Login

गुंतता हृदय हे भाग 14

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का


गुंतता हृदय हे भाग 14
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

श्रुती लांबून बघत होती खुशी कबीर सोबत आहे. जावू दे किती अडवणार. तिने जेवून घेतल.

खुशी, कबीर झाडाखाली बसले होते.

"खुशी पार्टी दे." एक दोन फ्रेंड्स विचारत होते.

"नाही, अजिबात नाही. ती कमवत नाही." कबीर म्हणाला.

"ती श्रीमंत आहे."

" असू दे ती तिची कमाई नाही. ती कुठून पैसे आणेल." कबीर म्हणाला.

"तू पार्टी दे मग तिचा कोच."

"माझ्याकडे अस फालतू खर्चायला पैसे नसतात. मला या पार्टीची गरज वाटत नाही." कबीरने स्पष्ट पणे सांगितल.

"कॅन्टीनमध्ये चहा चालेल. " सगळे खुश होते.

ते निघाले. श्रुती, खुशी सोबत होत्या.

" काय सुरू आहे तुझ खुशी? " श्रुतीने रागाने विचारल.

"तू चिडली का श्रुती? " खुशी तिच्या कडे बघत होती. किती केल तरी ती बालमैत्रिणी होती. अत्यंत प्रिय.

"चल आता घरी."

"श्रुती ऐक ना चिडू नको ना. मी सांगते. थांब तरी ." ती तिच्या मागे गेली. त्या दोघी एका टॅक्सीत बसल्या. बाकीच्या मैत्रिणी ही होत्या.

कबीर त्याच्या मित्रां मधे होता.

"कबीर चल ना ." रोहित म्हणाला.

" खुशीला बोलाव या कार मधे. ती श्रुती नको. " कबीर म्हणाला.

रोहित मुलींच्या टॅक्सी जवळ आला." गर्ल्स कंफर्टेबल ना? खूपच गर्दी झाली या टॅक्सीत."

त्याने खुशीला इशारा केला. "खुशी हे तुझ सामान आहे का बघ जरा? इथेच राहून जाईल."

खुशी खाली उतरली.

"कबीर बोलवतो आहे तिकडे. " त्याने सांगितल.

" हो आलीच. "

" श्रुती मी तिकडे आहे. तू येते का?"

"नाही तू जा खुशी. मी थकली आहे. लवकर ये. " श्रुती कबीर कडे बघत म्हणाली.

मुलींची टॅक्सी निघाली. "खुशी राहिली. थांबा."

" येईल ती मागच्या टॅक्सी तून अजून बरेच मुल मुली आहेत."

"खुशी या टॅक्सीत बस. " रोहित दाखवत होता.

"माझी सायकल घेतली ना? " खुशीने विचारल.

" हो कबीर ने घेतली. "

ओके. ती आत बसली. हा कबीर कुठे आहे ती इकडे तिकडे बघत होती. त्या बाजूने कबीर आत येवून बसला. अजून एक फ्रेंड बसला. कबीर खुशी जवळ होता. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. खुशी खूपच खुश होती.

"आता ठीक वाटत ना?" कबीरने तिच्या कडे बघत विचारल.

हो. ती लाजून म्हणाली.

ती खूप थकली होती. टॅक्सी सुरू झाली तिचे डोळे आपोआप मिटले. आता ती कबीर जवळ होती. तो ही तिला नीट सांभाळत होता.

" खुशी उठ, घर आल."

तिने मुश्किलीने डोळे उघडले. " मी जाते. उद्या भेटशील ना कबीर? "

हो.

खुशी घरी आली खूप दमली होती. परत जरा वेळ झोपली. संध्याकाळी रोहितच्या घरचे आले होते. रोहित सोबत नव्हता. ते खुशी सोबत खूप बोलत होते. त्यांना खुशी खूप आवडली.

" बेटा रोहित तुझ्या सोबत आहे ना? "

" हो काकू. "

" कसा आहे तो वागायला. "

काय सांगणार आता यांना? की तो भांडकुदळ आहे. पण आज खूप नीट वागत होता. " तो चांगला आहे काकू."

"त्याने आता ऑफिस ही जॉईन केल आहे, घरी किती नीट वागतो. सगळं छान सांभाळतो." त्या खूप कौतुक करत होत्या.

" चला घरच्यांशी तरी नीट वागतो हा रोहित." खुशी विचार करत होती. थोड्या वेळाने ते गेले.

सतीश राव, रश्मी ताई खुश होत्या. "आज बर्‍याच दिवसांनी छान वाटल ना. चांगले आहेत देशमुख फॅमिली. "

" हो चांगला वाटतो रोहित."

"हो ना. सिरियस आहे. लहान आहेत पण मुल."

"अजून दोन वर्ष थांबता येईल. तशी इच्छा असेल तर आपल्याला हे ठरवता येईल." रश्मी ताई म्हणाल्या.

"बोलून बघाव लागेल देशमुख साहेबांशी."
....

खुशी रूम मध्ये बसली होती. श्रुतीचा फोन आला." खुशी तू कुठे होती?"

" मी कबीर सोबत आली. "

" खुशी एक बोलू का? मला ना तुझा खूप राग येतो आहे. कोणी बोलत ही नाही तरी तू बळजबरीच नात का जोडते आहेस ." ति कबीर बद्दल बोलत होते.

" श्रुती अस नाही ग. कुठल्याही नात्यात कोणाला तरी एकाला पुढाकार घ्यावा लागतो ना. कबीर माझ्याशी नीट वागतो. मी त्याच्या सोबत राहील तर काय बिघडत. चिडू नको ना. "

" काही प्रॉब्लेम नाही पण त्याने नंतर नकार दिला तर तु त्रास करून घेवू नकोस." श्रुती हुशार होती. तिला बर्‍या पैकी परिस्थितीची जाणीव होती. कोण कस आहे समजत होत.

" तो होकार देईल. आता हल्ली तो माझ्याशी चांगल वागतो. " खुशी अजूनही गोड विचारात होती.

" तुझ चांगल झाल तर मला आनंद आहे खुशी. गॉड ब्लेस यू . " श्रुतीने फोन ठेवला.

खुशी अभ्यासाच टाइम टेबल करत होती. दिपू तिला हसत होती. "काय प्रॉब्लेम आहे दिपू? "

"खुशी दी तू नेहमी टाइम टेबल करते. आणि त्या प्रमाणे काही होत नाही."

"या वेळी मी सिरीयस आहे. मला समजल आता सक्सेस कस मिळवायच. मी रोज अभ्यास करणार. " खुशी म्हणाली.

"वाह दी तुझ्यात खूप फरक पडला."

खुशी लाजली होती. हे सगळ कबीर मुळे झाल त्याने चांगल्या सवयी लावल्या. तो काय करत असेल. तिने त्याला मेसेज केला." उद्या भेटू या का?"

कबीर एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या कॉन्फरन्स रूम मध्ये बसलेला होता. प्रशांत मामा सोबत होते. मोठी मीटिंग सुरू होती. एका मोठ्या कंपनी सोबत डील होती. त्या कंपनीचे लोक समोर बसलेले होते. ते काय प्रेझेंटेशन करत होते. कबीर नीट ऐकत होता. मधेच तो मामा कडे बघत होता.

"जमेल हे. या पुढे तुमच्या सगळ्या ऑर्डर आम्हाला द्यायचा." मामा म्हणाले.

रेट फिक्स केला. तसा काॅन्ट्रक्ट केला. ते लोक गेले.

मामा, कबीर घरी यायला निघाले.

" हे छान काम झाल. अस त्या लोकांचे एक एक कॉन्टॅक्ट तोडायच. धक्क्यावर धक्के द्यायचे. मी एक वकील हायर केला आहे. राऊत एक टीम तयार करत आहेत. जोरात काम सुरू करू." कबीर म्हणाला.

"बोलाव त्याला मीटिंगला."

वकील आले. त्यांची मीटिंग सुरू होती. एखादी कंपनी टेक ओवर करायला काय कराव लागत. वकील नियम सांगत होते. मामा प्रश्न विचारत होते. " ही आयडिया भारी आहे. "

" हो मलाही पटल असच करू या का? " कबीरने विचारल.

" हो मी येतो पुढच्या आठवड्यात तेव्हा फिक्स करू. "

ते गेले.

कबीर फोन बघत होता. खुशीचा मेसेज होता. मामांच लक्ष गेल. तो बघत होता कबीरच्या चेहर्‍यावरचे हावभाव बदलले होते. कोणी प्रिय व्यक्ति अचानक दिसल्यावर कस खुश होतो तस वाटत होता. प्रॅक्टिकल पासून कबीर हसरा दिसत होता. त्याने खुशीला मेसेज केला.

" नक्की भेटू. "

" कस सुरू आहे कबीर हे खुशी प्रकरण?" मामाला समजल होत नक्की हा खुशीशी बोलतो आहे.

" राइट ऑन द ट्रॅक मामा."

