२१) गुलमोहर... एक प्रेमकथा

....
पण झालं भलतचं" आईने तिला प्रेमाने समजवायचं सोडा पण...मायेने साधा हात सुद्धा फिरवला नाही.

आई पिंकीला धारधार आवाजात दटावून  रूम बाहेर पडणारचं होती.की दाराबाहेर उभ्या असलेल्या मोहिनीने तिथून काढता पाय घेतला.

तर.... पिंकी मात्र जाणार्या आईकडे फक्त एकटक बघत होती.

आई पिंकीच्या रूम मधून बाहेर येताचं"स्वयंपाक घरात गेली. तर मोहिनीला अजून तिथेच बघून....

काय? ग.... आवरलं नाही का?

झालंच ग.... पण तू.... आलीस पण "बोललीस का? तिच्याशी"

हो बोलले .....

काय? बोललीस ग....

काही नाही असचं"

असचं कसं असू शकत आई काही तरी....बोलली असशील ना"आणि जे...काही बोलली असशील त्यात माझ्या पासून लपवण्यांसारख काही नसेल ना"मोहिनी आईला प्रश्नांवर प्रश्न करत होती तर... आई सांगायची टाळाटाळ"

मोहिनी पुरे.. झालं असेल तर.. चल जाऊ अजून तिघांना मिळून खुप मोठा निर्णय घ्यायचा आहे.

आई "विषय बदलू नको....असं असेल तर.... मी यात पडणार नाही. पण तीची परिस्थिती मला बघवत नाही म्हणून मी" तिला सावरायचा प्रयत्न करतेय"त्यातून बाहेर पडावी म्हणून मी" तूला तिच्यांशी अबोला सोडून बोलायला पाठवलं"पण तू... भलतच करून आलीस"

तूला कसं कळलं "

हो मला कळलं कारण मी "माझ्या डोळ्यांने बघितलं आई"तू तिच्या केसातून एक मायेचा हात सुद्धा नाही  फिरवलास"पण....याचा काय? परिणाम होईल माहित आहे.विचार करत बसली असेल आपले आईबाबांच या सगळ्यात आपली चूक आहे असं समजतात याच विचाराने तिचं मन तिला खात असेल.जाऊदे" एवढं समजवून सुद्धा तूला जर....असं वागायचं असेल तर मला काही बोलायचं नाही.मोहिनी जरा चिडतच निघून गेली .ती सरळ पिंकीच्या रूमच्या दिशेने"

तर इकडे आई रूम मधून बाहेर पडताचं पिंकी भानावर आली. आणि ती ड्राव मधून काही तरी शोधत होती.काही वेळ शोधल्या नंतर तिला ती गोष्ट सापडली.तीने ती वस्तू हातात घेतली आणि एकदा त्या वस्तू वरून एक कटाक्ष टाकला आणि ती वस्तू हाताच्या  मनगटा जवळ नेत डोळे घट्ट मिटले आणि त्या वस्तूने मनगटावर वार केला.आणि काही सेकंदातचं तिला भोवळ आली. आणि तीला तोल न सावरल्यामूळे जमिनीवर कोसळली.आणि ज्याने वार केला होता ती वस्तू तिच्या पासून काही अंतरावर पडली होती.

थोडा वेळ झाला आणि पिंकीच्या रूमच्या दिशेने निघालेली मोहिनी "तीच्या रूमच्या बाहेर येऊन पोहचली. समोर पिंकीला असं जमिनीवर कोसळलेली बघून मोहिनी धावतच तिच्या जवळ आली. कारण ती पोटावर पडली होती.

तशी मोहिनीच्या पायाला पिंकी पासून काही अंतरावर पडलेली वस्तू लागली तसा वेदनेने तिने पाय बाजूला घेतला.काय? आहे बघाव म्हणून ती खाली वाकली तर...ते ब्लेट होतं तशी मोहिनी घाबरली आणि मग मात्र जे समजायचं ते समजली.मात्र तिच्या जखमेची परवा न करता ती जीवाच्या आकांताने ओरडत पिंकी जवळ गेली.

