गुढीचा थाट (पंचाक्षरी काव्य)
वसंत आला
सृष्टी फुलली
चैत्र पालवी
धरा खुलली
सृष्टी फुलली
चैत्र पालवी
धरा खुलली
घेऊन आली
सोन पहाट
शोभून दिसे
गुढीचा थाट
सोन पहाट
शोभून दिसे
गुढीचा थाट
जरी वस्त्राने
गुढी नटली
फुलं हारांनी
खूप सजली
गुढी नटली
फुलं हारांनी
खूप सजली
कडुलिंबाच्या
कडूची तोड
साखर गाठी
करते गोड
कडूची तोड
साखर गाठी
करते गोड
नववर्षाचे
स्वागत करू
चैत्र महिना
हा झाला सुरू
स्वागत करू
चैत्र महिना
हा झाला सुरू
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा