गुंतता हृदय हे भाग 19

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 19
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

ही कथा काल्पनिक आहे. वेगळ लिहायचा प्रयत्न केला आहे. वाचकांचे खूप आभार. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला लेखिका समर्थन करत नाही. यातून बर्‍याच मुलींना.. मुलांनीही सावध होवुन कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. विचार करून वागवं अस सांगायच आहे. जास्त टेंशन घेवून वाचू नये.
.....

कबीर रात्री घरी आला. घरचे सगळे खुश होते. तो लगेच मामाच्या रूम मधे गेला. "मामा ही फाईल नीट ठेव."

"हो हे महत्वाच आहे. आयुष्याचे इतके वर्ष यासाठी तर काम केल. आता शेवटचा टप्पा."

सुलक्षणा ताई घाईने रूम मधून बाहेर आल्या. "कबीर आला का? खरच का? कुठे आहे तो?"

कबीर येवून आईला भेटला. "आई थोड काम होत म्हणुन अचानक आलो."

"तुझ तर घर आहे. तू इथे रहायला हव. अस का सांगतोस." त्यांनी कबीरला जवळ घेतल.

" झाल आई आता थोड राहील मग मी इथे राहीन. नाहीतर मी जिथे तिथे तुला घेवून जाईन."

" नक्की ना. "

हो.

"बाहेर एवढी गर्दी का आहे? " सुलक्षणा ताई बाहेर बघत होत्या.

" दादाचे बॉडीगार्ड आहेत. "

" का लागता आहेत ते बॉडीगार्ड? त्यांची व्यवस्था कुठे करायची? कुठे झोपतील ते?" सुलक्षणा ताईंनी निरागस पणे विचारल.

"ते जागे रहातील. " कबीर म्हणाला.

" का? "

सगळे हसत होते.

"आई त्यांच काम ते आहे. तुझ म्हणजे वॉचमनला म्हणशील आरामात झोप रे बाबा. ते लोक झोपले तर आपल रक्षण कोण करेल. "

" आपल्याला का लागतंय पण एवढी सिक्युरिटी? काही धोका आहे का? "

" नाही आई तू टेंशन नको घेवुस."

"ते जेवतील ना."

" झाल आमच जेवण."

तो सगळ्यांशी बोलत बसला.

सुदेश, विराज, सोनू सगळे कबीरच्या आजुबाजुला होते. मामा फोन वर कोणाला तरी मेसेज करत होते. सुलक्षणा ताई आतून ताट वाढून घेवून आल्या." थोड तरी खा कबीर." तो आईच्या हातून जेवत होता.

रडून रडून खुशी झोपली. सकाळी ती उशिरा उठली काही करायची इच्छा नव्हती. आवरून ती बाहेर येवून बसली. रश्मी ताईंनी न बोलता तिला चहा नाश्ता दिला. तिने थोड खाल्ल. बाबां सोबत ती ऑफिस मधे आली. रस्त्याने सतीश राव बिझी होते. दोघ विशेष बोलले नाही. ऑफिस मधे खुशी तीच काम करत होती. थोड्या वेळाने तिने कबीरला फोन लावून बघितला. त्याने फोन उचलला नाही. मेसेज टाकला तो ही बघितला नाही.

"कुठे आहे हा कबीर? " ती काळजीत होती.

रोहितच्या घरी खुशी बद्दल समजल. ते लोक नाराज होते.

"खुशीला दुसरा मुलगा पसंत आहे तर तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितल." रोहितची आई फोन वर म्हणाली.

"आम्हाला ही आता समजल." रश्मी ताई हळू आवाजात म्हणाल्या.

रोहित समजावत होता. तरी त्याच्या घरचे रागावल्या सारखे झाले होते. आता या परांजपेंशी काहीही संबंध ठेवण्यात अर्थ नाही.
....

सकाळी मामा, कबीर ऑफिसला जायला निघाले. सुलक्षणा ताईंनी नाश्ता वाढला. कबीर फोन मधे बघत होता." कबीर खा लवकर गार होईल. "

" आई तू ही बस."

