गुंतता हृदय हे भाग 17

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का


गुंतता हृदय हे भाग 17
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

खुशी घरी आली. आज ती खुश होती. कबीर समजूतदार आहे. चांगला आहे. मला काल उगीच त्याचा राग आला होता.

माई बघत होत्या. त्या तिच्या मागे रूम मधे आल्या. "खुशी बेटा तुला खायला आणु का?"

"नको माई माझ पोट भरलं."

"अस कस? काही खाल्लं नाही की चहा घेतला नाही."

"माई मनाप्रमाणे झाल की काही नको वाटत ना." खुशी आनंदाने म्हणाली.

हो.

"माई मी खुश आहे."

"का? मला सांग ना?" त्या तिच्या कडे बघत होत्या.

"मी नंतर सांगते." रोहितचा फोन आला.

"माई दार लोटून घ्या. "

हो. त्या जात होत्या.

" बोल रोहित. "

" कबीर भेटला होता का? " त्याने विचारल.

" हो रोहित, कबीर आज भेटला होता. तो मला हो म्हटला. मी खूप खूश आहे. " खुशी मोठ्याने सांगत होती.

" खुशी छान झाल. पण तुला माहिती आहे ना त्याच्या बद्दल?"

" हो सगळं माहिती आहे. गरीब साधा मुलगा आहे. पण त्याने काय होत रोहित? आवडत्या व्यक्ति सोबत रहायला छान वाटत. मी कबीरची साथ देईन. आम्ही छान राहु. "

रोहितला काय बोलाव अस झाल होत.

" मी काय म्हणतोय खुशी. "

खुशी ऐकण्या पलीकडे गेली होती. ती कबीर बद्दल खूप बोलत होती.

माईंनी कबीर अस काहीतरी ऐकल. त्यांना विशेष समजल नाही. काय आहे हे? तो हो म्हटला म्हणून खुशी आनंदात आहे. पण हीच लग्न रोहित सोबत ठरत आहे ना. रश्मी मॅडमला सांगू का? पण खुशीला अस वाटेल की मी चुगल्या करते. मुलगा चांगला आहे वाटत. कोण पण? फोन रोहितचा आला होता. ती कबीर बद्दल बोलत होती. नक्की काय सुरू आहे?

दिवसभर खुशी रूम मधे होती. तिने गाणे लावले होते .ती अभ्यास करत होती. गात होती. तीच लक्ष फोन वर होत. साडे आठला कबीरच ऑफिस संपत त्याचा फोन येईल बहुतेक. काय बोलू त्याच्याशी. ती परत लाजली. मी कबीर सोबत राहीन.

रश्मी ताई आत आल्या ."आज काय अभ्यास सुरू आहे खुशी? चल जेवायला."

" हो पाच मिनिट ." ती फोन कडे बघत म्हणाली.

"काय झाल? कोणाचा फोन येणार आहे?"

" काही नाही चल. " ती फोन चार्जिंगला लावून बाहेर आली.

" पटकन जेवायला दे आई. माई पोळी द्या. काय हे? इथे जेवणाची काही तयारी नाही . मला आत्ता पासून बोलवून ठेवल." खुशी घाई करत होती.

"म्हणजे काय खुशी? जरा मदत कर. भाजी वाढ तिकडून. काही येत नाही तिला." रश्मी ताई ओरडल्या.

खुशी भाजी देत होती. दिपू आली. सतीश राव आले.

" अरे वाह खुशी आज चक्क आईला मदत करते आहे." सतीश राव हसत होते.

" चक्क म्हणजे काय बाबा? मी नेहमी काम करते. " खुशी म्हणाली.

" आम्हाला कधी दिसल नाही." दीपु म्हणाली.

सगळे हसत होते.

खुशी घाईने खात होती.

" अग हळू. काय झाल हिला काय माहिती." रश्मी ताई ओरडल्या.

माईंना माहिती होत ही नक्की कबीरच्या फोनची वाट बघते आहे. काय करू सांगू का रश्मी ताईंना?

जेवण झाल सतीश राव दीपूशी अभ्यासाबद्दल बोलत होते. खुशी आत जात होती.

" खुशी इकडे ये इथे बस."

"बाबा मला काम आहे." ती घाईत होती.

"पाच मिनिट बोल जरा. "

खुशी समोर येवुन बसली . "बाबा माझा अभ्यास जोरात सुरू आहे. आता रीव्हीजन बाकी आहे. "

"हुशार आहे आमची खुशी. तू ऑफिस जॉईन कर. "

" माझ कॉलेज बाबा? आता परीक्षा ही आहे." खुशी म्हणाली.

