गुढ एका हवेलीचं

ऋता वाचणार का आपल्या पुर्वाजांची हवेली का पैशाच्या तंगीखातर विकणार .तसेच हवेलीच भुत तिला हे करू देईल का ह्या प्रश्नासाठी नक्की वाचा .गुढ हवेलीच
ऋता आज हॉलमध्ये डोकं धरून बसली होती. चहुकडे अंधार आणि समोर होता भगभगणारा प्रकाश दाखवत चालु असणारा लॅपटॉप आणि त्यावरती  तिच्या सगळ्या आशांवर पाणी फिरवणारा मेल.

 कंपनीच्या आर्थिक स्थितीमुळे सध्या शोजनां स्पॉन्सर करणं शक्य होणार नाही आहे तर आम्ही आपलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करत आहोत.तसदी बद्दल क्षमस्व.

दहावेळा मेल वाचुनही त्यात काडीचाही बदल होउ शकत नाही हे तिला समजुन चुकलं.स्पॉन्सर शिवाय एवढा मोठा शो आणि अरेंजमेंट करण शक्यच नव्हतं.

आर्टीस्टही तिला तिच्या पैशातुन परवडणारे नव्हतेच.सगळं काही ठरवुन झालेलं .. शो साठी लागणाऱ्या खास सांउड आणि लाईट असलेल्या मशिनीही आणि स्पेशल प्रॉप काही दिवसांत येणार होत्या. ज्यात ऋताने सारी सेविंग घातली होती.  मशिन व प्राॅप बनवणारी कंपनी  आता पैसे परत करायला नकार देत होती.

काय करावं ते उमजत नव्हतं, अचानक ऑफिसातील वातावरण प्रचंड थंड झालं.तिला गारठायला व्हायला लागंल...ती सेंट्रल हिटरकडे गेली आणि तिला चकित व्हायला झालं..कारण सेंट्रल हिटर तर चालु होता.मग ही थंडी कशी...इतक्यातच घरचा लँन्डलाईन वाजला .

\"ट्रिंग ट्रिंग\" ह्या आवाजाने शांत घरात एक कल्लोळ उठवला .ऋता अजुनच घाबरली.काहीक्षण फोन उचलु का नको असं झालं होतं  तिला कारण कॉल आयएसडी होता. फोनच्या विशिष्ट रिंगच्या पद्धतीमुळे तिला ते जाणवलं. असा फोन बहुदा रात्री यायचा तिच्या घरी.


"इतक्या रात्री तेही लँडलाईनवर फोन कुणाचा असेल ..?आजोबा ..?पण त्यांना तर इकडची लँडलाईन माहित नसणार का असेल माहिती? आई बाबा वारल्यापासुन मी कित्येक वर्ष आजीशी बोलली नाही आहे.मग त्यांना ह्या  घराचा नंबर कोणी दिला असेल. " ह्या विचारांनी ऋताच्या मनात चलबिचल सुरू झाली .इकडे मात्र फोनची रिंग अधीर झाल्यासारखी अजुन मोठ्याने वाजायला लागली.

"हैलो...! "ऋताने काहीसं घाबरत आणि अजुनही कुडकुडत विचारलं.

"ऋता मॅडम,मी कृष्णप्पा , शिवराज यांचा सेवक .मालक संकटात आहेत.कधी काही होऊ शकतं.त्यांना बघायला लगेच या.."

"आजोबा..!काय झाल त्यांना? ..हैलो..हैलो..!!" अचानक फोन कट झाला. ऋता आता अस्वस्थ झाली.
तिने तिकडे जायचा निर्णय घेतला आणि ट्रॅव्हल साईटवरून  मुंबईला जाण्यासाठी तिकीट बुक केली.

बॅग पॅक करताना ऋताला सारा भुतकाळ आठवला.
आई वडिलांशी आजोबांनी संबंध तोडुन टाकले होते कारण तिची आई एक परजातीची मुलगी होती. ऋताशी नेहमी आजी बोलायची पण आजोबा कधीच नाही.आजीच एक दोनदा येउनही गेलेली ,पण आजोबांनी मात्र कधीच तिला पाहीलं नव्हतं.

त्यांची एक हवेली होती .पुराण कालीन हवेली ज्याचें वास्तु डीझाईन अद्भुतरम्य होतं.पुर्वीच्या मोठ्या जमीनदारांची ती हवेली होती.सध्या त्या हवेलीत एक हॉटेल उघडलं होतं पण ते फारसं चालत नव्हतं.कारण होतं ..तिच्या गावाचा कच्चा रस्ता आणि तिकडे जाताना लागणारं घनदाट जंगल व हवेलींच महागडं भाडे.

