13) गुलमोहर एक प्रेम कथा

....
मोहिनी "असं नको बोलू ग.... तूला काय? वाटलं मला तूला होणारा त्रास दिसतं नाही का? दिसतो तूझा सुद्धा त्रास कमी करण्यांचा प्रयत्न करत नाही का? ग....आम्ही करतो ना " बाळा पण दर वेळी पदरात अपयश येतं"पण...तरीही मी" आणि बाबा हार मानणारं नाही. मी "तर आजचं जाणार होते पिंकीचा आणि तूझा फोटो घेऊन रमा वहिनी कडे"तसं बाबांच म्हणाले मला की, घेऊन जा...चांगलं स्थळ आलं की उरकून टाकायचं म्हणतं होते. मग आधी ज्याच्यासाठी स्थळ येईल त्याची सनई आधी वाजवायची म्हणालेत.पण ह्या बिन अक्कलेचा कांद्याने हा नवीन घोळ घालून ठेवलायं"

पण मोहिनी हे काही असलं तरी....मी" माझ्या मुलीचं आयुष्य बेरंग राहू नाही देणारं "माझ्या वर विश्वास ठेव आणि एक गोष्ट लक्षात ठेव मोहिनी"देव जेव्हा जन्माला घालतो तेव्हा त्याचं आयुष्य पण लिहून जातो. कोणतीही गोष्ट कोणासाठी चूकवली   नाही.त्याने,

जर...तूझ्या आयुष्यात आता दु:ख लिहिलं असेल ना"तर त्या दु:खातून सावरायला तूझा जोडीदार सुद्धा पाठवला असेल.तोचं तूझं हे बेरंग आयुष्यात इंद्रधनुष्यात जसे रंग बदलत राहातात ना" तसे मिनटांमिटांला प्रत्येक रंगाची छटा उमटवेल.एवढचं नाही तर हे तूझं कोमेजलेलं आयुष्य त्या गुलमोहरा सारखं सतत बहरलेलं असेल ते ही त्याच्या येण्यांनेच"

काळजी नको करू तूझ्या हक्कांचं सुख देणारा तो नक्कीचं तूझ्या आजूबाजूला असेल.आई मोहिनीला समजवत होती.तर...मोहिनी आईचा शब्द ना "शब्द मन लावून ऐकत होती.

आई तूम्ही माझ्या सोबत आहात म्हटंल्यांवर काळजी नाही.मी" अगदी बिनघोर जगू शकते.आई बोलायची थांबली तशी मोहिनी पुन्हा म्हणाली.तसं आईने चेहर्यावर हसू आणत मोहिनीच्या गालावरून हात फिरवला.आणि पुन्हा दोघी स्वयंपाकाला लागल्या.

थोडासा वेळ झाला स्वयंपाक तयार झाला.तसं मोहिनीने भिंतीवरच्या घड्याळात बघितलं.संध्याकाळचे सात वाजले होते. तेवढ्यात दरवाज्यांची बेल वाजली.आईच्या काळजात धस्स झालं आईने शातीवर हात ठेवून स्वत:ला सावरलं.तर ...मोहिनी दरवाजा अघडायला म्हणून"दरवाजाचा दिशेने गेली.तर दारात बाबा होते ती दरवाजातून बाजूला झाली.आणि बाबा घरात आले.आणि सोप्यावर बसले आई त्याच्यासाठी पिण्यांच पाणी घेऊन आली.आणि पाण्याचा ग्लास बाबासमोर केला.बाबांनी आईच्या हातातून पाण्यांचा ग्लास घेतला खरा "पण...आईचा चेहरा त्याना  नेहमी सारखा आनंदी नाही दिसला.पण तूरतास त्यांनी काही विचारलं नाही. पाणी पिऊन ते फ्रेश होण्यासाठी निघून गेले.तशी मोहिनी आई जवळ येत...

