गुन्हेगार मी नाही

Relation is imporatant part of life


कथा पूर्णतः काल्पनीक आहे...

काय केलेस तू माझ्या पोरीसोबत?? कुठे आहे ती सांग??मृदुलाचे बाबा मनोहरला बोलत होते..त्याचे अगदी शर्ट पकडून त्याला त्याच्या घरातून बाहेर ओढत आनले...हे इतक्या घाईघाईत घडलं की मनोहरला काय होत आहे हेच कळत न्हवते...

मनोहर:"तुम्ही काय बोलत आहात मला काहीच कळत नाही??

मृदुलाचे बाबा:"किती खोटं बोलणार आहेस??थोडी तरी शरम बाळग....सहा महिने झाले नाही लग्नाला आणि तू पोरीला त्रास द्यायला लागलास..तू आता काही माहीत नसल्याचा बनाव करू नकोस....सांग लवकर मृदुला कुठे आहे..??

मनोहर:"ती तुमच्या इथेच आली होती .मला म्हणाली आई बाबाची खूप आठवण येते आहे..चार दिवस माहेरी जाते.काल दुपारी तिने फोन केला मला पाहोचली म्हणून सांगितले..

मृदुलाचे बाबा:"किती खोटं बोलणार आहेस??..किती ढोंगी आहे रे तू ??थांब तुला पोलिसात देतो मग सगळं आठवेल...


शेवटी प्रकरण पोलिसांकडे गेले.पोलीस मनोहरकडे चौकशी करू लागले..सांग कुठे आहे तुझी बायको?काही बरे वाईट तर नाही केलेस ना??

पोलीस त्याला संशयाच्या नजरेने पहात होते. मनोहर ढसाढसा रडु लागला.त्याला काही सुचत न्हवते. किती प्रेम करतो मृदुलावर मी आणि मृदुला माझ्यावर मग हे काय सर्व चालू आहे..तो हात जोडून ,स्वतःच्या मेलेल्या आईची शप्पथ घेऊन सांगत होता सर मला खरंच माहीत नाही  मृदुला कुठे आहे..मनोहर पालिसांच्या कचाट्यात सापडला होता.त्याचे डोकं बधिर झाले होतं.


मृदुला कुठे गेली .खूप काळजी वाटत होती तीची..काही मार्ग नव्हता..मृदुला बेपत्ता होती..ना तिच्या नवऱ्याला माहीत होते ना तिच्या वडिलांना.. कोण खरं बोलतयं काही कळण्यास मार्ग न्हवता...त्याला वाचवणार .त्याला ऐकून घेणारे कोणीही न्हवतं.. जी होती तिला रागाच्या भरात खूप काही बोललो, सगळे संबंध तोडले होते.ती म्हणजे स्वरा..स्वरा त्याची मोठी बहीण.. खूप काही बोलला होता  ..कारणही तसेच होते पण आज कुठेतरी त्याला बहिणीशी संबंध तोडल्याचा पाश्चाताप  होत होता..रागाच्या भरात किती अपमान केला होता...


ज्या ताईने संसाराची घडी बसवली होती त्या ताईलाच दूर लोटले होते ..आज वर्ष झाले होते ताईशी बोलला नाही आणि भेटण्याचा प्रश्नच न्हवता ..किती सहज बोलून गेला होता"माझ्या संसारात लुडबुड करू नको पुन्हा ,मला तुझं तोंड बघायचे नाही ..जर का पुनः माझ्या घरी आलीस तर याद राख..."

स्वरा खिन्न मनाने निघून गेली होती..आई बाबा नंतर तिला माहेर म्हणजे फक्त भाऊ होता..तिचे माहेर नेहमीसाठी संपले होते.ज्या बहिणीने त्याला अंगा खांद्यावर खेळवले तीच वैरी वाटू लागली..ताई शिवाय त्याचे पान हलत न्हवते.काहीही असेल तर आधी ताईला सांगणारा मनोहर नेहमीसाठी चिडीचूप झाला..रक्षाबंधन ,भाऊबीज असली की वेड्यासारखा ताईची वाट पहात राहायचा.. ताईची मुलगी सोनू तिच्यावर तर खूप जीव ..लाडकी  भाची पण तो जिव्हाळा, प्रेम सर्वच संपलं होतं.. नात्यात  कटुता  आल्याने दुरावा वाढला होता ..खूप दूर झाले होते दोघेही..

