा डोक थंड ठेव. इकडे मी बघतो. " विकास म्हणाला.

" तिकडे ठीक आहे ना?"

" परफेक्ट. फूल कंट्रोल मधे."
.....

खुशी घरी आली. तिचा चेहरा उतरलेला होता.

सतीश राव फोन वर बोलत होते. बरेच लोक ओळखीचे होते. त्यांना काम द्यायला तयार होते. एवढे सक्सेसफुल बिझनेस मॅन त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला तर चांगल होत लोकांना. त्यांनी दोन तीन कंपनी शॉर्ट लिस्ट करून ठेवल्या होत्या. दिपू आली नव्हती. माई पण घरी नव्हत्या

" खुशी आज तू लवकर कशी आलीस?" त्यांनी विचारल.

"बाबा मला नोकरी वरून काढून टाकल. " खुशी नाराज होती.

कोणी?

"प्रशांत साहेबांनी तो कबीरचा मामा. बाबा मला काळजी वाटते आता आपल कस होणार?" खुशी पाणी पीत होती.

"मी जॉब सुरु करतो आहे. मी आणेन पैसे. किती हवे ते सांग. अजून काही टेंशन?" सतीश राव म्हणाले.

" बाबा आता सत्य कस शोधणार? मला तुम्हाला कोणी काही म्हटलं की आवडत नाही. "

"आपण निर्दोष आहोत हे आपल्याला माहिती आहे. कोणाला सांगायची गरज नाही. " सतीश राव म्हणाले.

" पण मग आपल्याला आपली प्रॉपर्टी कशी मिळेल?"

"आपल्या नशिबात असेल ते होईल. आपले मन साफ आहेत जे चोर आहेत ते टेंशन मधे राहतील आपण नाही. सोड त्या लोकांना. मला नाही वाटत आता काही होईल. ती कंपनी गेली. हे बघ इकडे ये खुशी माझ नवीन काम. मी ह्या कंपनी शोधल्या आहेत. तुझी आई आली की मी कामाच ठरवणार आहे. नाहीतर पहिल्या पासून कष्ट केले आहेत. ईझी काही मिळाल नाही. "सतीश राव उत्साही होते.

" बाबा आपण आधी श्रीमंत नव्हतो ना. " खुशीला आठवल कबीर काय म्हटला ते.

" नाही मी इंजिनिअर झाल्यावर छोट्याश्या वर्क शॉप पासून सुरुवात केली. सुरुवातील मी आणि तुझ्या आईने किती कष्ट केले तेव्हा थोड्या वर्षांनी चांगले दिवस आले. "

" बाबा तुम्ही त्या प्रशांत मामांना खरच ओळखत नाही."

" नाही. "

" त्यांच म्हणण आहे की आपल्या कडे एवढी प्रॉपर्टी त्या भालेराव ग्रुप मुळे आली. म्हणजे आपण त्यांचे पैसे घेतले." खुशी हळूच म्हणाली.

"काय? काहीही. तुझी आई घरी आली की आपण बोलू. तिला पूर्ण माहिती आहे. मी सांगितल तर एकतर्फी होईल. "

" बाबा तुम्ही रागवले का?" खुशीला कसतरी वाटत होत.

"तुझ्यावर कश्याला रागवू बेटा. "

" बाबा मला माहिती आहे तुम्ही किती त्रास घेतला आहे. तुमचे विचार किती उच्च आहेत. आमच्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत. शिक्षण, अभ्यास ,वाचन या गोष्टीला आपल्या कडे किती महत्व आहे. माझ चूकल मी उगीच विचारल. " खुशीला कसतरी वाटल.

"तु बरोबर केल बेटा. मनात शंका नको. तुला वाटल ते विचारायला हव. प्रसंग असा आला आहे. सगळ्या बाजूने चौकशी होईलच. ते सोड हे बघ. ही फॅक्टरी सीक युनीट आहे. यांच प्रॉडक्ट ही छान आहे. मला ऑफर आहे. ही कंपनी नीट केली तर यात भागीदारी मिळेल. ज्याईनिंग बोनस, आॅकाॅमडेशन सगळं. छान तीन बेडरूमचा फ्लॅट घेवू. पुढे मागे कार ही घेता येईल. "

"बाबा तुम्ही खूप हुशार आहात. " खुशीच्या मनातली शंका दूर झाली.

" माई कुठे गेल्या?"

" माहिती नाही त्या संध्याकाळी वापस येतात. "

"त्या कामाला जातात की काय?" खुशीला शंका आली.

" ओह. मला हा विचार आला नाही." सतीश राव म्हणाले.

माई आल्या साडी थोडी ओली होती.

" कुठे गेल्या होत्या तुम्ही माई?" खुशीने विचारल.

"मी बाजूला बसले होते. आज तू लवकर आलीस का?" त्यांनी विचारल.

" कपडे का ओले आहेत. भांडी घासली स्वयंपाक केल्या सारख. खर सांगा."

त्या काही म्हटल्या नाहीत.