आई ग... तू आता अशी नारज नाराज त्याच्या समोर राहू नको ते तूझ्या चेहर्यावरून मनातलं लगेच ओळखतील.मला तर वाटतय की त्यांनी ओळखळय सूद्धा"पण ते बोलले नाही काही"

पण तिच्या बोलण्याकडे आईच काही लक्ष नव्हतं तशी मोहिनी पुन्हा म्हणाली.

आई ग... काय? बोलतेय मी ऐकतेस  ना"आई काय? झालंय तूला लक्ष कुठे आहे तूझं नुसती तंद्री नको लावत बसू"


काय? म्हणालीस का? तू...आई मोहिनी च्या आवाजाने भानावर येत म्हणाली.


मी" हे म्हणाले की बाबा समोर असा कमेजलेला चेहरा घेऊन गेलीस तर ते तूझ्या मनातला गोंधळ लगेच ओळखतील .

अग... पण त्यांना ते सांगायचं आहे ना"

हो सांगायचंच आहे पण ...आताचं नको जेवून झालं की सांगू नाही तर दिवसभराचं जेवण सुद्धा करणार नाही ते"

हो ते आहेच नाही बोलणार मी पण तू एक काम कर ती कार्टी रूम मध्ये काय? करते बघून ये ,मी बाबाच्या चहाच बघते.

नाही नको मी" नाही जात तूच जा...मला बघितलं की ती चिडते तू ,जा...बघून ये...मी "बाबांच्या चहाचं बघते.मोहिनी म्हणाली आणि आईला बोलू न देता स्वयंपाक घरात गेली सुद्धा"

मग मात्र आईला दुसऱा पर्याय नव्हता पिंकीचा रूम मध्ये जाण्याशिवाय"

आई पिंकीचा रूमच्या दारात पोहचली की, पिंकी तीला अस्वस्थ होऊन कोणाला तरी फोन लावताना दिसली.पण तिकडून फोन काही उचलला जात नव्हता.म्हणून पिंकी अस्वस्थ झाली होती.आईने तीला त्या अवस्थेत बघून आवाज दिला.तशी ती आईच्या आवाजाने दचकली.आणि तिच्या हातातून फोन खाली पडला.

दुसरीकडे मोहिनीने चहा कपात ओतला आणि बाहेरच्या सोप्यावर निवांत बसलेल्या बाबींसाठी चहा घेऊन आली.तीने बाबासमोर कप केलाचं होता की ,अचानक तिला गरगरलं आणि तिच्या हातातला कप खाली पडला.तसं बाबांचं लक्ष पडणार्या मोहिनी वर गेलं त्याने तीला पडण्यापासून वाचवलं
आणि आधार देऊन सोप्यावर बसवलं.आणि मोहिनीच्या आईला आवाज देतच स्वयंपाक घरातून पाणी आणून मोहिनीच्या डोळ्यांवर शिंपडल आाणि तिला सुद्धा पाजलं.

तर...इकडे पिंकी आणि आई बाबाच्या आवाजाने बाहेर आल्या पिंकीने मात्र आईच्या कचाट्यातून सुटली म्हणून सुटकेचा मोठा श्वास घेतला.तर ...दुसरीकडे मोहिनीला त्या अवस्थेत बघून आई घाबरत...

मोहिनी अग काय? झालं तूला अचानक"आई म्हणाली तसे मोहिनीने हळूच डोळे उघडत घाबरलेल्या आईकडे बघत....

काही नाही ग... आज दुपारी लवकर आली ना त्यात जेवण नाही केल मी आणि मघाशी चहा सुद्धा घेता घेता राहिलाचं आपला म्हणून आली असेल किती घाबरतेस काही नाही झालं ती हळूहळू उठत सोप्यावर बसायचा प्रयत्न करत म्हणाली.

