गृहिणी, हेच माझ करिअर

A story about a housewife

"मम्मा....मी नाही खाणार पोहे, मला सँडविच देना"

"स्वरा,अग...खाऊन बघ ना... टेस्टी झालेत पोहे!"

"नो मम्मा...."

"ओ के....करते तुझ्या साठी सँडविच, आणते पाच मिनटात,.... खुश ना आता?"

" लव यू मम्मा"

स्वराचा आणि तिच्या आईचा म्हणजे सायलीचा हा संवाद, शोभाताई शांतपणे ऐकत होत्या. आपल्या भाच्याकडे आलेल्या एक आठवड्याच्या पाहुण्या त्या,आल्यापासून बघत होत्या सायली, स्वराचे सगळे हट्ट पुरवत, तिचे लाड करत असे.

पोट भर नाश्ता करून मंडळी आप आपल्या कामाला निघाले. अनुपचा स्वत्तः चा इंटेरियर डिझायनिंगचा बिझनेस, तो सकाळी निघाला, की थेट रात्री सात नंतरच घरी येत असे. स्वरा, पाचवीत शिकत होती, ती लहान असल्याने, सायलीने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला होता.

स्वराला स्कूल बस मध्ये बसवून सायली घरी येताच, आपल्या घरकामाला लागली. किचनमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने शोभाताई आत गेल्या.

"मावशी, अहो मी आणून दिलं अस्त ना पाणी तुम्हाला. मला हाक मारायची ना"

"अगं, असुदे तेव्हढच आपलं आमचे हाथ पाय चालू राहतात ग. त्यांना खरं तर आत सायलीशी बोलायचं होत, पण कसं ते कळेना. तरी इकडचे तिकडचे विषय बोलून झाले, आणि मुख्य विषयावर यायचं त्यांनी धाडस केलं....

"सायली, तू आता पुन्हा नोकोरी नाही करणार का?? म्हणजे स्वराच्या वेळेस गरोदर राहिलीस तेव्हा नोकरी सोडली तू.आता स्वरा मोठी झाली,पुन्हा नोकरी करावी असं नाही वाटत ?"

" नाही मावशी,आत्ता सध्या तरी माझा नोकरी करण्याचा विचार नाही."

"पण एवढं शिकलेली तू,चांगली एम.बी.ए झालीस. आणि आता करिअर न करता घरात बसायचं म्हणजे?"

"अहो मावशी, घरात असते, म्हणजे काही न करण असं कुठे अस्त? घरातली कामं, स्वराच सगळं करायचं,अनुपचं आणि आई बाबाचं काय हवं नको ते बघणं म्हणजे काहीच न करण अस्त का?? "

"मी एक गृहिणी आहे, आणि हेच माझं करिअर आहे ! नाही, म्हणजे ह्या कामाचे मला पैसे मिळत नाहीत, पण म्हणून गृहिणी होण, म्हणजे नुस्त घरी बसण नाही!"

"नाही मला तसं नव्हतं म्हणायचं ग, तुला बघते मी गेले चार दिवस,तु सगळ्यांची किती काळजी घेते. स्वराची मर्जी सांभाळते, तिच्या आवडी निवडी जपते."

"सकाळी पण, तिला पोहे नकोत तर लगेच सँडविच करून दिलस "

"तिच्या साठीच तर नोकरी सोडून घरी राहायचं ठरवल ना मी. गृहिणी होण्याचा माझा निर्णय मी स्वतः घेतला आणि आज माझ्या निर्णयाचां अभिमान आहे."

"मी नोकरी करत असते, तर माझ्या पिललाचे कित्येक लडिवाळ क्षण, तिचे हट्ट, तिचे लाड करणे, ह्या सगळ्याला मी मुकले असते!"

"मला,खरंच खूप कौतुक वाटतं माझ्या सगळ्या मैत्रीणींच ज्या ऑफिस, करिअर सांभाळून घर आणि मुलांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतात."

"मी जरी गृहिणी असले,तरी एकाच वेळेस अनेक भूमिका निभावत असते. मुलाला जन्म देणे, आणि आई होणं हेच एक मोठं करिअर आहे"

"त्या इवल्याश्या जिवाला, सांभाळणे, वाढवणे,आपल्या बाळाला शिकवून सक्षम बनवणे हे खूप मोठं आव्हान आहे."

"स्वरासाठी मी फक्त तिची मम्मा नसते, ह्या आईच्या भूमिकेत अनेक विविध भूमिका दडल्या आहेत. आई, शिक्षिका, मैत्रीण, कधी आवडीचा मेनू करून देणारी शेफ, तर कधी तिची तत्वज्ञानी, तर कधी मार्गदर्शक असते. कधी ती आजारी पडली तर तिची नर्स आणि काही शाळे साठी प्रोजेक्ट करण्यास मदत हवी असले तर प्रोजेक्ट मॅनेजर ही भूमिका देखील माझी असते!"

