५६) गुलमोहर.... एक प्रेमकथा

...
राहिला प्रश्न तरीही काही झालं याचा तर.... मी"आहे ना "घडला प्रकार मी" माझ्या डोळ्यांना बघितलायं आणि मी"इथे तूझ्या सोबत होते हे ही कबूल करायला मागे पुढे बघणार नाही.कर" तू.... सही "मोहिनीने त्याला तिचा परीने समजवून एक विश्वास दिला.तीच्या बोलण्यांत कुणास ठाऊक काय?जादू होती पण त्याला तीचा आधार वाटला.आणि त्याने सही करायची हिमंत करत एकदा त्या फाँमवर नजर टाकली.आणि पुन्हा एकदा मोहिनीकडे आशालभूत नजरेने बघितलं.तिने सुद्धा डोळ्यांनेच मी "तूझा सोबत आहे आसा आधार दिला.आाणि इकडे त्यांने मनातले सर्व विचार बाजूला सारून सही केली.आणि तो फाँम जमा केला.

तस अनिकेतला एका रूम मध्ये नेण्यांत आलं.त्या रुममध्ये भयान शांतता होती.रुममध्ये मध्यभागी पेशंटसाठी एक पांढरी शुभ्र चादर घातलेला बेड होता.त्यावर दोघांनी मिळून त्याला झोपवलं.बेडच्या आजूबाजूला बर्याच मशीन होत्या.अनिकेतचा बेडच्या भोवती डाँक्टर्स नर्सची गर्दी होती.त्यातलेच काही जण नर्स शिकावू डाँक्टरांपैकी त्याला ओळखणारे निघाले.कारण काही शिकावू डाँक्टर्सचा तो आयडियल निघाला.

त्याचा सारखंच डाँक्टर बनायचं ही जिद्द घेऊन बाहेर निघालेले आज डाँक्टर बनून त्याचा निपचित पडलेल्या शरीराला मदतीचा हातभार लावून जीवनदान देण्याचा प्रयत्न करणारं होते.तर...नर्सेसचा तो त्यांचा हँडसम दिसण्यांने क्रश सुद्धा निघाला.

तिथे असलेल्या प्रत्येकीच्या मनात त्यांचा जोडीदार अनिकेत सारखाचं असावा अशी आशा बाळगणार्याचा आज जीवनदान देण्यात मोलाचा वाटा असणार होता.त्याला तिथे बघून प्रत्येकांचा मनात प्रार्थना आाणि डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.

मेन डाँक्टर आले होते जे अनिकेतचं आँपरेशन करणारं होते.बाकी सर्व त्याना तिथे मदत म्हणून होते सर्वानी आपआपलं काम हातात घेतलं.आणि इकडे आँपरेशन थिएटर बाहेरचा लाल दिवा पेटला.डाँक्टरांनी चिडफाड करायला सुरूवात केली.तिथे हजर असणार्या पैकी कोणी डाँक्टरांचा हातात कैची देत होत तर कोणी कापूस बराचं वेळ आँपरेशन चालूच होत.तर दुसरीकडे मोहिनी आणि इंदर तिथेच बाकड्यावर बसले होते.

देवा काही कर पण आँपरेशन सक्सेसफुल होऊ दे पिंकीच प्रेम या वेळेस हारता कामा नये मोहिनी मनोमन देवाला प्रार्थना करत होती.

कसली सही कोणाची ट्रीटमेंट अनिकेतची आई अनिकेतचा बाबाचं फोन वरच बोलणं ऐकून त्याचा मागे उभी राहात म्हणाली.तसं बाबांचा राग अनावर झाला.त्यांनी हाताची मुट्ठी आवळत....

अनिकेतचा अँक्सिडन्ट झालायं  मरणाचा दारात आहे तो जरा रागानेच म्हणाले.

काय? अँक्सिडन्ट "आहो काय? बोलताना तूम्ही आईला ऐकून धक्काच बसला.