कोल्हापुर सारख्या शहरात जर स्वतात हवेली पहायला मिळत असेल तर कोण जास्त पैसे खर्च करून त्यांच्या तालुक्यात येणार होतं.
आता मात्र मुंबईला येईपर्यत कधीही न पाहिलेल्या आजोबांसाठी ती देवाला सतत  हीच प्रार्थना  करत होती की आजोबा ठीक असुंदे.

गेल्या काही वर्षात तिला मनासारखी प्रगती करता आली नव्हती.लोक आता असे शोज बघायला उत्सुक नसत. म्हणुन ती ज्या कंपनीचा हिस्सा होती ती कंपनीही बंद पडली होती. तिने शेवटचा प्रयत्न म्हणुन एका कंपनीकडुन स्पॉन्सर मिळवुन स्वत:च ग्रँड शो करायचं ठरवलं होतं ,ज्यासाठी तिने आतापर्यत कमावलेला सारा पैसा लावला होता.पण आता तोच पैसा पाण्यात गेल्यासारखा वाटत होता.

आता तिलाही वाटायला लागलं होतं ,की बस झालं  अजुन ह्या फिल्डमध्ये आपल्याला यश नाही आहे ,तिने ठरवलं की आजोबांशी दिलजमाई करायची आणि परत तिकडेच राहयचं आणि त्यांचा हॉटेल बिझनेस सांभाळायचा.

ऋताने मुंबईला एक दिवस आराम केला आणि मग रात्री मुंबईहुन तिला गावाला जायला आधी ट्रेन पकडली . ट्रेनचा रात्रीचा प्रवास करून ती पुढे गाडीने आठ तासाची ड्राईव करून घरी रात्री पोहचणार होती.

कित्येक वर्षानी ऋता ह्या ठीकाणी परत येत होती.ऋताने एका वेबसाईटवरून  गाडीची आधीच सोय करून ठेवली होती.तिच गाडी तिला स्टेशनवर न्यायला यायला येणार होती ,पण अचानक ड्राइवरचा मॅसेज आला की गाडी खराब झाली आहे .तो येऊ शकत नाही पण, त्याने कुणालातरी अरेंज केलयं आणि सोबत त्या गाडीचा नंबर व फोटो होता.

ऋता स्टेशनच्या बाहेर आली ,पाहिलं तर नंबर दिलेल्या गाडीपाशी एक ड्राइवर उभा होता.धिप्पाड ,सावळ्या रंगाचा ,मोठे काळे डोळे ,जाड भुवया आणि चेहऱ्यावर मोठ्या मिशा असलेला माणुस पाहुन ऋता काही क्षण घाबरली .त्याने चेहऱ्यावर प्रसन्न हसु आणत तिच्या बॅग हातात घेतल्या आणि म्हणाला ,

"बर झालं ,तु आलीस मुली .मी तुझीच वाट पाहत होतो." ते हसु पाहिल्यावर ऋताला कुठेतरी त्याला पाहिल्यासारखं  वाटलं पण कुठे ते तिला आठवेना.तरीही ती विश्वासाने गाडीत जाऊन बसली.

गाडी संध्याकाळी त्या घनदाट जंगलातुन वाट काढत हवेलीकडे निघाली  .ऋताला वाटेत झोप लागली होती,   ती जागी झाली. तिने पाहीलं आजुबाजूला भयानक अंधार होता.किर्र काळोख चहुकडे आपलं साम्राज्य दाखवत होता. गाडीच्या दिव्याने प्रकाशीत झालेली झाडेही विचित्र आकार घेत होती.

जणु त्यांना लागलेले डोळे कोणाची तरी प्रतिक्षा करत असावेत.पुर्ण रस्ताभर तिची गाडी सोडली तर कोणतीच गाडी नव्हती.ऋताने घड्याळात पाहीलं तर रात्रीचे आठ वाजले होते.एव्हाना तर तिला घरी पोहचायला हवं होतं.

तिने आपला सेलफोन काढला तर त्यात नेटवर्क लागत नव्हतं.ऋताने आता देवाची धावा करायला सुरवात केली कारण आता अनेक गुन्हेगारी घटना ज्या तिने वाचल्या व ऐकल्या होत्या त्या तिच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या.आणि प्रत्येक घटनेत जर आपण असतो तर आपण बचावासाठी काय केलं असतं ह्या शक्यतांचा मनात विचार करून तिचं डोक फुटायची पाळी आली. 