आणि तसचं बाबां कडे बघत स्वारी हा बाबा चहा सांडला माझ्या हातून "आज तूमच्या सुद्धा नशीबात चहा नव्हता वाटत माझ्या सारखाचं"

अरे... राहू दे तो चहा मोहिनी तू महत्वांची आहेस बाळा चहा नाही. बाहेरच्या लोकांनी तूला कितीही नावं ठेवली तरी मला माझ्या साठी माझी मुलगी राजकुमारीचं आहे. कायम राहिलं

बाबाच्या वाक्यांवर मोहिनी च्या डोळ्यांत पाणी आलं. तशीच अश्रू भरल्या नयनांनी ती पुटपुटली राजकुमारी"

हो राजकुमारी आहेस तू... कारण तू जगातलं सर्वात मोठ सुख देणारी आहेस या बाबांची परी आहेस"

पुन्हा ती चकित झाली आणि पुटपुटली बाबाची परी....

हो तूला अश्चर्य वाटलं ना "की आज मी तूला परी म्हणतोय राजकुमारी  म्हणतोय जे या आधी कधी म्हणालो नाही ते आज म्हणतोयं " कारण मी या आधी तूझ्या शी कठोर वागत आलोयं  प्रेम दाखवता आलचं नाही ते या आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनमूळेचं त्याच्या टोचून बोलण्यांने तूझ्या बद्दल माझ्या मनात प्रेमाच्या जागी रागाने जागा घेतली आणि त्याचा परिणाम तू माझ्या पासून  अंतर ठेऊ लागलीस.हे झालं त्या लोकांमुळे जे की माझ्या साठी महत्वाचे कधी नव्हंते पण त्याच्या बोलण्यांने मी भरकटलो आणि माझ्या त्या मुलीचं माझ्या आयुष्यातलं महत्व मी कमी करत गेलो ज्या मुलीनी मला पहिल्यांदा बाबा म्हणून आवाज दिला जगातलं पहिलं सुख देणारं बाळ आहेस तू तूझ्या तोंडून बाबा जेव्हा मी ऐकलं होत तेव्हा माझं मन  अगदी आनंदाने मोहरलं होतं आणि म्हणून मी तूझं नावं मोहिनी"ठेवलं.

बाबा म्हणजे? तूम्ही माझ्या वर प्रेम करता ना खुप अगदी आई सारखं"

आई सारखं करतो की नाही माहित नाही पण या पुढे तू या सर्वाचं निरिक्षण कर.... आणि मग ठरव आईच प्रेम जास्त आहे की माझं"बाबा म्हणाले तशी मोहिनी बाबांच्या कुशीत शिरली.

तसं बाबांनी तीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ...

ये लाडूबाई  पूरे आजचं सर्व लाड पुरवणार आहेस का? चल ऊठ आधी डाॅक्टर कडे जाऊन येऊ"

बाबा आता डाॅक्टर कडे कशाला सांगितलं ना" मी... काही खाल्ल नाही म्हणून आली असेल चक्कर"आणि बरचं झालं चक्कर आली ती त्यामूळे तूमच्या मनात माझ्यासाठी असलेलं प्रेम तरी दिसलं.

मोहिनी माझं प्रेम दिसावं म्हणून तूला आजारी पडायची गरज नाही लागणार "

बरं  बाबा प्रेमाने माझं पोट तर भरलं बुवा पण बाकी सर्व मनात आपल्याला शिव्या देत असणार हो ना"ग... आई मोहिनी आईकडे बघत म्हणाली.

हो बाई प्रेमाने पोट भरलं नसेल तूझं आज जास्तीची भूक लागली असेल तूला एवढं नक्की "नाटकी बंद कर आणि जेवायला चला लवकर"आई म्हणाली तसे आईच्या मागून मोहिनी आणि बाबा डायनिंग टेबलच्या दिशेने गेले

तर .... दुसरीकडे पिंकी मोहिनी वरच्या बाबाच्या प्रेमाला आलेलं उधाण बघून  पिंकीचा अगदीच जळफळाट झाला ती जरा पाय आपटतच गेली पण डायनिंग टेबल कडे नाही तर सरळ तिच्या रूमच्या दिशेने "....

क्रमशः

🎭 Series Post

View all