मोहिनीचा आवाज पुर्ण घरात पसरला आई बाबा दोघंही आवाजाच्या दिशेने धावले तर... मोहिनी पिंकीचं डोक मांडीवर घेऊन तिला शुद्धित आणायचा प्रयत्न करत होती.डो़ळ्यांत अश्रूंची धार चालूच होती.

आई मात्र पिंकी आणि मोहिनीला तसं बघून जागेवर स्तब्ध झाली.

बाबा मात्र मोहिनी जवळ जात....मोहिनी बाळा हे काय? झालं"

बाबा बाबा पिंकीने हाताची नस कापली मी" रूम मध्ये आली तेव्हा ती इथे जमिनीवर पडलेली होती.तीला वाचवायला हवं"मोहिनी गडबडत अडखळत बोलत होती.

हो.... हो आपण हाँस्पिटल मध्ये घेऊ जाऊ"चल तिकडून तू...पकड इकडून मी" पकडतो बाबा घाबरलेल्या मोहिनीकडे बघत म्हणाले.तसं मोहिनी आणि बाबांनी मिळून तिला आधार देत उभ केलं रूम बाहेर घेऊन आले.खरे पण... आता हाँस्पिटल मध्ये कसं जावं याचं विचारात "ती उभी होती.

इकडे समोरच्या रूममध्ये इंदर मोबाईलवर कोणाशी तरी...बोलत होती.मोबाईल वर बोलता बोलता मागे वळला. तर...समोरच दृश्य बघून इंदर त्या दिशेने जात....

काय? प्रोब्लेम झालायं का?इंदर म्हणाला आाणि मोहिनी ने जरा मोठे डोळे करत त्याच्याकडे बघितलं.तसा इंदरने विषय बदलत ....

नाही म्हणजे? खुप रक्त गेलंय तिचं" हाँस्पिटलला लवकर पोहचायला हवं "म्हणून मी काय? म्हणतो माझ्या गाडीने जाऊया"

हो हो खुप उपकार होतील तूझे ...बाबा मध्येच म्हणाले

काका? उपकार नाही माणूसकी म्हणून करतोय" पण....तूमची काही हरकत नसेल तर ....मी" तीला उचलतो.

देवासारखा कोणीतरी मदतीला तयार झाला म्हणून"बाबांनी सुद्धा जास्त विचार न....करता परवानगी दिली. तसं इंदरने पिंकीला दोन्ही हातावर उचलून पुढे चावायला सुरूवात केली.

बाबा मीच जाते तूम्ही आईसोबत थांबा ती अजून रूम मधून बाहेर आली नाही. ते जरा...जाऊन बघा" मोहिनी काही तरी....आठवत सोबत येणाऱ्या बाबांना आडवत म्हणाली. आणि तशीच़ पिंकीला घेऊन जाणाऱ्या इंदरच्या मागे निघून गेली.

शेवटी जे नको होत तेच झालं.पुर्ण सोटायटीत पिंकीचा कारनामा समजला.पण ...अर्ध सत्य "अजून तरी एक सत्य गुपितचं होतं.मोहिनी गेली तसे बाबा आत गेले ते तसेच पिंकीच्या रूम च्या दिशेने गेले .त्यांना तिथे आई भान विसरून तंद्री लावून उभी असलेली दिसली.तसा त्यांनी तिला जवळ जात आवाज दिला.तशी ती भानावर येत....

पिंकी पिंकी कुठे? आहे ती अशी जमिनीवर का? पडली होती. काय?झालंय तीला आईने अस्वस्थ होऊन विचारलं.

संध्या तिने हाताची नस कापली का? कापली ते नाही माहित"

काय? हाताची नस मला माहित आहे का? कापली ती"

म्हणजे? काय? बोलायचं आहे तूला माहित आहे म्हणजे?

तीने नस कापली याला कारणीभूत मी आहे.

तू... संध्या अग ....काय? बोलतेस भानावर आहेस का?

