६३) गुलमोहर.... एक प्रेमकथा

......
पिंकी रडत रडत म्हणाली पण तीचा आवाज त्याचा कानापर्यतं गेलाच नाही.ती अजूनही त्यांने उठावं म्हणून प्रयत्न करत होती. त्याला हलवून उठवायचा प्रयत्न केला. पण काहीच झालं नाही. अचानक त्याची हालचाल थांबली तशी ती घाबरली आणि ती जीवाच्या आकांताने ओरडली.पण,तीचा आवाज रुमच्या बाहेर गेला नाही.

दुसरीकडे बाहेर अनिकेतच्या बाबांशी इंदर बोलण्यांत मग्न होता.मोहिनीचं अचानक आजूबाजूला लक्ष गेलं पण.....पिंकी तीला तिथे दिसली नाही.

इंदर पिंकी कुठे? गेली मोहिनी इंदर कडे बघत म्हणाली.

इथेच होती ना "आता कुठे? जाणार आहे

अरे... इथेच होती मला माहित आहे.पण आता नाही म्हणून विचारतेय ना"

शांत हो ना बाई हाँस्पिटल आहे इतक्या जोरात कशाला बोलतेस.तसंही तीच्या पायाला लागलंय जास्त दुर नाही जाणार असेल इथेच मी"बघतो.बोलत इंदरने एक नजर चौफेर फिरवली.पिंकी काही दिसली नाही.

मोहिनी ".....ती अनिकेतला बघायला तर नाही गेली ना" मध्येच इंदर काही तरी विचार करत म्हणाला.

डाँ अनिकेत.... अरे हे कसं विसरले  मी"माझ्या लक्षात नाही आलं.

हो ना "कसं लक्षात येईल तूला तर ...कारण हवं असत मांजरी सारखा पंजा मारायचा जो असतो.

हो "जास्त बोलू नको नाही तर...पंजा नाही पण नख मारेन थांब बघतेय मी" तिथे आहे का? ते बोलता बोलता ती त्या रूमकडे वळली आणि दार लोटलं तसा पिंकीचा रडका सूर तिच्या कानावर पडला.तशी ती पुर्ण दरवाजा लोटून आत जात"...

पिंकी अग ...काय? झालं तूला रडायला येतील ग... ते शुद्धित"

ताई ते शुद्धित आले होते ग....

काय? आले होते कधी काय? बोलतेस तू"

हो ताई आले होते ते मी" त्यांच्याशी बोलत होते अचानक त्याचा हाताचा बोटांची हालचाल मला जाणवली.आवाज पण दिला मला मी" ऐकलं त्यांनी मला हाक पण मारली.पण मी"वर बघणार की ,पुन्हा बेशुद्ध पडले.ते कधी पासून उठवतेयं मी"उठतच नाही.

काय? तू ....तू ....वेडी आहेस शुद्धित आले आणि पुन्हा बेशुद्ध पडले तर ....तू ,त्यांना उठवत बसलीस"अग...वेड लागलंय का? तूला"आशा वेळी डाँक्टरांना बोलवतात ना" की,रडत बसतात मुर्ख कुठली आवाज देता नाही आला का? तूला"मोहिनी चिडून म्हणाली.

काय? झालंय आणि काही नाही किती वेळ झालायं बेशुद्ध होऊन काय? करू ती मनात बडबड करत"

इंदर ".....अचानक मोठ्या आवाजात म्हणाली.आणि रूम बाहेर धावत जाताचं"....

इंदर ते डॉक्टर".... डाँक्टरांना बोलव लवकर डाॅक्टर अनिकेतना शुद्ध आली ते पुन्हा बेशुद्ध पडलेत.

काय?मोहिनी इंदरला सांगत होती की डाँक्टर राऊंडसाठी आले होते.

डाँक्टर बरं झालं तुम्ही आलात ते पेशंटला शुद्ध आली होती पण ते पुन्हा बेशुद्ध झालेत"इंदर म्हणाला.

