गुंतता हृदय हे भाग 22

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 22
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

खुशी ऑफिस मधून निघाली. बस स्टॉप वरून तिने श्रुतिला फोन केला. आता अस करते घरी जावून सगळं सांगते. तिने विचार केला.

" सर खुशी मॅडम बस स्टॉप वर बसुन रडत होत्या. " कबीरला निरोप गेला.

" ठीक आहे. " त्याने फोन बाजूला ठेवला.

घरी फोन लावला तो बराच वेळ त्याच्या आईशी बोलत होता.

" विराज उद्या येतो आहे तिकडे त्याची परीक्षा आहे. "

" ठीक आहे मी आहे इकडे. "

" तू घरी कधी येणार. मला तुझ्याशी महत्वाच बोलायच आहे. " सुलक्षणा ताई विचारत होत्या.

" काय आई?"

"तु आला की सांगते. "

"आता सांग. "

"तुझ्यासाठी स्थळ आल आहे .मामीचे नातेवाईक आहेत. मुलगी शिकलेली आहे .तिकडे राहते तू तिला भेटशील का? हे बघ मामा मामीचा आपल्याला आधार आहे. ते ठरवता आहेत. नकार देवू नकोस. "

"आई मी थोडा बिझी आहे. आपण रात्री बोलू या का? "

"ठीक आहे. "

त्याने फोन ठेवला. खुशी शिवाय मी कोणाशी लग्न करणार नाही. मामाला सगळं माहिती आहे तो का अस करतोय. त्याला थोडा राग आला.
...

खुशी घरी आली. तिचा चेहरा उतरलेले होता. रश्मी ताई दीपू ही घरी आलेल्या होत्या.

"काय झालं काय म्हटले ते भालेराव सर?" त्यांनी विचारल.

" काही नाही."

"खुशी नीट सांग काय झालं ते." रश्मी ताई तिच्या कडे बघत होत्या नक्की काहीतरी झाल आहे.

ती रडत होती. "बाहेर ये बाबा ऐकतील."

"मी जागा आहे. मला ही सांग काय झाल ते." सतीश राव म्हणाले.

"बाबा तुम्ही टेंशन घ्याल."

"काही होत नाही मला मी ठीक आहे."

सगळे तिच्या आजुबाजुला होते.

" पटकन सांग खुशी . "

" आई बाबा मी हे तुम्हाला सांगितल तर तुम्ही मला घराबाहेर काढून द्याल. मग मी कुठे जाईल. " ती टेंशन मधे होती.

" अस काही होणार नाही खुशी. मी आहे ना . "सतीश राव म्हणाले.

रश्मी ताई तिच्या जवळ गेल्या." मी नाही ओरडणार तुला बाळा. सांग काय झाल? काहीही असल तरी तुझे आई बाबा तुझ्या पाठीशी आहेत. "

" आई बाबा मला माफ करा. हे सगळं माझ्यामुळे झाल आहे. माझा मित्र कबीर आहे ना तोच कबीर भालेराव आहे ज्याने आपली कंपनी घेतली."

सगळे आश्चर्याने बघत होते.

"त्याने का पण अस केल ?"

"माहिती नाही. "

" कोण आहे तो?"

खुशी सगळं सांगत होती." तो रोहितचा मित्र आहे. आणि मीच त्याला सह्या दिल्या म्हणून त्याने कंपनी टेक ओव्हर केली. त्याने खोट सांगितल की आई आजारी आहे. मला पैसे हवे आहेत ते लोनचे पेपर आहेत."

"तू पेपर वाचले नाहीत का?"

" बघितले होते एक दोन. लोन साठी होते. नाव ही वेगळ होत. कबीर भालेराव नव्हतं. तो म्हणाला हे आपल कर्ज आहे खुशी आपण परत करू म्हणून मी तुम्हाला सांगितल नाही. "

" खाली ओरीजिनल पेपर असतिल. असच करतात हे लोक. हा ट्रॅप होता खुशी. तुला कस समजल नाही. " सतीश राव म्हणाले.

