गुंतता हृदय हे भाग 2

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का
गुंतता हृदय हे भाग 2
तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?

©️®️शिल्पा सुतार

श्रुती, खुशी जेवल्या. मावशींनी डबा दिला. त्या घेवून दोघी हॉस्पिटल मधे आल्या.

" श्रुती तू कबीरला फोन लावून बघ. " खुशी बोलली.

" नाही लागत. "

"ठीक आहे उद्या मी सकाळी त्याच्या गावाला जाते, त्याला घेवून येते तू इकडे आई बाबां कडे बघ. तो इथे हवा. आपल्याला मदत होईल. त्याला सांगू आपण हा प्रॉब्लेम. "

" चालेल. खूप हुशार आहे तो. " श्रुती बोलली.

सतीश राव झोपलेले होते. दिपू त्यांच्या बाजूला बसलेली होती. रश्मी ताई कामात होत्या. त्या अतिशय बोल्ड हुशार होत्या. परिस्थिती सांभाळणार्‍या होत्या. ऑफिस मध्ये ही त्या फायनान्स सांभाळत होत्या. आता दिसत असलेल्या हिशोबा प्रमाणे हातात काहीही राहील नव्हत. अगदी हॉस्पिटलच बिल कस भरणार अशी परिस्थिती होती.

"दीक्षित माझ्या अकाऊंट वर किती पैसे आहेत? " त्यांनी विचारल. दीक्षित मॅनेजर होते ते पूर्ण कंपनी हॅन्डल करत होते.

"मॅडम तुमचे सगळे अकाऊंट ब्लॉक केले आहेत."

"आता? हॉस्पिटलच बिल कस भरणार?" त्यांना खूप टेंशन आल होत.

"भालेराव साहेब ऑफिस मध्ये येतील मी परिस्थिती सांगतो. करतो काही तरी. नाहीतर मी आहे. साहेब कसे आहेत?" दीक्षित म्हणाले.

"ठीक आहेत. ही परिस्थिती कधी नीट होईल दीक्षित? काही करता काही व्हायला नको." त्या काळजीत होत्या.

" माहिती नाही मॅडम इथे ऑफिस मधे ही खूप प्रॉब्लेम आला आहे. आपल्या अर्धा लोकांना काढून टाकल त्यांनी."

" माझी मीटिंग अरेंज करा ना त्यांच्या सोबत. "

" हो विचारून बघतो. मीच अजून किती दिवस आहे इथे माहिती नाही." दीक्षित काळजीत होते कधीही काढतील सांगता येत नाही.

" तुम्ही शक्यतो हा जॉब सोडू नका. आपल कोणीतरी हव इथे. लक्ष द्या. आपल्या वकिलांना कॉन्टॅक्ट करा." रश्मी ताई भराभर काम सांगत होत्या.

" मॅडम फी कशी भरणार? कंपनी बँक अकाऊंट ब्लॉक आहे. ".

"बरोबर आहे. थांबा थोड ठरवू काय ते. "रश्मी ताई विचार करत बाहेर उभ्या होत्या. सतीश रावांना जास्त काही सांगता येणार नाही. त्यांना आता टेंशन द्यायच नाही.

खुशी आत आली. तिने बघितल आई टेंशन मधे आहे. तिने थोड ऐकल होत. पण तिने आत्ता आली अस दाखवल.
" आई तू बाहेर का उभी आहेस? आत चल. कसे आहेत बाबा? "

" ठीक आहे. तू आपले कपडे आणले का?"

"हो आई, हे बाबांचे कपडे. आपल सामान श्रुती कडे आहेत."

काकू .. श्रुती येवून भेटली.

"चल दिपू, चला काकू जेवून घ्या. खुशी हा काकांचा डबा. आम्ही कॅन्टीन मधे आहोत." श्रुतीने दीपुचा हात धरला.

"नको मला काही." रश्मी ताई बोलल्या.

"आई अस करुन चालेल का? प्लिज स्वतःची काळजी घे. " त्या श्रुती दिपू सोबत कॅन्टीन मधे गेल्या.

खुशी विचार करत होती काय कराव आता? रहायची सोय करावी लागेल. त्या भालेराव साहेबांना भेटाव लागेल. काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. बाबा इतके हुशार स्ट्रॉंग आहेत. त्यांनी धीर सोडला म्हणजे कंपनी हातातून गेली आहे बहुतेक. नाहीतर ते इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत.

तिथले डॉक्टर ओळखीचे होते. ते तपासायला आले. "कशी आहेस बेटा?"