रस्ता तर संपायचं नाव घेत नव्हता..ड्राइवरही काहीच बोलत नव्हता.तिने ड्राइवरला हात लावण्याचं ठरवलं.तिने ड्राइवरला जसा हात लावला ,तिला रेअर व्हु आरश्यात एक रक्तरंजीत चेहरा दिसला.जो तिच्याकडे पाहत हसत होता.ती जोराने किंचाळली आणि बेशुद्ध पडली.


********************************
"म्हातारी लवकर बाहेर ये. "एक उर्मट आरोळीने हवेलीचं अंगण दुमदुमलं आणि नंतर स्पीकरवरून अश्लील गाण्यांचे आवाज आले .

हवेलीत थांबलेलं जोडपं  पहाटेपासुन चालु असणाऱ्या कर्कष गाण्याच्या आवाजाला कंटाळुन कांउटरवर आलं." आम्हांला आमचे पैसे परत हवे ."

काउंटरवर बसलेली साठ वर्षापेक्षा जास्त असलेल्या बाईने नम्रपणे सांगितलं.."हे बघा तुमचं चार दिवसाच पॅकेज आहे .प्लीज तेवढे दिवस रहा .कालच तर आला आहात. "

"अहो मॅडम! ,आम्ही शांतीसाठी आलो होतो, स्वत:चे कान फोडुन घ्यायला नाही." त्यातील मुलगा म्हणाला.

"हे बघा ,आमचे पैसे मुकाट्याने परत करा नाहीतर सोशल मिडीयावर तुमची वाजवु ." त्या जोपडप्यातील स्त्रीने आवाज चढवला.

इकडे आवाज बंद झाला आणि एक आरोळी पुन्हा सर्वाना ऐकु आली़. "म्हातारे बाहेर ये नाहीतर म्हाताऱ्या सारखं तुलाही पलंगावर खिळवीन."

गेस्ट समोर अजुन तमाशा नको म्हणुन त्या बाईने मुकाट्याने जोडप्याचे पैसे परत केले .ती बाहेर आली तेव्हा तिची तीक्ष्ण नजर आणि ताठार चाल पाहुन तो गुंड दोन मिनांटासाठी वरमला.

ती होतीच तशी ,गहिरे तपकिरी डोळे ,उभट नाक ,टोकदार जीवणी ,वयानुसार सुरकतेले ओठ ,सावळा रंग ,बारीक शरीरयष्टी ,अंगावर कुंकु कलरची  साडी,डोक्यावर जुन्या रूपयाच्या आकाराच  कुंकु आणि त्याखाली ॐ गोंदण .नाकात ठसठशीत नथ .गळ्यात ठुशी नि जाड डोरलं .हातात तश्याच लाल व सोन्याच्या बांगड्या  कमरेला जाडसा चांदीचा जुन्या जमान्याचा कंबरपट्टा आणि  पायात लांबवर ऐकु जातील असे जाडे घुंघरू असलेले पैंजण आणि करकरीत कोल्हापुरी वाहण. चेहऱ्यावरती घरंदाजपणाच तेज.

"हे बघ सांग! तुझ्या मालकाला,आम्ही कुठेही जाणार नाही .मी मेली तरी हडळ म्हणुन इकडेच वावरेन.." हा तुझा भोंगा घे आणि फुट ..नाहीतर आणि अचानक तिने पाठी लपवलेली तलवार त्या गुडांवर रोखली.

सहा फुटी धिप्पाड गुंडाला साक्षात ती दुर्गेची रूप वाटली .त्याच्यासोबत असलेले साथीदारही पळाले..पण जाताना तो परत म्हणाला ..

"म्हातारे तीन दिवसाची मुदत देतो...नाही हवेली खाली केलीस ..तर खरचं तु आणि तुझा दादला कुठे गायब व्हाल समजणारही नाही."

ह्यावर ती बाई  तलवार घेऊन धावत त्यांच्याजवळ गेली .ते पाहुन तर त्यांच धाब दणाणलं.तसही बिल्डरने फक्त धमकी देऊन ये सांगितल्यामुळे त्यांनी पलटवार नाही केला ..इतक्यात एक नोकर त्या बाईजवळ येउन म्हणाला ,

"जीजीसा ,बेबी उठल्या .लवकर चला."असं  म्हणताच ती बाई शांत झाली आणि त्या नोकराला म्हणाली.