"तुम्ही म्हणाल, आई म्हटल की हे सगळ आलच,उगाच का मी ह्या वेग वेगळ्या भूमिकांची नावं घेत आहे. पण मावशी घरात राहून मी हे सगळे करिअरचे पर्याय एकाच वेळेस गृहिणीच्या रुपात सध्या करत आहे असं मला वाटतं.आणि म्हणूनच गृहिणी असणं सुद्धा एक करिअर आहे असं माझं ठाम मत आहे!

सायलीचे म्हणणे ऐकताना शोभाताई अवाक झाल्या. आजच्या पिढीतील सुशिक्षित मुलगी, गृहिणी होण्यातच समाधान मानते आणि एवढंच नसून तेच तिचं करिअर आहे असं म्हणते !

"पण लोकं करिअर करून पैसे कमावतात, त्यात त्यांची बढती झाली की कामाचा उत्साह वाढतो. पण ह्या तुझ्या गृहिणी करिअर मध्ये असं कुठे आहे? " न राहून अखेर शोभाताईंनी सायलीला विचारलच.

"हाहाहा, हो मावशी, पैशांची कमाई नाहीये, पण पैसे योग्य रित्या खर्च करणे आणि ते वाचवणे ह्यात सगळ्याच गृहिणी आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करतात! "

"आणि बढती म्हणाल तर असेतेच की, आज मी माझ्या सासु सासऱ्यची फक्त सून नव्हे, लाडाची सून आहे! आणि स्वारा साठी तर, तिची मम्मा म्हणजे तिचं विश्वच आहे जणू !"

"मी तिचे लाड करते आणि काही प्रमाणात हट्ट ही पुरवते पण तिच्या साठी कधी काय योग्य आहे ते लक्षात घेऊन मी वागण्याचा प्रयत्न करते. तिला शिकवता शिकवता काही वेळेस मी सुद्धा तिच्या कडून काही नवीन गोष्टी शिकते. अहो कॉम्प्युटर वर, शाळेचे मोबाईल ऍप वर कित्येक होमवर्क असतात, ते अँप कसे वापरावे हे मला शिकून घ्यावं लागलं."

"सायली, कमाल आहेस हो तू पोरी! मला आपलं वाटायचं काय आमच्या पिढीच्या बायकांनी फक्त चूल आणि मुल केलं. पण तू आज मला गृहिणीची अनेक रूप दाखवून,पटवून दिलं की गृहिणी म्हणून स्व इच्छेने घरी राहणे हे देखील एक करिअर आहे!"

"अहो मावशी, आज मी घरी राहून एक कर्तव्य दक्ष गृहिणीची जबाबदारी घेतली आहे, म्हणून तर अनुप आज बाहेर निर्धासतपणे त्याची पैसे कमावण्याची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण करत आहे!आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या मी घरची घेतली आणि अनुप ने बाहेर जाऊन नोकरी व्यवसाय करण्याची जबबदारी घेतली."

"घरी असते, घर काम करते, शिकून सवरून हेच करायचं तर शिक्षणाचा काय उपयोग? असे विचारणारे आहेत,पण घर सांभाळणं सुद्धा एक कला आहे, अभ्यास आहे तो."

"मी सुद्धा आज घरा बाहेर पडले असते तर आम्हाला स्वरा, आणि आई बाबांच्या देखभालीसाठी कुणा परक्या व्यक्तीची गरज भासली असती.पण उद्या जर माझ्यावर नोकरी करण्याची वेळ आलीच तर मी नोकरी आणि घर दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न करेन.

सायालीचे आचार विचार ऐकून शोभाताईंच्या मनात, सायलीची  प्रतिमा उंचावली.मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्या म्हणल्या " तुझ्या गृहिणी करिअरसाठी अनेक उत्तम आशीर्वाद!"

समाप्त!

सायली सारख्या अनेक जणी आज गृहिणी असून आपल्या भूमिका चोख बजावत आहेत. तरी काही वेळा मनात विचार डोकावतोच की मी घरात असते,पैसे कमवत नाही, माझ्या शिक्षणाचा काय उपयोग वगैरे वगैरे पण सयांनो अश्या निराश होऊ नका तुम्ही स्वतः आपला गृहिणी म्हणून स्वीकार करा आणि सन्मान करा!☺️????

© तेजल मनिष ताम्हणे