राज्यस्तरीय साहित्य करंडक
फेरी -२ ,कविता
विषय - दोन ध्रुवांवर दोघे आपण
शीर्षक - गूढ जीवा शिवाचे
टीम - भंडारा
*गूढ जीवा शिवाचे*
तू निर्गुण निराकार
तुझा निरपेक्ष व्यापार
तुझ्या सगुण रुपास
मी शोधीले अपार
गुरफटले मी मायेत
भवती जडत्वाचे फासे
परी वेडे मन माझे
वेध तुझा घेत असे
वेद शास्त्रे पुराणे
सांगती जीव हा नश्वर
करू कोणता उपाय
मज भेटेल ईश्वर
गूढ अगम्य रूप तुझे
कळवया ते गहन
तुझ्या भेटीलागी माझे
कंठी आले पंचप्राण
ऐलतीरी जीव माझा
पैलतीरी तुझे स्थान
येऊ कशी तुजपाशी
चक्र जन्ममृत्यूचे भेदून
©® मुक्ता बोरकर - आगाशे
मुक्तमैफल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा