अतिथी

अतिथीचे पाहुणचार व तरीही अतिथीचे न जाण्याच्या निर्णयामुळे चिंतीत आदरतीर्थ करणाऱ्या जोडप्यांची परिस्तिथी व संयम या वर आधारित विनोदी कथा


      या पाहुण आलात तुम्ही एकदाचे . आमच्या घरी इथे लांब कुणीच यायचे नाहीत पण तुम्ही आलात आणि खरच आम्हाला खूप आनंद झाला . अहो जणू काही आमचे भाग्यच उजडले आणि अंधारमय जीवनात तुम्ही जणूकाही दिपच घेऊन आलात . परंतु हे पाहुण दिवस नंतर रात्र ती येतेच आणि रात्र हे यथासत्य आहे त्यामुळे आपण याचा आदर करावा . आपण आलात  पाहुणे साहेब पण आपणाला येऊन चार दिवस झाले त्यामुळे आपण आपला पाहुनचाराचा थाट गुंडाळून  निरोप घ्यावा अशी आमची माझ्या मनातून इच्छा आहे. आणि ही इच्छा स्वाभाविक असणारच कारण पाहुणे हे पाहुणे असतात आणि घर हे घर असतं आणि आपलं घर हेच आपल्यासाठी स्वर्ग असतं.

                            पाहुणे आज तुम्हाला येऊन चौथा दिवस उजाडला आहे . पाहुणे आपण चार दिवसांपासून सोफ्यावर विराजमान आहात आपण उठायचे नावही घेत नाही आहात . ज्या सोफ्यावर आपण बसलेला आहेत व वृत्तपत्र किंवा पुस्तकात हरवलेले आहात आपण ते पुस्तक खाली करून समोर असलेले कॅलेंडर बघावे . त्या कॅलेंडर वर निरखून पाहिल्यास आपल्याला असे कळेल की आपल्याला येऊन चार दिवस झालेले आहेत व सोबतच माझ्या संयमाचा अंत होत आहेत . मी एक साधा मध्यम वर्गीय माणूस . थोडी सेविंग आणि घरखर्च यापुढे माझी हिम्मत नाही आहे . त्यामुळे अतिथीचे सन्मान करणाऱ्यारांचा विचार आपण घ्यावा अशी माझी तीव्र नम्र विनंती आहे आणि आपण माझा वैचारिक मनातील अर्ज स्वीकारावा.
                            मी जपून खर्च करणारा व्यक्ती आहे आणि माझी भार्या सुद्धा पैसे जपवणारी व्यक्ती आहे . पण जेव्हा आपण आलात आम्हाला कळले की माझा खिसा कापल्या जाणार आहे तरीही मी आपले मानून  आपला आदरतीर्थ केला . दुपारी आपल्या पाहुनचारनिमित्त आम्ही उच्च वर्गीय जेवण बनविले होते . आठवा साहेब दोन भाज्या वरण भात सोबत एक गोड पदार्थ होता तो म्हणजे रसगुल्ला आणि आम्ही आमच्या संसारात पहिल्यांदाच आस्वाद घेतला पण आपल्या आदरतीर्थ साठी आम्ही माझ्या पाकिटला फाशी द्याचे ठरविले .
संध्या ला सुद्धा आम्ही आपणासाठी आम्ही काही कमी नाही राहू दिले होते . आम्हाला वाटले की आता खानपानाचा कार्यक्रम योग्य रित्या पार पडला व आपण आता टाटा करणार आमचा निरोप घेतावेळी आम्ही तुम्हाला खोटे खोटे थांबवणार पण तुम्ही आमच्या पाहुनचाराला योग्य तो मान देऊन जाणार व आमचे नाव आपल्या गावात काढणार . परंतु आपण काही जाण्याचे नाव घेतले नाहीत . आपण उशिरा उठलात आम्हाला वाटले दुपारून जाणार आहात म्हणून बायकोने डबा सुद्धा बनविण्याचे ठरवले पण आपण आपला मुक्काम ठोकला. काल रात्री बायको म्हणाली की आज फक्त खिचडीच टाकते मी पण हो म्हणालो कारण आता आमच्यात एवढीच हिम्मत आहे आणि पुढे जर असेच राहिले तर आम्हाला उपवास सुद्धा धरावा लागेल    त्यामुळे पाहुनचाराला सुद्धा आता मान न देण्याचे आम्ही ठरविले  कारण हिम्मत आणि संयम हेच आम्हाला राम राम ठोकत आहेत. त्यामुळे जेवणाच्या या प्रवासाला समजून आपण योग्य निर्णय घ्यावेत.