" किशोर ..तु हो पुढे ..मी ही ठेवुन येते.असं म्हणुन तिने तलवारीला नमन केलं .मग ती सोन्याची मुठ असणारी तळपती तलवार आधी नक्षीदार म्यानात ठेवली .त्यावर एक नाव पाहीलं आणि तिचं मन त्या व्यक्तीच्या कर्तृ त्वाच्या आठवणीने भरून आलं ..ते नाव होतं \"कृष्णप्पा.\"ह्या घराण्याचा मूळपुरुष.

ती स्त्री एका रूममध्ये आली ..तिकडे भव्य असा गोल नक्षीदार पलंग होता आणि  सगळ्या रूममध्ये लाकडाचं कोरीव काम केलेल होतं.काळ्या शिसवी पलंगावर त्या मुलीच्या आवडीच्या रंगाची अबोली कलरची रंगसंगती साधुन चादर आणि उश्या ठेवल्या होत्या. बाजुलाच एक तिशीतली बाई चापुन चोपुन हॉटेलच्या युनिफॉम असलेली जांभळ्या कलरची व सफेद फुलांची प्रिन्ट असलेली साडी
नेसुन उभी होती. जीजीसाला पाहताच तिने वाकुन नमन केलं.

डोक प्रचंड दुखत असल्यामुळें डोक्याला हात धरून असलेली मुलगी जीजीसाला बघताच तिच्याकडे धावत गेली आणि तिला बिलगुन म्हणाली ,

"आजी मी इकडे कशी आली ?आणि हे लोक माझ्या प्रश्नाला उत्तर का देत आहेत.?"

जीजीसाने आधी तिला स्वत:पासुन विलग करत तिला पुर्णपणे पाहीलं. किती गोड दिसत होती तिची नात. बाहेरगावी असल्यामुळे गव्हाळ रंग उजळुन गोरा झाला होता.उंचीही बापाएवढीच.अंदाजपंचे पाच फुट सहा  किंवा सात इंच.भरलेलं सुदृढ़ शरीर.आई सारखे मोठे डोळे ,थोडसं बसतं बापासारख गोल नाक ,आणि सेम जीवणी. रूंद कपाळ आणि गोबरे गाल मात्र आजोबांसारखेच होते.तिच्या घराण्याची एकुलती एक वारस ऋता बांदल.

"कशी आली म्हणजे ?गाडीनेच येणार ना तु !" जीजीसा म्हणजे चंद्रिका बांदल यांनी तिलाच आश्चर्याने विचारलं.

"पण, आजी ते ...मी..जंगलातुन गाडीने जात होती .अंधार होता आणि मग ड्राइवरचा चेहरा मला रक्ताळलेला दिसला..मी जोराने ओरडले..मग मला बाकी काही आठवतं नाही." ऋताने काल रात्री जो प्रसंग घडला तो जीजीसाला सांगितला.

जीजीसाही  हैराण होत म्हणाली ,"अगं जंगलाचा रस्ता तर कोणीच वापरत नाही आता.गावकडे यायला छान हायवे वरून रस्ता काढलाय.सगळीजण तिकडुन तर येतात."

"आणि तु ड्राइवर आणला होतास?रात्री तु एक वाजता इकडे पोहचली तेव्हा रूम इकडच्या रिसेप्शनिस्टकडे  लक्झरी रूम  मागितली .त्यालाही तुझी ओळख दिली नाही .ते तर सकाळी आम्ही रजिस्टर चेक केलं तेव्हा कळलं की तु आली आहेस. तुझी गाडी अजुनही पार्किंगसाठी बाहेर ठेवली आहे कारण डिकी लॉक होती आम्ही सामान बाहेर नाही काढु शकलो.."जीजीसाने जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा ऋता विचारात पडली कारण तिला काहीच आठवतं नव्हतं पण तिच्या दिमतीला तत्पर असणारी बाई मात्र कान देऊन सारं टिपत होती.

जीजीसाने ऋताच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवुन त्या बाईला हाक मारली. " नमिता जा आणि ऋता बेबी साठी नाष्ता घेऊन ये ."

"जी जीजीसा ,असं म्हणुन ती जायला लागली तर ऋताने तिला अडवत म्हटलं ." आजी मला तुझ्या हातचं चॉकलेट मिल्कशेक हवयं आणशील प्लीज.."

