गुंतता हृदय हे भाग 5

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 5
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

थोड्या वेळाने श्रुती कॉलेजहून खुशी कडे आली.

"पाणी पुरी आणली का? " खुशीने घाईने विचारल.

हो.

तिने प्लेट मधे पाणी पुरी काढली. खुशी आनंदाने खात होती.

"कॉलेज मधे कोण कोण होत? " तिला विचारायच होत कबीर दिसला का?

" नेहमी प्रमाणे तेच मुल मुली. काही विशेष नाही. " श्रुतीने सांगितल.

" काय शिकवलं? "

" तीनच लेक्चर होते. बर झाल तु आली नाहीस. "

"रोहित होता का?"

"हो त्याचा पूर्ण ग्रुप होता. मला कॅन्टीन कडे जातांना दिसले ते. " श्रुती म्हणाली.

"कबीर होता का?" शेवटी तिने न रहावुन विचारल.

" माझ एवढ लक्ष नव्हतं."

" किती बोर आहेस तू श्रुती. " खुशी चिडली. तिला हवी ती माहिती मिळाली नाही. या श्रुतीला कॉलेज मधे लक्ष द्यायला काय होत.

" याला काय अर्थ आहे. तू उगीच चीड चीड करते खुशी. एक तर मी तुझ्यासाठी इथे आली त्यात तुझे मूड स्विंग. मी जाते. " श्रुती निघाली.

" श्रुती थांब. सॉरी ..."

दिपू कॉलेज हून आली." कस वाटतय दी? "

" ठीक आहे. "

" काय झालं श्रुतीशी परत भांडण झाल का?" ती हसत होती.

"भांडण अस नाही, दोन दोन शब्द झाले. जा मला पाणी आण." दिपू आत गेली. थोड्या वेळाने श्रुती घरी गेली.

रात्री जेवतांना खुशी शांत होती. आई बाबा काहीतरी ऑफिस बद्दल बोलत होते. बोलण्यात टेंशन होत. खुशी ऐकत होती विशेष समजल नाही. ती आत आली थोड्या वेळ अभ्यास केला. औषध घेवून झोपली.

सकाळी खुशी रेडी होती. तिला कधी कॉलेजला जावू अस झाल होत.

"काळजी घे तिकडे खुशी, जरा उत्साह आवर. " रश्मी ताईंनी सूचना केली.

" हो आई."

खुशी कॉलेज मधे आली. तिचा ग्रुप सोबत ती क्लास बाहेर कट्ट्यावर बसली होती. कबीर कुठे दिसतो का ती बघत होती.

श्रुती आज स्कूटीवर कॉलेजला आली होती . " श्रुती... इकडे ये. सॉरी. चिडली का."

"नाही."

" पार्किंग मधे होता का रोहित त्याचा ग्रुप."

" नाही खुशी सारख काय तेच." एक्चुअली तिने त्या मुलांना बघीतल होत. श्रुतीला माहिती होत ते बाहेर चहा घेत होते . तीने मुद्दामून सांगतल नाही. "हे घे. ढोकळे. आईने दिले."

"इथे नको सगळे खातील. खूप छान असतात तुमचे ढोकळे."

"चल मग क्लास मधे." श्रुती निघाली.

तीच दोन मन होत होतं. जावू का? पण इकडे कबीर दिसला तर?

" खुशी चल."

ती नाईलाजाने आत गेली.

क्लासेस सुरू झाले. लंच ब्रेक मधे तो दिसला नाही. काय कराव? "श्रुती आज रोहित ..त्याचा ग्रुप आला असेल का?"

"मला काय माहिती? काय काम आहे तुला त्या रोहितशी? तो तर तुझा दुश्मन आहे ना." श्रुती बोलली.

"रोहित नाही कबीरला भेटायच आहे ."

"ओह, तो घाईत असतो पार्ट टाइम जॉब करतो तो."

का?

"अग त्यातून त्याची कॉलेजची फी इतर खर्च निघतो. घरची परिस्थिती जेमतेम आहे त्याची. "

खुशी त्याच्या बद्दल माहिती विचारत होती. श्रुती सांगत होती. कबीर अतिशय मेहनती मुलगा दिसतो आहे. मला असे सिरीयस मुल आवडतात.

" आता भेटेल का तो? "

" माहिती नाही. तो अर्धा वेळ कॉलेज मधे असतो सकाळी भेटतो. खुशी एक बोलु का? " श्रुती सिरियस होती.

हो.

" तु कबीरच्या मागे मागे करू नकोस. मला ना तो वेगळा वाटतो. "

"वेगळा म्हणजे?"

" गरीब आहे पण गरीब वाटत नाही. "

" असतात काही मुल चांगले दिसायला. अस कस म्हणतेस तू श्रुती. " खुशीला अजिबात आवडल नाही श्रुती जे बोलली ते.