"माझी निवड चुकली आई, बाबा. किती मोठी शिक्षा मिळाली." ती आता रडत होती.

आई, बाबा, दीपु, माई तिच्या जवळ आले. "खुशी शांत हो."

"तुम्हाला मला पोलिसात द्यायच तर द्या. घराबाहेर काढा. मी काही म्हणणार नाही. मला चुकीची शिक्षा मिळायला हवी."

" अस काही होणार नाही. त्याने फसवल तुला." रश्मी ताई म्हणाल्या.

"नक्की काहीतरी हिस्ट्री आहे या मागे. आता तर आपल्याला डिटेक्टिव ही घेता येणार नाही. त्याचे आधीचे पैसे द्यायचे बाकी आहेत. करू बेटा आपण काहीतरी. थोडे दिवस जावू दे बरोबर काहीतरी सापडेल. " सतीश राव विचार करत होते.

" बाबा तो पर्यंत कस होईल? हे घर किती वरती आहे लहान आहे, पाणी नाही. " खुशी म्हणाली.

" काही होत नाही. होईल बरोबर. मी ठीक आहे. आणि तुला कोणी काहीही म्हणत नाही. टेंशन घेवू नकोस खुशी. " सतीश राव म्हणाले.

" खुशी दी तू जॉब शोधणार होती ना. तू पुढचा स्टडी कर तुझ मन रमव. "दिपू तिच्या जवळ उभी होती तिने तिचे डोळे पुसून दिले.

" मला आता तिकडे आपल्या कंपनीत कंपलसरी काम कराव लागेल. तो कबीर दुसरीकडे काम करायला नाही म्हटला."

रश्मी ताई, सतीश राव एकमेकांकडे बघत होते.

"अहो मला खूप काळजी वाटते आहे. तो मुलगा बदमाश वाटतो आहे. "

"दीक्षित आहेत. " सतीश राव म्हणाले.

"आई बाबा पण मी एक सांगते मी हे नीट करेल. तुम्हाला कंपनी घर वापस मिळवून देईल. "

" खुशी शांत हो. अजिबात रीस्क घ्यायची नाही. त्रास करून घ्यायचा नाही. ते लोक डेंजर दिसता आहेत. " सतीश राव म्हणाले.

" हो खुशी, मी आणि तुझे बाबा करू बरोबर. " रश्मी ताई म्हणाल्या.

खुशी किचन मधे पाणी पीत होती. ती माईं जवळ झोपली. रश्मी ताई आल्या." खुशी त्या कबीरने तुझ्या सोबत काही वेडवाकड केल नाही ना. "

" नाही आई. तो नाही मी त्याच्या मागे होते. आता तो ऐकत नाही त्रास देतो. तो माझ्याशी लग्न करायच म्हणतो आहे. "

" सावध रहा. "

" हो आई . "

"नको जावू तिकडे नको ते पैसे. तू घरी रहा."

"आई पण मी ऑफिस मधे नाही गेली तर ते लोक मला पोलिसात देतील. पोलिस स्टेशनमध्ये खूप भीती वाटते. मला ऑफिसला जावंच लागेल. "

रश्मी ताई विचार करत होत्या डेंजर आहे हे कबीर प्रकरण.

सकाळी ती झोपलेली होती. रडून रडून डोक दुखत होत.

रश्मी ताई मैत्रिणीच्या ऑफिस मधे जॉईन होणार होत्या. सगळ्यांना वाईट वाटत होत. ज्या मैत्रिणीं आमच वैभव बघून हेवा करायच्या आज त्यांच्या हाताखाली काम कराव लागत. तस त्या असच मदत करायला तयार होते. पण रश्मी ताई तयार नव्हत्या.

त्यांनी पटकन पोळी भाजी बनवली. डबा भरला त्या ऑफिसला निघाल्या.