"पुढची स्टेप घ्यावी लागेल. तिचा तुझ्यावर विश्वास बसायला हवा." मामा त्याच्या कडे बघत होते.

" हो आजही ती मी म्हणेल ते करेल." कबीर लाजल्या सारखा वाटत होता. मामा टेंशन मधे होते. आता हा कबीर खुशी बाबतीत इमोशनल झाला तर काही खर नाही. लवकर कराव लागेल हे. पण या दोघांना दूर करून उपयोग नाही. खुशी तर मेन आहे. करू नंतर बरोबर.
....

दुसर्‍या दिवशी सुट्टी होती. खुशी उशिरा उठली. ती फोन बघत होती. कबीरचा रीप्लाय आला होता. ती खुश होती. कबीर भेटायच म्हणतो आहे. म्हणजे तो ही माझ्यात इंट्रेस्ट घेतो. वाह आता छान होईल.

बर्‍याच वेळ ती त्याचा डीपी बघत होती. वेगळच छान वाटत होत. ती बाथरूम मधे आवरायला गेली. केस वरती बांधले. तिथे आरश्या समोर ती बर्‍याच वेळ उभी होती. मला काहीच सुचत नाही. चला आवराव लागेल. बाथटब मधे बसुन ती गोड स्वप्नं बघत होती. गालावर लाली चढली होती. गाण गुणगुणत तिची आंघोळ झाली.

ती बाहेर आली. माई बाहेर बसल्या होत्या. "कुठे गेले सगळे?"

"ते काय साहेब, मॅडम फोन वर बोलत आहेत. दीपु तिच्या रूम मधे असेल." माई म्हणाल्या.

"नाश्त्याला काय आहे?"

"इडली सांबार देवू का?"

"मी घेते. "

त्यांचा फोन झाला.

"काय सुरू आहे आई बाबा ?" खुशीने इडली घेतली.

"रोहित कडून स्थळ आल आहे खुशी. रोहितच्या घरचे आपल्या कडे येतील. त्यांच्या कडून लग्नाची मागणी आली आहे. " रश्मी ताई म्हणाल्या.

काय? कोण? मी? काहीही. खर का?

"हो मग तूच लग्नाची आहेस इथे. " रश्मी ताई, सतीश राव हसत होते.

"रोहितला माहिती आहे का हे?"

"माहिती असेल. ते लोक त्याच्याशी बोलले असतिल. खूप चांगले लोक आहेत ते आणि अस ही तू रोहित एकमेकांना ओळखतात ना? " रश्मी ताई तिला चटणी देत होत्या.

"काय करता तुम्ही लोक? आम्ही फक्त एका कॉलेजला आहोत. तो मोठा आहे. खर सांगायच तर त्याच माझ पटत नाही. भांडकुदळ आहे तो. काहीही आई बाबा. तुम्ही अस करु शकत नाही . " खुशी चिडली होती तिने नाश्त्याची डिश बाजूला ठेवली.

" काय प्रॉब्लेम आहे? चांगले लोक आहेत ते. रोहित ही सिरीयस आहे. तूच भांडत असेल त्याच्याशी. " रश्मी ताई अस म्हटल्यावर खुशी बाबांकडे बघत होती.

" बाबा काय अस? मला काही काम नाही का? त्या रोहितशी मी भांडत नाही. तोच काहीही बोलतो. मी हे लग्न करणार नाही . मला अजिबात आवडल नाही. त्या लोकांना नाही सांगून द्या." माझा किती चांगला मूड होता.
नुसता खराब केला या लोकांनी.

आई, बाबा दोघ हसत होते.

"तुम्हाला गम्मत वाटते का? मी सिरीयस आहे. " खुशी परत चिडली.

" अग आता फक्त लग्न जमवून ठेवू. नंतर तुम्ही दोघ म्हणाल त्या प्रमाणे करू. " सतीश राव म्हणाले.

" माझा नकार आहे. " खुशी मोठ्याने म्हणाली.

"हे अस आहे. हट्टी पणा नुसता . काय कारण आहे?" रश्मी ताई ओरडल्या.

"कारण मी.... " कबीर वर प्रेम करते. पण हे कस सांगणार घरी. अजून मी कबीरशी या बाबतीत बोलली नाही. आता बोलाव लागेल.

" बाबा एवढ्यात लग्न नको ना. " तिला माहिती होत अस काही असल की बाबा मदत करतात. आई नुसती ओरडते.

" तू एकवीसची आहे. दोन वर्षाने लग्न केल तरी तेवीस चोवीस ठीक आहे अति उशीर बर वाटत नाही."