" मी ठीक आहे काका."

"परांजपे साहेब तुम्ही एकदम ओके आहात. टेंशन फ्री रहा." डॉक्टर म्हणाले.

सतीश राव शांत पणे हसले. खुशी त्यांना बघून दुःखी होती.

डॉक्टर बाहेर आले. खुशी त्यांच्या मागे पळत गेली. "काका, बाबा ठीक आहेत ना? मला खूप काळजी वाटते आहे."

"काही काळजी सारख नाही. परांजपे साहेब एकदम ओके आहेत. उद्या घरी सोडून देवू."

" काका तुमची फी मी नंतर दिली तर चालेल का? आता बहुतेक जमणार नाही. पण मी करते आहे प्रयत्न. तुम्हाला माहिती ना काय झालं." ती शांततेत म्हणाली.

"मला नकोच आहे फी. काही काळजी करू नकोस. औषध गोळ्यांच बघ फक्त." डॉक्टर म्हणाले.

"काका घर नाहिये रहायला. मी नोकरी शोधते आहे." खुशी कसतरी म्हणाली. ऐरवी कोणाकडे एकही वस्तु मागायची नाही अस आईने शिकवलं होत. तिला हे जड जात होत.

"माझा एक फ्लॅट आहे. लहान आहे तिथे शिफ्ट होणार का? म्हणजे अगदी एक बेडरूमचा आहे."

"चालेल काका. खूप थँक्स. घरभाड किती? "

" पैसे नाही घेणार. परांजपे साहेबांनी खूप उपकार केले आहेत माझ्यावर. पण तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. दिवसातून एकदा पाणी येत. भरून ठेवाव लागेल. लिफ्ट ही नाही. चौथा मजला जुनी बिल्डिंग आहे. "

" काही हरकत नाही. आधी शिफ्ट होतो मग बघू दुसरीकडे घर. " खुशीला बर वाटल.

" संध्याकाळी चावी आणतो. साफसफाई करून घे. "

" थॅक्यु काका. "

रश्मी ताई, दिपू, श्रुती जेवण करून आल्या. " श्रुती तू दिपूला तुझ्या सोबत घरी घेवून जा. "

" ठीक आहे. " त्या दोघी घरी गेल्या.

"आई मला थोड काम आहे. मी बाहेर जाते." खुशी बोलली.

" कुठे जातेस? केव्हा येशील? " रश्मी ताई काळजीत होत्या.

"येते एक तासात. आणि घराच काम झाल."

" कोणी दिल? " रश्मी ताईंना त्यातल्या त्यात बर वाटल.

" डॉक्टर काका, लहान आहे घर, पण सुरुवातीला ठीक आहे. संध्याकाळी काका चावी देतील. "

ठीक आहे.

ती परांजपे इंडस्ट्रीच्या ऑफिस मधे आली. आता हल्ली ती तिथे तिच्या बाबांसोबत काम करत होती. बर्‍याच वेळा कॉलेज झाल्यावर ती ऑफिस मधे येत होती. काम शिकत होती. सगळे ओळखीचे होते.

गेट वर तिला थांबवल. आत येवू दिल नाही. तिने आत फोन लावला. आता दोन दिवसा पुर्वी इथे किती रुबाब असायचा तिचा. मालकाची लाडकी मुलगी.

दीक्षित काका बाहेर आले. "हिला येवू द्या."

"काका काय झालं हे? त्या लोकांनी आपली कंपनी का घेतली असेल?" खुशी घाईने विचारत होती.

"भालेराव ग्रुप मोठा ग्रुप आहे. काहीतरी गैरसमज झाला आहे. चौकशी सुरू आहे." त्यांनी सांगितल. खर तर त्या भालेराव ग्रुपने प्लॅन करून शेअर घेतले अस दिसत होत. पण काय बोलणार.

"तुमचे जॉब फिक्स आहेत ना?"

"काही माहिती नाही. खूप लोकांना काढल. "

" ते लोक अस कस करू शकतात. दुसर्‍याची वस्तू घेवू नये आपल जे आहे त्यात छान रहाव. " खुशी निरागस पणे म्हणाली.

" हो ना पण आता काय करणार खुशी बेटा. हे जग इतक चांगलं आहे का ?"

"बाबांना बर नाहिये. त्यांना अ‍ॅडमिट केल आहे." खुशीने तोंड उतरवून सांगितल.

"हो ना समजल. मी केला होता फोन. खुशी तुला पैसे लागत असतिल तर सांग. "

" हो काका थँक्स. " कठिण परिस्थिती आहे. खुशी काळजीत होती.

"त्या भालेराव ग्रुपच ऑफिस कुठे आहे, घर कुठे आहे. मी आज भेटणार आहे त्यांना. " खुशी म्हणाली.

" तिकडे नका जावू खुशी मॅडम. "

"पण काहीतरी कराव लागेल ना काका. "

"त्या लोकांबद्दल काहीच माहिती नाही. ते या शहरातले नाहीत." दीक्षित माहिती देत होते.

"मग आपल्या कंपनी साठी ते इकडे आले का? " खुशीला आश्चर्य वाटल.

हो.

" का पण? "

" माहिती नाही मी आत कामाच बघतो. "

" ठीक आहे मी निघते मी फोन करते तुम्हाला. " खुशी आणि दीक्षित साहेब बोलत होते ते वॉचमन ऐकत होता.

"आज ते भालेराव साहेब हॉटेल ओबेरॉय मधे आहेत. तिथे मीटिंग आहे. अजून या ऑफिस मधे सकाळ पासून आले नाहीत तुम्ही तिकडे जावून बघा मॅडम. " वॉचमनने सांगितल.

ती पटकन निघाली. हॉटेल मधे आली. खूप मोठ हॉटेल होत. कुठे असतिल भालेराव सर? जमलं तर ती बोलणार होती त्यांच्याशी. काय झालं नक्की ते ऐकणार होती. खूप महत्त्वाची आहे ही मीटिंग. ती घाईत होती. रीसेप्शन जवळ आली ." भालेराव ग्रुपची मीटिंग कुठे आहे?"

"टॉप फ्लोअर."

ती लिफ्टने वर गेली. रूम सापडली. तिने दार वाजवल. एका मुलीने दार उघडल.

"काय हव?" ती बघत होती जीन्स घातलेली ही मुलगी कोण आहे.

"भालेराव सर आहेत का? त्यांना भेटायच आहे ." खुशी बोलली.

" तुमची अप्यायमेंट आहे का? कोण तुम्ही? "

"नाही अप्यायमेंट नाही. अर्जंट काम आहे." खुशी म्हणाली.

"ते असे कोणालाही भेटत नाही. तुम्ही व्यवस्थित वेळ घेवून या." ती प्रक्टीकल होती.

"प्लीज खूप महत्वाच आहे. मी परांजपे इंडस्ट्री मधून आली आहे. खुशी परांजपे. थोड बोलायच होत त्यांना निरोप द्या ना. "

" नाही जमणार सर रागावतील. ते बिझी आहेत. "

"मी पटकन आटपेल. त्यांना फक्त रीक्वेस्ट करायची आहे."

" कोण आहे प्रिया?" आतून आवाज आला.

"एक मुलगी आहे. खुशी परांजपे. तिला आत यायच आहे तुम्हाला भेटायला. " प्रिया बोलली.

खुशी आत वाकून बघत होती. कोण आहे हे. आवाज ओळखीचा वाटतोय.

तिला भेटू दिल नाही. ती बराच वेळ बाहेर उभी होती. आतून कोणीतरी तिच्यावर लक्ष देवून होत. शेवटी ती कंटाळली, उभ राहून पाय दुखत होते. ती वापस निघाली. संध्याकाळी खूप काम आहेत.

ती हॉस्पिटल मधे आली. सतीश राव ठीक होते आता ते हळू हळू बोलत होते. तिने चहा घेतला. ती विचार करत होती. हे भालेराव ग्रुपचे लोक सहजासहजी भेटणार नाही अस वाटतय. काय कराव? ती त्या कंपनीची माहिती मोबाईल मधे वाचत होती. फोन नंबर आहे पण तो दुसरीकडचा आहे.

तिचा फोन वाजत होता. कोण आहे काय माहिती.

"मी भालेराव इंडस्ट्री मधून प्रिया बोलते आहे. तुम्हाला भालेराव सरांनी भेटायला बोलवल."

"आत्ता?" तेव्हा मी गेले तर मुद्दामून भेटले नाहीत आणि आता अस बोलवलं. ती विचार करत होती.

"हो, आत्ता सर मीटिंग मधून बाहेर आले."

"तुम्हाला माझा फोन नंबर कोणी दिला?" खुशीला आश्चर्य वाटल होत.

"सरांकडे तुमचा नंबर होता."

"मी उद्या येवू का ?" आता तिला खूप कंटाळा आला होता. जाणार कस इतक्या लांब किती पैसे लागतात.

"उद्या जमणार नाही सरांच शेड्युल बिझी आहे. "

"येते, थोडा वेळ लागेल."

" चालेल. "

तिने श्रुतीला फोन केला. त्या दोघी स्कूटी वर हॉटेल मधे आल्या. फाइव्ह स्टार हॉटेल होत. आत स्कूटी आत न्यायला बंदी होती. तीने स्कूटी समोर गल्लीतच लावली. दोघी वरच्या मजल्यावर आल्या. श्रुती बाहेर सोफ्यावर बसली होती . खुशी आत गेली.

प्रिया आत सांगायला गेली.

खुशी बाहेर उभ राहून काय बोलायच त्याची उजळणी करत होती. त्या सरांनी ऐकायला हव. निदान रहायला घर किंवा नोकरी तरी मिळायला हवी. तिला धडधड होत होती.

"आत पाठव." ते सर बोलले.

खुशी आत आली.

"ये खुशी."

ती पुढे गेली. कोणी तरी सोफ्यावर बसल होत.

" थॅक्यु सर. मला तुम्ही भेटायला वेळ दिला. मी खुशी परांजपे. माझ म्हणण ऐकुन घ्या. मी फक्त पाच दहा मिनिट घेईल तुमचे." ती भराभर बोलली.

समोरून कोणी काही बोलल नाही.

"काय प्रॉब्लेम झाला आहे समजत नाही. तुमच्या कंपनीने आमचे शेअर घेतले. आमची कंपनी टेक ओवर केली. का अस? मला समजेल का? काही गैरसमज असेल तर आमची कंपनी उत्तर द्यायला तयार आहे. कारण सगळे शेअर आमच्या फॅमिली मेंबर कडे होते. तुम्ही नक्की कोणाचे शेअर घेतले? तुम्हाला कोणाचा राग आला आहे का. काही चूक झाली का आमच्या कडून. मी माफी मागते. " खुशी भराभर बोलत होती.

" हुशार दिसतेस. सगळी माहिती आहे तुला. पण तुला तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. समजल ना खुशी. "

" हा आवाज. कोण आहे? " ते सर उभे राहिले. तिने समोर बघितल. ती एकदम दचकली. " तू इथे? काय आहे हे? तुझ अडनाव भालेराव आहे का?"

हो.

तिच्या डोळ्यात पाणी होत. ती एकदम पुढे गेली. त्याचा शर्ट पकडला.

प्रिया पळत आली. बॉडी गार्ड आला. त्याने हात दाखवून सगळ्यांना थांबायला सांगितल. ते वापस गेले. "बोल काय प्रॉब्लेम आहे खुशी. आज पर्यंत या प्रकारे माझा शर्ट पकडायची कोणाची हिम्मत झाली नव्हती. याची शिक्षा तुला मिळेल." त्याने तिचे केस मागून ओढून घेतले. तिच्या चेहर्‍यावर वेदना होती डोळ्यात आसू होते. ती ओरडली. तिने झटका मारून स्वतःची सुटका करून घेतली. तो तिच्या जवळ आला. ती पटकन मागे सरकली. त्याला ढकललं. तिच्या डोळ्यात खूप राग होता.

"शी.. मला तुझी कीव येते. किती घाण विचार आहेत तुझे. या प्रकारे कोणाला फसवतात का? का केल तू अस? आम्ही काय केल होत तुझ? बाबांनी किती टेंशन घेतल आहे . ते आजारी आहेत. अ‍ॅडमिट आहेत. आम्हाला घराबाहेर काढल, रहायला जागा नाही. हॉस्पिटल साठी पैसे नाहीत. घरात सामान नाही. काही वाटत नाही का अस वागतांना. कुठे जावू मी आई बाबांना घेवून." ती रडत होती. तिला खूप कसतरी होत होतं. श्वास घेता येत नव्हता. तो निराकार चेहर्‍याने तिच्याकडे बघत होता.

तिला एकदम चक्कर आली. ती खाली पडली. खुशी..... त्याने तिला उचलल .आत आणून झोपवल. तो दोन मिनिट तो तिच्या चेहर्‍याकडे बघत बसला. खुशी उठ.

त्याच्या मोबाईल वर मीटिंगच नोटिफिकेशन आल. तो बाहेर आला.
"कोण आहे या मुली सोबत बघ प्रिया. डॉक्टरांना बोलव. ज्यूस दे हिला. बर वाटल तर तिला इथून जावु दे. " तो मीटिंग साठी निघून गेला.


🎭 Series Post

View all