हो खर तेच बोलतोय मरनाचा  दारात आहे.आणि त्याचा या परिस्थितीला दुसरं तिसरं कोणी नाही फक्त तूम्ही जबाबदार आहात.मी "म्हणतो काय? गरज होती त्या मुलीचा भूतकाळ उगाळून काढायची"प्रेम"होतं त्याचं ते त्याला मिळालं म्हणून त्यानें आपल्या प्रेमाला स्विकारलं पण नाही तूम्हाला तूमच्या मुलांच सुख, कशात आहे हे कधी ओळखताच नाही आलं.आणि त्याचा परिणाम मुलाचा जीव धोक्यात घातला बाबा म्हणाले आणि तिथून निघणारं की"....

आहो थांबा मी"पण येते आईचा आवाज कानावर पडला.

आता कशाला येताय काही गरज नाही.

आहो अस नका बोलू माझा मुलगा आहे तो मी "जन्म दिलायं त्याला"....

जन्म दिलायं का? मग हे काल नाही आठवलं का?कि आपण जन्म दिलायं"बरेच वर्षे आपण त्याला प्रेमात हरलेलाचं बघत होतो.आता कुठे? देवाने त्याचा आयुष्यात सुख पाठवलं होतं  आनंदात होता त्या मुली मूळे पण नाही त्यातही तूम्ही त्या दोघांमध्ये तुमच्या भुरसटलेल्या विचाराची भिंत उभी केली.

मला नका दोष देऊ हे सर्व ती मुलगी त्याचा आयुष्यात आली म्हणून झालंय आवदसाचं आहे दूर होती तेव्हा पण त्रासचं दिलायं आता जवळ येऊन सरळ मरणाचा दारात सोडलायं आवदसा कुठली माझ्या मुलाला काय?झालं ना" तर...सोडणार नाही मी" तिला सांगून ठेवते आईने पिंकीवरचा राग व्यक्त केला.

बसं बस करा तुमच्या चुकीचं खापर त्या मुलीवर फोडू नका"त्याला जर ....काही झालं ना "तर मी....मात्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे ही लक्षात ठेवा.बाबांनी आईवर आवाज चढवला.आणि काही न बोलता निघून गेले.तर त्याची आई मात्र जाणाऱ्या अनिकेतच्या बाबांना पाठमोरी बघत राहिली.

हे.... काय? बोलून गेले.... मी "माझ्यांच मुलांचा परिस्थितीला जबाबदार"....हे बोलताना यांना कसं काहीच वाटलं नाही.पण काय? चूकीचं बोलले बरोबरचं बोलले ते मी"सर्व मान्य करून तिला स्वीकारलं असतं तर...हे घडलचं नसतं.आज कदाचित तो या परिस्थितीत नसतानाही ".....

नाही अनिकेत जोपर्यंत शुद्धिवर येणार नाही तोपर्यंत मी"अन्नांचा एक कण ही घेणार नाही.अनिकेतची आई स्वत:शीच म्हणाली.आणि तशीच ती देवघरात गेली.

देवी आई अग काय? हे माझ्या हसत्या खेळत्या मुलांवर मृत्यूचं सावट पडलंयं "ते ही उद्या तूझा दिवस आहे देवी आई आज माझ्या घरात हे असं संकट येऊन ठेपलंय"माझी भक्ती कुठे? कमी पडली आई" ....

आज मुलांचा या परिस्थितीला एका आईला दोष दिला जातोयं आई "आज माझ्या भक्ती सोबतं तूझ्या शक्तीची सुद्धा परिक्षा आहे.अनिकेतला जन्म देणारी जरी मी "या जगासाठी आई असले तरी मला आई होण्याचा आशिर्वाद देणारा हात तूझा होता हे विसरु नकोस आई"अनिकेतला माझ्या पदरात टाकून तू...माझी झोळी त्यावेळी भरली होतीस तीच झोळी आता रिकामी होण्याचा वाटेवर आहे.नवसाचा आहे ग.... आपला अनिकेत "

ऐकलंस  ना...मी"माझा नाही आपला म्हणाले म्हणजे ?तो आपल्या दोघींचा मुलगा आहे देवी आई"...त्याला काही झालं तर...माझ्या सोबत तुझी ही ओहोटी रिकामी होईल ग...

तू माझी ओहोटी भरून जो विश्वास मनात जागवलास तोचं विश्वास  डगमगू नको देऊस त्यासाठी तरी माझ्या अनिकेतला सुखरूप ठेव" देवी आई".... देवघरातल्या देवासमोर हात जोडून आई अनिकेतचा जीवाची भिक मागत होती.

दुसरी कडे पिंकी मोहिनीचा अजून काँल आला नाही म्हणून अस्वस्थ होऊन बसली होती.

मोहिनीचा आईने सुद्धा आज लेकीच्या सुखासाठी देवालाच पाण्यांत ठेवलं.आता अनिकेतला शुद्ध आल्या शिवाय देवाची सुद्धा सुटका नव्हती.

इकडे हाँस्पिटल मध्ये तीन तासा नंतर आँपरेशन थिएटरच्या बाहेरचा दिवा बंद झाला.तसे डाँक्टर बाहेर आले.

डाँक्टर ते पेशंट ठिक आहे ना"इंदर डाँक्टर बाहेर येताचं म्हणाला.

अ"... आँपरेशन तर....सक्सेसफुल झालंयं" पण ....पेशंट शुद्धित आल्या शिवाय काहीच सांगू नाही शकत.चोवीस तासात पेशंट शुद्धित येण खुप गरजेच आहे.नाही तर......डाँक्टरांनी बोलता बोलता वाक्य अर्धवटच सोडलं.

नाही" तर...मग काय? डाँक्टर ".....मध्येच मोहिनी म्हणाली.

नाही तर पेशंट कोमात जाऊ शकतो.आणि एकदा कोमात गेला कि, तो कोमातून कधी बाहेर येईल सांगू शकत नाही.आम्ही आमचं काम तर....केलं आता सर्व त्या देवी आईच्या हातात"शेवटी विश्वाची पालनहार तीच तर आहे.डाँक्टर म्हणाले आणि निघून गेले.मोहिनी मात्र डाँक्टरांचं बोलणं ऐकून सुन्न झाली होती आजूबाजूचा गोंधळ सुद्धा आता तिच्या मेंदू पर्यत पोहोचे ना असा झाला होता.तर इदंर मात्र डोक्यावर हात मारून बसला होता.

दुसरीकडे मागे उभे असणाऱ्या अनिकेतचा बाबाच्या कानावर डाँक्टरांच सगळच बोलणं पडलं आणि त्याना धक्का बसला.

विधी बघ तूझ्यां एका चूकी मूळे काय? होऊन बसलंयं"देव करो आणि तो शुद्धित येऊ दे....आणि असं नाही झालं ना"तर मात्र मी"तुला सुद्धा माझ्या आयुष्यातून वजा करेन बाबा मात्र मनात अनिकेतचा आईला उद्देशून म्हणाले.

मोहिनी मला एक कळतं नाही अनिकेत गाडी अगदीच काळजीपुर्वक चालवतो रस्त्यांने जाणारी प्रत्येक गाडी  त्याचा गाडीचा पुढे असते मग मला हेच कळतं नाही हा अँक्सिडन्ट झाला कसा"

विचार.... विचाराने झाला पिंकी त्याचा आयुष्यातून पुन्हा एकदा दूर गेली तेही त्याचा आई मूळे या एका विचाराने आज त्याचा जीवाची मुद्दत चोवीस तास ठरली इंदर मोहिनीला  विचारलेल्या प्रश्नांच उत्तर मागे उभ्यां असलेल्या अनिकेतचा बाबांनी दिलं

काका? तूम्ही केव्हा आलात आणि हे काय? बोलताय तूम्ही इंदर अनिकेतचा बाबांचा आवाज कानावर पडताचं मागे वळत म्हणाला.

तेच म्हणालो मी"इंदर जे.... तू"ऐकलंस त्या मुलीच्या अब्रूची लत्तर उडवली गेली रे.... तिथे आणि हे त्याचा आईने केलं हे त्याला खुप लागलं असणारं म्हणून "हा अँक्सिडन्ट" जीवावर बेतला.


🎭 Series Post

View all