गुलाब...

पूजा ला आज सांगायच होत की तू मला आवडतो पण सुचत नव्हत काही, पूजा मनोमन विचार करत होती.... आयुष्यभराचा सोबती असाच हवा होता मला
 गुलाब

सकाळी सहाला घड्याळाचा अलार्म झाला, पूजा उठली तिने आवरलं, लगेच स्वयंपाक घरात आली ती, भाजी चिरायला घेतली.. 

" जा पूजा तू आवर मी करते स्वयंपाक",.. आई

"दोघी मिळून करु आई स्वयंपाक, म्हणजे लवकर होईल, तू पण दिवसभर काम करत असते",.. पूजा 

"किती समजूतदार झाली आहे पूजा, पूजा लहान होती तेव्हा मला असंच वाटायचं की पूजाने समजूतदार व्हावं, तेव्हा अजिबात ऐकायची नाही ती कोणाच, काही काम करायची नाही, पण आता नको वाटत आहे पूजाने काहीतरी खोडी काढावी, तिच्या आयुष्यात आनंद असावा असं आता वाटतं आहे ",.. आई 

बाजूची तिची मैत्रिणी मीना आली,..." संध्याकाळी येते का ग माझ्यासोबत शॉपिंगला पूजा?",.. 

" नाही जमणार मला मीना, ऑफिसमध्ये खूप काम आहे",.. पूजा 

" जाऊन ये ना ग पूजा, जरा फिरत जा, चार चौघात मिसळ",.. आई

" नाही आई मला अजिबात जावसं वाटत नाही",... पूजा आत मध्ये निघून गेली

  मीना आणि आई एकमेकीकडे बघत होत्या, आवरुन पूजा ऑफिस मध्ये पोहोचली, कामाला सुरुवात झाली 

" चल पूजा चहाला येतेस का?",.. ऑफिस मधील अनघा विचारात होती... 

" नको ग आताच आली मी, खूप काम पेंडीग आहे",... पूजा 

" बर आज पार्टीला येतेस ना संध्याकाळी?, मस्त एंजॉय करू " ,.... अनघा 

"नाही ग नको वाटतय मला, तू जा " ,... पूजा 

"काय हे पूजा? अस करतेस? , सारख आपला हे नको ते नको, मी नाही येत वगैरे, किती बोर वागतेस तू ... एवढ मोठ आयुष कस घालवणार एकट , दुःखी ",... अनघा 

"नाही अनघा आता नको वाटतय परत कोणाला भेटण नको तेच रिलेशनशीप, मी अशीच छान आहे एकटी " ,... पूजा 

" एक अनुभव असा आला म्हणून सगळे लोक वाईट नसतात पूजा, तू मिसळून तर बघ सगळ्यांमध्ये, खूप चांगले लोक आहेत या जगात, तुला चांगल वाटेल, belive me, मोकळी हो ग", ... अनघा समजावत होती 

" नको.. काही सांगू नको मला, मी येणार नाही", .... पूजा 

अनघा रागाने निघून गेली.... 

 पूजा ग्राजुएट होती ऑफिस मध्ये रिसेप्शन मध्ये काम करत होती , कॉलेजला असतांना पूजा एक अतिशय हसरी खेळकर उत्साहाने भरलेले मुलगी होती, सगळ्या गोष्टींची हौस होती तिला , वाटल सासर ही असच छान मिळेल, पण कसल काय, दोन वर्षापुर्वी घटस्फोट झाला होता तिचा , कारण एकच सासर कडच्या मंडळींच्या मागण्या पूर्ण नाही करू शकले, त्यांनी पूजा ला वेडी ठरवली, जस लग्न ठरल तस सुरू होत त्यांच फर्निचर द्या, गाडी द्या , तू नौकरी कर, पण तेव्हा लगेच पूजा ला नौकरी मिळाली नाही आणि घरच्या त्रासामुळे तिच्यात confidence राहिला नव्हता, रोज छळ होत होता, त्यात तिचा नवराही सामील होता, तो स्वतः काही करायचा नाही, फक्त पूजा ला त्रास देण आणि पैसे मागण हेच एक काम होत त्याच

कुठून आणतील एवढे पैसे? पूजा च्या घरचे त्रासले होते, यांची जेमतेम परिस्थिती होती , सतत तिच्या घरच्यांचा अपमान, नंतर मागण्या वाढत गेल्या, दुकान टाकण्यासाठी पैसे द्या, रमेश तिचा नवरा मागे लागला होता, एक दिवस अस पैशावरुन खूप भांडण झाल, रमेशने पूजा ला खूप मारल, सोडल सगळ तिने तेव्हा, घरी परत आली ती, तेव्हा पासून पूजा एवढी गप्प झाली , जे दिल ते खाते, काही विचारल तर नाही सांगते, उत्साह लोप पावला तिचा, काही करायच मन नव्हत, ती कोणाशी बोलत नव्हती 