खुशीच्या फोन वर कबीरचा मेसेज आला. "ऑफिसला लेट झाली तर हाफडे लागेल."

"हो येते आहे."

"हुशार आहेस. मी वाट बघतो."

बसने ती ऑफिस मधे आली. बसची गर्दी तिला अजिबात आवडली नाही. ति रीसेप्शन मधे बसलेली होती. अर्ध ऑफिस ओळखीच होत. दीक्षित काका आले.

"गुड मॉर्निंग खुशी मॅडम."

"गुड मॉर्निंग. मी आधी अकाऊंटच काम शिकत होती. मी तेच करू का काका? "

"मला डीसीजन घेता येणार नाही. हे लोक ठरवतील. मी जातो आत." दीक्षित म्हणाले.

ती बाहेर बसली होती तिला आत बोलवलं. ती गेली. कबीर केबिन मधे बसला होता.

" गुड मॉर्निंग खुशी."

" गुड मॉर्निंग सर."

"कॉफी आण."

"मी?" तिने विचारल.

"हो. काही प्रॉब्लेम आहे का?" कबीर तिच्याकडे बघत होता.

"नाही पण काका आले नाही का?"

"आहेत ना काका. त्यांच काय. तुझ काम तू कर.... कॉफी?"

हो. ती बाहेर गेली. "काका आत कॉफी हवी. "

" हो करतो. परांजपे साहेब कसे आहेत?"

"ठीक आहेत. घरी सोडल. " खुशी तिच्या विचारात होती कबीर मला अस कॉफीच काम का देतो आहे.

त्यांनी कॉफी करून दिली. ती काका सोबत आत आली. "घ्या साहेब. "

खुशी बाजूला उभी होती.

" कोणी केली ही कॉफी?" कबीरने विचारल.

" मी साहेब. " काका म्हणाले.

" घेवून जा. खुशी तू करून आण." कबीर म्हणाला.

"का पण. मी का?"

"आज पासून तू माझी पर्सनल हेल्पर म्हणजे असिस्टंट आहेस . समजल का? नीघ. ते हातातल सामान इथे ठेव." कबीर तिच्या कडे बघत म्हणाला.

खुशी काकांकडे बघत होती.

" काका आज पासून माझ सगळं काम खुशी करेल. " कबीरने सांगितल.

" पण साहेब. मॅडम नाही करू शकत हे काम. "

" काका तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. जा तुमच काम करा. "

काका गेले.

"कबीर सर मी इथे अकाऊंट डिपार्टमेंट मधे होती ना. ते काम दे ना मला ." खुशी त्याच्या कडे बघत होती.

" होती, आता नाही. आता मी म्हणेल तेच करायच. "

प्लीज.

" खुशी जा तुझ काम कर." कबीर म्हणाला.

" मी करणार नाही. मी घरी जाते आहे. "ती चिडली.

" विचार कर मग एक्शन घे खुशी. तुझ्या कडे दोन ऑप्शन आहेत. अ‍ॅक्चुअली तिन.
एक माझ्या सोबत लग्न कर. बंगल्यावर रहायला ये.
दोन इथे नोकराच काम कर.
तीन पोलिस स्टेशन मधे मुक्काम.
काय ते तू निवड. "

" मी इथे काम करते. पेमेंट किती? "

"त्या काका किती आहे त्या पेक्षा कमी "

" त्यात घर चालेल? "

" तू ठरव काय करायच ते. "

खुशी काही म्हटली नाही. ती कबीर कडे बघत होती.
त्याने तिच्या कडे बघितल.... "कॉफी? आणि येतांना स्वच्छ ग्लासात पाणी आण."

ती किचन मधे गेली. "काका कॉफी कशी करायची?"

" मॅडम मला खूप वाईट वाटत आहे. "

तिने कॉफी केली. ती कॉफी घेवून गेली." आत येवू का? "

"हो. कॉफी ठेव. या फाईल नीट लाव. नुसता पसारा झाला आहे या केबिन मधे." कबीर म्हणाला.

