गुंतता हृदय हे भाग 3

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 3
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

प्रिया बाहेर आली. "तू खुशी सोबत आहेस का?"

हो. श्रुती बोलली.

"तिला चक्कर आली आहे. "

" कशी काय?" श्रुती पळत आत आली. खुशी आत झोपलेली होती.

"खुशी काय झालं? खुशी उठ."

ती थोडी उठली. ती श्रुतीला मिठी मारून रडत होती.

"काय झालं? तुला कोणी काही बोलला का? भेटले का ते साहेब. कोण होत? देणार का ते तुमची कंपनी वापस? तुला चक्कर कशी काय आली? खुशी बोल. तुझ्या सोबत कोणी काही बर वाईट केल का? काय झालं? अशी का रडतेस? " श्रुती घाबरून गेली होती.

प्रिया आत आली.

"काय झाल इथे? खुशीला त्रास का होत आहे? " श्रुतीने विचारल.

" मला माहिती नाही. हे घ्या मॅडम ज्यूस. डॉक्टरला बोलावलं आहे." प्रिया बाजूला उभी होती.

"काही नको मला तुमच." खुशी उठली." चल श्रुती इथून. घाणेरडे लोक आहेत. लाज वाटत नाही का अस वागतांना."

त्या दोघी निघाल्या. खुशीला एकदम चक्कर आल्या सारख होत होतं. श्रुतीने फोन बाहेर काढला. ती रश्मी ताईंना फोन लावत होती.

" श्रुती फोन नको लावू प्लीज. आई आधीच त्रासात आहे. ती घाबरून जाईल. "

" चल आपण चहा घेवू. " दोघी कॅफे मधे आल्या. अर्धा तासात खुशीचा चेहरा खूप उतरला होता. उदास दिसत होती. डोळ्यात पाणी होत.

" काय झालं? सांग तरी खुशी?"

" तू कोणाला सांगणार नाहीस ना? "

नाही.

ती सगळ सांगत होती.

" कठिण आहे." दोघी गप्प बसून होत्या. चहा घेवून त्या निघाल्या.

खुशी एकदम गप्प झाली होती. श्रुती स्कूटी चालवत होती मधूनच ती खुशी कडे लक्ष देवून होती. त्या हॉस्पिटलमध्ये आल्या.

" श्रुती आईला सांगू नकोस मला चक्कर आली होती ते."

"हो. खुशी अग किती त्रास करून घेतेस? नको रडू ना." श्रुतीने तिचे डोळे पुसले.

" सोड श्रुती आमच काही खर नाही. काय होईल पुढे मला समजत नाही ."

रश्मी ताई खुशीला बघून घाबरल्या. "काय झालं ग?"

" आई डोक दुखत आहे. बाकी काही नाही." ती उदास पणे म्हणाली.

" तु रडली का?"

"नाही मी का रडेल? बाबा कसे आहेत? जेवले का ते? "

" ठीक आहेत." रश्मी ताई श्रुती कडे बघत होत्या. काय झालं विचारत होत्या. ती काही म्हटली नाही.

संध्याकाळी डॉक्टरांनी घराची चावी दिली. "आई मी थकली आहे. मी सकाळी साफसफाई करते. मी श्रुती कडे जाते. " ती कोलमडून गेली होती. तिला वेळ हवा होता. आई बाबां समोर तिला रडायच नव्हत.

"ठीक आहे आराम कर."

बाबा ठीक होते. आता ते दोघ रहातील. आता तिला काही सुचत नव्हत.

खुशी, दिपू, श्रुतीकडे आल्या. थोड जेवून ती झोपली.

आता ती हळू हळू रडत होती. किती मोठा धोका आहे हा. तिला झोप येत नव्हती. कठिण वेळ आली होती. यातून मार्ग काढावा लागेल. आई, बाबा, दिपूला त्रास नको व्हायला. माझ्यामुळे झाल आहे हे. आई बाबा सॉरी. मी सोडणार नाही या लोकांना. काय करू? कस सत्य शोधू? का केल असेल त्या लोकानी अस? होत्याच नव्हतं झाल.

श्रुती झोपायला आली. "खुशी रडू नकोस. शांत हो. दिपूने बघितल तर ती घाबरेल."

" श्रुती तू माझ्या सोबत आहेस ना."

" हो खुशी. काळजी करायची नाही." दोघी झोपल्या.

खुशीला आधीचे सुखाचे दिवस आठवत होते.

साधारण एक वर्षा पुर्वी.....

कॉलेजच्या कॅन्टीन मधे मुलींचा ग्रुप बसलेला होता. लेक्चर नुकतेच संपले होते. आज राधिकाचा बर्थडे होता. मस्त पार्टी होती.

"संध्याकाळी कोणता ड्रेस घालायचा?" सगळ्या विचारत होत्या.

"बर्थडे गर्ल तू काय घालणार आहेस?" श्रुती राधिकाला विचारत होती.

"वन पीस घालु या?"

चालेल.

रंग ?

ऑफकोर्स पिंक... त्या सगळ्या ओरडल्या. "चला आता पटकन घरी निघू या. लवकर आवरून हॉटेल मधे भेटू."

सगळ्या निघाल्या.

" मी येते तुला घ्यायला श्रुती. रेडी रहा." खुशी घरी आली. बंगल्यात कार शिरली. त्यांचा टुमदार मोठा बंगला होता. सगळ्या सुखसुविधा होत्या. आजुबाजूला गार्डन होत. पार्किंग होत. मॉडर्न तरी घरघुती वातावरण होत. सगळीकडे सिक्युरिटी व्यवस्थित होती.

"आई... आई... मला राधिकाच्या बर्थडे साठी जायच आहे. " खुशी हाका मारत आत आली.

"केव्हा?"

" थोड्या वेळाने."

"खुशी दी कोणता ड्रेस घालणार?" दीपु बाजूला बसुन काहीतरी वाचत होती.

"पिंक वन पीस."

" दीपुला ही ने. " रश्मी ताई काम करत होत्या.

" चलते का दिपू. राधिका ओळखीची आहे ना तुझ्या. "

" नाही, मी काय करू तिकडे. आई काहीही काय हिच्या फ्रेंड्स वेगळ्या आहेत ." दिपू नाही म्हटली.

" चल ना. श्रुती ही आहे. " खुशी ला दिपू खूप आवडत होती. दोघी बहिणी अगदी प्रेमाने रहात होत्या.

"नको त्या पेक्षा मी अभ्यास करते."

"ठीक आहे."

"चल थोड खावून घे खुशी. " रश्मी ताई म्हणाल्या.

माई डिश घेवून आल्या.

खुशी तयार होत होती. बेबी पिंक ड्रेस तिच्यावर अतिशय सुंदर दिसत होता. मागून केस मोकळे सोडलेले. लाइट लिपस्टिक लावली होती. हाय हिल सॅन्डल. ती बाहेर आली. रश्मी ताई, खुशी, माई तिच्या कडे बघत राहिल्या.

" वॉव खुशी दी किती सुंदर दिसते आहेस. अगदी प्रिन्सेस."

माई तिचे केस मागून नीट करत होत्या.

"नकोना माई. " खुशी बाजूला सरकली.

"अग असे काय तुझे केस गोल गोल झाले. "माई म्हणाल्या तस दिपु रश्मी ताई हसत होत्या.

"कर्ल आहेत ते."

"काय बाई एक एक फॅशन, आधी माझ्या हाताने तेल लावून छान वेणी घालायची ही खुशी. आता डोक्याला तेलाचा पत्ता नाही." माईंनी नाराजी दाखवली.

"लवकर ये ग."

हो आई. बाय.. दिपू, माई, आई .

खुशी निघाली. श्रुतीला घेतल. त्या हॉटेल मधे आल्या. हॉटेल पॉश होत. सगळ्या जमल्या होत्या. बर्थ डे पार्टी जोरात सुरू होती. मुली खूप एन्जॉय करत होत्या. राधिकाने केक कापला. खुशी, श्रुती, सीमा, मीना, प्रीती एन्जॉय करत होत्या. इतरांकडे बघून हसणं. उगीच गम्मत करणं हे तर अगदी ठरलेल काम होत. स्टार्टर सर्व केले जात होते. समोर गेम सुरू होते. नंतर म्युझिक सुरू झाल त्या सगळ्या डान्स करत होत्या.

हसता हसता सीमाच्या हातून खुशीच्या अंगावर कॉल्ड ड्रिंक सांडलं. "काय हे शी. माझा ड्रेस श्रुती हे बघ हिने काय केल. मी एका मिनिटात आली." खुशी वैतागली होती.

"चल मी पण येते." श्रुती सोबत होती. दोघी वॉश रूम मधे आल्या. ती तिचा ड्रेस पाण्याने साफ करत होती. श्रुती तिला टीशु पेपर देत होती.