                             आज दुपारी झाली आहे पण आपल्यात एक शब्द सुद्धा बोलणे नाही झाले आहे . आपण शांतपणे सोफ्यावर बसून आहात आणि आम्ही मात्र इथे अशांत आहे . काल आपला तिसरा दिवस होता आणि बायकोने विचारले सकाळी की हे कधी पर्यंत राहणार आहेत . मी काही बोलू शकलो नाही म्हणून फक्त खांदे उंचावले आणि तेव्हाच तुम्ही तुमचे सगळे कपडे धुवायला लावलेत तेव्हा नेहमी शांत राहून सगळं ऐकून घेणाऱ्या माझ्या पत्नीला काय वाटले असेल व तिला सुद्धा राहवलं नाही हे मला तिच्या चेहऱ्यावरून कळले.
मला कपडे धुवावे लागणार की काय अशीच परिस्तिथी होती पण निदान मला माझेच कपडे धुवावे लागले यातच मी सुख समजतोय . 
                        पाहुणे तुम्हाला ही शांतता काही कळत नाही का ? या शांततेचे बोल ऐका . पहिल्या दिवशी आपल्या घरची विचारपूस नातेवाईकांबद्दल बोलणे आम्ही केले. कॉलेज ,जुने मित्र , आठवणी, गमतीजमती ,शेजारपाजार, नौकरीधंदे , शिक्षक लोक , सिनेमे ,अभिनेते-अभिनेत्रीं ,इथं पासून तर आपल्या जुन्या प्रेमीका बद्दल सुद्धा बोलणे झाले. पण आता शब्दच च नाही आहेत आहे फक्त अबोला त्यामुळे आपण गुडबाय करण्याची संधी घ्यावी कारण आपल्या जाण्याची हीच सुवर्णसंधी आहे म्हणून आपण प्रस्थान करावे .
                     अतिथी देव असले तरी ते कधी कधी मनुष्य असतात अन आज कळले की काही प्रमाणात ते राक्षस सुद्धा असतात . आपण देव आहात पण मी एक साधा माणूस आहे . देव आणि माणसाचा संबंध घट्ट असला तरी देव ही मनुष्याला वेळ देतो व मनुष्य सुद्धा देवळात काही वेळच थांबतो . देव ही भक्ताला सोडतो . पण एक तर तुम्ही आहेत दूरचे पाहुणे त्यामुळे संयम नसणारच परंतु आम्ही तरीही आदरतीर्थ केले आपले .
जवळचे असते तर खुशीने ठेवलं असतं पण त्यांच्यासारखे पाहुणे आपण नाही निघालात . त्यांना मनापासून थांबा म्हटले तरी ते जातात आणि आपण ..........
                          प्रत्येकाला दुसऱ्यांचे घर आवडते पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्यांच्या घरी तळ ठोकावे . आपले घर हे आपलेच असते आणि म्हणून त्याला होम स्वीट होम म्हणतात पण आपल्यांमुळे त्यांचे स्वीट होम तिखट होम होऊ नये ही जबाबदारी नाही का हा युक्तिवाद समजून घायवे आपण . करण स्वीट होम आणि वेलकम या शब्दांबरोबर गेट आऊट हा शब्द सुद्धा असतो पण अनुचित होईल सगळे आणि शेवटी माणूस हा शेवट बघतो आणि आम्ही जे पण केले आधी ते डिलीट होईल. परंतु आपण आमच्या संयमाचा अंत पाहू नये . उद्याचा सूर्योदय हा आपला पाचवा दिवस असेल आणि  माझ्या संयमाचा हा शेवटचा दिवस असेल त्यामुळे अनर्थ टाळावे व उद्या तरी योग्य निर्णय घ्यावा व ठरवा अतिथी तुम्ही कधी जाणार.