ओळखीच्या काकांच्या मदतीने ऑफिस मध्ये नौकरी लागली, आपल्या लेकीच्या संसाराची ही अवस्था बघून आई वडील हादरून गेले, बर्‍याच वेळा सासरच्या लोकांना समजवण्याचा पर्यंत केला पण काही उपयोग नव्हता , तुमच्या मुलीला काहीही येत नाही, तुम्ही पूर्ण हुंडा दिला नाही, पूजा ला परत पाठवायच असेल तर आम्हाला दुकान टाकून द्या, एक नाही अनेक मागण्या होत्या त्यांच्या, अगदी हातापाया पडले त्या लोकांच्या तरी त्यांनी ऐकल नाही त्यांनी , घटस्फोट झालाच शेवटी, पुढे काय भविष्य आहे मुलीच? विचार करत बसायचे ते, जे होईल ते होईल, पूजा आपल्या कडे आहे, तिकडे अजून छळ झाला असता, जिवाला धोका होता तिच्या, मुलगी वाचली हीच जमेची बाजू होती 

"अहो पूजा गेली का ऑफिसला? हा बघा डब्बा इथेच राहिला, जावून देवून या ना, कशात लक्ष नसत तीच ..... सकाळी ही काही खाल्ल नाही तिने" ,... आई 

"हो जातो",.. बाबा 

आॅफीस जवळ होत तीच 

बाबा ऑफिस मध्ये पोहोचले, पूजा जागेवर नव्हती, चहा घ्यायला कॅन्टीन मध्ये गेली होती, छान होत ऑफिस पूजाच, बाबांना अभिमान वाटला मुलीचा एकदम, 

" कोण हवय काका तुम्हाला ? ",.. सुधीरने विचारल, तो तिच्या ऑफिस मध्ये होता मॅनेजर पोस्ट वर , त्याला कळल हे पूजाचे बाबा आहेत , 

"द्या तो डब्बा इकडे, मी देतो पूजाला, तुम्ही चहा घेणार का काका" ,... सुधीर 

"नको मी येतो, काम आहे खूप",.. बाबा निघाले 

सुधीर मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, ऑफिस मध्ये चांगल्या पोस्टवर होता तो, घरी आई बाबा आणि तो मस्त त्रिकोणी सुधारलेल कुटुंब होत, आई शिक्षिका होती वडील ही मोठ्या पोस्ट वर होते बँकत,

 पूजा जॉईन झाली ऑफिस मध्ये तेव्हा पासून त्याला पूजा आवडत होती, अतिशय साधी कामाशी काम ठेवणारी, ऑफिस काम उत्तम करणारी, अतिशय हुशार, अशीच बायको हवी मला 

पूजा च्या ते लक्ष्यात आल होत, सुधीर तिला जास्त स्पेशल ट्रीटमेंट देत होता , प्रेमाने वागत होता , तिने ठरवल काहीही झाल तरी आता नको परत तेच संसार प्रेम, काही चांगले नसतात लोक आधी प्रेमाने वागतात एकदा लग्न झाल की त्रास देतात, 

सुधीर तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा, ती घाबरून होती त्याला, एक दोनदा विचारला ही त्याने, ती नकार देत होती,.. "माझा घटस्फोट झाला आहे , तुम्हाला चांगली मुलगी मिळू शकेल, तुम्ही माझ्या मागे वेळ वाया घालवू नका" ,

 सुधीर ऐकायला तयार नव्हता , एक ही संधी सोडत नव्हता तो , त्याला आशा होती एक दिवस पूजा हो बोलेल, 

"तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता आहात सुधीर, मला आधीच्या लग्नाचा वाईट अनुभव आहे, प्लीज मला समजवण्याचा प्रयत्न करू नका, मला परत लग्न करायच नाही",.. पूजा 

" सगळी मुल सारखी नसतात, विश्वास ठेव माझ्यावर, आपण दोघ सोबत खूप सुखात राहू, एक चान्स दे, तुझ्या आई बाबांना तू आनंदी असलेली हवी आहे, विचार कर पूजा ", ...... सुधीर, 

"तुमच्या घरच्यांच काय? त्यांना आवडेल घटस्फोट झालेली मुलगी?",... पूजा 

"कोणत्या जगात वावरते तू, आमच्या कडे सगळे मोकळ्या विचाराचे आहेत",... सुधीर 

" आधी सगळे असेच म्हणतात नंतर त्रास देतात, पूजा चिडली होती, प्लीज leave me alone", ... 