"नमिता तु थांब आणि माझं डोक चेपुन दे .." ऋताने तिला ऑर्डर दिली .जीजीनेही हसत मान डोलावली आणि  तिकडुन निघुन गेली.

"नमिता हे काय गोंधळ सुरू होता सकाळी ?कोण होती ती माणसं ?" ऋताने विचारलं

तशी नमिता जणु संधीची वाट पाहतच असल्यासारखी बोलायला लागली."अहो..किरमणी कॉरपोरेशन माणसं होती.हवेली विकत घ्यायची म्हणत होते.चांगले पन्नास लाख ऑफर करत आहेत ..पण,जीजीसा मानतचं नाही "

"पण का नाही विकत आहेत.? मी असती तर लगेच हो म्हणाली असती आणि आजोबा ...ते नाही आले मला भेटायला?" ऋताने विचारलं.

"अहो, तुमचे आजोबा ,ते हॉस्पीटलमध्ये आहेत.त्यांच्यावर तर किरामणीच्यां माणसांनी हल्ला चढवला .. त्या लोकांना वाटलं हे पाहुन तरी जीजीसा घाबरून सही देईल,पण म्हातारी खवट निघाली. "

"आता एवढा त्रास होतो तर टस का मस होत नाही आहे" असं म्हणत नमिताने जीभ चावतं पटकन मालीश थांबवली.

"अगं !म्हातारीला म्हातारी म्हणाली तर बिघडलं कुठे?" हे घे शंभर रूपये छान मालिश केलीस आणि माझं एक काम करशीलं?ऋताने हसत म्हटलं जणु तिला तिच्या आजीला अपशब्द बोलल्याचं काहीच वाटलं नव्हतं.

"काय करायचं बेबी साहेब..? नमिताने हसत विचारलं.

"उद्या माझी मिटींग घडवशील का?किरामणींच्या मालकाशी.त्यांना सांगा हवेली त्यांची होईल ..पण मला पाच करोड हवे .."

नमिता तोंड तर आश्चर्याने उघडचं राहिल.ऋताला त्याची गंमत वाटली .मग तिनेच बोटाने नमिता  हनुवटी वर करत म्हणाली "मला माहीत आहे ..ह्या हवेलीची किंमत किमान दहा करोड असेल..आणि हे सगळ शिसम ,सागवानी एन्टींक फर्निचर, ती पुर्वाजांची तलवार विकली तर पाच एक करोड कुठेच गेले नाही ."

नमिताने आनंदाने मान डोलावली आणि निघुन गेली .ऋताही फ्रेश व्हायला निघुन गेली...पण कुणीतरी असं तिकडे होतं ,ज्याला ऋताचं वागण बिलकुल आवडलं नव्हतं. त्याच्या रागीट लालसर डोळ्यानी ऋताचं प्रतिबिंबीत असलेला आरसाच चक्काचुर केला. ज्या आवाजाने फ्रेश व्हायला गेलेली ऋता परत बाहेर आली.

तिने पाहिलं तर त्या आऱश्यांच्या विखुरलेल्या तुकड्यात तिला तिचा चेहरा अगदी भयावह दिसला.जणु कोणीतरी त्याला दगडाने चेचुन मारलं आहे. बुबळे बाहेर आली आहेत ..जीभ बाहेर येऊन तुकड्यात लटकते आहे.

तिलाच हे पाहुन इतकी भिती वाटली ,तिने जोरजोरात किंकाळ्या मारायला सुरवात केली.इतक्यात जीजीसा तिकडे आल्या आणि ऋताला विचारलं ..

"काय झाल गं..?कशाला एवढी ओरडत आहेस..?"

"आजी तो आरसा ..माझा चेहरा.." ऋताने आरश्याकडे बोट दाखवत म्हटलं पण जेव्हा जीजीसाने पाहिलं तेव्हा तो आरसा जसा आधी अखंड होता तसाच होता.

"आजी ह्या हवेलीत भुत आहे..समथिंग पैरानॉर्मल .."ऋता घाबरत म्हणाली मग तिने तिला जे आरश्याच्या तुकड्यात पाहीलं ते घाबरतं वर्णन केलं.

हा अनुभव तिला भारतात आल्यापासुन दुसऱ्यांदा
कोल्ड कॉफीचा ग्लास घेऊन येत असलेला किशोर तर भुताच्या नावाने एवढा घाबरला की त्याच्या हातुनच  कोल्ड कॉफी असलेला ग्लास खाळकन फुटला आणि  रूमच्या बाहेरून किरामणीला फोन करण्याऱ्या नमितालाही पटकन भीती वाटली कारण तिनेही काच फुटल्याचा आवाज ऐकला होता.