आहे वेळ मी तो पर्यंत कबीरशी बोलले आणि रोहितशी ही. ह बर झाल आठवल. ती आत आली रोहितला फोन केला." तुला समजल का आपल लग्न जमतय ते."

"हो आई बाबा आत्ता तेच सांगत आहेत." रोहित म्हणाला.

" रोहित तू सांग ना घरी हे शक्य नाही. "

" का पण? मला अस सांगता येणार नाही. माझे आई बाबा ओरडतील." तो हसत म्हणाला. त्याला खुशीला चिडवायची संधी मिळाली होती.

"रोहित तू हे मुद्दाम करतो आहे ना. तुला माहिती आहे मला कबीर आवडतो. सांग ना घरी. त्यांना म्हणा खुशी भांडकुदळ आहे . "

" ते तर तू आहेच. तुला हव तर तू नाही सांग तुझ्या घरच्यांना खुशी. " रोहित सहज म्हणाला.

" ते माझ ऐकत नाहीत. म्हणतात लग्न जमवून ठेवू. मला मुद्दाम त्रास द्यायला सुरु आहे हे ." तिने रागाने फोन ठेवला.

रोहितने कबीरला फोन लावला. "खुशी कडे जातो आहोत आज. "

का?

" आमच लग्न जमतय. "

" काय?" कबीर खूप चिडला होता.

" काळजी करू नकोस. मी नकार देईल पण अजून नाही. पण याने ही तुझा फायदा होईल. " रोहित म्हणाला.

" तो कसा? "

" आता दुसरी कडे लग्न जमत म्हणून खुशी घाबरेल. तुला पटकन प्रपोज करेल. तू आता नकार देवू नकोस."

" बरोबर, मी का नकार देईल तिला मला खुशी सोबत रहायच आहे . " कबीर खुश होता.

" पण हा दाखवायचा कार्यक्रम करायची गरज आहे का? " कबीरला सहन होत नव्हतं की खुशी अशी तयार होवुन कोणा समोर जाईल.

" मी नाही घरच्यांनी ठरवल. "

" ठीक आहे. "
...

खुशी दिपू बरोबर अभ्यास करत होत्या. दिपूला समजल होत हीच रोहित सोबत लग्न जमत ते. ती आनंदात होती." दीदी तू खरच रेस लावली होती रोहित सोबत? "

" हो आणि मी जिंकली ही. "ती अभिमानाने म्हणाली.

" वॉव दीदी तुला रोहित आवडतो का?"

"काहीही दीपू मी त्याला हेट करते. "

" मग तुम्ही दोघ नेहमी सोबत का असतात. लग्न ही करताय?"

"कुठे सोबत असतो? तो दुसर्‍या ग्रुप मधे आहे. मला नाही लग्न करायच ."

"तुला कसा मुलगा हवा. कोण आवडत दी?" दिपू विचारत होती.

कबीर... तोच हवा मला. ती लाजली.

" तस काही विचार केला नाही मी अजून. " खुशी खोट बोलली.

" दीदी खर सांग ना. रोहित चांगला आहे. एकदा विचार कर. "

" ते शक्य नाही. "

" तु सांग दिपू तुला कसा मुलगा आवडतो?" तिने दीपुला विचारल.

" हीरो सारखा. नुसता दिसायला नाही वागायला ही. सगळी कडे बॉस. नेहमी जिंकणारा. उंच. त्याचा आवाज इम्प्रेसीव हवा. पण अस कोणी नसत." ती सहज म्हणाली.

"असत अग . असे मुल आहेत. " खुशी पटकन म्हणाली.

कबीर आहे तसा. माझा कबीर. तिला खूप छान वाटत होत. मी उद्या बोलते त्याच्याशी.

" कोण दी. तू ओळखते का एखाद्याला. माझी ओळख करून दे ना." दीपु हसत म्हणाली.

" दिपू तू आत्ताशी बारावीत आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर." खुशी मुद्दाम ओरडली.

ती बघत होती कबीर ऑनलाईन आहे का. त्याला कस सांगू आता हे रोहित प्रकरण. तो शंभर टक्के चिडेल. पण तो घाबरला तर बर होईल. मला हो तरी म्हणेल. पण आई बाबांच काय? त्यांना कस सांगणार कबीर बद्द्ल. तिला टेंशन आल होत. रोहित ही जास्त करतो त्याच्या कडे बघते जरा मी. आमच्या कडे येतो का मला भेटायला.


🎭 Series Post

View all