"सगळं सांभाळून अभ्यास करायचा. तसेही आता विशेष क्लासेस नसतील. कॉलेज झाल की ये. थोडथोड शिक." सतीश राव म्हणाले.

"चालेल उद्या पासून येते. " नाहीतर कबीर ही ऑफिसला जातो. तस मी ही जाईन. ती विचार करत होती.

" मी आत आहे."

रात्री सतीश राव फोन वर बोलत होते. त्यांच्या डीटेक्टीव एजन्सीचा फोन होता." बोला झाल का काम? कोण आहेत ते लोक समजल का? एवढा काय वेळ लागतोय? इतक काय सिक्रेट आहे हे? "

" हो सर ते लोक काही समजू देत नाही. एक मुलगा आहे त्याच्या वर लक्ष देवून आहोत आम्ही. पण कोणत्या बेसिसवर चौकशी करणार?"

"असच जा त्या ऑफिस मधे .आपल्या कंपनी कडून आलो आहोत अस सांगा. काय प्रॉब्लेम आहे ते डीसकस करा. कोण आहे ते बघा. त्या दिवशी ही व्हिडीओ कॉल वर त्यांच्या कॅमेरा ऑफ होता." सतीश राव म्हणाले.

" ते लोक चिडले आहेत. "

"त्यात काय चिडवण्यासारख? आपल्याला ते लोक कोण आहे आणि का अस करताय ते बघायच आहे इतकच. बाकी तुम्ही बिझनेस करू नका अस थोडी आपण म्हणू शकतो. फक्त आमच नाव घेवू नका. तुमचा आमचा काही संबंध नाही. एवढच आपल म्हणण आहे. "सतीश राव म्हणाले.

" बरोबर आहे परांजपे साहेब तुम्ही अगदी साधे आहात."

त्यांनी फोन ठेवला.

"हा प्रॉब्लेम कधी नीट होईल? " रश्मी ताई म्हणाल्या.

" अस तर चालू असत बिझनेस मधे. कोणी ना कोणी येतच मधे. तुला माहिती आहे रश्मी. "

" हो पण या वेळी ही परिस्थिती नीट होत नाही. "रश्मी ताई म्हणाल्या.

" तीच काळजी वाटते आहे. "
....

सकाळी खुशी नाश्ता करत होती. माई समोर उभ्या होत्या त्या तिच्याकडे बघत होत्या.

" माई काय झाल?"

"काही नाही. " त्यांना वाटत होत विचाराव. पण कस? मी किती केली तरी मुलींना सांभाळायला आहे. ते लोक माझ्या वयाकडे बघून मला मानाने वागवतात प्रेमाने बोलतात. नको आपण आपल्या हद्दीत राहू.

"काही बोलायच आहे का माई ?" खुशीने परत विचारल.

"नाही खुशी बेटा. "

"मग अस काय बघताय माझ्या कडे? "

"केस धुतले का ते बघत होती. "

"हो माई. "

"नीट पुसले ना. तुला लगेच सर्दी होते." त्या प्रेमाने म्हणाल्या.

हो.

खुशी श्रुती कॉलेज मधे जायला निघाल्या. कार मधे श्रुती गप्प होती. आज दोन लेक्चर होते. बाकी सबमिशन होत.

श्रुतीने आता कबीर बद्दल विचार करण बंद केल होत. खुशी ऐकत नाही काहीही कर म्हणा. जरा लांबून माहिती काढु. जावू दे नाहीतर मी काहीही केल तरी खुशी काही त्या कबीरला सोडणार नाही मी माझा वेळ वाया घालवणार नाही. परीक्षा जवळ आली आहे.
...

परांजपे ऑफिस मधे मोठी मीटिंग सुरू होती.

"कोण आहे ते लोक? तो मुलगा भेटला का? कुठे पर्यंत आली चौकशी?"

"सुरू आहे विशेष माहिती मिळत नाही. राऊत आणि कोणी प्रशांत आहेत ते समजल. पण अजून एक दोन लोक आहेत यात . त्यांच्या ऑफिसची चौकशी केली. काही सापडत नाही."

" त्यांचा उद्देश काय? "

"अजून समजल नाही. पण भरपूर काम आहे त्यांच्या कडे. आपल्या तीन कॅन्सल झालेल्या ऑर्डर ही आहेत तिकडे. " दीक्षित म्हणाले.

" त्या साठी त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे सिरियस लोक दिसतात आपण गैरसमज करण्या पेक्षा आपल काम चोख ठेवा. " सतीश राव खूप सूचना करत होते.