ते ऑफिस मधे आले. जाधव वकील आलेले होते. समोर फाईल होती. ते सगळ बघत होते. मामा, कबीर शांत बसलेले होते.

" एवढे शेअर ठीक आहेत का? आम्ही आधी ही थोडे घेतले होते." मामा म्हणाले.

"भरपूर आहेत."

"आता पुढे काय?" कबीरने विचारल.

"मी प्रोसेस सुरू करतो."

"आपल्याला त्यांच्या या कंपनी वर हक्क दाखवता येईल पण बाकीच्या प्रॉपर्टीच काय? ती ही भरपूर आहे. ते लोक सहज यातून बाहेर पडतील. " कबीर म्हणाला.

" हा प्रॉब्लेम नीट झाल्या शिवाय त्या प्रॉपर्टीला हात लावता येणार नाही. पण ते अकाऊंट फ्रीज करू. काहीतरी घोळ आहे अस दाखवू. पण ते थोडे दिवस अस फ्रीज ठेवता येईल. त्यांच्या बाजूने प्रयत्न झाले तर ही कंपनी सोडून त्यांना सगळं वापस मिळेल. " वकीलांनी सांगितल.

" एक महिना तर मिळेल ना? "

" हो. त्या पेक्षा जास्त वेळ मिळेल. आता अस झाल कंपनी हातची गेल्यावर त्या लोकांना सुरवातीला काही सुचणार नाही. त्यात त्यांचा बराच वेळ जाईल. इतर प्रॉपर्टी क्लेम करायला पैसे हवे ते नसतील. या कंपनी सोबत अजुन एक वर्क शॉप आणि त्यांच घर तुमच्या ताब्यात येईल ते ही थोडे दिवस. त्यामुळे जे करायच ते पटापट करा. नंतर ते लोक एक्टीव्ह होतील. "

" मग बस. बराच धडा शिकवता येईल. " कबीर म्हणाला.

(ही प्रोसेस काल्पनिक आहे. समजून घ्या. कथा स्वरुपात लिहिल आहे .)

प्रोसेस सुरू झाली. दोन चार दिवसात परांजपे इंडस्ट्री वर नोटिस बजावली.

सतीश राव केबिन मधे बसुन नोटिस वाचत होते. त्यांना घाम फुटला होता." दीक्षित आत या."

त्यांनी नोटिस वाचली. "सर आता?"

"आता काय आपल्या वकिलांना बोलवा उत्तर द्याव लागेल."

" काय खोडसाळ लोक आहेत. यासाठी ते आपल्या ऑर्डरच्या मागे लागले होते आधी त्यांनी आपल्याला फाईन्नाशिअली ब्लॉक केल. मग ही कंपनी ताब्यात घेतली."

"पण का ते समजल नाही. " सतीश राव म्हणाले.

" हो ना सर."

परांजपे इंडस्ट्रीचे बँक अकाऊंट फ्रीज केले.

सतीश रावांनी बँकेत फोन केला." तुम्ही अस करु शकत नाही. काय प्रॉब्लेम आहे?"

ते लोक त्यांच्याशी बोलत होते.

" तुमचे अर्धाच्या वरती शेअर भालेराव ग्रुप कडे आहेत त्यांनी कंपनी वर क्लेम केला आहे. जो पर्यंत हा प्रॉब्लेम नीट होत नाही तो पर्यंत अकाऊंट वापरता येणार नाही. तसा स्टे आला आहे. नंतर तुम्ही क्लेम करा ."

सतीश राव विचार करत होते या साठी खूप फी भरावी लागेल. मोठी प्रोसिजर होती. यात बरेच दिवस जाणार होते. कस करणार.

कंपनीत सगळीकडे समजल. सगळे घाबरले. मोठी मीटिंग होती. सतीश राव टेंशन मधे होते. दीक्षित मीटिंग मधे बोलत होते. हे झाल कस? कोण आहे हा भालेराव ग्रुप? काहीच समजत नव्हत.

