३५) गुलमोहर... एक प्रेमकथा

....
हो... पण तूला कसं कळलं कि,मी....तूझा विचार करत होते म्हणून,

ताई "तू... कोणाचाही विचार करत आलीस" तूच या घरात अशी आहेस की, विचार केल्याशिवाय तूझा दिवस जातं नाही.आणि इथे तर...तूझ्यां शेंडीफळाचा प्रश्न आहे.तिच्या आयुष्यात उलटापालट झालीयं याने तूला त्रास झाला नसेल असं होऊ शकत नाही.मला माहित आहे मला असं त्रासात बघून तू....सुद्धा कित्येक रात्र झोपली नसशील.

ओळखायचा प्रश्न नाही ताई...पहिली पिंकी खुप वेगळी होती. तिच्या लिस्ट मध्ये फँमेलीच्या आधी दुसरी व्यक्ती होती.आताची पिंकी फँमेली सोबत प्रेम सुद्धा मिळवणारं"या वेळेस दोन्ही गोष्टी तीला महत्वाच्या असतीलं"तुषार  सोबत असताना मला एकांची निवड करायला सांगितली असती ना"तर... अर्थात मी" त्याचीच केली असती पण....आता जर मला फँमेली आाणि प्रेम" निवडायला सांगितलं तर ....मी" स्वत:ला संपवून टाकेन.कारण वाईट काळात मला माझ्या फँमेलीने सावरलंय "आणि सर्वकाही सहन करत निस्वार्थी प्रेम करणार्या अनिकेतला फसवून दु;खात लोटण्या पेक्षा स्वत:ला मृत्यूच्या दारात लोटणं योग्यच़ आहे.

पिंकी पण... असं काही होणार नाही तू....जेव्हा केव्हा अनिकेत समोर तू़झं प्रेम" व्यक्त करशील तेव्हा सर्व काही रीतसर करू ग....आणि अनिकेत साठी आईबाबा नकार देणारच नाही.चल हे सर्व झालं आता रूम मध्ये जाऊन थोड आवरू या"मोहिनी म्हणाली.

तशी दोघीही स्वयंपाक घरातून बाहेर आल्या आणि दोघीही आपापल्या रूमच्या दिशेने गेल्या...

बरोबर रात्री नऊ वाजता बाबा पिंकी आणि मोहिनी डायनिंग टेबलवर जमले.सर्व येण्याआधी आईने सर्व जेवण टेबलवर आणून ठेवलं.मोहिनीने रूम मधून बाहेर येण्याआधीच इंदरला काँल केला होता.

रात्री साडेनऊ वाजता दारावरची बेल वाजली.

पिंकी इंदर आला वाटत दार उघडशील प्लिज"मोहिनी म्हणाली. तशी पिंकी उठून दरवाजाच्या दिशेने गेली.मोहिनीने बोलवल्या प्रमाणे इंदर आला होता.

अरे.... इंदर दादा तू... आलास ये....ना ,दारात इंदरला बघून पिंकी म्हणाली.तसा इंदर जरा बाजूला झाला.आणि त्याच्या मागे उभा असणारा अनिकेत पिंकी समोर आला.त्याच्यावर नजर पडताच तिला आनंद झाला खरा पण...तीने तसं न दाखवता नाराजीतच आत गेली.

इदरं हिला आवडलं नाही का? गाल फुगवून आत गेली मी" जाऊ का ,परत पिंकी आत जाताच इंदरकडे बघत अनिकेत म्हणाला.

ये....आता जाऊ नकोस "ती नाराज नसेल कदाचित तू....तिच्या डिस्चार्जचा वेळीस हाँस्पिटल मध्ये नव्हतास म्हणून कदाचित रागवली असेल "चल आता प्रेमासाठी तीचा राग सहन नाही करू शकत तू....इंदर म्हणाला तसे दोघेही आत आले.

अरे... डाँ अनिकेत तूम्ही येणार नव्हता ना" मोहिनी डोळे मिचकावत म्हणाली.

हो नव्हतो येणारं पण...आलो पेशंटला बघायला उद्या मी" परत अमेरीकेत जाणार आहे ना...