" हो सर. तिथला बॉस तो मुलगा अगदी तरुण आहे. हुशार आहे. त्याला आपल्या ऑर्डर मधे खोट वाटली म्हणून ती कंपनी ट्राय करत होती. "

त्यांनी वेगळ्याच मुलाची चौकशी केली होती. आता ते लोक शांत झाले होते.

" या लोकांमुळे तीन ऑर्डर आपल्या हातून गेल्या. त्याचा परिणाम किती दिवस भोगावा लागेल. " सतीश राव काळजीत होते.

खूप प्रॉब्लेम वाढले होते .पैसे लागत होते. सगळे इन्व्हेस्ट केलेले होते.

"दीक्षित आपल्याला थोडे शेअर काढावे लागतील. माझ्या नावावरचे काढू या ."

"ठीक आहे सर मी हिशोब करून दुपार पर्यंत सांगतो. "
....

कॉलेज सुटल्यावर खुशी आज ऑफिस मधे यायला निघाली. तिने कबीरला फोन केला.

"काय सुरू आहे खुशी?" त्याने विचारल.

"मी ऑफिस जॉईन करते आहे. "

का?

"का म्हणजे काय? बाबा म्हणाले सगळं शिकून घे. ऑल द बेस्ट तर दे."

"ऑल द बेस्ट आता आपण भेटणार कस?" मुद्दाम बारीक आवाजात तो म्हणाला.

"तु ही ऑफिसला जातोस ना. असाही तुला वेळ नसतो. माझ ही कॉलेज संपल आहे."

"अरे हो परीक्षेची तयारी कशी सुरू आहे. " कबीरने विचारल.

" छान. "

" म्हणजे आता आपल्याला जास्त भेटत येणार नाही. काही तरी कराव लागेल खुशी. मला तुझी खूप आठवण येते." कबीर म्हणाला.

खुशी खूप छान हसत होती.

"अरे आय एम सिरीयस. आजकाल तुझ्या शिवाय रहायचा मी विचार करू शकत नाही. "

तिला छान वाटल. " काल पर्यंत तू मला नाही म्हणत होता ना कबीर. "

" ते मला गरीब श्रीमंत तस वाटत होत. "

"आता?"

"आता माहिती आहे तू माझी साथ सोडणार नाही. "तो लाडाने म्हणाला.

"ऑफिस आल चल मी फोन ठेवते." खुशी म्हणाली.

"काय अस खुशी?"

"आपण एका ऑफिस मधे हव होत कबीर. दिवस भर सोबत. छान प्रेमाने ऑफिस काम केल असत. "खुशी हसत म्हणाली.

" होईल ते ही खुशी. तू विचार केला ना मग आपण सोबत एका ठिकाणी काम करू. मग असच होईल. तू लकी आहेस मला. म्हण तुझ काम होईल. "

" हो कबीर तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुझ काम होईल. "

बाय खुशी.

बाय.
...

खुशी इतर वेळी ऑफिसला यायची पण आता वेगळ वाटत होत. ती बाबांच्या केबिन मधे आली.

" जेवण केल का तू बेटा? "

" हो बाबा तुम्ही? "

" हो झाल. "

" आज आई नाही आली. "

" नाही. "

दीक्षित आत आले. "नमस्ते काका. "

" हॅलो खुशी मॅडम. "

" दीक्षित खुशीला पगारच्या डिपार्टमेंट मधे काम द्या. सगळ काम हळू हळू शिकवा. "

खुशी अकाऊंट डिपार्टमेंट मधे गेली. तिला बसायची जागा दाखवली.

एक दोन दिवस तर तिने कंपनीची पूर्ण माहिती वाचली. घरी आल्यावर अभ्यास सुरू होता. परीक्षा जवळ आली होती. क्लासेस बर्‍या पैकी होत नव्हते.

आज तिने श्रुतीला फोन केला. " कुठे आहेस?"

"अभ्यास करते आहे. तू?"

"ऑफिस मधे. तुला काय वाटल?" खुशीने विचारल.

"मला वाटल कबीरला भेटायला जायच असेल म्हणून माझी आठवण आली."

" अस का म्हणतेस श्रुती? आम्ही नेहमी भेटत नाही. कबीर बिझी असतो. फोन वर बोलतो कधी कधी." खुशी सांगत होती.

"एवढा गरीब मुलगा बिझी?"

" त्याला ऑफिस असत."

खुशी विचार करत होती. श्रुती काय म्हणाली. काहीही सुरू असत तीच.

खुशी ऑफिस मधे आल्या पासून ऑर्डर रीजेक्ट होत नव्हती. प्रशांत मामा, कबीर आता परांजपे इंडस्ट्रीजच्या शेअरच्या मागे लागले होते.