"मला काय म्हणायच ते सांगता येत नाही. " श्रुती बोलण्याचा प्रयत्न करत होती.

" म्हणजे काय? "

" माहिती नाही तो वेगळाच आहे. आतल्या गाठीचा. तू खूप साधी भोळी आहे खुशी. बी केअरफुल. अस अगदीच त्याच्या मागे मागे करू नकोस. " श्रुती बोलली.

" मला नाही वाटत अस. " खुशी सहज बोलली.

" अस नसेल तर चांगल आहे. "

क्लासेस सुरू झाले. खुशी कबीर बद्दल विचार करत होती. मला तर तो चांगला वाटतो, माझी मदत केली. पाय नीट केला. श्रुती काहीही बोलते. मी ऐकणार नाही. मला कबीर सोबत ओळख करायची आहे.

कॉलेज संपल. त्या घरी आल्या. खुशी जेवताना कबीरचा विचार करत होती. अजिबात करमत नव्हत. नुसती हुरहुर लागली होती. डोळ्या समोर कबीर होता. तो जॉब करतो. अगदी सिरियस आहे वाटत. पैसे नसतील का त्याच्या कडे. कस करत असेल. मला ही ऑफिस काम शिकायचं. मी पण खुप अभ्यास करेन.

"खुशी जेव ना. तुझ लक्ष कुठे आहे." रश्मी ताई बोलल्या.

हो.

"काय झाल कॉलेज मधे? "

"काही विशेष नाही. "

" मग एवढा कसला विचार सुरू आहे?"

" काही नाही." या कबीर मुळे मला वेड लागेल. की कबीरच वेड लागल. ती तिची तिची हसत होती.

"खुशी दी मला थोड समजून सांग केमिस्ट्रीचा एक लेसन." दिपू बोलली.

हो. दुपारी ती दिपू सोबत तिच्या रूम मधे होती. थोडा अभ्यास झाला." मी जाते आता दीपु, तू तुझ तुझ कर. मला पण खुप वाचायच आहे."

"थॅंक्यु खुशी दी. "

खुशी रूम मधे आली. "श्रुती काय बोलत होती. तिला कबीर चांगला वाटला नाही. काय अस. त्याची कुठे चौकशी करावी. तस ही तो त्याचा त्याचा बिझी आहे. तो कुठे म्हणतो माझ्याशी मैत्री कर. मीच त्याच्या मागे जाते आहे. फार चांगला आहे तो. उद्या भेटते त्याला. त्याचा क्लास कुठे असेल. इतर माहिती काढायला हवी. मी श्रुती कडे लक्ष देणार नाही. "

रात्री सतीश राव आले सगळे जेवत होते.

"बाबा ऑफिस मधे काय काम असत?" खुशी विचारत होती.

" बरच काम असत वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. " सतीश राव सांगत होते खुशी दीपू ऐकत होत्या.

" तरी सांगा ना किती सॅलरी मिळते? "

" आता ते ज्या त्या कंपनी वर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या पोस्ट वर आहात ते ही महत्वाच. पण खूप मेहनत करावी लागते तेव्हा थोडे पैसे मिळतात आणि सातत्य ठेवावं लागतं. "

खुशी कबीर चा विचार करत होती. बापरे नुसत्या शिक्षणासाठी किती काम करतो तो. तिला त्याचा अभिमान वाटला.

" बाबा मला ही ऑफिस मधे यायच मी पण काम शिकणार. "

" शाबास बेटा ठरवु आपण. "

सतीश राव दिपू सोबत बोलत होते." परीक्षा कधी आहे? अभ्यास कसा सुरू आहे बेटा? "

ती टाइम टेबल सांगत होती.

" खुशी तुझी कधी आहे परीक्षा?"

" बाबा माझ सबमिशन आहे आता. नंतर परीक्षा. "

" अभ्यासाला लागा आता. "

हो. दोघी एकदम बोलल्या. नंतर सतीश राव, रश्मी ताई ऑफिस बद्दल बोलत होते

दुसर्‍या दिवशी खुशी कॉलेज मधे आली. तिने सगळीकडे फिरून बघितल कबीर दिसला नाही. "श्रुती अग कुठे असेल कबीर?"

" तो लंच ब्रेक मधे कॅन्टीन मध्ये असतो."

दोन तास अजून. तिने कसेतरी काढले. लंच ब्रेक मधे ती स्वतः न जेवता पटकन कॅन्टीन मधे गेली. कबीर त्याचा ग्रुप सोबत चहा घेत होता. साधा शर्ट खाली जीन्स होती. स्पोर्ट शूज त्यात तो खूप भारी दिसत होता. चेहर्‍यावर तेज, अगदी हुशार वाटत होता.