"सर आमची नोकरी राहील ना?"

"सर आमचा या महिन्याचा पगार मिळेल ना?" बरेच लोक प्रश्न विचारत होते.

रश्मी ताई घाईने ऑफिस मधे आल्या. मीटिंगला येवून बसल्या. " आता काय होईल?"

" आपण ऑब्जेक्शन घेतल आहे बघू."

जो पर्यंत पुढचा रिजल्ट लागत नाही तो पर्यंत भालेराव ग्रुप ही कंपनी चालवेल. निकाल लागला.

" तुम्ही क्लेम करा दोषी नसाल तर सगळ वापस मिळेल."

"दोषी म्हणजे?"

" आता तुमची कंपनी भालेराव ग्रुप ऑफ़ कंपनी मधे सामिल झाली आहे. त्यांच म्हणण आहे त्यांना न विचारता तुम्ही कंपनीच्या अकाऊंट मधले पैसे वापरले. तुमच्या वर केस केली आहे."

काहीच मार्ग उरला नव्हता. सतीश राव खूप प्रयत्न करत होते. रश्मी ताई, खुशी, दिपू त्यांच्या सोबत होत्या.

त्या कंपनीने चार्ज घेतला. या सगळ्यांना बाहेर काढल. सिक्युरिटी गार्ड ही बदलले.

सतीश राव हताश झाले होते. पण हे झालच कस? कोणी तरी जवळच्या व्यक्तीने केल आहे. पण कोण करेल? आमच अस कोणी नाही. त्यांची तब्येत बिघडली होती.

दोघ घरी आले. खुशी, दिपू, माई काळजीत होत्या.

"आई आता काय होईल. कोणी केल हे? काय झाल?" दिपू रडत होती.

"काहीच माहिती नाही बेटा. जा सामान आवर. हे घर खाली कराव लागेल."

" आपण कुठे जाणार?"

"माहिती नाही."

"थोडे दिवस बेटा. ही केस आपण लढू मी सोडणार नाही त्यांना." सतीश राव म्हणाले.

खुशी तिच्या रूम मधे गेली. तिने कबीरला फोन लावला. नेहमी प्रमाणे त्याने फोन घेतला नाही. कुठे आहे हा? ती एकटीच रडत होती.

कबीर ऑफिस मधे होता. मामा समोर बसलेले होते. " आपल्या ताब्यात आली कंपनी मामा. "

" नीघ तू कबीर. तिथला चार्ज घे. जो शहाणपणा करेल त्याला लगेच घरी पाठव. बॉडीगार्ड नेहमी सोबत ठेव. कोणासमोर इमोशनल व्हायच नाही. ते लोक तुझ्याशी गोड बोलतील तुला समजावतील. तू आपल ध्येय विसरू नको."

" मामा आपल्याला काय त्रास झाला मी कधीच विसरणार नाही. काळजी करू नकोस आई कडे बघ. " कबीर वापस आला. लगेच काम सुरू केल.

सतीश राव गप्प बसुन होते. रश्मी ताई वकीलां सोबत मीटिंग मधे होत्या. दीक्षित, खुशी त्यांच्या सोबत होते. दुसर्‍या दिवशी त्यांना घर खाली करायच होत.

सतीश रावांना टेंशन आल. त्यांना अ‍ॅडमिट केल. खुशीने रोजचे कपडे घेतले. श्रुती कडे नेवून ठेवले.

खुशी भालेराव साहेबांना भेटायला हॉटेल ओबेरॉय मधे गेली. तिथे तिला कबीर भेटला. माझा कबीर ज्याच्या साठी मी काय नाही केल त्याने अस केल. तिला चक्कर आली. ती श्रुती सोबत घरी आली.

खुशीला त्रास झाला कबीर डीस्टब होता. त्याच्या लोकांना खुशी वर नजर ठेवायला सांगितल.