"आपल्याला आता निघाव लागेल श्रुती. आईचा फोन येवून गेला." खुशी बोलली.

"हो, आता जेवण करू लगेच निघू. "श्रुतीचा फोन वाजत होता. तिथे रेंज नव्हती. " मी बाहेर आहे. "

"हो आलीच मी."

श्रुती निघून गेली. अचानक लाइट गेली. ओह माय गॉड. किती हा अंधार. कोणी तरी वाचवा मला. शांत हो खुशी अंधाराला घाबरायचं नाही. तू शूर वीर मुलगी आहेस. ती स्वतः ला म्हणाली. काय करू. देवा वाचव. इथे भूत तर नसेल ना.

तिने स्वतः ला धीर दिला. दार कुठे आहे. ती हळूच बाहेर आली. कोणी दिसत नव्हत. श्रुती कुठे गेली. श्रुती.. श्रुती... ती तिला शोधत होती.

एका बाजूला थोडा उजेड दिसला. कोणी तरी फोन वर बोलत उभ होत. ती त्या बाजूने गेली. कशावर तरी तिचा पाय पडला. ती पडणार तेवढ्यात तिला दोन भक्कम हातांनी धरल.

पडशील. तो बोलला.

ती जोरात ओरडली. "कोण आहे?"

"घाबरू नकोस मी आहे."

" मी कोण?"

कबीर.

तेवढ्यात लाइट आले. दोघ एकमेकांच्या बाहुपाशात होते. खुशी त्याच्या कडे बघत होती. तो तिच्या कडे.

कोण आहे हा ? एवढा हॅन्डसम. या आधी कधी बघितल नाही. त्याने त्याचा मजबूत बाहुत तिला आरामात आधार दिला होता. त्याचा मेल परफ्यूम तिला वेड करत होता. ती त्याच्या डोळ्यात हरवली. ती पहिल्यांदा अस कोणाच्या एवढ जवळ गेली होती. तिने नकळत त्याला थोडी मिठी मारली.

" एक्सक्युज मी." तो म्हणाला.

हमम... ती त्याच्या धुंदीत होती.

"सरक ना." तो थोड चिडला.

"नाही. थांब ना असा. कबीर."

"हॅलो." त्याने तिला परत हाक मारली.

" मला जावू दे."

ती अजूनही निरागस पणे त्याच्या कडे बघत होती... सॉरी, ती बाजूला झाली. परत तिचा पाय त्या वस्तु वर पडला. ती सरकली. त्याने तिचा हात धरला. तिला नीट उभ केल.

"काय आहे? तुला नीट बघून चालता येत नाही का? खाली बघ ना. पडली तर सगळे दात तुटतील." त्याने तिला बाजूला उभ केल.

हा अस सांभाळणार असेल तर मी सारखी पडायला तयार आहे. ती विचार करत स्वतः हसली. थोडी लाजली ही.

तो निघून गेला. ती तो गेला तिकडे बघत होती. थांब ना कबीर, किती छान आहेस तू? आपण ओळख करून घेवू. समोर कोणी नव्हतं.

"खुशी... कुठे होती ग? " श्रुती तिला शोधत आली.

"तू कुठे होतीस? लाइट गेले किती अंधार झाला होता माहिती आहे का?" खुशी चिडली.

"मी बाहेर उभी होती. तू त्या बाजूने काय बाहेर गेलीस?"

" ओह अस झाल का. मला समजल नाही. " खुशी अजूनही आजुबाजुला बघत होती.

" घाबरली काय एवढी? मोबाईलचा लाइट लावायचा ना." श्रुतीच बरोबर होत,

" कुठे आहे माझा मोबाईल? मी तुझ्या जवळ दिला होता ना. "

" ओह सॉरी."

" चल आता. "

त्या आत हॉल मधे आल्या. खुशीच पार्टीत मन लागत नव्हत. पण बर झाल मी घाबरली तो मुलगा तरी भेटला. कबीर... बाहेर जावुन बघू का तो दिसला तर ? त्याचा जवळ अतिशय सुंदर वास येत होता. कोणता होता तो परफ्यूम? मला त्या मुला सोबत रहायच आहे. माझ ठरल.

तिच्या मनात प्रेमाचे वारे वाहत होते. ती तिची राहिली नव्हती. लहान पणा पासुन हवी ती गोष्ट तिला लगेच मिळाली होती. त्यामुळे ही अनिश्चितता तिला माहिती नव्हती.