अनघा चा पाठिंबा होता सुधीरला , एक दिवस सुधीर अनघा पूजा च्या घरी गेले, तिच्या आई बाबांना भेटले, सुधीरने पूजा शी लग्न करायच आहे अस सांगितल, मागणी घातली, आई बाबांना खूप आनंद झाला, आम्ही समजावतो पूजाला, तुम्ही काळजी करू नका, सुधीर चे आई बाबा येवून भेटून गेले, सगळ्यांचा होकार होता 

पूजा ला सुधीर अनघा घरी येवून गेले ते कळल,

"पूजा बेटा इकडे ये ",... बाबा 

पूजा येवून बाबांन जवळ बसली 

"मला माहिती आहे पूजा तुझे लग्ना बद्दल मत थोडे वेगळे आहेत, पण मला आणि तुझ्या आई ला खरच अस वाटत की तू एकदा सुधीर चा विचार करावा आम्ही भेटलो त्याच्या घरच्यांना खूप चांगले लोक आहेत ते, त्यांना तुझ आधी लग्न झाल होत याची ही कल्पना दिली आहे मी आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाही ",... बाबा 

" हो चांगले लोक आहेत ते, विचार कर बेटा, आम्ही आहोत तोवर ठीक आहे पुढे कसा होणार तुझ?" ,... आई 

" बेटा जगात चांगली लोक ही आहेत, अस करून नकोस, एक चान्स दे सुधीर ला, मला विश्वास आहे तू खूप खुश होशील ",... बाबा 

पूजा विचार करत होती काय करू? ऑफिस मध्ये चांगला वागतो तो सगळ्यांशी, आता मला ही थोड फार आवडतो आहे हा सुधीर, थोडे दिवस भेटून बघू, ती सुधीर ला भेटली, त्याला सहा महिन्याचा वेळ मागितला 

हे सहा महिने अतिशय आनंदात गेले पूजा चे, ऑफिस मध्ये सुधीर आहे या विचाराने ऑफिस ला जायची ओढ लागायची तिला, सुधीर खूप काळजी घेत होता तिची, अगदी प्रत्येक गोष्टीत जपत होता तो तिला, आता पूजा ला खात्री पटली मुलगा चांगला आहे, ती त्याच्या घरच्यांना जावून भेटली, घरच्यांचा होकार होता आधीपासून 

तिने होकार कळवला, 

एका सुरेख संध्याकाळी दोघे भेटले, एक अनामिक हुरहुर मनी दाटली होती , माहिती होत त्याला मी आवडते , ही भावना खूप छान होती , एवढ्या मोठ्या जगात कोणाला तरी मी हवी आहे, पूजा खुश होती, मी ही तुझी छान साथ देईन सुधीर, 

पूजा बोल ना काही तरी... आता तरी बोल मनातल 

पूजा लाजली होती.. 

पूजा ला आज सांगायच होत की तू मला आवडतो पण सुचत नव्हत काही, पूजा मनोमन विचार करत होती.... आयुष्यभराचा सोबती असाच हवा होता मला , लग्नानंतर कस असेल सुधीर सोबत आयुष विचार करतांना ही तिच्या गाली गुलाब फुलत होते , तेवढ्यात सुधीर ने लाल गुलाब पुढे करून तिला लग्नाची मागणी घातली, स्वप्न पूर्ती होत होती , तिने होकार दिला, 

गुलाबाचा गुच्छ मनमोहून घेतो
प्रेमाची आपली साक्ष तो देतो 
नात तुझं नी माझा अजून फुलवतो
मी तुला पहिल्यांदा दिलेला गुलाब 
की त्याच वेळी तुझ्या गाली फुललेला गुलाब 
कोणता जास्त सुंदर दिसतो 
गुलाबाचा गुच्छ मनमोहन घेतो 
आपल प्रेम अजून बहरवतो

एक सुंदर आयुष्याची सुरुवात झाली होती, 

पूजा ने होकार दिला... 

सुधीर ने उठून तिला मिठीत घेतल, पूजा लाजून चूर झाली होती 

आयुष्यभराच्या आठवणी साठी तिने तो लाल गुलाब जपून ठेवला❤️...... कायमचा स्वतः च्या मनात, त्याचा सुगंध तीच आयुष गोड गुलाबी करणार होता, ती ही तेवढीच उत्सुक होती, आता तो गुलाब ही तिचा होता आणि सुधीर ही...