"अगं !ऋता शांत हो..मी सगळं सांगते .तु म्हणते ते खर आहे गं! इकडे कृष्णप्पा यांचा वास आहे.ही हवेली त्यांनी त्यांची प्रेयसी भामा यांच्यासाठी बनवली होती.कृष्णप्पा यांच अंगवस्त्र ठेवणं त्यांच्या घरातील लोकांना बिलकुल आवडलं नाही.त्यांनी भामाला मारून टाकलं ,पण मग कृष्णप्पानेही त्या लोकांना मारलं आणि ह्या हवेलीत चिणुन टाकलं..असं म्हणतात कृष्णप्पा अजुनही ह्या हवेलीत वास करतात कारण  त्यांना त्यांच्या दोषींऩा मुक्तता मिळु द्यायची नाही आहे म्हणूनही ते कुठल्याच वारसाला ही हवेली कुणाला विकु देत नाहीत."

"ओ माय गॉड..हॉरीबल आहे हे आजी..!" ऋताने घाबरत म्हटलं.

"हो !काही आत्मे मग रागाने इकडे राहणाऱ्यांना त्रास देतात..कारण हवेली समजा पडली तर ते मुक्त होतील.त्यासाठी ही जागा रिकामी होण गरजेच आहे."
आजीने अजुन नवीन माहीती दिली जी ऋतासकट तोंडफाट्या किशोर नि  लपुन बसलेल्या लोभी नमिताने ही ऐकली.

*****************************
किरामणी आणि ऋताचं मिंटींग यशस्वी झाली.टोकन अमाउंट म्हणुन दहा लाख ऋताने सांगितलेल्या एकांउटवर ट्रान्स्फर केले.

ऋताने किरामणी बिल्डरला सांगितलं, "बरोबर पंधरा दिवसांनी पझेशन घ्यायला या .त्या दिवशी रात्री मी हवेलीचे पेपर तुम्हाला देईन."

ती गेल्यावर जीजीला  घाबरवणारा गुंड किरामणीला म्हणाला ,"साहेब थोडे थांबला असता तर पन्नास लाखातच सौदा झाला असता ."

"अरे !मुर्खा सौदा स्वस्तात पटला उलट चाळीस लाख वाचले.." किरामणीने हसत हसत त्याला सांगितलं.

"म्हणजे ,मी नाही समजलो.."गुडांवर विचारलं

"अरे..!हवेलीत भुत आहे असं नमिता म्हणत होती.एकदा पेपर हातात आले की ऋताला मारून टाकायचं आणि आवई उठवायची ..भुताने मारलं.मग उरलेले पैसे कुणाला दिले ,कोण विचारतयं " किरामणी गुढ हसत म्हणाला जणु त्याने ऋताला कसं मारायचा ह्याची योजना मनात बनवत होता़.

*****************************
पंधरा दिवस संपले.जीजीसा तर हॉटेलमधुन गायब झाली होती आणि ऋताच्या नावावर पॉवर ऑफ एटर्नी केली होती .आजोबाही हॉस्पीटलमध्ये शेवटचा श्वास मोजत आहेत अशी अफवा गावात पसरली.

अमावस्येची रात्र होती..बाहेर किर्र काळोख होता.हवेलीत कोणीही नोकर नव्हते.किरामणी आणि त्याची माणसे हवेलीच्या आत आली.
ऋताने काहीही न बोलता बसायचा इशारा केला आणि पेपर आणायला आत निघुन गेली.तिच्या वागण्यावरून ती नेहमीची ऋता वाटत नव्हती,पण किरामणीला त्यांच काही सोयर सुतक नव्हतं. किरामणी गुर्मीत हवेलीतील राजसिंहनसदृष्य खुर्चीवर जाऊन बसला..


त्याने साथीदारांना इशारा केला तर तेही किरामणीला एकटं सोडुन हवेलीत काय मुल्यवान वस्तु आहेत ह्याची पाहणी करायला लागले.