असं अचानक अमेरीकेत का?

अरे... मोहिनी मी" तिकडेच राहातो मी" तर आई बाबांना भेटायला आलो होतो. संपली माझी सुट्टी उद्यांची माझी टिकीट आहे प्लाइटची म्हणून म्हटलं तूझं आमत्रण का? नाकारावं.... अनिकेत म्हणाला.

आणि मोहिनीने इंदर कडे बघत... खरचं का? इशारा करत विचारलं तस त्यांने शांत बसायचा इशारा केला.तर इकडे पिंकी मात्र त्याच्या तोंडून तो जाणार हेच ऐकून चिडली.पण सर्वांसमोर ती काही करू नाही शकली.मोहिनीला मात्र त्याचं नाटक लक्षात आलं तस तिने त्याला बसायला सांगितलं.आणि सर्वानी जेवायला सुरूवात केली.

मग डाँ अनिकेत पुन्हा कधी  येणार...

नाही आता लवकर नाही येणार तोपर्यंत जर ....तूझं लग्न वगैरे ठरलं तर...येईल बोलवलंस तर....

डाँ अनिकेत नको माझ्या लग्नाला येण्याचं शब्द दिलात तर मग भारतात कधीच येऊ नाही शकणार "तूम्ही"माझं लग्न होणं इतकही  सोप नाही.

असं काही नाही तूझ्यांवर प्रेम करणारा" तू ....आहेस तसा तूला स्विकारणारा तूझ्यां आजूबाजूला असेल"नक्कीच तोही तूझी वाट बघत असेल सहसा कोणाला प्रेम भेटत नाही.हे माझ्यापेक्षा कोणालाच समजून नाही शकणार पण हे ही खरं आहे ज्याचाशी लग्न करशील त्याचावर तूला प्रेम झाल्या शिवाय नाही राहाणार.

हे अगदी बरोबर बोललात तूम्ही "बाय द ....वे" जेवण छान झालंय काकू इंदर मध्येच म्हणाला.

हो का, मी ...नाही या दोघीनी केलंय"

अरे... वा....

मी "नाही इंदर दादा ताईने केलंय ते सर्व"

अरे वा... मोहिनी अन्नपूर्णा आहे म्हणजे? तू लग्न झाल्यावर नवरा जेवण कमी बोटचं खात बसणार आहे.इंदर हसत म्हणाला.हसत खेळत सर्व जेवत होते पण पिंकी मात्र अनिकेत वाक्य पुन्हा पुन्हा आठवण्याचा  प्रयत्न करत होती.जेवणाची तिची इच्छा उडून गेली होती.पण....सर्वांसमोर ती उठून सुद्धा"जाऊ शकत नव्हती.एक एक करत सर्वच जेवणा वरून उठत हाँलमध्ये येऊन बसले.पण अनिकेत आणि पिंकी अजून जेवणाच्या ताटावरचं होते.विचारातून बाहेर येताच कधीतरी ती भानावर आली आणि आजूबाजूला कटाक्ष टाकला.तर .... अनिकेत शिवाय तिथे कोणीही नव्हतं म्हणून मग ती सुद्धा उठली.आणि निघून गेली.ती उठली तस अनिकेतने समोर बघितलं तर...तिच्या ताटात जेवण तसच्या तसं होतं.ते बघून त्याला वाईट वाटलं.तो तसाच उठला आणि सर्वांमध्ये जाऊन बसला.

जेवली नाही वाटत का? मी"अमेरिकेला जाणार म्हणालो म्हणून का?मी ....म्हणालो कारण मला वाटलं चिडून प्रेम व्यक्त करेल पण....तसं काही केलं नाही तिने"याबदल्यात तिने शांतता स्विकारली.सर्वानंसोबत बसलेला अनिकेत विचारात मग्न होता.

चला निघायचं इंदर अनिकेत कडे बघत  म्हणाला पण तो विचारात असल्याने त्याला काही समजलं नाही. म्हणून इंदरने पुन्हा त्याला खुणावलं.

काय? म्हणालास का? अनिकेत  भानावर येत म्हणाला.