तिने तिचा आणि दीपूचा फोटो असलेली फ्रेम घेतली.

" इकडे दे ती. "

" तो माझा फोटो आहे. "

"आता हे माझ ऑफिस आहे. ती फोटो फ्रेम माझ्याकडे राहील." कबीर ने तो फोटो त्याच्या बागेत टाकला.

तो कॉफी घेणार तेवढ्यात त्याला थोडा चटका बसला.

"गरम आहे कॉफी कबीर हळू." ती सहज बोलून गेली .

कबीर तिच्या कडे बघत होता. "खूपच प्रेम आहे तुझ माझ्या वर खुशी. म्हणून म्हणतो इतका त्रास करून घेवू नकोस. माझ्याशी लग्न कर आरामात रहा. इथे नोकरानी की राणी बनून रहायच तू ठरव आणि काल सांगितल ना मला कबीर म्हणायच नाही. "

सॉरी. ती बाहेर जावुन बसली. तीच सामान तिने किचन मधे ठेवल. तिला एकदम भरून आल होत. रडून काही उपयोग नाही. किती हा त्रास. काय करू हा कबीर का अस करतो. नक्की काय झाल आहे याला.

एक सुंदर मुलगी आत आली. छान च्युडीदार घातला होता. केस मोकळे. मॉडर्न होती . ब्रँडेड पर्स. उंच सॅन्डल "कबीरची केबिन हीच का?" तिने खुशीला विचारल.

हो.

"आहे का तो?"

"आहेत सर. "

ती आत गेली.

कोण आहे ही? खुशी विचार करत होती. सुंदर आहे.

"हाय कबीर."

" अरे अंजली ये." ते दोघ भेटले.

"सॉरी उशीर झाला."

"काही प्रॉब्लेम नाही डीयर."

त्याने बेल दाबली. खुशी आत आली. खुशी अंजली साठी कॉफी आण. अंजली खुशी कडे बघत होती.

"ही हेल्पर आहे इथली? "

हो. त्याने सांगितल.

"तु चांगल्या घरची वाटते आहेस. शिकलेली. असे काम का करते? काय नाव तुझ? " तिने विचारल.

" खुशी."

"हा खुशी. जिथे काही शिकायला मिळेल अस काम कराव."

" हो मॅडम मी लक्ष्यात ठेवेन. "

अंजली काहीतरी कामाच बोलत होती. कबीरने थांब अस खुणावल.

" खुशी जा आता इथून. दार लोटून घे."

ती किचन मधे आली. कोण आहे ही मुलगी. मला शहाणपणा शिकवते." काका इकडे या? ती मुलगी कोण आहे? "

"कोण मुलगी?"

"ती कबीरच्या केबिन मधे."

"मला नाही माहिती."

जावू दे. कोणी का असेना ती मुलगी. कबीरला कबीर म्हणते. मला सर म्हणायला सांगितल. त्याची मैत्रीण असेल का? आता तर मला म्हणत होता लग्न कर. लगेच त्या मुलीला मिठी मारली. नक्की तो कबीर माझ्याशी लग्न करून मला सोडून देईल. हिच्या सोबत राहील. खुशी विचार करत होती.

ती बाहेर बसली होती. आतून बेल वाजली.

"जा मॅडम आत." काकांनी सांगितल.

खुशी आत गेली. दोघ हसून बोलत होते. खुशी कबीर कडे बघत होती.

" खुशी ही कप बशी ने. अंजु सोबत जा. तिचा टेबल रेडी कर स्वच्छ पुसून घे. अजून काय अंजु?"

"कबीर थँक्यू ."

" वेलकम डीयर."

खुशीने कॉफीचा कप, पाण्याचा ग्लास घेतला. ती बाहेर गेली. अंजली बाहेर आली. चल खुशी.