अचानक सगळ्या हवेलीत रडण्याचे नि किंचाळण्याचे आवाज दुमदुमले.तसचं अचानक प्रकाश लाल रंगात परावर्तित झाला.सगळीकडे एकदम थंड असं वातावरण निर्माण झाला

किरामणीलाही अंगावर काहीतरी वळवळतयं असं जाणवलं.पाहिलं तर अंगावर काही काळ्या गोम होत्या.अचानक गोम कुठुन आल्या ,हे त्याला समजेना.हळुहळू त्या त्याच रक्त शोषु लागल्या. त्याने घाबरून उठायचा प्रयत्न केला तर खुर्चीवर एकदम दोन लोखंडाचे पट्टे बाहेर आले आणि त्याची मनगटं जखडुन टाकलं. खुर्चीतुन बाहेर आलेल्या जळलेल्या अश्या रखरखीत दोन हातांनी त्याच तोंड गच्च पकडुन ठेवलं.

इकडे दोन्ही गुंड जे हवेलीत फिरत होते. त्यांच्यासमोर अचानक एक बाई उभी राहीली.तिच्या डोऴ्यांना बुबळ नव्हती. त्वचा पांढरीफटक आणि पेहराव नऊवारी साडी असलेला आणि पुर्ण शरीर जखमांनी भरलेलं.तिने ह्यांना आपल्या लांबसडक नखांनी स्पर्श केला तसे दोघेही घाबरत हवेलीच्या मुख्य दरवाज्यापाशी आले .पण दार उघडेना आणि खिशातील पिस्तुल तर केव्हाच गायब झाली होतं.

अचानक सरदार वेषात धिप्पाड ,मोठ्या मिश्या असणारा माणुस त्यांच्याकडे धावत आला.त्याचे डोळे लाल भडक होते.त्याने त्यांच्या अंगावर तलवार उपसली.

ते गुंड आता मरणार असं वाटत असतानाच अचानक हवेलीचा दरवाजा उघडला.बाहेरून तिच लाल साडीवाली बाई खिदळत त्यांना बोलावु  लागली. हे पाहुन त्यांची एवढी तंतरली की ते घाबरून बाहेर पळत सुटले.त्या बाईने हवेलीच्या वेशीपर्यंत त्यांचा पिच्छा केला.पाठी वळुन पाहण्याची हिमंत होत नव्हती कारण कानात सतत घु्ंघरा्चा आवाज धुमत होता.कशीतरी त्यांनी जीप चालु केली.

तर हवेतचं एक प्रेत खी खी करत त्याच्यावरून  उडु लागलं.त्यांनी घाबरून जीप चालु केली जी चालुचं होईना.त्या प्रेताचा कर्णकर्कश आवाज आणि मासविहीन खोपड़ी असलेला चेहरा त्यांना बघवत नव्हता.अचानक ते प्रेत त्यांच्या जवळ आलं तसे ते जीपमधुन उडी मारत धावत पुढे गेले आणि समोरून येणाऱ्यां गाडी पुढे आले आणि चिरडुन मेले.

किरामणी हे सगळं काही खुर्चीवर जखडलेल्या  अवस्थेत पाहत होता. अचानक तो पुरूष तलवार घेऊन त्याच्याकडे आला तेव्हाच त्याचे लोखंडी पट्टे सुटले.त्याने पाहिलं ही तीच तलवार होती ज्यावर कृष्णप्पा लिहीलेलं.तलवारीच्या मुठीवरनं त्याला ते समजलं कि हे कृष्णप्पाचेच भुत आहे.

तो ऋताला \"वाचव,वाचव\" अशी हाक मारत हवेलीच्या आतील भागात गेला ...तिकडे पाय अडखळुन पडला आणि त्याने पाहिलं तर ऋताचे कपडे अंगावर असलेली डेडबॉडी दिसली ज्याचं शीर गायब होतं..

सगळीकडे रक्तरंजीत फर्निचर दिसतं होतं.किरामणी हे पाहुन अजुन चरकला.अचानक ते धड उभ राहीलं .किरामणीला लीगल पेपर देवु लागलं.हे पाहुन किरामणी खुपच घाबरला .तो माफीची भीक मागु लागला.

इतक्यात त्या धिप्पाड माणसाने तलवार मानेवर रोखली आणि म्हणाला "बोल ,शिवराजला कोणी मारलं ?माझ्या जीजीला हवेली रिकामी करण्यासाठीं कुणी धमकावलं ."

"मला माफ करा..मी मान्य करतो हे सगळं मीच केलं..मीच शिवराज यांना गुडांकरवी मारलं.मीच सांगायचो जीजीनां त्रास द्यायला.सोशल मिडीयावर बदनामी व्हावी म्हणुन मीच खराब रिव्हु लिहण्यासाठी पैसे दिले होते.मला सोडा.मी परत ह्या हवेलीकडे ढुंकूनही बघणार नाही .वचन देतो." किरामणीने रडत  आपल्या पापांचा कबुलीनामा वाचला.