तिला खूप आनंद झाला. अस वाटत होत जोरात पळत जावून त्याला भेटावा. तिच्या चेहर्‍यावर आनंद स्पष्ट दिसत होता. ती त्यांच्यात जावून उभी राहिली. सगळे तिच्या कडे बघत होते.

" काय काम आहे खुशी? काही झाल का?" रोहित बोलला.

"मला कबीरशी बोलायच आहे ."

सगळे कबीर कडे बघत होते. तो गोंधळला. मी? त्याने विचारल.

"हो, दोन मिनिट इकडे ये ना कबीर ." खुशीने रिक्वेस्ट केली.

"नाही, काय हव इथे सांग." तो तयार नव्हता. बाकीचे मुल त्याला हसत होते.

"मी काय करते आहे तुला. दोन मिनिट कबीर ." खुशीने रीक्वेस्ट केली. कबीर इकडे तिकडे बघत होता. त्याला राग आला.

नाही.

बाकीचे मुल हसत होते. तिला कसतरी वाटल. अपमान झाला होता. इथे बोलू का. तिला सुचत नव्हत.

"थँक्यु कबीर. तू मला परवा हेल्प केली. "

" त्यात काय. तुझ्या जागी कोणी दुसरी मुलगी पडली असती तरी मी हेच केल असत. अजून काही?" तो प्रॅक्टीकल होता.

"नाही ."

तो त्याच त्याच इतर मुलांशी बोलत होता. हिच्या कडे पाहिल ही नाही. पाय कसा आहे विचारल नाही. ती हिरमुसली. तिथून निघाली . कबीर मला अजिबात भाव देत नाही. तिने त्याच्या साठी चॉकलेट आणल होत ते त्याला दिल नाही. कसला खडूस आहे. बोलत का नाही तो. लाजतो का. की अति शहाणा आहे.

ती क्लास मधे येवून बसली.

"खुशी जेवायच नाही का? कुठे गेली होती." श्रुती हाक मारत होती.

"काही नाही थोड काम होत." मी मूर्ख... नाही महा मूर्ख आहे. कश्याला बोलायला गेली त्या कबीरशी. किती आकडतो तो. त्याच्या मुळे तो ग्रुप मला हसत होता.

रागात तिने जेवून घेतल.

क्लासेस सुरू झाले. तीच मन लागत नव्हत. कबीर मुळे तिला अस्वस्थ्य व्हायला होत होतं.

त्याला माझ्याशी बोलण्यात अजिबात रस नाही. का अस? त्याची कोणी गर्ल फ्रेंड असेल का? चौकशी करते.

राहुल तिच्या वर्गात होता. तो खुशीच्या ग्रुप मधे होता. तिचा चमचा होता. याला माहिती असेल का काही? "राहुल इकडे ये."

"काय खुशी?"

"एका मुलाची माहिती काढायची आहे? "

"कोण?"

" कबीर, तो रोहितच्या ग्रुप मधला. "

" काय झाल आता? परत भांडण झाल का? तुझ आणि रोहितच. तू लांब का थांबत नाही त्या ग्रुप पासून." राहुल बोलला.

" अस काही झालं नाही राहुल. तु कर ना चौकशी. " खुशी वैतागली.

" त्या बदल्यात माझ्या सोबत कॉफी साठी येशील का?" तो खुशी साठी काहीही करायला तयार होता.

"राहुल मी तुला अभ्यासात मदत करते ना. नोट्स देते ना."

"कॉफी साठी यायच. "

"ठीक आहे. जावू कॅन्टीन मध्ये. " हा राहुल पण जास्त करतो. असे मिळमिळीत मुल काय माझ्या मागे लागतात. कबीर सारखे डॅशिंग मुल मला आवडतात. ते लांब थांबतात.

" कॅन्टीन मधे नाही. बाहेर जायच डेट वर . ते ही संध्याकाळी आणि श्रुतीला आणायच नाही सोबत. " राहुल बोलला. त्याला काहीही करून खुशी सोबत वेळ घालवायचा होता.

"तु राहू दे हे काम. मी माझ बघून घेईल. माझ्या नशिबात हे असे नमुने येतात." ती चिडली होती. रागाने निघाली. ती क्लास मधे येवून बसली.

खुशी..... राहुल हाक मारत होता. तो हताश होऊन कट्टय़ावर बसला.

समोरून रोहित, कबीर त्यांचा ग्रुप येत होता. समोर बघ राहुल.

"आता मजा बघ. तो राहुल खुशीचा आशीक. त्याचे सगळे सेक्रेट सांगेल आपल्याला." रोहित बोलला.

कबीर हसत होता.

" हाय राहुल. काय रे. काय करतो इथे. तू नाराज आहेस का?" रोहितने विचारल.

" हो खुशी चिडली माझ्या वर." तो बारीक तोंड करून बोलला.