खुशीने टेबल पुसायला कपडा घेतला ती गेली. "कोणत टेबल? "

हे तिने समोरच टेबल दाखवल.

खुशीने ते पुसून घेतल. सगळ सेट झाल. अंजली लॅपटॉप उघडून बसली. कंपनी तर्फे तिला तो लॅपटॉप दिला होता. चार्जिंगला लावला तरी चालत नव्हता. अंजली खटपट करत होती.

"मी बघू का?" खुशी म्हणाली.

"तुला येत?"

हो.

खुशीने खटपट केली. लॅपटॉप ऑन झाला. ती बघत होती लॅपटॉप मधे काय काय आहे. तेवढय़ात कबीर बाहेर आला.

"खुशी काय सांगितल तुला. तू लॅपटॉपला हात का लावला? " खुशी दचकली. उठून उभी राहिली.

अंजली बघत होती. "कबीर अश्या पद्धतीने का ओरडतो आहेस खुशीला. ती माझी मदत करते आहे. हा लॅपटॉप सुरू होत नव्हता. खुशी मुळे सुरू झाला. किती हुशार आहे ती. तिला खूप चुकीच काम मिळाल आहे. ती इथे मेन ऑफिस मधे हवी होती. "

" खुशी तू सांगितल का हिला." कबीर तिच्याकडे बघत होता.

"नाही कबीर सर. मॅडम सांगा ना."

" खुशी काही म्हटली नाही. या कंपनी बद्दल मला कोण माहिती देईल खुशी? "

"मॅडम मला नाही माहिती."

" ठीक आहे . तू जा. "

खुशी तिथून तिच्या जागेवर येवून बसली. म्हणजेच कबीरच्या केबिन बाहेर.

दीक्षित काका आले." खुशी मॅडम इथे काय करताय? तुमच्या जागेवर जा. "

" हीच माझी जागा आहे काका. मी शिपाई आहे आता. शिपाई ही नाही काका नोकर आहे इथे." खुशी म्हणाली.

त्यांना खूप कसतरी वाटल." काय बोलताय मॅडम?"

"हो काका मला मॅडम म्हणू नका. सगळ्यात कमी पोस्ट आहे ही. "
....

कबीर ऑफिस मधे उभा होता. सगळे आजुबाजूला जमले होते.

" जो जे काम करत तेच करा. आणि तुम्हाला काही काम असेल तर खुशीला सांगा. "

सगळे खुशी कडे बघत होते. तिने खाली बघितल.

"ती आज पासून इथे शिपाई आहे. खुशी ऑफिस फाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर बघायचा नाही. कोणाशी जास्त बोलायच नाही. फक्त साफसफाई आणि चहा पाणी. समजल." कबीर म्हणाला.

" हो सर. " ती म्हणाली.

" मी सांगितल त्यात चूक झाली तर तुला समजल असेल इतक्या दिवसात मी काहीही करू शकतो ते." त्याने धमकी दिली.

हो.

" केबिन जवळ थांब. "

बाकी सगळे ऐकत होते. त्यांना कसतरी वाटल.

" सर खुशी मॅडमला अकाऊंटच काम द्या. त्या आधी तेच करत होत्या. हे अस शिपाई म्हणजे खूप काहीतरी वाटत." एक मुलगा म्हणाला.

" तु इकडे ये. सामान घे घरी जायच. " कबीरने त्या मुलाच आय कार्ड काढून घेतल.

"अजून कोणाला खुशीच्या कामावर काही आॅबजेक्शन आहे का?"

नाही.

" दीक्षित या कंपनीची पूर्ण माहिती आहे असे चार पाच लोक कोण आहेत?"

पाच जण पुढे आले.

" दीक्षित तुम्ही आणि हे पाच लगेच घरी जायच. आज पासून तुमची सुट्टी." त्यांना काढून टाकल होत. सगळे कुजबुज करत होते. नवीन बॉस डेंजर आहे.