हे पाहुन त्या तलवार बाजाने किरामणीला जाऊ दिले.किरामणी जो पळत सुटला तो पळत जंगलाच्या दिशेने गेला. त्याला दिशेच  भानही नव्हतं. त्याने काही क्षण थांबुन पाहीलं तर खरचं कृष्णप्पाच भुत त्याचा पाठलाग करत होतं.तो इतका घाबरला की जंगलाच्या वेशीच्या  सुरवातीला वाटसरूंसाठी बांधलेल्या जुन्या विहिरत घसरून पडला आणि बुडुन मेला.

*******************************

दोन आठवड्यांनी हवेलीत लगबग सुरू होती. जीजी आणि शिवराज आजोबा सण असल्यासारखे तयार झालेले. जीजी तरी म्हणाली ,

"मला हे नवीन डेकोरेशन कसतरी वाटतंय ..पुर्वी किती छान होतं."

"अगं! कामाप्रमाणे डेकोरेशन बदलायला नको का..?तसही हे डेकोरेशन आजच्या दिवसापुरतं आहे .मग तर तुझी वास्तु पहिल्यासारखी दिसेल  आणि उस्तवमुर्ती तयार झाली का ?आता गेस्ट यायला लागतील.


"हो आजोबा..मी तयार आहे .मी कशी दिसतेय?"ऋताने हसत हसत विचारलं.

"सुंदर ..खुप सुंदर.!.खरं सांगु ?मुलगी झाली म्हणुनही मी तुझ्या वडिलांशी दिलजमाई नव्हती केली.मला वाटलं माझं घराण संपल .पण, बेटा तु ज्या तऱ्हेने हवेली वाचवलीस ..खरी हवेलीची वारस तुच आहेस." शिवराज आजोबा भावनिक होत म्हणाले.

जीजी पण,तिकडे आल्या आणि म्हणाल्या ."कृष्णप्पा यांची कृपा हो ..!तुम्ही हॉस्पीटलमध्ये गेल्यावर मी त्यांचा धावा केला होता आणि म्हणाले होते.माझ्याच्याने आता ही हवेली जपणं  होणार नाही.तुच काय ते बघ आता."


"आणि माझी प्रार्थना सफल झाली.त्यांनी तुमच्या नावाने हिला फोन लावला .ही धावत पळत आली.येताना मला हिने फोन केला आणि हिला इकडची परिस्थिति समजली."जीजीने शिवराज यांना कौतुकानं सांगितलं

" हो ,आजोबा तेव्हाच ठरवलं की माझ्या जादुगरीच्या शिक्षणाचा उपयोग करायचा आणि ह्या हवेलीला  माणसांच  सोबत आणि वैभव परत मिळवुन द्यायचं.त़्यासाठी हॉन्टेड  हवेली म्हणुन अफवा होणं महत्वाचं होतं..म्हणुन मला भुतं दिसत असं सर्वाना सांगितलं..किरामणी कडुन पैसे सुद्धां ह्यासाठी घेतले कारण मला काही हॉन्टेड प्रॉप्स घ्यायचे होते. " ऋताने स्वत:ची कर्तबगारीची उजळणी केली तसे तिघंही हसले.

"हिच तर वसुली होती..त्याने जे आपले गिऱ्हाईक घालवले आणि तुमच्यावर हल्ला केला त्याची." तिने किरामणीकडुन पैसे का घेतले होते ह्याचे कारणही सांगितलं.

"मला अजुनही एक गोष्ट समजत नाही आहे..हवेलीत तलवार घेतलेला आणि ती साडीवाली बाई तर आर्टीस्ट होते. तसंच  ते प्रेत हॉलोग्राम होता .आपण तर घाबरवुन त्याचा कबुलीजबाब ही घेतला होता. असं असताना किरामणीला कोणी मारलं? त्याचा मृत्यु जरी एक्सीडेंट  असला तरी मी स्वत:  त्यादिवशी  हवेली बाहेर हवेत एक  तलवार उडत किरामणीचा पाठलाग करताना पाहिली होती."

इतक्यातच कृष्णप्पांची तलवार भितींवरून खाली पडली आणि तिघांनाही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.तिघांनी तलवारीला उचललं आणि हवेलीचे नवीन नावं "हॉन्टेड हवेली"या नवीन नामकरण पुजेसाठी बाहेर निघुन गेले.