तरी ताई त्याला जाता जाता म्हणून गेली होती"मनोहर तुझे डोळे एक दिवस नक्की उघडतील??तू मला मनापासून आवाज देशील पण मी तेव्हा तुझ्यासोबत नसेल...लक्षात ठेव.."आज तेच झाले होते.. आज ताईला तो मनापासून आवाज देत होता पण ताई न्हवती....

मनोहरला डोळा लागला...त्याला स्वराचा आवाज ऐकू आला..त्याने डोळे उघडले.. पाहतो तर कोणीही न्हवते.. खरचं तो भास होता..एकटक भिंतीला पहात होता...मृदला न सांगता कुठे गेली होती त्याच विचाराच्या  तंद्रीत होता..

समोरून त्याला कोणीतरी येताना दिसले... त्याची नजर त्या येणाऱ्या व्यक्तीकडे स्थिरावली..डोळ्यातून फक्त घळाघळा पाणी येत होते.. ती ताईच होती  ..हो त्याचीच बहीण आली होती ...सोबत वकीलसुद्धा आणले होते...वकीलांशी बोलणं झाल्यावर त्याला सोडण्यात आले...
मनोहरने किती दिवसाने ताईला घट्ट मिठी मारली...ताईनेही त्याच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवला,तसे त्याला अजून गहीवरून  आले .


ताईसोबत घरी आला..ताईने उंबऱ्यावर पाय ठेवला तसे तिच्याही डोळ्यात पाणी आले ..किती दिवसाने आज माहेरची पायरी ओलांडत होती...सासरी सर्व सुख असूनही माहेरच्या मायेसाठी ती तहानली होती..


मनोहर तिला बोलू लागला"ताई मृदुला कुठे आहे काय झाले कळतं नाही...मी काहीच केले नाही ताई ...

मनोहर मृदुला फार चतुर मुलगी आहे ,मी सुरवातीलाच ओळखले होते.माझीच चूक झाली ....

मनोहर:"काय चूक झाली ताई??

ताई:"मनोहर मला आधीच तुला सांगायला हवे होते....एकदिवस मी तिला एका मुलासोबत पाहिले..मला वाटलं मित्र आहे..पण तो मित्र नव्हता...तो मुलगा माझ्या मिस्टरांच्या कंपनीत कामाला होता..त्याच्यामुळे त्यांचे जे काही प्रेम  प्रकरण होते ते माझ्याही कानावर आले...


मृदुलाने फार चतुराईने आपल्या दोघांमध्ये भांडण लावले....मला प्रॉपर्टी हवी असे मी कधीच म्हणाले नाही .मी तिला एकदा त्या मुलाविषयी  विचारले तर माझ्यावर भडकली आणि म्हणाली"इथे तुम्ही पाहुणी आहात ,पाहूण्यासारखं राहायचे.जास्त नाक नका खुपसू.. ती फक्त माझ्यावर खार खात राहिली..नंतर तर मी येणं जाणे कमी केले...वाईट तर तेव्हा वाटलं आपण लहानाचे मोठे झालो,एकत्र राहिलो तरी तू मला ओळखू शकला नाही...तुलाही तेच वाटलं की मी हिस्सा मागेल..मला कसलीच कमी नाही रे मनोहर.

मी  नेहमीच पुढाकार घेऊन बोलते ...आई बाबा गेल्यावर फक्त 
तूच जवळचा होतास ..आणि तू सुद्धा दुरावला.नात्यावरून विश्वास उडाला..एकदा मी मृदुलाविषयी   तुला हे सांगितले तर  तू मलाच म्हणाला  "माझी मृदुला असं काही करणार नाही"..तिच्यावर इतका विश्वास होता तुला, त्यासमोर  तू सत्य पडताळून पाहण्याची तसदी घेतली नाही...

