३६) गुलमोहर... एक प्रेमकथा

.....
तर तिचे डोळे पाण्याने भरले होते.

पिंकी अग काय? झालं रडू नको मी" जातो नाही येणार परत खरच... तो तिच्या डोळ्यात पाणी बघून गोंधळला.

हो तुम्ही तेच करणारं  म्हणून तर....माझ्या डिस्चार्जच्या वेळेला न"सांगता आलात ना"जा....तुम्ही "खरचं जा.....पण ,मग मरत होते मी ....मरू द्यायचं होत कशाला वाचवून उपकार केलात तूम्ही "असे उपकार की मी....ते फेडू नाही शकणार"

प्रेम "व्यक्त केलात तेव्हा "आनंद झाला पण ....एक मन म्हणालं की, तू ....वापरली गेलीस त्याचासाठी योग्य नाहीस म्हणून, मी ....उत्तर नाही देऊ शकले.रात्र भर विचार केला मग वाटलं ज्यांचावर प्रेम केलं त्याने माझी ही अशी माती केली.

पण...जो प्रेम करतो त्याला एक संधी सुद्धा नाही दिली
मी" मन खात होत माझं मलाच"म्हणून ठरवलं सकाळी कबूल करू प्रेम "सकाळी माझे डोळे फक्त तुम्हाला शोधत होते.प्रेम व्यक्त करून तुमचा आनंद जो, बघायचा होता.पण तुम्ही आलाचं नाही.खुप वाईट वाटलं पण...आपलीचं चूक आहे जाऊ दे ....असा विचार करून समजवत होते मनाला.लायक नसेन मी "म्हणून एका दुखातून सावरता सावरा दुसऱ्या दुखा:त पडली.

पिंकी ऐकतोयं म्हणून काही बोलतेस"का? काय? लावलसं हे तू....लायकी लायकी  म्हणजे? मग तूझी लायकी आहे तरी काय?तो जरा चिडून म्हणाला.

ही आहे माझी लायकी ती ,तिची ओढणी बाजूला करत म्हणाली.

पिंकी....काय? करतेस तु हे पुन्हा ओरडला.

हो हिच आहे माझी लायकी तुषारने जे ....केल तेच बरोबर आहे. लचके तोंडून घेण हेच आहे माझं काम"तुम्ही प्रेम करत होता ना....पण ,मी नाही देऊ शकले तसं पण ....जाणारच आहात लचके तोंडून जा....म्हणजे?तुम्ही माझ्यावर प्रेम करण्यात जो वेळ वाया घालवलात  त्याची परतफेड माझ शरीर"करेलं.

तिचं प्रत्येक वाक्य कानावर पडल तशी तशी त्यांने त्याचा दोन्ही हाताच्या मूठी आवळल्या त्याची चिड वाढली आणि त्याने तीच्या गालावर एक चपराक दिली.

अजून एक शब्द जरी बोललीस ना" तर ...जीव घेईन मी" तूझा"तूझ्या मनात माझी हिच छबी असेल पिंकी तर ...मी "मरेन तसाचं पण ... तूला माझं तोंड नाही दाखवणारं तो म्हणाला आणि ती रडता रडता खाली पडणार होतीचं की, त्यांने तीला सावरत सोप्यांवर बसवलं.आणि पाण्याने भरलेला ग्लास तीच्या समोर धरत....

घे.. थोड पाणी पी....

नको मला डाँ अनिकेत....

पिंकी शांत हो ग... रडू नको ना"मला नाही ग ....आवडत तूला असं बघायला"शांत हो...  घे ....पाणी आधी म्हणत त्यांने भरलेला ग्लास तिच्या तोंडाला लावला.तीने घोटभर पाणी पिऊन त्यांने ग्लास ठेऊन दिला.

बरं पिंक आता मला सांग तूला मी" इथे आलेलं आवडलं नाही का?

असं काहीच नाही अनिकेत"

मग तू ....खुश का? नाही पिंकी मी" माझं प्रेम व्यक्त करून चूकी केली का?मी तूला नकोयं का?

असं काही नाही अनिकेत किती वेळा सांगू"सांगितलं ना,"मी....एकदा की, तूम्ही मला न "सांगता निघुन गेला याचं वाईट वाटलं.तेव्हा पासून देवाजवळ एकच प्रार्थना केली फक्त एकदा समोर येऊ देत त्यांना मला मनातलं सांगायचं आहे.

मग पावला देव तूला आलोय ना" मी ....समोर सांग तूझ्यां मनातलं.खुप आतूर आहेत हे कान"

अनिकेत मला माहित आहे माझ्या हातून खुप मोठी चूकी झाली. पण....त्यात त्यांने फसवलं नाही, तर ....माझं प्रेम होतचं  ना" त्याचावर पण....तूम्ही व्यक्त झाल्यापासून मी" तूमचाचं विचार केला एकदाही त्याची मला आठवण नाही आली.याचा अर्थ मी" तूमच्यांवर प्रेम करते अनिकेत"

मला तूम्ही माझ्या आयुष्यात हवे आहात प्लिज मला दुर नका करू"नाही राहू शकणार मी....तूमच्याशिवाय अनिकेत नका सोडून जाऊ बोलता बोलता तिने मिठी मारली आणि रडायला लागली.

मला सोडून तूम्ही कुठेही जाऊ नका त्या अमेरिकेलाही नाही ती पुन्हा म्हणाली.