मी म्हणालो निघायचं ना"

हो चलं  ना"म्हणत दोघेही सोप्या वरुन उठले आणि दारापर्यंत आले.जे काही ठरवलं ते सर्व वाया गेलं ना "अनिकेतने पुढाकार घेतला ना 'पिंकीने घेतला आणि ते दोघं निघून गेले.तशी पिंकी रागात पाय आपटत रूम मध्ये गेली.

काय? यार इंदर जे करायला ऐकायला आलो होतो ते काही झालच नाही. काही कर....पण मला तिच्याशी बोलायचं आहे
इंदरच्या रूम मध्ये अनिकेत इंदरला म्हणाला.

पेशंटला बघायला आला होता एक शब्दांने विचारल नाही कि, मेलीस की जिवंत आहेस म्हणून"इकडे पिंकी रूममध्ये रागात धुसमूसत बडबडत होती.

तर इकडे मोहिनीच्या मोबाईलवर इंदरचा काँल होता.

मोहिनी काही कर... पण पिंकीला घेऊन माझ्या घरी ये.... लवकर ही एकच संधी आहे व्यक्त हो़ण गरजेचं आहे प्लिज"म्हणाला.आणि काँल कट सुद्धा केला.

काय? माणूस आहे आँडर केली आणि काँल ठेऊन दिला.घेऊन ये....म्हणे"खाऊ आहे का?मोहिनी बडबडली आणि तशीच पिंकीच्या रूमच्या दिशेने जाताचं...

पिंक माझ्या सोबत चलं

कुठे? ग... ताई

चल म्हणाले मी"तीला हाताला पकडून घेऊन बाहेर पडली.जाताजाता आई बाबांच्या रूम मध्ये नजर टाकत....

आई ग.. जेवण  जास्त झालंय पिंकीला
घेऊन वाँकला जाते.उशीर होईल तूम्ही झोपा"सांगून निघून गेली.दार उघडून बाहेर आली आणि इंदरच्या दाराची बेल वाजवली.

ताई त्याची बेल का वाजवतेस तू....

तू गप्प ग ... त्याला घेऊन जाणार आहे मी वाँकला....

अग... पण मी आहे ना"

तू ....नको....दोघी बोलत होत्या की, दरा उघडलं.

आलीस ये.. ना आत ये...इंदर म्हणाला.

काय? दादा चल ताईला भिती वाटतेय म्हणून तूला बोलवायला आलीयं ती"

हो....जाऊ पण, पाच मिनिटे लागतील मला"तोपर्यंत बाहेर नको,चांगलं नाही दिसत ये... बस म्हणाला तश्या दोघी आत आल्या"

पिंकी तिथे बसली मोहिनी तशीच उभी होती. इंदर बेडरूम मध्ये जाऊन आला.आणि येताचं मोहिनीला डोळ्यांने बाहेर पडायचा इशारा केला. तशी ती बाहेर पडली मग इंदर सुद्धा  बाहेर पडला आाणि पिंकीला काही कलायचा आत दार ओढून घेत बाहेरून कडी लावली.

मोहिनी ताई अग... दार का? बंद केलंस उघड ना" दार बंद होताचं पिंकी गडबडली आणि दरवाजा वर जोर जोराने हात मारत होती.

पिंकी माझं बोलून झाल्याशिवाय ते नाही येणार पिंकीच्या कानावर आवाज पडला. तशी पिंकी मागे वळली.

तू.... इथे काय? करतोस "

काय? करतो म्हणजे?तुझ्याशी बोलायचं आहे मला "

आता मला नाही काही बोलायचं जा...तू "अमेरिकेलाच जा"

जाईन मी पण....तूझा नकार असेल तरचं.....

मग नकारच समज ना "आणि जा.....इथून "

पिंकी खरचं का? मी जावं हे तूला मनातून वाटतयं का?

हो....हो ....हो .....जा" म्हणाले.ना....

हो....ना "मग हेच तू ....माझ्याकडे बघून बोल त्याने तिची हनुवटी हाताने पकडत स्वत:कडे बघायला लावलं.


🎭 Series Post

View all