मला त्याच्याशी ओळख करायची आहे. पण त्या मुलाने मला अजिबात भाव दिला नाही. उलट मी पडत होती तर त्याच्या चेहर्‍यावर त्रासिक भाव होते. मी चांगली तर दिसते ना. अस पहिल्यांदा झाल. कोणी मुलाने माझ्याकडे बघितल नाही. नाहीतर श्रीमंत सुंदर म्हणून मुल माझ्या मागे मागे फिरतात. मीच त्यांना भाव देत नाही. हा कबीर वेगळा आहे.

"चल खुशी जेवून घेवू." श्रुती बाकीच्या मैत्रिणीं सोबत उठली. त्या प्लेट घेत होत्या.

"तु जेव मी आलीच."

"कुठे जाते खुशी. ही मुलगी ना काय करेल सांगता येत नाही."

खुशी पळत बाहेर आली. वाॅशरुम कडे गेली. बाजूच्या रूम मधे बघितल. तो दिसला नाही. पार्किंग मधे बघू का. ती तिकडे ही पळत गेली. कोणी नव्हत. ती वापस आली. जेवताना तीच लक्ष नव्हतं. तो परत भेटला नाही तर? मी काय करू? ती तिची राहिली नव्हती.

वर्गातल्या बाकीच्या मुली सोबत होत्या. "चला निघू या."

"उद्या काय करू या?" त्या ठरवत होत्या.

"उद्या सुट्टी आहे, जायच ना किल्ल्यावर? सकाळी लवकर उठा. ग्राउंड वर भेटा." सीमा सांगत होती.

"सायकलींग ना."

हो.

"तु लवकर उठ खुशी." श्रुती बोलली.

हो.

मुली उत्साही होत्या. खुशी, श्रुती घरी निघाल्या. ती इकडे तिकडे बघत होती. तो दिसला नाही. कार घ्यायला आली होती.

" खुशी काय झालं? तुला अशी काय शांत शांत वाटते आहे. " श्रुती म्हणाली.

" काही नाही. " ती सोशल नेटवर्किंग साईट वर कबीरला शोधत होती. आडनाव काय आहे त्याच? ते तर माहिती नाही. लव अॅट फर्स्ट साइट झाल की काय मला. ती गोड हसली.

तिने श्रुतीला घरी सोडल. "मी सकाळी लवकर येते."

हो.

खुशी घरी आली. सतीश राव आलेले होते. कार दिसत होती. ती आत गेली. सतीश राव नेहमी प्रमाणे बिझनेस न्यूज बघत होते. ती त्यांच्या जवळ येवून बसली. "खुशी बेटा कुठे गेली होतीस?"

"बाबा राधिकाचा बर्थडे होता."

"काय गिफ्ट दिल तिला?"

"आम्ही कॉन्ट्रिब्युशन केल होत घड्याळ घेतल. माहिती आहे तुम्ही म्हणाल पुस्तक घ्यायच. वाचन करायला हव."

आता सतीश राव छान हसत होते. "माहिती होत ना मग द्यायच एखाद पुस्तक."

"बाबा ती करेल तीच तीच वाचन." तिने टीव्ही रीमोट घेवून न्यूज चॅनेल बदलल.

"खुशी काय प्रॉब्लेम आहे. बातम्या लाव. " सतीश रावांनी तिच्या कडून रीमोट घेतला.

"नेहमी काय इंग्लिश न्यूज. माझ चॅनल लावा. बाबा तुम्ही इतके सिरियस का रहातात."

" इकॉनॉमिक्स न्यूज महत्वाच्या आहेत. तू ही बस इथे तुला ही आता ऑफिस मधे काम आहे. ऐक जरा. "

" जेवण केल का खुशी?" रश्मी ताई आल्या. त्यांनी सफरचंद कापून आणले होते.

" हो आई. दिपू कुठे आहे? "

" आत आहे काहीतरी लिहीत आहे. तिला आता सबमिशन आठवल असेल. " रश्मी ताई बोलल्या.

" नेहमी प्रमाणे."

तिघ हसत होते.

खुशी बाजूला बसली होती. ती पार्टीत काय झालं ते सांगत होती. तिला कबीर आठवला. अचानक खूप छान वाटत होत. माझ्या स्वप्नातला राजकुमार. लव यू. कुठे भेटेल हा? काहीतरी करायला हवं. हा आमच्याच कॉलेजमध्ये असेल का? कोण देईल याच्या बद्दल माहिती. कबीर....


🎭 Series Post

View all