नाही जाणार मी " पण मला सांग किती प्रेम करशील माझ्यावर"

शेवटच्या श्वासापर्यंत हे हृदय फक्त तूमच्यासाठी धडधडेलं अनिकेत"

मग लग्न करशील माझ्याशी होशील माझ्या हृदयावर राज्य करणारी " तो म्हणाला तशी ती लाजली.

अह... पिंकी लाजू नको मला" मी....विचारलंय त्याचं उत्तर हवयं"

उत्तर हवयं  का?

हो....

बरं देईन पण ....माझ्या पद्धतीने"

बरं पण उत्तर दे....

ओके तूम्ही डोळे बंद करा.

बरं केले तो डोळे बंद करत म्ह़णाला.

चिटिंग नाही करायची डाँक्टर अनिकेत"

नाही करत बोल ना " तू

पिंकीने त्याच्या गालावरून  हात फिरवला तसा अनिकेत शहारला"

पिंकी काय करतेस तू....  कसं तरी होतयं मला"

अनिकेत फिल करा... बोलू नका "

पिंकीने पुन्हा तीचे दोन्ही हात त्याच्या मानेच्या दोन्ही बाजूला ठेवत अलगत हात मागे पुढे केला .आणि त्याचं हाताने तिने त्याला जरा गच्च पकडून स्वत:जवळ ओढलं.आणि गालावर किस केला.तसे त्याने डोळे उघडले.आणि तीने हे काय? केलं याच आभिरभावात बघत होता.

असं काय? बघताय दिलं मी "उत्तर तेही गोड....

उत्तर खरचं गोड आहे पण तू ....मला ते तिन शब्द कधी बोलशीलं"

तेव्हा जेव्हा मला वाटेलं. बोलता बोलता तिला काही तरी....आठवलं आणि ती अनिकेत पासुन जरा... बाजूला झाली.

काय? झालं अशी अचानक बाजूला का? झालीस"

अनिकेत मी....तूमच्या आई बाबांना चालेलं ना "तीने जरा नाराजीतच विचारलं"

त्यांचा विचार नको करू ते. ...नाही नाही म्हणारं

पण ....ते अनिकेत माझ्या बद्दल"

हो सर्व सांगेन आणि त्यांना तूझ्यां घरी"घेऊन येईन....

माझ्या घरी कशाला....'

जेवायला मंद कुठली'...

म्हणजे?

लग्नांची बोलणी करायला"

हो मग ....चालेल म्हणतं हसतचं ती पुन्हा त्याचा मिठीत शिरली. तशी त्याने त्याची मिठी घट्ट केली.

तेवढ्यात इंदर आणि मोहिनी वाँक वरून आले इंदरने दरवाजाची कडी उघडत...

झाली का? रे...लग्नांची तारीख फिक्स टोमणाच मारला"

हो.... हो... म्हणजे? नाही दोघेही गडबडले"

नक्की काय? हो... कि नाही इंदर म्हणाला तशी पिंकी धावत जाऊन मोहिनीच्या मिठीत शिरली.

तसे सर्व जोर जोरात हसले"

काय? रे... असं काय? केलसं नक्की की,ही सारखीचं लाजतेयं"

मी ....काहीच नाही जे काही केलं ते तिनेच केलयं"

म्हणजे? रे.. आ.... आ....

जे करायला पाहिजे? होत तेचं  केलयं "गप्प बस आम्हाला छेडण्यापेक्षा  तूझ्यां आयुष्यात पण तो एक गुलमोहर कसा येईल याचा प्रयत्न कर"

हो दादा.... मिशन सुरू कर तू.... तिघांची मस्ती चालूच होती की ,माहित नाही मोहिनीला काय? झालं ती तिकडून निघून पण गेली.

हसी मजाकत संपली तसं तिथे मोहिनी नसल्यांच लक्षात आलं"

अरे ही कुठे,? गेली इंदर म्हणाला....

घरी गेली असेल लग्नांचा विषय निघाला की,ती राहातचं नाही यार"तिलाही तीचा गुलमोहर भेटला असता तर... किती छान झालं असतं.

मिळेल ग.. नक्की मिळेल तू... घरी जा .....उशीर झालाय"चल इंदर मी "पण.... जातो. अनिकेत म्हणाला त़़शी पिंकी निघून गेली तसाचं अनिकेत सुद्धा गेला. आणि इंदरने दरवाजा बंद केला.

मोहिनी तीच्या रूम मध्ये होती पिंकी घरात जाताचं मोहिनीच्या रूममध्ये जात..

मोहिनी ताई काय? झालं अशी का? निघून  आलीसं अनिकेत इंदर दादाला लग्नाबद्दल म्हणाला म्हणून का?

मला नाही माहित पिंकी "

दादा आवडतोयं का? तूला"

नाही ग... पिंकी तसं काहीच नाही ग.. माझा आाणि त्याचा कुठे? तालमेल नाही. पण ....मैत्री गमवायची भिती वाटते. कोणाचीही परवा न करता माझ्या सोबत येतो आजूबाजूला माणसं माझ्या रंग रूपावरून त्याला काय? काय? बोलतात  पण....हा त्याचा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आणि मलाही म्हणतो लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ"खुप चांगला आहे तो त्याच्या आयुष्यात कोणी आलं तर.... तो माझ्या आयुष्यातून निघून जाईल ना"ग.... म्हणून जरा  वाईट वाटलं बसं बाकी काहीचं नाही.

ताई तो अनिकेत गमतीने म्हणाला ग..... त्याला थोडीच माहित होत की,तूला या गोष्टीच वाईट वाटेलं म्हणून "

क्रमशः

🎭 Series Post

View all