परांजपे इंडस्ट्रीज मधे पैसे लागत होते. लोकांचे पेमेंट साठी फोन सुरू होते. ते आता शेअर विकणार होते. सतीश राव ,दीक्षित त्याबद्दल बोलत होते, खुशी केबिन मधे येवून बसली.

"बाबा शेअर विकले तर काय होईल?"

"बाकीचे जे लोक ते शेअर घेतील ते आपल्या कंपनी मधे इन्व्हेस्टमेंट करतील. नंतर आपण परत जमलं तर जास्त शेअर आपल्या कडे घ्यायचे. बर्‍याच गोष्टी आहेत यात."

"म्हणजे ते आपल्याला पैसे देवून मदत करतील. आपण त्यांना भागीदार करून घ्यायच. "

" हो, पण डोळे उघडे ठेवून वागावं लागत."

"काही प्रॉब्लेम येणार नाही ना?"

"अगदी थोडे विकतो आहे. "

" बाकीचे शेअर कोणाच्या नावावर आहेत? "खुशी विचारत होती.

" खुशी तू. मी आणि रश्मी, " खुशीच्या नावावर जास्त शेअर होते.

ठीक आहे.

मार्केट मधे बातमी पसरली. परांजपे इंडस्ट्रीज शेअर विकता आहेत.

स्पायडर 77 ने ती बातमी कबीरला दिली.

" आपण घ्यायचे, हा चान्स सोडायचा नाही. "

" हो. शेअर रीलीज झाल्यावर पहिल्याच लॉट मधे विकत घेवु."
...

खुशी थोड्या लवकर घरी आली. अभ्यास सुरू होता. ती बरीच सिरियस झाली होती. चांगले मार्क मिळायला हवे.

पुढच्या आठवड्यात परीक्षा होती. खुशी आता ऑफिस मधे जात नव्हती. खूप अभ्यास सुरू होता. तिला पेपर चांगले गेले. शेवटचा पेपर झाला त्या मैत्रिणी कॉफी शॉप मधे बसलेल्या होत्या.

"खर तर ही पार्टी खुशी तू द्यायला हवी होती."

"काय विशेष?"

"आम्ही सांगू का आता? तुझ आणि कबीरच समजल आम्हाला."

खुशी लाजली होती. श्रुती तिच्या कडे बघत होती. खूप गप्पा सुरू होत्या. सगळ्या ऑफिस बद्दल विचारत होत्या. खुशी लकी आहे लगेच मनाला वाटल तेव्हा ऑफिस जॉईन केल. आम्ही थोडे दिवस जॉब शोधतो नंतर पुढच शिक्षण आहे.

ती घरी येत होती." हॅलो" तिला आवाज आला. ती छान हसली.

कबीर.

"आम्हाला विसरल्या तुम्ही मॅडम. पेपर कसे गेले."

"छान गेले."

त्याने तिला चॉकलेट आणले होते ते दिले. अरे वाह तुला माहिती होत मला चॉकलेट आवडतात ते.

"हो गोड मुली साठी गोड चॉकलेट. चल जरा वेळ ग्राउंड वर जावुन बसू. "

" तुझ ऑफिस कस सुरू आहे कबीर?"

"ठीक आहे मी अजून कामाचे तास वाढवून घेतले. "

" का? एवढ दमु नकोस. "

" मला पैसे हवे आहेत. आई आजारी असते."

खुशीला कसतरी वाटल आणि कबीर बद्दल अभिमान ही. किती करतो हा.

" कबीर माझी काही मदत लागली तर सांग. "

" नक्की तुझ्या शिवाय काय होईल माझ खुशी." त्याने तिला जवळ घेतल. दोघ बर्‍याच वेळ बोलत होते.

" मला निघाव लागेल. "

ती घरी आली. आज मी खूप आराम करणार आहे. अभ्यासासाठी तीच जागरण झाल होत.

" जेवायला काय आहे आई?"

"तुझ आवडत वरण भात, भाजी पोळी. " रश्मी ताई हसत म्हणाल्या.

" कधीतरी पाव भाजी नूडल्स करायची ना. "

" आठवड्यातुन दोनदा ठरल ना आपल. जा आवरून ये पटकन."

जेवण झाल. जेवताना ही ऑफिसचा विषय होता.
...

सकाळी परांजपे इंडस्ट्रीजचे थोडे शेअर रीलीज झाले स्पायडर 77 ने लगेच घेतले.

" काम झाल. " त्याने मेसेज केला.

चला बर झाल. आता खुशी कडून सह्या घेतल्या की झाल. मामा खुश होते.🎭 Series Post

View all