खुशी लांबून त्यांच्या कडे बघत होती. दीक्षित काकां कडून अपेक्षा होती ते काहीतरी करतील. आता काय होईल. जुने चांगले लोक या कबीरने काढून टाकले. बोलून बघू का? नको तो शिक्षा करेल.

दीक्षित सामान आवरत होते. त्यांच्या चेहर्‍यावर काळजी होती. खुशी त्यांच्या मदतीला गेली.

"काका आता काय करू या? तुमचा आधार होता. थोड तरी समजल असत इथे काय होत ते."

"तुम्ही बघा खुशी मॅडम."

"मला फाईल बघायला नाही सांगितल. काहीतरी करा ना काका."

"होईल काहीतरी बेटा."

तिच्या डोळ्यात पाणी होत.

"रडून काही उपयोग नाही बेटा. जा तुझ काम कर. मी येतो घरी मग बोलू. हे लोक चुकीचे वागता आहेत पण ते काही चूक करतील. तू ती पकड सावध रहा." दीक्षित म्हणाले.

"हो काका."

ते गेले.

शिपाई काका बोलवायला आले.

" खुशी मॅडम तुम्हाला कबीर साहेब केव्हाचे बोलवता आहेत. "

ती पळत गेली.

कबीर दोन तीन मॅनेजरशी बोलत होता. "खुशी कुठे फिरते आहेस . इथे बाहेर बसायला सांगितल ना. जा त्या अंजली कडून फाईल आण."

हो ती गेली. फाईल घेवून आली.

" राऊत ही फाईल नीट बघा. काम सुरू करा. एक मिनिट थांबा तुम्हाला ओळख करून देतो. ही आहे खुशी परांजपे."

राऊत बघत होते. ही का काम करते आहे. ही तर साहेबांची प्रिय मैत्रिण आहे.

"खुशी, राऊत इथले मेन बॉस आहेत . त्यांच काम ऐकायच."

हो .

राऊत कबीर कडे बघत होते.

" खुशी इथली शिपाई आहे. तिला बिनधास्त काम सांगा. "

आधी ती त्या ऑफिसची बॉस होती. आता सगळ्यांच्या हाताखाली काम होत.

"खुशी जा तुझ काम कर. चहा दे सगळ्यांना. इथे बघ किती धूळ आहे. उद्या पासून ऑफिस साफ हव."कबीर म्हणाला.

ती हो बोलली. तिने चहा ठेवला. सगळ्यांना दिला.

बाकीच्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तिने उत्तर दिल नाही. नको हा कबीर मला पोलिसात देईल. आई बाबांना त्यांना हा धक्का. सहन होणार नाही. आपल काम करा. होईल देवाच्या मनात जे असेल तस.

एमबीए च्या इंटरेन्सचा अभ्यास करावा लागेल. ती बघत होती वेळच नाही. अजिबात बसायला मिळत नाही. एका दिवसात पाय किती दुखता आहेत.
...
एक कबीर सारखा दिसणारा हँडसम मुलगा ऑफिसमध्ये शिरला. सगळे त्याच्याकडे बघत होते. तो आधी अंजलीला भेटला. दोघ बोलत होते. त्याने इकडे तिकडे बघीतल. अंजलीने कबीरच्या केबिन कडे बोट दाखवल. तो खुशी समोर येऊन उभा राहिला.

"कबीर भालेराव आहेत का? "

ती त्याच्याकडे बघत होती. कोण आहे हा?

"मी विराज भालेराव त्याचा भाऊ." त्याने सांगितलं.

खुशीला आश्चर्य वाटल. कबीरला भाऊ आहे?
...

ही कथा काल्पनिक आहे. वेगळ लिहायचा प्रयत्न केला आहे. वाचकांचे खूप आभार. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला लेखिका समर्थन करत नाही. यातून बर्‍याच मुलींना.. मुलांनीही सावध होवुन कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. विचार करून वागवं अस सांगायच आहे.

🎭 Series Post

View all