" काय झालं? अजून हो नाही बोलली का खुशी तुला. " रोहितने विचारल.

" बोलणार आहे ती." राहुल आशेने म्हणाला.

" कधी? आता शेवटच्या वर्षाला आहे ना तू आणि खुशी? काय बोलत होते तुम्ही?" रोहित बोलला. त्याने बघितल होत खुशी आत्ता इथे उभी होती.

" नाही. काही नाही. मी जातो." राहुल गडबडला.

रोहितने राहुलला जावू दिल नाही. धरून ठेवल. "सांग पटकन नाहीतर उद्या पासून रोज मारेल मी तुला. "

" नाही. अस करु नका. कॉलेज मधे मारामारी अलाऊ नाही. मी कंप्लेंट करेन. खुशी चांगली आहे तिला त्रास देवू नको रोहित. ती कामा पुरती बोलते माझ्याशी." राहुल सुटायचा प्रयत्न करत होता.

" मग आता काय काम दिल खुशीने तुला? "सगळे उत्सुक होते.

त्याने कबीर कडे बघितल. काही नाही.

" सांग पटकन. आम्ही तुझ्या बद्दल खुशीला चांगल्या गोष्टी सांगू. तुमची डेट अरेंज करू. मग तू तिला प्रपोज कर. " रोहित अस म्हटल्यावर राहुलचे डोळे चमकले.

" नाही, मी नाही सांगणार. मी खुशीला धोका देणार नाही."

"अस का. मग धरा याला. मारा रे. "

" सोडा मला अस एकट्या मुलाला गाठून त्रास देता. काही वाटत नाही का?" राहुल त्रासला होता.

"सांग मग पटकन." दोन मुलांनी राहुलला धरल.

"तुम्ही खुशीला काही बोलणार नाही ना."

नाही.

"तिने मला कबीरची चौकशी करायला सांगितली."

कबीर सकट सगळे शॉक झाले.

"का पण?"

"माहिती नाही. "

" जा. खुशीला काही सांगू नकोस."

तो पटकन निघून गेला.

कबीर शांत बसला होता." काय झाल कबीर? "

" या खुशीने माझी चौकशी का करायला सांगितली असेल?"

" स्पष्ट समजत आहे तिला इंटरेस्ट असेल तुझ्यात. " रोहित त्याच्या शेजारी बसत बोलला.

" कस काय पण? मी गरीब मुलगा ती श्रीमंत मुलगी. "

" त्यात काय? मजा आहे तुझी एन्जॉय कर. "

"नाही मला आवडत नाही अस. मी जिच्यावर प्रेम करेल तिच्याशी लग्न करेल." कबीर ठाम होता.

" खुशी काही वाईट नाही. भांडकुदळ आहे थोडी. पण सुंदर आहे. समजूतदार आहे." रोहित म्हणाला.

" ती अल्लड आहे. हट्टी आहे. आमची बरोबरी नाही. मला यात पडायच नाही. शिक्षण झाल्यावर चांगली नोकरी हवी. घरी आई एकटी असते तिच्या कडे बघाव लागेल. " कबीर बोलला.

" अस आहे देव देतो कर्म नेत. मूर्ख आहेस तू कबीर. श्रीमंत पोरगी मस्त चान्स होता." रोहित बोलला.

" नाही परत तेच बोलू नका." तो उठून निघून गेला

" हा असा काय आहे."

"परिस्थिती मुळे. "

कॉलेज सुटल. खुशी श्रुती पार्किंग मधे येत होत्या. राहुल पळत आला.... खुशी.

" केली का चौकशी? "

" नाही. त्या मुलांनी मला धरल. " राहुल सगळं सांगत होता.

" तू त्यांना काही सांगितल नाही ना?" खुशीला शॉक बसला.

"हो सांगितल ."

"मूर्ख आहे का तू राहुल. काय सांगितल. अस वाटत तुला साटकन एक थोबाडीत द्यावी. बोला ना आता पटकन." खुशी चिडली.

"तु कबीरची माहिती काढायला सांगितल ते."

"ओह माय गॉड वेडा आहे का हा?" खुशी डोक धरून बसली.

"तु ही काय खुशी याला काहीही सांगते." श्रुती ही चिडली होती.

"बरोबर आहे. माझ चुकलं. काय म्हटला तो ?"

"काही नाही. " राहुल सांगत होता कस त्या मुलांनी त्याला दम दिला म्हणून त्याने सांगितल.

"मी काय करू आता श्रुती. आता नसेल ना तो कॉलेज मधे? गडबड झाली."

नाही.

त्या दोघी घरी आल्या." मला ना फार कसतरी वाटत आहे. उद्या मी कबीरची माफी मागते. "

श्रुती तिच्या घरी गेली.


🎭 Series Post

View all