तितक्यात बेल वाजली..मृदुलाचे बाबा आले  होते.....

बाबा:"मनोहर माफ कर,चूक माझ्या पोरीची आहे..मला वाटलं होतं लग्न झाल्यावर प्रेमाचे भूत उतरेल.म्हणून मी तिचं लग्न लावले..चूक माझीच होती ...मोठी चूक झाली....

स्वरा:"काय चूक झाली ????तुम्हाला स्वतःची मुलगी कशी  आहे हे चांगलं माहीत असून सुद्धा माझ्या भावाचा बळी दिला???ही चूक नाही गुन्हा आहे .माझ्या भावाचे आयुष्य उध्वस्त केले तुम्ही....

मृदुलाचे बाब:"मान्य आहे ,मी खरंच गुन्हा केला आहे....बाप म्हणून मुलीचे सुख पाहिले..पण ती अशी करेल माहीत न्हवतं..ती सुरवातीला  चांगली राहिली.त्या मुलाला विसरली म्हणून असे दाखवले...थोड्या दिवसाने आम्हाला सांगू लागली मनोहर खूप त्रास देतो..मारहाण करतो ..म्हणून मनोहर वर आम्हाला शंका आली..आम्हाला वाटलं मनोहरने काही केले का...पण आज आम्हाला कळलं, की ती त्या मुलासोबत आहे...खरंच जी सजा द्याल ती कबुल आहे.....

मनोहर:"मी काय सजा देणार तुम्हाला ..मलाच भोगायचे आहे आता.खरं प्रेम केल्याची शिक्षा....कधी तिच्यावर हात उचलला नाही आणि तरी माझं नाव खराब केले...माझी जी इज्जत गेली ती तुम्ही परत  आणून देऊ शकता का??
तो पुन्हा रडु लागला...

स्वरा:"मनोहर, सांभाळ स्वतःला....तुला माहीत आहे ना तू निर्दोष आहे ..तू काही केले नाही तर तू कशाला मनाला लावून घ्यायचे.??.. मृदुला चुकीचे वागली तुझ्यासोबत ....एकदाही तिने विचार करू नये असे वागताना..मला आजही तुझ्यावर विश्वास आहे..तू  कधीच चुकीचा न्हवता..तू चांगला नवरा म्हणून संसार करत राहिला...गुन्हा तर तिने केला आहे..तुझ्यावर खोटे आळ घेतले, बहीण भावांमध्ये फुट पाडली..स्वतःच प्रेम मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबला.पळून जाण्यासाठी तिने जी हिम्मत  दाखवली जर तिने आधी आई वडिलांना लग्नाला विरोध करण्याची हिंमत दाखवली असती तर आज ही तुझ्यावर  परिस्तिथी आली नसती...तिने तुझं आयुष्य दावणीला का लावायचे??देव तिला कधीच माफ करणार नाही बघ .....कधीच माफ करणार नाही...


मनोहरने स्वरासमोर हात जोडले तसे स्वराला गहिवरून आले..तिने स्वतःला सावरलं ..थोड्या वेळात स्वराची मुलगी सोनू आली तिने मनोहरला घट्ट मिठी मारली म्हणाली "मामा ,खूप आठवण येत होती तुझी,खूप मिस केले.. आई तुझ्यासाठी रोज रडायची ...आम्ही आईला पाहून रडायचो.."...


सर्वांच्या अश्रूंनी नात्यातील दुरावा वाहून गेला होता..नात्यातील गैरसमज दूर झाले आणि नातं पुन्हा जवळ आले होते,बहरले होते......


नातं कोणतही असो गैरसमजाचा रुक्षपणा आला  की त्या नात्यातला ओलावा कमी होऊन नातं बिखरतं ..जर वेळीच गैरसमज दूर केले की नातं भक्कम होते..

समाप्त..


कसा वाटला लेख नक्की प्रतिक्रिया कळवा.लेख आवडल्यास लाईक,शेअर ,कंमेंट जरूर करा..मला फॉलो करायला विसरु नका.
©®अश्विनी पाखरे ओगले..