खुशी रात्र भर विचार करत होती का झाल अस? एखाद्यावर प्रेम करण म्हणजे चूक असते का? कबीर मी तुझ्यावर विश्वास ठेवला. तू काय केल आम्हाला रस्त्यावर आणलं. पण का काय अस? आम्हाला एवढी मोठी शिक्षा का? किती खोट बोलला. मला जाळ्यात ओढले. मी त्याला कधी माफ करणार नाही. ती खूप रडत होती.

आता माझ्या जिवनाच एकच लक्ष. मी सगळी प्रॉपर्टी माझ्या बाबांना परत मिळवून देईल. कबीर तू का अस केल ते शोधून काढेन. तुला जास्तीत जास्त शिक्षा होईल अस बघेल.

आता पुढे.....

खुशी सकाळी उठली. ती नुसती बसलेली होती काही सुचत नव्हत. श्रुती चहा घेवून आली. श्रुतीला बघून ती परत रडत होती.

"किती रडणार खुशी. पुरे आता. तू ना अति हट्टी आहेस. यामुळे तू स्वतःच नुकसान करून घेते. मूर्ख नुसती. तू ऐकत का नाही कोणाच. मी म्हणत होती. मला वाटत होत काहीतरी होईल. तो कबीर अतिशय खोटारडा मुलगा आहे. दिसतच होत. कर आता काहीही. घर गेल फॅक्टरी गेली. घरी काय सांगशील." श्रुती तिला खूप रागावली.

" श्रुती नको ना ओरडू. मी चांगली मुलगी नाहिये. मी माझ्या हाताने आई बाबांच नुकसान केल. मला काय माहिती तो कबीर एवढा हुशार निघेल. खूप प्रेम असल्या सारख दाखवत होता. मी काय करू श्रुती." ती परत रडत होती.

"आधी रडणं बंद कर. चल आपण काकूंना सगळं सांगू. "

" नाही माझी हिम्मत नाही. आई आधीच माझ्या वर चिडली आहे. बाबा आजारी आहेत. नको सांगायला. मी त्या कबीरला सोडणार नाही श्रुती. त्याच्यावर प्रेम करायची किती मोठी शिक्षा दिली त्याने माझ्या फॅमिलीला. दार लाव मला फोन करायचा आहे. कोणी ऐकायला नको."

तिने कबीरला फोन लावला. त्याने उचलला नाही.

तिने मेसेज केला." कबीर प्लीज फोन उचल."

त्याचा फोन आला.

"कबीर मला तुला भेटायच आहे. आत्ता."

"काय काम आहे खुशी .मी बिझी आहे."

"कबीर तू का अस केल? तुला कंपनी हवी होती का? हे सगळ आपलेच आहे ना कबीर. प्लीज सांग. तू माझ्याशी खोट बोलला. तू गावाला गेला होता अस सांगितल. कोणी सांगितल तुला हे करायला? तू माझ्या फॅमिलीला का त्रास देतो आहेस. काय प्रॉब्लेम आहे? काहीतरी गैरसमज झाला आहे. माझे बाबा किती साधे आहेत. मी, आई, दिपू तुझा कोणावर राग आहे? नीट सांग. बोल ना काही. " खुशी विचारत होती. रडत होती.

" खुशी तू बोलण्याच्या मनस्थितीत नाही आराम कर. "

" एक मिनिट कबीर मी नीट आहे. सांग ना बाबांची फॅक्टरी घर का घेतल? कबीर बाबांची कंपनी वापस कर तुला कोणी काही बोलला का ? तुझा अपमान केला का? का रागावला इतका? मी काही बोलली का? मला काही आठवत नाही. ठीक आहे तरी मी तुझी माफी मागते. असा त्रास नको देवू . बाबा अबोल झाले आहेत अ‍ॅडमिट आहेत. आई सगळे काम करत आहे. दिपूच बारावीच महत्वाच वर्ष आहे . आणि मी कबीर. माझा तर विचार कर ना. किती मोठा धोका आहे हा. मी मनापासून तुझ्यावर प्रेम केल होत. तुला अस करतांना काही वाटल नाही का? काही तरी बोल. "

" खुशी मला तुला काही सांगायची गरज वाटत नाही. "

" का गरज वाटत नाही. मी महत्वाची नाही ना तुला. तुझ्या मुळे आम्हाला घर नाही. हॉस्पिटल साठी पैसे नाही. रहाणार कुठे? खाणार काय? का केल तू अस?"

"खुशी मला उशीर होतो आहे. मला या विषयावर काही बोलायच नाही. तुला काही माहिती नाही काय झाल ते. मला तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही. तू माझी होणारी बायको आहे. तुला मी त्रास होऊ देणार नाही. " कबीर म्हणाला.

" बायको आणि मी? आता ते विसर. माझ्याशी प्रेमाचा नाटक केल. "

" नाही तुझ्याशी प्रेमाच नाटकं केल नाही खुशी. अगदी मनापासून तुझ्यावर प्रेम केल. आणि करतो. अजूनही सांगतो मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही. आय लव यू. आजही तुझ्यासाठी मी काहीही करेन. "

"शट अप. काही नको मला तुझ प्रेम, गोड बोलण. माझ ऐकतो म्हणतो ना मग दे आमच घर कंपनी वापस. " ती म्हणाली.

" एवढे साधे आहेत का तुझ्या घरचे? मला जास्त बोलायला लावू नकोस. मी काही देणार नाही. आणि मला तू ही हवी. तुला माझ्याशी लग्न करायच होत ना चल आता करू. एक लक्ष्यात घे, तुला तुझ्या घरचे ठीक हवे असतिल तर मला येवून भेट. मी म्हणतो ते करायच खुशी. माझ्या सोबत रहायच."

" कबीर मूर्खासारखा काहीही बोलू नकोस या पुढे आपला काही संबंध नाही. मी ब्रेक अप करते आहे. खूप मोठी चूक केली मी, माझ्या फॅमिलीला धोक्यात टाकल. मी तुझ्या तोंडावर सांगते तू का केल अस मी शोधून काढेल. मी चूक केली मीच नीट करेन. माझ्या आई बाबांना त्यांची प्रॉपर्टी मिळवून देईन. "

" अरे बापरे फूल टु टशन खुशी. नॉट बॅड बघू तरी तू काय करतेस. "

" आता मी तुझी पोलीस कंप्लेंट करते आहे . "

" त्याने काय होईल? पोलिस काय करतील. तू अजून मला ओळखलं नाहीस खुशी. मी कबीर भालेराव आहे. तुला पुरून उरेल. आता जशी तुझी कंपनी ताब्यात घेतली तस तू ही माझ्या ताब्यात येशील. खुशी का त्रास करून घेतेस. तू अजून लहान आहेस. तू यात पडू नकोस. " तो म्हणाला.

आता दोन दिवसा पुर्वी कस बोलत हा कबीर माझ्याशी आणि आज कसा बोलतो आहे.

" मला ना आता समजल कबीर माझ्या कडून किती मोठी चूक झाली. या पुढे मी कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही. "

तो हसत होता.

" मी परत एकदा सांगतो खुशी त्रास करून घेवू नकोस.
माझ्या जवळ ये मी तुला आनंदात ठेवेल. मात्र तुझ्या आई बाबा सोडणार नाही. वाटल तर दीपूला घेवून ये. कार पाठवू का? सांग. नाहीतर मीच येतो तुला घ्यायला लग्नाची वरात घेऊन येतो . तुला घाई होती ना आपल्या लग्नाची. मी तयार आहे आता. सांगितल होत मी गावाहून आल्यावर लगेच घरी सांगू. येवू का आता तुमच्याकडे. तुझा हात मागायला. " तो मुद्दाम तिला त्रास देत होता.

तिने रागाने फोन ठेवला.

" काय म्हटला ग तो? " श्रुती विचारत होती.

" मूर्ख, बदमाश आहे एक नंबरचा. काहीही बोलतो. मला आधी का समजल नाही." ती परत रडत होती.

" चल श्रुती आपण पोलिस स्टेशन मधे जातो आहोत. "🎭 Series Post

View all