भानावरचं आहे मी "माझ्यामूळेचं झाली तीची ही अवस्था"

काय? झालंय संध्या बाबांनी नसमजून पुन्हा विचारायचा प्रयत्न केला.तसा आईने मोहिनी आणि तिच्या मधलं बोलणं सांगितलं.त्यानंतर पुन्हा तिचं पिंकी सोबत झालेलं बोलणं सांगितलं.तसे बाबा आवाक होत....

म्हणजे? तूझ्या बोलण्याचं वाईट वाटून तीने हे पाऊल उचल अग....काय? गरज होती तिला तसं बोलायची मोहिनीने तिला समजवळ होत ना"तूला सुद्धा "तिने समजवूनच पाठवलं होत पण ....तूझ्यां आततायीपणा मूळे काय? होऊन बसलंय येतयं का? तुझ्यां लक्षात"अरे ती पोरगी पोटावर पडली पोटावर काय? होतंय काय? माहित बरं....झालं"तो समोरच्या रूम मधला मुलगा मदतीला आला म्हणून"पण ....जे लपवायचा प्रयत्न करत होतो ना" तेच समोर आलंय पुर्ण सोसायटीला समजलंय"
हा घडला प्रकार "बाबा म्हणाले आणि जाण्यासाठी निघाले.

आहो तूम्ही कुठे? जाताय आता" जाणाऱ्या बाबांना आई म्हणाली.

कुठे? म्हणजे? मुलगी हाँस्पिटल मध्ये आहे मोहिनी एकटी काय? काय? करेल ती पण बितरलीयं म्हणून मला इथे बसून नाही चालणार"नको तो उद्याप करून ठेवलाय"काय? होतयं आणि काय? नाही काय ?समजत नाही.

मला तस नव्हतं म्हणायचं मी" पण.... येऊ का? म्हणजे? माझं मन नाही लागणार "

बरं चला लवकर मी मोहिनीला काँल करून विचारतो.
कोणत्या? हाँस्पिटलला आहे ते.... तूम्ही खाली या"मी पुढें होतो.बाबा म्हणाले आणि कानाला मोबाईल लावत निघून गेले.

दुसरी कडे इंदरची गाडी भरधाव वेगाने रस्ता कापत होती.मोहिनी पिंकीच डोक मांडीवर घेऊन गाडीत मागच्या सीटवर बसली होती.खुप उशीर झाल्याने पिंकी बेशुद्ध अवस्थेत निपचित पडली होती.मोहिनी डोळ्यात पाणी आणून देवाचा धावा करत होती.काही वेळ झाला आणि गाडी हाँस्पिटल समोर थांबली.

तसा इंदर गाडीतून खाली उतरला"आणि मोहिनीच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि पिंकीला पुन्हा दोन्ही हातावर उचलतं हाँस्पिटलच्या दिशेने गेला. तशी मोहिनी सुद्धा गाडीतून उतरलीआणि इंदरच्या मागे गेली.

डाॅक्टर "डाॅक्टर एमर्जन्सी प्लिज" इंदर तिला घेऊन हाँस्पिटल मध्ये जाताचं"ओरडत होता.तशी एक नर्स इंदरच्या दिशेने आली.

डाॅक्टरला बोलवा"प्लिज "एमर्जन्सी आहे.इंदर पुन्हा म्हणाला.

सर... ही पोलिस केस आहे आम्ही असचं अँडमिट नाही करू....शकत तूम्ही पोलिसांना बोलवाव लागेल"
पोलीस आहो तिची क्रिटिकल कंडिशन आहे बेशुद्ध होऊन तिला खुप वेळ झालायं आणि या अवस्थेत असताना तूम्ही म्हणतायं की पोलिस केस आहे म्हणजे? पोलिस येत पर्यंत तीच्या जिवाला काय? झालं तर मग याची जबाबदारी कोण? घेणार" मोहिनी नर्सच्या बोलण्यावर जरा भडकलीच"
क्रमशः


🎭 Series Post

View all