"माई मी काय विचारल? " खुशी सतीश राव एकमेकांकडे बघत होते.

"मी बाजूच्या सोसायटीत स्वयंपाकाच काम करते. चार मुल मिळून एका फ्लॅट मधे रहातात त्यांनी विचारल. मी हो म्हटली. " माई हळूच म्हणाल्या.

"माई अहो अस करु नका. तुमच वय बघा. " खुशी म्हणाली.

" पोरांना चांगल जेवण मिळत. आपल्याला दोन पैसे." त्या म्हणाल्या.

" माई तुम्ही मला मोठ्या बहिणी प्रमाणे आहात. माझ्या वर विश्वास आहे ना. मी हे ठीक करेन. आराम करायचा हे काम बंद करा बर. " सतीश राव म्हणाले.

" हो काम बंद करा. उगीच दमायच नाही. "खुशीने त्यांना जवळ घेतल.

" मी घरासाठी करत होते. तुम्ही सगळे कामात मला नुसत बसुन कसतरी वाटत. " माई भावूक झाल्या.

" तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. लवकर हे संकट टळेल. " सतीश राव म्हणाले.

खुशीने घर आवरल. ती थोड सामान घ्यायला गेली. भाजी किराणा घेतला. ती विचार करत होती या लोकांनी मला कामावरून काढल. नवीन नोकरी शोधावी लागेल. मी हे प्रकरण अस सोडणार नाही. अधून मधून कबीरला भेटाव लागेल. पण तो त्या मामाच ऐकतो. मामा सगळं कंट्रोल करतो वाटत. अंजलीने सांगितलेले गाव ती मॅपवर बघत होती. जवळच आहे दोन तीन तास. जावून बघू का तिकडे.
....

कबीर टेंशन मधे होता मामा चिडला आहे. त्याचा खुशीवर राग आहे तिच्या कडे लक्ष द्याव लागेल. त्याने बॉडी गार्ड ला फोन केला. "खुशी कडे नीट लक्ष द्यायच. रात्रीच ही तिच्या घराच्या आसपास रहा. या कामाला एक माणूस अजून घ्या . आता कुठे आहे ती?"

"मॅडम दुकानात आल्या आहेत सामान घ्यायला. थोड घेतल वाटत. पैसे नाहीत त्यांच्या कडे. आता त्या बाहेर येवून पैसे मोजत होत्या."

कबीरला वाईट वाटल. आज ती म्हणत होती मला या कामाची गरज आहे. मदत करू का? पण ती घेणार नाही. काय करता येईल. सामान पाठवल तर? नको उगीच.
.....

खुशी घरी आली. तिने भाजी चिरायला घेतली. थोडा स्वयंपाक करून ठेवू. आई ही दमून येते. ती विचार करत होती आता पुढे शिक्षण घेवू. नवीन नोकरी करावी लागेल. आता वेळ अशी आली आहे काय करणार. पण आता तिकडच्या बातम्या कश्या समजणार. माझे सही केलेले पेपर कुठे असतिल. त्या ऑफिस मधे नसतील ते पेपर. कबीरच घर, जून ऑफिस कुठे ते बघाव लागेल. तिने श्रुतीला फोन केला. " श्रुती माझी नोकरी गेली. मला त्या मामाने काढून टाकल."

" काय झालं नीट सांग. कोण मामा?"

खुशी सगळं सांगत होती.

"आपल्याला कबीरच्या ऑफिस मधे, घराकडे जाव लागेल. मला माझे सही केलेले पेपर हवे."

"विचार करून वाग खुशी. मागच्या वेळी त्या कबीरने आपल्याला पोलिसात दिल होत." श्रुतीला आठवल.

"आता कबीर मधे खूप बदल झाला आहे. तो नाही ओरडणार. "

" हो का मग गोड बोलून तूच त्याची सही घे ना. एवढा त्रास का करून घेते." श्रुती हसत होती.

" श्रुती ते एवढ सोप आहे का? तो अजूनही माझ्या घरच्यांवर राग धरून आहे. माझ्याशी नीट वागतो. त्याच्या मनातून आई बाबां विषयी राग बाहेर काढावा लागेल. "

" खरच अस कर. पण खुशी ते पेपर सापडून उपयोग आहे का?" श्रुतीला प्रश्न पडला होता.

"नाही जो पर्यंत कबीर सही करत नाही तो पर्यन्त उपयोग नाही ." खुशी म्हणाली.

"मग का जा तिकडे. उगीच रिस्क. "

" बरोबर आहे. श्रुती मला जॉब हवा. "

" बघत रहा पेपर मधे कोणी ओळखीच असेल तर बर होईल. "

" उद्या येते तिकडे. "

हो.

तीने राघवला फोन केला. "काही समजल का. कोणी नवीन लोक आले का नाही? "

" अजून नाही आले. "

" ती अंजली काही सांगणार नाही ना कबीरला? " तिला भीती वाटत होती.

" चांगली आहे ती मदत करेल. तिला विचार. "

खुशी पुढचा प्लॅन करत होती.
......


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//