काय? म्हणतं डाँक्टरांनी लगेच त्याचा हाताचे ठोके चेक केले.

ओ माय गाँड "

काय? काय? झालंय डाँक्टर"डाँ अनिकेत  ठिक तर...आहेत ना"इंदर गडबडत म्हणाला.पण डाँक्टर काहीच बोलले नाही. घाईतच त्याचा छातीवर एक दोन वेळा मशीनने दाब देऊन त्याचा श्वासोच्छ्वास परत आणायचा पर्यतं केला.पण काही झालं नाही.तसा डाँक्टरांनी पुन्हा तोच प्रयत्न तिसऱ्यादा केला.तसं अनिकेतच शरीर अर्धा इंच इतकं उडालं.आणि त्याचा श्वास सूरू झाला.

देवाची कृपा झाली.त्यांची पल्स बंद पडली होती.मलाही खात्री नव्हती ते जीवंत होतील याची.पण मी"एक प्रयत्न केला आणि चमत्कार झाला.पेशंट आता ठिक आहे धोका टळलायं"

म्हणजे? माझ्यां अनिकेतला आता काही होणार नाही डाँक्टरांच बोलणं ऐकून पिंकी मध्येच म्हणाली.

हो जीवाचा धोका पुर्णपणे टळला पण तब्येत अजून थोडी नाजूक आहे.रिकव्हरी साठी वेळ जाईल थोडावेळ सर्व बाहेर जा...पेशंटला त्रास होता कामा नये"

नाही मी "बाहेर जाणार नाही ताई मला इथेच बसायचं आहे प्लिज मी"आजिबात त्रास नाही देणार तु सांग डाँक्टरांना मला इथे बसायला परवागी द्या म्हणून पिंकी बाहेर जाण्यास नकार देत म्हणाली.

डाँक्टर प्लिज "पिंकीचा विनवणीवर मोहिनी डाँक्टर कडे बघत म्हणाली.

बरं ठिक आहे राहू द्या त्यांना इथे पण लक्षात ठेवा त्रास होईल असं काही होता कामा नये"नाही तर आम्ही काही करू शकणार नाही.मी" परत परत हेच म्हणेन देवांने जीवनदान दिलंय ते जपण आता त्याचा आजूबाजूला असणाऱ्यांच्या हातात आहे.
डाँक्टर म्हणाले आणि निघून गेले.तशी पिंकी अनिकेतच्या समोर बसली. तसा इंदर आणि अनिकेतचे बाबा निघून गेले.तर....मोहिनीने तीच्या डोक्यावर वरून हात फिरवत....

कळलं ना"डाँक्टर काय?म्हणाले त्यांना त्रास होईल असं काही बोलू नको मी" बाहेर आहे काही वाटलं तर लगेच आवाज दे....
म्हणत मोहिनी सुद्धा बाहेर आली.

अनिकेत हे सर्व माझ्या मूळे झालयं ना"मी तूमचाशी निट बोलली नाही म्हणून तुम्ही रागावलायं ना "माझ्यावर ठिक आहे  रागवा मी"  तूमचीच आहे ना" मग तुम्ही रागवण तूमचा हक्क आहे पण, हा पण विचार करा ना"की जे काही झालं त्यात फक्त माझीच चूकी आहे का? तसच जर तुम्हाला वाटत असेल तर मग मी "काहीच बोलणार नाही हवं तेवढं रागवा हवं तर भांडा माझ्यांशी प़ण हे असे नका, रागवू"मला मला खूप राग येतोयं का? मी" त्या दिवशी तुमचा आईचा राग तूमचावर काढला का? मी" तुम्हांला जा ,म्हणाले का?कदाचित मी" तेव्हा तुम्हाला समजून नाही घेतलं म्हणून कदाचित ही अवस्था झाली.

खूप प्रेम आहे तुमचा वर पण सांगू नाही शकले कधी पण तुम्हाला  काही झाले तर....मी कसं जगू पिंक बेशुद्ध अवस्थेत असलेल्या अनिकेत कडे बघून अश्रूं भरल्या डोळ्यांने व्यक्त होत होती.तीच बोलणं अनिकेतचा कानात घुमत होतं.तसा तीच्या तोंडातून येणाऱ्या प्रत्येक वाक्यांतून त्याचं काळीज चिरत होतं
तसं त्याच्या डोळ्यातून थेंब ओघळला..

किती प्रेम करतेस किंबहुना माझ्या पेक्षा ही खूप दाखवलं मात्र नाहीस तूझ्या अति भोळेपनाची मला खूप काळजी वाटते वाईट तर याचं वाटतंयं तूझ्या  प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून मला ओळखता नाही आली. काळजी नको करू मी"अजून तू़झांच आहे पण अजून हवं तसं व्यक्त नाही झालीस ते होणं खूप गरजेच आहे. आणि मी सहज तूझ्यां आयुष्यात आलो तर मला हवी असणारी पिंकी कधी भेटणार नाही.त्यासाठी मी तुला अजून थोडा त्रास देणार "अनिकेत बंद डोळ्यांनेच मनात म्हणाला.आणि हळूहळू त्यांने डोळे उघडले.

ती मात्र स्वत: व्यक्त होण्यांत इतकी मग्न होती की,अनिकेत बराच वेळ झाला फक्त तीच्या कडे बघतोय हे सुद्धा तिला कळलं नाही.

तीच्या डोळ्यांत त्याला फक्त घोर चिंता जाणवली ती कसली हे फक्त त्याला शोधावं लागणार होतं

बराच वेळ झाला तीने तीचे डोळे पुसले आाणि अनिकेत कडे एक नजर बघितलं.तर तो एकटक फक्त तिच्या कडे बघताना दिसला.तीच्या चेहर्यावर आनंद पसरला त्यांचआनंदात तीने त्याला मीठी मारत.....

अनिकेत तुम्हांला शुद्ध आली

मी "इथे काय़?करतोयं आाणि मला काय? झालंयं"तुम्ही कोण?असे बरेच प्रश्न लगोलग विचारले.तसा तीचा आनंद क्षणांत मावळला.ती त्यांचा मीठीतून बाजूला झाली.आणि पाणवलेल्या डोळ्यांने फ़क्त ती त्यांचाकडे बघत होती.

आहो तुम्ही का? रडतायं कोण? आहात तुम्ही मला ओळखतायं का? तुम्ही"आणि मला काहीच का? आठवत नाही.अनिकेत ने बोलता बोलता डोक्यावरचे केस हाताने आवळले आणि वेदनेने विवळला.तशी पिंकी भानावर आली त्याला त्या अवस्थेत बघून ती घाबरली.आणि तिला डोक्टरांच बोलणं आठवलं.तशी ती त्याचा पासून बाजूला झाली.आणि ती रूम बाहेर गेली.

अरे.... ही अशी का? गेली काय? झालं घाबरली की, काय? जाणाऱ्या पिंकीकडे बघत म्हणाला.

दादा अनिकेत शुद्धित आलेत तू डाँक्टरांना बोलवं"

काय? आला का? शुद्धित मी"आलो बोलवून डाँक्टरांना "म्हणतं इंदर निघून गेला.

तसं मोहिनीने पिंकीला तीच्याकडे वळवत....

काय? झालं तूला डाॅक्टर अनिकेत शुद्धित आले आणि तूला आनंद नाही झाला.

ह.... आनंद का? नाही होणार ताई खूप झाला.

मग तूझा चेहरा का? पडलायं काय? झालंयं"

काही नाही "ग... हा, इंदर दादा कुठे? राहिला"अजून आला नाही"पिंकी विषय बदलत म्हणाली.

तो येईल ग.... पण तूला काय? झालंय"विषय का? बदलतेस मी" काही तरी विचारलंयं तूला"काय? झालंय़"

मोहिनी ताई ते अनिकेत ने माझी ओळख नाकारली ग....मला ओळखलचं नाही.


🎭 Series Post

View all